1. जागतिक बँकेकडून ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2018: लर्निंग टू रियलाइज एज्युकेशन्स प्रॉमिस’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. अहवालाने असे स्पष्ट केले आहे की, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लाखो युवा विद्यार्थ्यांना संधी गमावण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि त्यामुळे भविष्यात  कमी वेतन मिळण्याची आशा असते, कारण त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षण त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षित करण्यास अपयशी ठरत आहे. तसेच जागतिक शिक्षणात उद्भवलेल्या ' शिक्षणाचे संकट' संबंधी चेतावणी देण्यात आली आहे.
 3. दारिद्र्य निर्मूलन आणि सर्वांसाठी सामायिक संधी आणि समृद्धी निर्माण करण्याच्या अभिवचनावर शिक्षण अपयशी ठरत आहे. 
 4. शाळेत बरीच वर्षे होऊनही, लाखो   विद्यार्थी मूलभूत गोष्टी वाचू, लिहू शकत नाही किंवा गणित सोडवू शकत नाही आहेत.
 5. गरिबी, संघर्ष, लिंग किंवा अपंगत्व यामधील भेदाभेदामुळे तरुण विद्यार्थी अगदी मूलभूत जीवनातले कौशल्य न घेता तरुण वयस्क अवस्थेपर्यंत पोहोचतात. 
 6. साक्षरता आणि गणिती क्षमता यावर आधारित आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात आढळून आलेल्या आकड्यांनुसार, गरीब देशांतील सरासरी विद्यार्थी श्रीमंत देशांतील विद्यार्थ्यांच्या 95% हून अधिक एवढ्या फरकाने वाईट प्रदर्शन केले.
 7. सन 2009-2015 या काळात पेरू देशाने त्यांच्या धोरणामधून शिक्षणात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वेगाने प्रगती साधलेली आहे. तसेच पुराव्याच्या आधारावर केंद्रित प्रयत्नांमुळे लायबेरिया, पापुआ न्यू गिनी आणि टोंगा यासारख्या अनेक देशांनी अगदी कमी कालावधीत लवकर वाचन क्षमतेते प्रगती साधली.
 8. शिक्षणाचे मूल्यांकन करणे, जेणेकरून ते मोजता येणारे लक्ष्य बनू शकेल. सुस्थापित विद्यार्थ्यांचे मूल्यांकनामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास, यंत्रणेच्या व्यवस्थापनात सुधार करण्यास आणि समाजाचे शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते. 
 9. सर्व मुलांकरिता शाळांना कार्य करण्यास तयार करणे.  खेळण्यासाठी परिसराचा विकास करून, तसेच लवकर पोषण आणि उत्तेजनेच्या माध्यमातून बौद्धिक विकास साधण्यास प्रोत्साहन देणे, जेणेकरून ते शाळेत शिक्षणसाठी घेण्यासाठी तयार होतील. प्रोत्साहनासाठी लोकप्रिय लोकांना शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तसेच शिकवण्यासाठी आमंत्रित करणे. शिक्षकांना शिकवण्यास मदत होईल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
 10. शिकण्यात सहभागी असलेल्यांना एकत्र आणणे. नागरिकांना एकत्र आणण्यासाठी, जबाबदारी वाढविण्यासाठी आणि शिक्षणाच्या सुधारणांसाठी राजकीय इच्छा निर्माण करण्यासाठी माहिती आणि संसाधनांचा वापर करणे. संरचना ते अंमलबजावणीपर्यंत शैक्षणिक सुधारणांच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, व्यवसाय समुदायांच्या समावेशासह भागीदारांना समाविष्ट करून घेणे.
 11. याशिवाय, शिक्षणसंबंधी समस्येचे निराकरण करण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी ठोस धोरणात्मक पावलांची शिफारस करण्यात आली.


 1. ऑल इंडिया रेडिओ (AIR) अर्थात 'आकाशवाणी' आता जपान, जर्मनी आणि अन्य देशांत आपली सेवा सुरु करणार आहे. 
 2.  अनिवासी भारतीयांना आकाशवाणीचा उपयोग व्हावा हा या सेवेमागील भारत सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 3.  कॅनडा, दक्षिण अफ्रिका आणि मालदिव या देशांमध्येही आकाशवाणीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आकाशवाणीतील वरिष्ठ अधिकारी अमलनज्योती मुझुमदार यांनी ' पीटीआय'ला दिली.
 4. सध्या बाह्य प्रसारण विभागाकडून (ईएसडी)  150 देशांत 27 भारतीय भाषांमध्ये आकाशवाणीची सेवा दिली जात आहे. यांपैकी  14 भाषांमध्ये शेजारील देशांत तसेच दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सेवा पुरवण्यात येणार आहे. यापुढे अनेक देशांत आकाशवाणीच्या सेवांचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवल्याचे मुझुमदार यांनी सांगितले. 
 5. तसेच आकाशवाणी  जपान, कॅनडा, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, मालदीव आणि इतर काही राष्ट्रकुल देशांत नव्या सेवा सुरु करणार असल्याचे मुझुमदार यांनी सांगितले. नुकताच आकाशवाणीचा हा प्रस्ताव बाह्य प्रसारण विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्याता आला होता.


 1. जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले साईबाबांचे शिर्डी अखेर हवाई मार्गाने जोडले गेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले असून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
 2. शिर्डीमध्ये विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी   ९९० च्या दशकात करण्यात आली होती. हवाई सेवेमार्गे शिर्डीला पोहोचण्यासाठी मुंबई किंवा औरंगाबादला उतरावे लागते. मुंबईपासून सुमारे  पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून  तीन तास प्रवास करुन शिर्डीला जाता येते. शिर्डीत रेल्वे स्थानक आहे. मात्र लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनी जायचे झाल्यास  कोपरगाव किंवा मनमाडला उतरावे लागते.
 3. शिर्डीत राज्यासह देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने शिर्डीत विमानतळ व्हावा अशी मागणी केली जात होती. अखेर दोन तपांच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी विमानतळाचे काम मार्गी लागले  आहे.  राहता तालुक्यातील काकडी गावात हे विमानतळ असून या विमानतळाचे रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  शिर्डीत विमानतळ झाल्याने आता  मुंबईतून शिर्डीला    ५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.
 4. सध्या शिर्डी विमानतळावरून   दिवसा विमाने उड्डाण करू शकतील. रात्री विमानसेवा सुरू व्हावी, म्हणून धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू आहे. ते काम जानेवारीत पुर्ण होण्याची शक्यता आहे.


Top