1. वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार 2017, जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे.  
 2. ' molecular mechanisms controlling the circadian rhythm' या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 
 3. जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल  108 व्या नोबेल पुरस्काराची येथील कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून घोषणा करण्यात आली. 
 4. तसेच या पुरस्कारांतर्गत या शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच  8 लाख 25 हजार पौंडांची रक्कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
 5. ' सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र' यामध्ये या तिघांनी महत्वपूर्ण संशोधन केले आहे. या घड्याळरुपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. 
 6.  सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो. यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरुन गेल्यानंतर होणाऱ्या अवस्थेचा दाखला दिला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांच्या टीमने सजीवांमधील या अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुकं आणि प्रथिनांचा शोध लावला आहे.


 1. ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह.मो. मराठे (वय 77 वर्षे) यांचे निधन झाले. 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही मराठे यांची पहिली कादंबरी होती. दैनिक गोमंतक, दैनिक लोकसत्ता, लोकप्रभा, मार्मिक, नवशक्ती अशा नियतकालिकांमध्ये त्यांनी लिखाण केले होते. 'किर्लोस्कर' मासिकाच्या संपादक मंडळातही मराठे यांचा समावेश होता. 
 2. ह.मो. मराठे यांचा जन्म 2 मार्च 1940 रोजी झाला. सुरवातीच्या काळात त्यांनी  कोल्हापूरमध्ये अध्यापनाचे काम केले. ' साधना' मासिकात प्रसिद्ध झालेल्या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीमुळे त्यांची ओळख निर्माण झाली. 1972 मध्ये ही  कादंबरी पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाली होती. 
 3. पाच वर्षांपूर्वी झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठे यांनी अर्ज भरला होता. ' ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार' या जुन्या लेखामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मराठे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.


 1. राज्यातील 9 जिल्हे व 13 महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 7 ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.
 2. लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले.  मिशन इंद्र्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. या वेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.
 3. राज्यात  9 जिल्हे व 13 महापालिका क्षेत्रांत 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 0 ते 2 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. 
 4.  सध्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे, ते  येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले. 
 5. 7 ऑक्टोबरला ही मोहीम सुरू होणार असून दर महिन्याच्या 7 तारखेला ही मोहीम राबवली जाणार आहे.


 1. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या 1.8 मीटर उंचीच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण केले. 
 2. प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केला असून, तो राजघाट येथे बसविण्यात आला आहे. या पुतळ्याची किमत ही  आठ लाख  73 हजार इतकी असल्याचे प्रसिद्धीस असलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 3. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधिस्थळ असलेल्या राजघाट येथे पहिल्यांदाच  नवीन सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. 
 4.  ग्रेनाइटच्या दोन फूट उंचीवर हा पुतळा बसविला आहे. राजघाटावरील या पुतळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुधारणांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. 
 5. राजघाटावर दररोज  दहा हजार पर्यटक भेट देत असून, त्यात अनेक परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. पार्किंगच्या जागेतील इंटरप्रिटेशन केंद्राचे उद्‌घाटनही नायडू यांनी या वेळी केले. 
 6. 59 लाखांचे एलईडी स्क्रीनचा वापर करून गांधीजींच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. त्याशिवाय पर्यटकांना  गांधीजींवरील चित्रपट आणि त्यांची भाषणेही ऐकता येणार आहेत, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.