Free Demo Class
मुलाखतीला सामोरे जाताना आपण आहोत त्याहून वेगळे आहोत असा न दाखवता, जसे आहोत तसे पॅनलला सामोरे गेलेले उत्तम! त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आतापर्यंत संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर, खोटेपणाचा आव न आणता, प्रामाणिकपणे उत्तर देणे म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे ज्ञानाची परीक्षा नव्हे, कारण तुमच्या ज्ञानाची परीक्षा ही मुख्य परीक्षेतच झालेली असते. मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपल्याला एखादी गोष्ट माहीत असण्यापेक्षा आपले ज्ञान इतरांसमोर कसे मांडता याला जास्त महत्त्व असते.
मुलाखत म्हणजे खेळाचा अंतिम सामना! मागच्या काही वर्षांचा आणि विद्यार्थिसंख्येचा अंदाज पाहता साधारणत: ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेतली जाते. (अर्थात असा काही नियम नाही) यापकी, पॅनलने आपल्याला प्रश्न विचारायचा वेळ वजा केल्यास उमेदवाराच्या वाटय़ाला फक्त २०-२५ मिनिटे येतात. या २०-२५ मिनिटांत उमेदवाराला स्वत:ला सिद्ध करायचे असते.