mpsc current affairs

गुगल प्रोजेक्ट लून


6424   27-May-2017, Sat

दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्याच्या हेतुने गुगल X या कंपनीच्या प्रोजेक्ट लून (Project Loon) ची सुरुवात दि. 18 फेब्रुवारी 2016 रोजी श्रीलंकेतील पुरेसा परिसरात हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून केली गेली. 

काय आहे प्रोजेक्ट लून?

 • प्रोजेक्ट लून (Project Loon) मध्ये गुगल कंपनी 18 ते 25 किलोमीटर उंचीवर जाऊ शकतील असे हेलियम भरलेले फुगे आसमंतात सोडते. 
 • या फुग्यांमार्फत वायरलेस सिग्नल सोडले जातात. प्रत्येक फुगा त्याच्या परिघाच्या 40 किमी क्षेत्रात वायरलेस ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. 
 • ही सुविधा डोंगराळ, वाळवंटी वा इतर दुर्गम भागातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल. 
 • या प्रकल्पाअंतर्गत गुगल कंपनी स्वस्त दरात डेटा कव्हरेज पाठवण्याचे वचन देते. 

प्रोजेक्ट लूनचा इतिहास व घटनाक्रम 
2008 साली गुगलने दक्षिण अमेरिकेतील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी बलूनच्या सहाय्याने हवेत बेस स्टेशन (Base Station) सोडणाऱ्या स्पेस डाटा कॉर्पोरेशन (Space Data Corp)शी करार करायचे ठरवले होते; परंतु करार करण्यात आला नाही.2011 साली गुगल X या कंपनी बरोबर गुगलने प्रोजेक्ट लूनवर काम करायला सुरुवात केली. 

 • जून 2013 मध्ये "प्रोजेक्ट लून' ची औपचारिक घोषणा करण्यात आली. 
 • 16 जून 2013 ला गुगलने न्यूझीलंडमध्ये 30 बलून सोडून या प्रकल्पासाठी प्रयोग केला आणि त्यात यश आले. 
 • नंतर गुगलने जगभरात असे 300 बलून सोडण्याचे ठरवले. 
 • मे - जून 2014 मध्ये असाच बलूनचा प्रयोग ब्राझील येथे झाला. 
 • 28 जुलै 2015 ला गुगलने श्रीलंकेच्या सरकारबरोबर करार केला. 
 • 18 फेब्रुवारी 2016 रोजी श्रीलंकेत हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून प्रोजेक्ट लूनची सुरुवात केली गेली. 

भव्य फुगा (Giant Balloon) 

 • उत्पादक कंपनी रेवन एरोस्टार (Raven Aerostar)
 • हा भव्य फुगा 0.7 मि.मी. जाडीच्या पॉलिथीनपासून बनलेला आहे. 
 • फुग्याच्या तळाशी एक चौकोनी डबा आहे, ज्याद्वारे संवेदन (Signal) सोडले वा मिळवले जातात. 
 • हा फुगा सौरऊर्जेवर काम करतो. 
 • जगात अजूनही 60% लोक इंटरनेटच्या सुविधेपासून वंचित आहेत. शिवाय दुर्गम भागातील 4.3 अब्ज जनतेपर्यंत इंटरनेटचे टॉवर उभारणे कठीण असल्याचे दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे. जवळपास 100 दिवस हा फुगा स्थितांबरात राहू शकतो. 
 • भारतामध्ये प्रोजेक्ट लूनची सुविधा देण्याची परवानगी मिळावी म्हणून "गुगल' प्रयत्न करत आहे. 

mpsc current affairs

‘मोदीराज’ची ३ वर्षे : मोदीशाहीची लक्षणे


2814   26-May-2017, Fri

सरकार, पक्षावर संपूर्ण पकड  गुजरातवर सलग बारा वष्रे एकहाती हुकूमत चालविणारे नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व एव्हाना सर्वानाच माहीतच होते, पण जरा दुरून. २६ मेपर्यंत २०१४ रोजीपर्यंत देशाने त्यांना प्रत्यक्ष अनुभवले नव्हते, त्यांची भलीबुरी कार्यशैली जवळून पाहिली नव्हती. पण तीन वर्षांनंतर मोदी राजवटीच्या व्यवच्छेदक लक्षणांची पुरेशी कल्पना देशाला आलीय, असे म्हणता येईल. त्यातील जाणवलेली काही लक्षणे..

