
1115 01-Oct-2017, Sun
- ऑल इंडिया रेडिओ (AIR) अर्थात 'आकाशवाणी' आता जपान, जर्मनी आणि अन्य देशांत आपली सेवा सुरु करणार आहे.
- अनिवासी भारतीयांना आकाशवाणीचा उपयोग व्हावा हा या सेवेमागील भारत सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.
- कॅनडा, दक्षिण अफ्रिका आणि मालदिव या देशांमध्येही आकाशवाणीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आकाशवाणीतील वरिष्ठ अधिकारी अमलनज्योती मुझुमदार यांनी 'पीटीआय'ला दिली.
- सध्या बाह्य प्रसारण विभागाकडून (ईएसडी) 150 देशांत 27 भारतीय भाषांमध्ये आकाशवाणीची सेवा दिली जात आहे. यांपैकी 14 भाषांमध्ये शेजारील देशांत तसेच दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सेवा पुरवण्यात येणार आहे. यापुढे अनेक देशांत आकाशवाणीच्या सेवांचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवल्याचे मुझुमदार यांनी सांगितले.
- तसेच आकाशवाणी जपान, कॅनडा, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, मालदीव आणि इतर काही राष्ट्रकुल देशांत नव्या सेवा सुरु करणार असल्याचे मुझुमदार यांनी सांगितले. नुकताच आकाशवाणीचा हा प्रस्ताव बाह्य प्रसारण विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्याता आला होता.