1. इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे माजी महापौर सदाशिवराव देशमुख यांचे २५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
 2. साताऱ्यातील भूमीपुत्र असलेले देशमुख इंग्लंडमध्ये महापौर पद भूषवणारे ते पहिले मराठी व्यक्ती होते.
 3. २० ऑक्टोबर १९३४ रोजी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील निमसोड गावामध्ये सदाशिवराव यांचा जन्म झाला होता.
 4. १९६२ साली त्यांनी लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
 5. लंडनमध्ये त्यांनी एलएलएम, एमफील, पीएचडी प्राप्त केली.
 6. त्यानंतर समाजसेवेचा वसा घेतलेल्या देशमुखांनी लंडनमध्ये कार्याला सुरूवात केली.
 7. १९९४ ते १९९५ या काळात त्यांनी कॅमडेनचे उपमहापौरपद भूषवले होते.
 8. त्यानंतर १९९५ ते १९९६ यादरम्यान देशमुख यांनी या शहराचे महापौर म्हणून कार्य केले.


7 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेतले गेले.

बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळांना मुदतवाढीसाठी अध्यादेश काढण्यास मान्यता:-

 1. राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे प्रशासक आणि प्रशासकीय मंडळे यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये दुरूस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 2. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमात सध्या विशेष परिस्थितीत 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची तरतूद आहे.
 3. कायद्यांतर्गत कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे प्रशासक आणि प्रशासकीय मंडळांना 1 वर्षांची मुदत दिली जाते.
 4. शिवाय, कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 13 जून 2017 रोजी अध्यादेश काढण्यात आला आहे. निवडणुका नव्या नियमानुसार पार पडाव्या यासाठी ही मुदतवाढ दिली जात आहे.

नक्षलग्रस्त भागासाठी पोलीस दलास स्वत:चे हेलिकॉप्टर मिळणार:-

 1. राज्याच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात चालवल्या जाणार्‍या नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 2. यासोबतच राज्य शासनाच्या वापरासाठीही दुसरे नवीन हेलिकॉप्टर घेण्यात येणार आहे.

जर्मन बँकेकडून महापारेषणला कर्ज मिळण्यासंबंधी राज्य सरकारकडून पुष्टी प्रमाणपत्र:-

 1. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रकल्प राबविण्यासाठी जर्मन डेव्हलपमेंट बँक (KFW) कडून 12 दशलक्ष युरो इतके कर्ज महापारेषण कंपनीला मिळणार आहे.
 2. त्यासाठी राज्य शासनाकडून पुष्टी प्रमाणपत्र देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
 3. भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत जर्मनीच्या मदतीने राज्यात महापारेषण कंपनीमार्फत 27 प्रकल्प राबविण्यास मान्यता मिळालेली आहे. यासाठी ही आर्थिक मदत मिळणार आहे.

मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या नामांतरणासाठी मंजूरी:-

 1. भारतामधील आद्य अर्थशास्त्र विभाग असलेल्या ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ विभागाला जागतिक संस्थेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्याचे नामकरण ‘मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था (मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी)’ असे करण्यासाठी आणि 2017-18 या वित्त वर्षापासून पुढील पाच वर्षे 25 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.
 2. यापुढे मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था ही उपयोजित अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण, संख्यात्मक गणिती वित्तीय अर्थशास्त्र व माहिती विज्ञान या विषयासंबधी जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून कार्य करेल.
 3. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विभागाला प्रगत अध्ययन केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे.
 4. स्वायत्त दर्जा प्राप्त असलेल्या या विभागाचा अभ्यासक्रम आजमितीस अर्थशास्त्र विषयातील जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांमध्ये गणला जातो.


 1. मोदी सरकारने माजी सीबीआय प्रमुख आर के राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नेमणूक केली आहे.
 2. उच्चायुक्तपदी सहसा आयएफएस (भारतीय विदेश सेवा) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रथा असताना मोदी सरकारकडून या राजकीय नियुक्तीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 3. ७६ वर्षीय राघवन हे जानेवारी १९९९ ते एप्रिल २००१ या कालावधीत सीबीआयच्या संचालकपदी होते.
 4. वर्ष २००२मध्ये त्यांच्याकडे गुजरात दंगलीच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली होती.
 5. तपासानंतर राघवन यांनी मोदी यांना क्लीनचिट दिली होती.
 6. २००८मध्ये राघवन यांना सर्वोच्च न्यायालयाने ग्रोधा दंगलीचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती.
 7. गुजरात दंगलीपूर्वी राघवन यांना २००६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.
 8. राघवन यांनीच भारतातील पहिला सायबर सेल स्थापन केला होता.
 9. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भ्रष्टाचारप्रकरणाची यांनीच चौकशी केली होती.
 10. २०००मध्ये मॅच फिक्सिंगचे प्रकरणही राघवन यांच्याकडेच सोपवण्यात आले होते.
 11. या प्रकरणात मोहम्मद अजहरूद्दीन आणि अजय जडेजा यांचे क्रिकेटचे करिअर संपुष्टात आले होते.


 1. भारतीय वंशाचे ज्येष्ठ सनदी अधिकारी जे वाय पिल्ले यांची सिंगापूरचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
 2. टोनी टॅन केंग याम यांनी राष्ट्रपतीपदाची ६ वर्षे पूर्ण केल्यानंतर जे वाय पिल्ले यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली आहेत.
 3. पिल्ले हे कौन्सील ऑफ प्रेसिडेंशियल अॅडवायजर्सचे अध्यक्ष असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते या पदावर राहतील.
 4. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष परदेश दौऱ्यावर असताना, पिल्ले यांनी सुमारे ६०वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.
 5. जे वाय पिल्ले यांचे संपुर्ण नाव जोसेफ युवराज पिल्ले असे आहे.
 6. त्यांचा जन्म १९३४साली क्लांग येथे (सध्या मलेशिया) येथे झाला.
 7. इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सायन्स अॅंड टेक्नॉलजी, लंडन विद्यापिठ येथे त्यांनी शिक्षण घेतले.
 8. पिल्ले हे सर्वोत्तम ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात.
 9. सिंगापूरचे संस्थापक पंतप्रधान ली कुआन यू हे त्यांना ‘इक्वल टू द बेस्ट ब्रेन्स इन अमेरिका’ असे संबोधत असत.
 10. पिल्ले यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि राष्ट्रीय विकास या मंत्रालयांमध्ये पर्मनंट सेक्रेटरी म्हणून कामकाज पाहिले होते.
 11. ते सिंगापूर एक्स्चेंज, डीबीएस बॅंकेचे अध्यक्षही होते.
 12. तसेच जीआयसी आणि मॉनेटरी अथॉरिटी आफ सिंगापूरचे ते व्यवस्थापकीय संचालकही होते.
 13. पिल्ले हे सिंगापूर एअरलाइन्सचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
 14. १९७२ साली केवळ १२ विमानांसह सुरु झालेली ही विमानसेवा जगातील उत्कृष्ठ विमानसेवांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
 15. पिल्ले यांनी सिंगापूर एअरलाइन्सच्या अध्यक्षपदाचा कार्यभार १९९६पर्यंत सांभाळला.


Top