नोकरशाहीवर भिस्त

वरिष्ठ सहकारी मंत्र्यांवर नव्हे, तर निवडक नोकरशाहीवर सर्वाधिक भिस्त हे मोदीशैलीचे सर्वात महत्त्वाचे लक्षण. एकीकडे कॅबिनेट मंत्र्यांच्या हाती काही ठेवले नसल्याचे चित्र असताना, दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, अतिरिक्त प्रधान सचिव पी. के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव अजित सेठ, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, गृहसचिव राजीव मेहरिषी आदी नोकरशहा अत्यंत प्रभावशाली. पंतप्रधान कार्यालयाचा प्रत्येक गोष्टीतील कथित हस्तक्षेप, तपशिलांवर बारीक नजर यावर काही मंत्री नाराज आहेत. पण त्यांना कोण भीक घालतंय? आणि याविरुद्ध बोलण्याची प्राज्ञा आहे तरी कोणाकडे?

सरकारपक्षावर संपूर्ण पकड

अटलबिहारी वाजपेयी व मोदी या दोन स्वयंसेवक पंतप्रधानांमध्ये व्यक्तिमत्त्वांच्या मूलभूत फरकांबरोबरच आणखी एक फरक होता तो म्हणजे मोदींची सरकार व पक्षांवर संपूर्ण पकड. लालकृष्ण अडवानी व संघपरिवारामुळे तसे भाग्य वाजपेयींना लाभले नव्हते. मोदींनी केलेली कामांची वाटणी लक्षणीय आहे. अमित शहांच्या ताब्यात पक्ष, अरुण जेटलींकडे संसद, विरोधक, उद्योगपती आणि माध्यमे, अजित डोवाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा, नृपेंद्र मिश्रांकडे दैनंदिन कामकाज अशी ती वाटणी आहे. याशिवाय राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराजांबरोबर गरजेनुसार सल्लामसलत केली जाते.

संघाशी नांदा सौख्यभरे

भाजपचा पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संबंध नेहमीच विलक्षण असतात, हे वाजपेयींच्यावेळी चांगलेच अनुभवले होते. अनेकवेळा संघाने वाजपेयींच्या निर्णयाविरुद्ध आपला ‘व्हेटो’ (नकाराधिकार) चालविला होता. अगदी त्यांना स्वत:च्या मर्जीतील (जसवंतसिंहांऐवजी यशवंत सिन्हा) अर्थमंत्रीही नेमू दिला नव्हता. पण तीन वर्षांपर्यंत तरी मोदी व संघ यांच्यातील संबंध ताणलेले, अवघडलेले आणि संशयाचे झाल्यासारखे वरकरणी तरी दिसत नाही. मोदींचे स्वत: सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांशी, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. अमित शहादेखील नियमितपणे संघपरिवारांशी समन्वय राखून आहेत. त्यामुळे थेट परकी गुंतवणूक (एफडीआय), कामगार सुधारणा, जनुकीय अभियांत्रिकीने बनविलेले वाण (जीएम) यांसारख्या मुद्दय़ांवर मोदी सरकारशी संघपरिवाराचे मतभेद असले तरी ते अद्याप तितकेसे उग्र बनले नाही. त्यातही मोदींविरोधी जनमत निर्माण होण्यास (अ‍ॅण्टी इनकम्बन्सी) अद्याप सुरुवात झालेली नसल्याने ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी संघाची भूमिका  आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या शब्दांत सांगायचे झाले तर संघाने मोदींना अजून सात-आठ वष्रे तरी दिलेली आहेत. तोपर्यंत तरी काही अडचण येणार नाही! एकंदरीत संघपरिवाराच्या आघाडीवर ‘नांदा सौख्यभरे’ असे चित्र आहे.

