मराठी प्रश्नमंजुषा क्र. ०१


खालील पर्यायातून कोणता पर्याय योग्य नाही तो ओळखा?

अ) ‘स्वल्प’ या शब्दाचा संधी विग्रह = सु + अल्प

ब) ‘यश: + धन’ या शब्दाची संधी = यशोधन

क) ‘मनश्चक्ष’ या शब्दाचा संधी विग्रह = मना + चक्षू

ड) ‘क्षुप्तीपासा’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह = क्षुध् + पिपासा

Show Answer

योग्य जोड्या लावा.

१) वाटण्याचा अक्षता वाटणे.        i) उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे.

२) जीव गहाण ठेवणे.                 ii) स्पष्टपणे नाकारणे.

३) खाल्ल्या घरचे वासे मोजणे.     iii) अतिशय वैर असणे.

४) मधून विस्तव न जाणे.           iv) कोणत्याही त्यागास तयार असणे.

अ) १-iii, २-iv, ३-i, ४-ii

ब) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

क) १-ii, २-iv, ३-i, ४-iii

ड) १-iii, २-iv, ३-ii, ४-i

Show Answer

पुढीलपैकी कोणते शब्द कानडी आहेत ते ओळखा?

अ) बिढार, अण्णा, मुरकुंडी, लवंग

ब) नाणावटी, भिशी, नवलकथा, चरखा

क) पायमल्ली, दोस्त, खबरदार, जहांगीर

ड) फणस, पायरी, साबूदाणा, कमांडर

Show Answer

‘संनिहित भूतकाळ’ असलेले वाक्य शोधा?

अ) सूर्य पश्चिमेला मावळतो.

ब) नेहमी खोटे बोलतो.

क) मी उठतो, तोच तुम्ही पसार!

ड) सूर्य रोज उगवतो.

Show Answer

योग्य जोड्या लावा.

विभक्ती प्रत्यय,            कारकार्थ

१) चतुर्थी               i) झा, झी, झे (संबंधी)

२) पंचमी              ii) त, ई, आ(अधिकरण)

३) षष्ठी                iii) स, ला, ते, (संप्रदान)

४) सप्तमी           iv) ऊन, हून (अपादान)

अ) १-ii, २-iv, ३-i, ४-iii

ब) १-iii, २-i, ३-iv, ४-ii

क) १-ii, २-iii, ३-i, ४-iv

ड) १-iii, २-iv, ३-i, ४-ii

Show Answer

‘विराट कोहलीने’ षष्टकार मारून सामना जिंकला?

वरील वाक्याचे संयुक्त वाक्यात रुपांतर करा?

अ) जर विराटने षष्टकार मारला नसता तर सामना जिंकला नसता.

ब) विराटने असा षष्टकार मारला की त्याने सामना जिंकला.

क) जेव्हा विराटने षष्टकार मारला तेव्हा सामना जिंकला.

ड) विराट कोहलीने षटकार मारला आणि सामना जिंकला.

Show Answer

‘यावर्षी शेजारची सलोनी भरतनाट्यम स्पर्धेतील राणी होणार आहे’ या वाक्यातील विधेय विभाग ओळखा?

अ) यावर्षी भरतनाट्यमतील राणी होणार आहे.

ब) यावर्षी भरतनाट्यमतील राणी

क) भरतनाट्यमतील राणी शेजारची होणार आहे.

ड) सलोनी भरतनाट्यमतील राणी होणार आहे.

Show Answer

पुढील पर्यायांमध्ये तीन वाक्यांचा एक गट आहे. त्यातील गटात न बसणारे वाक्य कोणते ते ओळखा?

अ) यशस्वी आंबा खाते.

ब) यशस्वीने आंबा खाल्ले

क) यशस्वीकडून आंबा खाल्ले गेले.

ड) यशस्वीकडून आंबा खाण्यात आले.

Show Answer

खालील पर्याय असलेली जोडी ओळखा? (समास)

अ) अंनंत – ज्याला अंत नाही ते. (नत्र बहुव्रिही समाज)

ब) अधिराणी – कर्मधारय

क) असीम – ज्याला सीमा नाही ते. (कर्मधारय समाज)

ड) अखंड – जिला खंड नाही तो (नत्र बहुव्रिही समाज)

Show Answer

योग्य जोड्या लावा.

१) संकेतार्थी वाक्य                    i) वैभवीला आंबा आवडतो.

२) विध्यर्थी वाक्य                     ii) माझी बहीण आज बाहेर गावी गेली.

३) विधानार्थी वाक्य                  iii) राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा मान राखावा

४) केवल वाक्य /शुद्ध वाक्य      iv) जे चकाकते ते सोने नसते.

अ) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ब) १-iii, २-iv, ३-i, ४-ii

क) १-iv, २-ii, ३-i, ४-iii

ड) १-iv, २-ii, ३-iii, ४-i

Show Answer

Top