भूगोल प्रश्नमंजुषा क्र.०१ 


सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे ओळखा.

१) सागरी गुहा (cave)

२) सागरी कमानी (Arches)

३) समुद्रकडा (Sea Cliff)

४) पुळण (Beaches)

५) वाळूचे दांडे (Offshore Bars)

अ) १,२,३,४        
ब) २,३,४,५
क) १,२,३        
ड) १,२,३,४,५

 

Show Answer

अवसादी/स्तरित खडकांच्या (Sedimentary Rocks) संदर्भात खालील  विधाने विचारात घ्या.

१)अवसादी खडक पृथ्वीच्या पृष्ठभागावर जलीय व्यवस्थेमुळे (Hydrological System) तयार होतात.

२) अवसादी खडकाच्या निर्मितीत पूर्वीपासूनच असणाऱ्या खडकांच्या झीजप्रक्रियेचा समावेश होतो.

३)अवसादी खडकांमध्ये जीवाश्मे असतात.

४) अवसादी खडकांची रचना स्तरीय स्वरुपाची असते.

योग्य विधाने कोणती ती निवडा.

अ) १ व २ योग्य     
ब) १ व ४ योग्य
क) २, ३ व ४ योग्य  
ड) १, २, ३ व ४ योग्य

Show Answer

योग्य जोड्या लावा.

सरोवरे                   राज्य

१) पुलिकात            i) महाराष्ट्र

२) चिल्का              ii) आंध्रप्रदेश

३) सांभार              iii) ओडिशा

४) लोणार             iv) राजस्थान

अ) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

ब) १-iii, २-ii, ३-iv, ४-i

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-i, २-iii, ३-iv, ४-ii

Show Answer

खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग हा जास्तीत जास्त राज्यांतून जातो?

अ) NH-४

ब) NH-६

क) NH-८

ड) NH-७

Show Answer

खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम घाटात उगम पावतात?

१) कृष्णा

२) कावेरी

३) गोदावरी

अ) फक्त १ व २

ब) फक्त २ व ३

क) फक्त १ व ३

ड) १, २ व ३

Show Answer

खालील माडीया गोंड जमातीविषयी योग्य विधाने निवडा.

१) गोंड जमातीचीच ही उपजमात असून, गोंड जमातीतील इतर उपजमातीपेक्षा ती कमी मागासलेली आहे.

२) ‘माडीया’ म्हणजे माड वृक्षाच्या प्रदेशात राहणारे लोक.

३) शिकारीला माडीयांच्या भाषेत ‘वेटावंदना’ म्हणतात.

अ) १ व २ योग्य    
ब) २ व ३ योग्य
क) १ व ३ योग्य    
ड) यापैकी नाही

 

Show Answer

योग्य जोड्या लावा.

वनप्रकार                     वृक्ष

१) सदाहरित             i) शेवरी

२) निमसदाहरित       ii) बोर

३) पानझडी              iii) तेल्याताड

४) झुडपी व काटेरी    iv) पळस

अ) १-iii, २-i, ३-iv, ४-ii

ब) १-iii, २-i, ३-ii, ४-iv

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-i, २-ii, ३-iv, ४-iii
 

Show Answer

योग्य जोड्या लावा.

१) डोंगरी वारे             i) नॉरईस्टर

२) दरीतील वारे           ii) उर्ध्व उतार वारे

३) वायव्य पश्चिमी वारे   iii) अधोमुख उतार वारे

४) पूर्व ध्रुवीय वारे        iv) गर्जणारे चाळीस

अ) १-iii, २-ii, ३-iv, ४-i

ब) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-i, २-ii, ३-iii, ४-iv
 

Show Answer

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने निवडा.

१) जगात सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य मौसिनराम या ठिकाणी होते.

२) मौसिनराम शंकूसारख्या लवनस्तंभ (Funnel Shaped) असणाऱ्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे.

३) खासी टेकड्या पेनिन्सुलार पठाराच्या (Peninsular Plateau) प्रदेशाचा भाग तयार करतात.

अ) फक्त १ योग्य    
ब) १ व २ योग्य
क) २ व ३ योग्य    
ड) १, २ व ३ योग्य

 

Show Answer

भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात खारफुटीची (mangrove) वने,सदाहरित वने आणि पानझडी वने यांचे मिश्रण आढळते?

अ) उत्तर तटीय आंध्र प्रदेश    
ब) नैॠत्य बंगाल
क) दक्षिणी सौराष्ट्र    
ड) अंदमान व निकोबार बेटे

 

Show Answer

Top