कमालीचा थंडपणा

मोदींचे आणखी एक वैशिष्टय़ सर्वाना जाणवले असेल. कमालीचा थंडपणा आणि जबरदस्त संयम. अरिवद केजरीवाल हे दररोज मोदींवर जबरदस्त आघात करायचे. कधी ते त्यांना भेकड आणि मनोरुग्ण म्हणायचे, तर कधी मोदी खून करतील, असा बेफाम आरोप करायचे. पण मोदींनी एक चकार शब्दसुद्धा कधी काढला नाही. विरोधकांशी तर त्यांची वर्तणूक धसमुसळेपणाची. शरद यादवांसारखा ज्येष्ठ नेता उघडपणे सांगतो, की देशाचा हा पहिला पंतप्रधान आहे, की ज्याने विरोधकांशी एकदाही सल्लामसलत केलेली नाही. यादव यांचे म्हणणे खरे आहे. अपवाद फक्त‘जीएसटी’चा तिढा सोडविण्यासाठी मोदींनी सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंगांशी केलेली चर्चा.

स्वत:चे समांतर माध्यमविश्व

माध्यमे आणि मोदी.. हे नाते २००२च्या गुजरात दंगलींनंतर पूर्णत:च बदलून गेले. कधी काळी मोदी हे ‘मीडिया डार्लिग’ होते. पण २००२ नंतर त्यांनी माध्यमांविरुद्धचा कप्पाच विकसित केला. आपल्याला दहा-बारा वष्रे माध्यमांनी जाणीवपूर्वक छळल्याची भावना त्यांनी जोपासली आणि त्यातूनच सामाजिक माध्यमांच्या मदतीने त्यांनी स्वत:चे समांतर माध्यमविश्व निर्माण केले.

कार्यशैली ‘सीईओ’सारखी : मोदींच्या भन्नाट शैलीबद्दल आणि अथकपणे काम करण्याच्या क्षमतेबद्दल सामान्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. त्यातील प्रचाराचा काही अंश सोडल्यास त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. यापूर्वीचे पंतप्रधान फक्त धोरणांची चौकट आखून अंमलबजावणी नोकरशहांवर सोडून द्यायचे. पण मोदींचे तसे नाही. धोरणनिर्मितीपेक्षा त्यांचा अधिक कटाक्ष अंमलबजावणीवर असतो. सलग सात-आठ तास शांतपणे बसून ते एकापाठोपाठ एक प्रेझेंटेशन पाहतात. जाहीर सभांमध्ये मोदी खूप तोंडाळ वाटतात; पण बठकांमध्ये अत्यंत कमी बोलतात.

इव्हेंट मॅनेजर..

गेल्या तीन वर्षांमध्ये मोदींना निरखून पाहिले तर काही उपमा निश्चितपणे द्याव्या लागतील.. : ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’, ‘इव्हेंट मॅनेजर’, ‘मार्केटिंग मॅन’ वगरे वगरे. या सर्वाचे अनुभव प्रत्येकाने नक्कीच घेतले असतील. अमेरिकेतील ‘मॅडिसन स्क्वेअर’मधील रंगबेरंगी सोहळा असो किंवा नोटाबंदीसारखा आर्थिकदृष्टय़ा अवघड निर्णय असो. मोदींनी त्यांचे अफलातून ‘मार्केटिंग’ केले. मोदींनी राबविलेल्या बहुतेक योजनांमध्ये नावीन्य काहीच नाही. उदाहरणार्थ, ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्वच्छ भारत’ यांसारख्या योजना यापूर्वी कोणत्या ना कोणत्या नावाने आल्याच होत्या. पण मोदींनी त्यांचे ‘ब्रॅण्डिंग’ असे काही केले की सगळेच जण बघत राहिले.

