1. १५ नोव्हेंबर २०१७ रोजी देशातील चिघळलेल्या राजकीय आणि हिंसक परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी झिम्बाब्वेच्या लष्कराने मुगाबे सरकारला आपल्या ताब्यात घेत देशाचा कारभार सांभाळलेला आहे.
 2. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या राज्यात बर्‍याच काळापासून राजकीय वाद उसळलेला आहे, त्यामुळे हिंसक घटनांना सुरुवात झालेली होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
 3. झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेमधील सर्व बाजूने भूमीने वेढलेला देश आहे. हरारे शहर ही या देशाची राजधानी आहे


 1. हिंद महासागर क्षेत्रातल्या परकीय नौदलांबरोबर द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित संयुक्त जल सर्वेक्षणासाठी भारताचे 'INS सर्वेक्षक' १५ नोव्हेंबर २०१७ रोजी टांझानियातील दार-ए-सलाम बंदरावर पोहचले आहे.
 2. भारताच्या गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोग्राफी या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या टांझानियाच्या नौदल कर्मचाऱ्यांबरोबर संयुक्त जलक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
 3. 'INS सर्वेक्षक' हे भारतीय नौदलाच्या दक्षिणी आदेशाखाली असलेले जलक्षेत्राचे सर्वेक्षण करणारे एक जहाज आहे. हे जहाज दर्शक श्रेणीमधील दूसरे जहाज आहे. कोचीमध्ये या जहाजाचे तळ आहे.
 4. या जहाजामध्ये जलक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे, जसे की डीप सी मल्टी बीम इको साऊंडर सिस्टम, साइड स्कॅन सोनार आणि स्वयंचलित सर्वे यंत्रणा बसविलेली आहेत. तसेच जहाजावर एक चेतक हेलिकॉप्टर सुद्धा तैनात आहे.


 1. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी स्वीत्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये या १६३.४१ कॅरट वजनाच्या सर्वात मोठ्या हिर्‍याच्या लिलावात यावर सर्वाधिक ३३.५ दशलक्ष स्विस फ्रँक ($33.8 दशलक्ष) इतकी विक्रमी बोली लागली.
 2. ही बोली 'डी' कलर हिर्‍यासाठी बोलल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व बोलींमध्ये सर्वाधिक आहे. 'डी' हा हिर्‍यांच्या सर्वोच्च रंगासंबंधी वर्ग आहे, जो हे दर्शवितो की हा दगड पूर्णपणे रंगहीन आहे आणि अत्यंत दुर्मिळ आहे.
 3. हा हिरा फेब्रुवारी २०१६ मध्ये अंगोलामधील लुलो खानित आढळलेल्या ४०४ कॅरेटच्या दगडापासून तयार केला गेला आहे


 1. नेपाळ वीज प्राधिकरणाने (NEA) ७५० मेगावॅट क्षमतेचा पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी चायना थ्री जोर्जेस कॉर्पोरेशन या चीनी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम तयार करण्यासंबंधी करार केला आहे.
 2. प्रकल्पाला अंदाजे $1.8 अब्जचा खर्च येणार आहे. यासाठी तयार करण्यात येणार्‍या संयुक्त उपक्रमात CTGC चा ७५% हिस्सा असेल आणि उर्वरित २५% NEA चा असणार.
 3. पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प हा नेपाळमधील सर्वात मोठ्या जलसाठा आधारित जलविद्युत प्रकल्पांपैकी एक असेल.


Top

Whoops, looks like something went wrong.