1. तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अलीकडील इतिहासात जगातील सर्वांत खोल 'बैकल' सरोवर सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.
 2. सरकारने या प्रदेशातील मासेमारीवर बंदी घातल्यानंतर शतकांपासून सरोवरात राहणारे मासे आता धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, 'बैकल' सरोवर या प्रमुख आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळी हानीकारक घटनांची एक श्रृंखला दिसून आलेली आहे. त्यात ओमुल मास्यांचे गायब होणे, दुर्गंधीत शेवाळची जलद वाढ होणे आणि त्याच्या विशाल अश्या 3.2 दशलक्ष हेक्टर (7.9 दशलक्ष एकर) क्षेत्रामधील पाण्यात आढळणार्‍या स्पंजच्या विशिष्ट प्रजातींचा मृत्यू अश्या घटनांचा समावेश आहे.
 3. 15 वर्षांपासून या सरोवरामधील ओमुलचे एकूण बायोमास अर्ध्याहून अधिक कमी म्हणजेच 25 मेट्रिक टनवरून केवळ 10 मेट्रिक टनपर्यंत पोहचलेले आहे.सरोवराचा पाणीसाठा हवामानाशी बांधलेला आहे. आता तेथे दुष्काळ आहे, नद्या उथळ झाल्या आहेत आणि त्यात कमी पोषक तत्वे आढळून येत आहेत. सरोवरचा पृष्ठभाग गरम होत आहे आणि ओमुलला गरम पाणी आवडत नाही.
 4. जगातील न गोठलेल्या गोड्या पाण्याच्या एक पंचमांश भागाचा धनी असलेला रशियाच्या सायबेरियातील 'बैकल' सरोवर हा " उत्क्रांतिवादाच्या विज्ञानासाठी अपवादात्मक मूल्य" दर्शविणारे एक नैसर्गिक आश्चर्य आहे, जे UNESCO ने जागतिक वारसा ठिकाण म्हणून आपल्या यादीत नोंदवलेले आहे.
 5. या सरोवरची खोली सरासरी  744.4 मीटर इतकी आहे. तसं तर कॅस्पियन सागर हा जगातला सर्वाधिक जलसाठा असलेले सरोवर आहे आणि त्यानंतर बैकलचा क्रमांक लागतो. मात्र कॅस्पियनमधील पाणी खारे आहे, त्यामुळे बैकल हे जगातले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. जैव विविधतेच्या दृष्टीने सरोवरात 3,600 वनस्पती आणि पाण्यांच्या प्रजाती वास्तव्य करतात.


 1. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) हैदराबाद आणि IIT बॉम्बे येथील संशोधकांनी त्वचेच्या कर्करोगाच्या पेशीवर उपचार पद्धती सादर करण्याकरिता संशोधनादरम्यान वनस्पतींपासून काढलेल्या अर्काचा वापर केला.
 2. वनस्पतीपासून मिळालेला अर्क कर्करोगाच्या पेशींसाठी विशेष रूपाने विषारी ठरते, कारण की याच्या वापरानंतर  रिएक्टिव ऑक्सीजन स्पेसीज (ROS) च्या निर्मितीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे, जेव्हा की डाय फोटोथर्मल थेरेपीच्या माध्यमाने कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यास मदत होते.
 3.  एंथोसेफलस कदंबा’ या भारतीय औषधी वनस्पतीच्या क्लोरोफिलने समृद्ध बायोमॉलेक्युलर अर्काचे नॅनोपार्टिकल फॉर्मुलेशन जेव्हा एका नियर-इंफ्रारेड डाय ( IR-780) सोबत मिसळल्या जाते, तेव्हा ते मिश्रण त्वचेच्या कर्करोगाच्या पेशींना मारण्यास सक्षम होते.
 4. वनस्पतींचा अर्क हाइड्रफोबिक असल्याकारणाने पेशी याला हळू-हळू शोषून घेतात, मात्र अर्काचे नॅनोफॉर्म्यूलेशन याची  हाइड्रोफोबिक क्षमता कमी करते, ज्यामुळे त्या प्रक्रियेत वाढ होते.
 5. नॅनोफॉर्म्यूलेशनला गरम करण्याकरिता नियर-इंफ्रारेड प्रकाशकिरणांचा वापर केला गेला.  नियर-इंफ्रारेड प्रकाशकिरणांच्या वापरातून डाय गरम होते आणि पॉलीमर मेम्ब्रेनमधून अर्काला बाहेर निघण्यास सुविधा प्रदान करते.
 6. या विकिरण प्रक्रियेनंतर नॅनोपार्टिकलांचे तापमान, ज्यामध्ये डाय आणि अर्क यांना मिसळले जाते, ते  51 डिग्री सेंटीग्रेड होते, जेव्हा की  42 डिग्री सेंटीग्रेडहून अधिक तापमानावर या पेशी नष्ट होतात. 4-5 मिनटांच्या विकिरण प्रक्रियेनंतर, कर्करोगाच्या जवळपास 80% पेशी नष्ट केल्या जाऊ शकतात.
 7. या शोधाचे परिणाम ‘बायोलॉजिकल मॅक्रोमोलेक्युल्स’ या नियतकालिकेत प्रकाशित केले गेले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.