पंतप्रधानांचे सुविचार

 • डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात मोठय़ा प्रमाणात घोटाळे झाले. मात्र मनमोहन सिंग यांच्यावर कोणताही आरोप झाला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे. (८ फेब्रुवारी २०१७, नवी दिल्ली)
 • मूलभूत आणि आवश्यक आरोग्य सुविधांबाबत केरळपेक्षा सोमालियातील परिस्थिती चांगली आहे. (११ मे २०१६, नवी दिल्ली)
 • पूर्वी अनिवासी भारतीयांना भारतीय असल्याची लाज वाटायची. मात्र आता त्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. देशातील सत्तेत परिवर्तन व्हावे, असे अनिवासी भारतीयांना वर्षभरापूर्वीच वाटत होते. (१९ मे २०१५)
 • उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सरकार धर्मानुसार प्रत्येक समाजाला वेगळी वागणूक देत आहे. गावात कब्रस्तान बनविले जाते, तर स्मशानभूमीही बनवायला हवी. रमजानच्या दिवशी वीज दिली जात असेल, तर दिवाळीच्या दिवशीही ती मिळालीच पाहिजे. (२० फेब्रुवारी २०१७)
 • ‘स्किल इंडिया’ हे आमचे धोरण आहे. याआधी भारताची ओळख ‘स्कॅम इंडिया’ (घोटाळ्यांचा भारत) अशी होती. (१५ फेब्रुवारी २०१५, कॅनडा)
 • कोलकाता पूल दुर्घटना म्हणजे देवाचा संकेत आहे. ज्याप्रमाणे आज हा पूल कोसळला त्याचप्रमाणे येथील सरकार पूर्ण बंगाल संपवेल. (८ फेब्रुवारी २०१६)

मानवाच्या वंशशास्त्राचा जगभरातील इतिहास काहीही

मानवाच्या वंशशास्त्राचा जगभरातील इतिहास काहीही


5992   23-May-2017, Tue

वंशशास्त्राच्या परंपरागत संकल्पनांनाच छेद देणाऱ्या संशोधनातून मानवजातीच्या हित-अहिताबाबत नव्याने मांडणी करावी लागेल.

मानवाच्या वंशशास्त्राचा जगभरातील इतिहास काहीही असला, तरी त्या इतिहासाच्या बऱ्याचशा पाऊलखुणा वर्तमानात धूसर झाल्या आहेत आणि भविष्यात तर त्या कदाचित दिसणारही नाहीत अशी चिन्हे आहेत. मानवी वंशशास्त्र ही एक गूढ अशी संकल्पना हजारो वर्षांपासून माणसाने जपली, जोपासली. ‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी’ असा संदेश आपल्या समाजात दृढ झाल्यावर त्याची सांगड मानवी वंशशास्त्राशी घालून जातिभेद, वंशभेद, धर्मभेद जोपासणाऱ्यांचे फावले आणि त्यातूनच ‘ऑनर किलिंग’सारख्या भयावह रूढी फोफावल्या. हे वंशशास्त्राच्या इतिहासाचे विकृत वर्तमान रूप असले, तरी ते आता बदलणे अपरिहार्य ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत मानवी जन्माची अनेक गूढ गुपिते उलगडणे शक्य झाल्यानंतर, वंशशास्त्राला विज्ञानाचीही जोड मिळाली आणि ‘टेस्ट टय़ूब बेबी’ हा काही वर्षांपूर्वी केवळ चित्रपटाच्या कथानकातच शोभला असता असा प्रकार वास्तवात आला. आता तर, मनाजोगत्या माणसांची पैदास करण्याचे कारखानेदेखील वास्तवात येतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

हजारो वर्षांपूर्वीच्या वंशशास्त्रीय संकल्पनेला वर्णसंकर मान्य नव्हता. आपण ज्याला धर्मग्रंथ मानतो, त्या भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात तर कुलधर्म आणि जातिधर्माची मूलतत्त्वे सांगताना, वर्णसंकरामुळे होणाऱ्या कुळाच्या हानीचे वर्णन केले गेले आणि ते शिरसावंद्य मानून समाजातील काही घटकांनी वंशभेद आणि वर्णभेद पाळणे हाच धर्म आहे असा खुळचट समजही करून घेतला. ‘दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसंकरकारकै:, उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता:’ – वर्णसंकरामुळे कुळाचा घात होतो, कुलधर्म आणि जातिधर्म नष्ट होतो, असा संदेश देणारी भगवद्गीता शेकडो वर्षे मस्तकी धरली गेली आणि वर्ण-जातिभेदाच्या विरोधातील लढाईत धर्मशास्त्राचे दाखले अडाणीपणाने ढालीसारखे पुढे केले जाऊ  लागले.

