अर्थशास्त्र प्रश्नमंजुषा 


खालील पर्यायामधून योग्य विधाने निवडा.

१) घाऊक किंमत निर्देशांक किंमतीतील (WPI) हा वितरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील किंमतीतील बदल विचारात घेत असल्याने चलनवाढ मोजण्यासाठीचे प्राथमिक मापक आहे.

२) घाऊक किंमत निर्देशांक प्राथमिक वस्तू, इंधन व शक्ती आणि वस्तुनिर्माण या विविध गटातील महत्त्वाच्या वस्तूंच्या घाऊक किंमतीतील कल दाखवितो.

३) WPI मध्ये तीन गटांचा भार प्राथमिक वस्तू – २०.१२% इंधन व शक्ती १४.९१% व वस्तुनिर्माण गटाचा भार ६४.९७% आहे.

अ) फक्त १ व २ योग्य
ब) १, २ व ३ योग्य
क) फक्त २ व ३ योग्य
ड) फक्त १ योग्य

Show Answer

‘फिलिप्स वक्ररेषा’ कशाचा सहसंबंध दाखविते?

अ) विकासाचा दर व बेरोजगारीचा दर
ब) महागाईचा दर आणि दरडोई उत्पन्न
क) बेरोजगारीचा दर आणि महागाईचा दर
ड) दरडोई उत्पन्न आणि विकासाचा दर

Show Answer

‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ याबाबत योग्य पर्याय निवडा.

१) या योजनेंतर्गत वर्षाच्या कोणत्याही हंगामातील एका पिकासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के एवढा एकसमान विम्याचा हफ्ता भरावा लागेल.

२) कापणीनंतर (post-harvest) चक्रीवादळे व अकाली पावसाने होणारे नुकसान या योजनेत भरून दिले जाते.

अ) फक्त १ योग्य
ब) फक्त २ योग्य
क) १ व २ दोन्ही योग्य
ड) यापैकी एकही नाही

Show Answer

साक्षरता दराबाबत राज्यांचा योग्य उतरता क्रम लावा.

अ) गोवा, सिक्कीम, गुजरात, त्रिपुरा
ब) गोवा, गुजरात, त्रिपुरा, सिक्कीम
क) गोवा, त्रिपुरा, सिक्कीम, गुजरात
ड) यापैकी एकही नाही

Show Answer

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

१) घाऊक किंमत निर्देशांक (WPI) पूर्वी आठवड्याला काढला जात असे. आता मात्र तो दर महिन्याला काढला जातो.

२) चलनवाढीचा दर दोन पद्धतींनी काढला जातो. यामध्ये वर्ष-ते-वर्ष पद्धतीने काढलेल्या चलनवाढीला Headline Intiation किंवा Topline Intiation असे म्हणतात.

अ) फक्त १ योग्य    
ब) फक्त २ योग्य
क) १ व २ योग्य    
ड) यापैकी एकही नाही

 

Show Answer

प्रतिपादन (A) : चलनाच्या अवमूल्यनाने निर्यातीस चालना मिळू शकते. कारण

(R) : अवमूल्यनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील देशाच्या उत्पादितांची किंमत कमी होऊ शकते.(१९९९)

अ) A व R दोन्ही योग्य आहेत व R हे A योग्य स्पष्टीकरण आहे.    
ब) A व R दोन्ही योग्य आहेत व R हे A योग्य स्पष्टीकरण नाही.
क) A योग्य आहे पण R अयोग्य आहे.
ड) A अयोग्य आहे पण R योग्य आहे.

 

Show Answer

स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) विषयी उत्पादनाविषयी खालील विधाने अभ्यासा.

१) GNP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होते.

२) GNP मुळे अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते.

३) GDP>GNP असेल तर देशातील बरेचशे उत्पन्न परदेशात निघून जातेय.

अ) १ व २ योग्य    
ब) सर्व विधाने योग्य 
क) १ अयोग्य, २ व ३ योग्य
ड) सर्व विधाने अयोग्य

 

Show Answer

योग्य जोड्या लावा.

१) पहिले औद्योगिक धोरण        i) १९५६

२) दुसरे औद्योगिक धोरण         ii) १९४८

३) नवीन औद्योगिक धोरण        iii) १९९१

४) MRTP कायदा लागू           iv) १९६९

अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv         
ब) १-ii, २-i, ३-iii, ४-iv
क) १-iv, २-ii, ३-iii, ४-i    
ड) १-iii, २-i, ३-ii, ४-iv

 

Show Answer

रंगराजन समितीच्या दारिद्र्याच्या आकडेवारीनुसार (२०११-१२) सर्वाधिक दारिद्य असणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम काय आहे?

१) छत्तीसगड

२) मणिपूर

३) मध्यप्रदेश

४) ओडिशा

अ) २, १, ३, ४        
ब) १, २, ४, ३
क) १, ४, २, ३        
ड) १, ३, ४, २

 

Show Answer

‘रमाई आवास योजना’ केंद्र सरकारची ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक तरतुदीची योजना असून त्याच्या लाभार्थ्यांविषयी योग्य विधाने निवडा.

१) लाभार्थी दारिद्यरेषेखालीच नवबौद्ध व अनुसूचित जातीमधील असावा.

२) लाभार्थ्यांची निवड आमसभा करेल.

३) लाभार्थी त्या राज्याचा रहिवासी असावा.

अ) फक्त १ व ३ योग्य
ब) फक्त २ व ३ योग्य
क) १, २, ३ योग्य
ड) फक्त १ व २ योग्य

Show Answer

Top