पण एक गोष्ट नक्की! काळ हे अनेक समस्यांवरील शाश्वत उत्तर असते. काळ पुढे जाऊ  लागला, विज्ञान प्रगत होऊ  लागले, पुराणकथा आणि इतिहासातील अनेक अनाकलनीय गूढांची विज्ञानाच्या निकषांवर उकल होऊ  लागली आणि हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानावर आधारलेले सिद्धान्त वर्तमानाच्या रेटय़ात कालबाह्य़ होत असल्याचे ध्यानात येऊ  लागले, तसा भूगोलावरील वंशशास्त्राचा इतिहासही बदलत गेला. प्रगत होत गेला.

पण अजूनही तो समूळ उखडला गेलेला नाही. वंशाभिमान, वर्णाभिमानाची बीजे सर्वत्र आहेत. अशी बीजे केवळ भारताच्याच मातीत रुजून राहिली, हा तर निव्वळ भ्रम आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र वंशभेद आणि वर्णभेदाची जाज्वल्य उदाहरणे दिसतात आणि त्यांचे उदात्तीकरणही केले जाते. राजघराण्याचा वारसा, राजघराण्याचे वंशज आणि राजघराण्याचे रक्त ही एक संकल्पना प्रगत देशांमध्ये आजपर्यंत रुजून राहिलेली आहे, यामागेही अशाच अभिमानाचा अंश असावा. अन्यथा, राजघराण्यात जन्मलेल्या व्यक्तीला सामान्य समाजातील व्यक्तीशी वैवाहिक संबंध ठेवण्याची कल्पनादेखील असह्य़ मानणाऱ्या प्रगत राष्ट्रांच्या परंपरा आजवर जपल्या गेल्याच नसत्या.

ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्तींनी सामान्य समाजातील व्यक्तींशी विवाह केल्यामुळे त्यांना राजघराण्याचे वारसा हक्क नाकारले गेल्याच्या गेल्या दोन-तीन शतकांतील घटना याच मानसिकतेची साक्ष देणाऱ्या नाहीत काय? सन १७७२ मध्ये ब्रिटनच्या संसदेने एक कायदा संमत केला. राजघराण्याच्या प्रतिष्ठेला कमीपणा येईल अशा व्यक्तीशी विवाह करण्यावर या कायद्याने अनेक बंधने घातली आणि या कायद्यावर प्रखर टीका होऊ  लागल्याने २०१५ मध्ये अखेर तो रद्द करण्यात आला. काही बंधने शिथिल करण्यात आली आणि बदलत्या काळासोबत परंपरांचे विळखे सैल करावे लागतात हे सिद्ध झाले.

पण एवढय़ाने जगाच्या पाठीवरील वंशशास्त्राच्या परंपरागत समजुतींना मूठमाती मिळाली असे झाले नाही. जपानच्या राजघराण्यातील सम्राट अकिहितो यांची नात एका सामान्य घराण्यातील तरुणाशी विवाहबद्ध होणार असल्याने, जपानी साम्राज्याच्या कायद्याचा पुन्हा एकदा कीस पडणार आहे.

या कायद्यानुसार, राजघराण्यातील या तरुणीने सामान्य माणसाशी विवाह केल्यानंतर तिला राजघराण्याचे दरवाजे बंद होणार आहेत आणि या तरतुदीमुळेच जपानी राजघराण्याच्या कायद्यावर नव्याने चर्चा झडू लागल्या आहेत. सामान्य घराण्यातील एका तरुणाशी राजघराण्यातील या तरुणीशी ओळख होते, त्याचे रूपांतर मैत्रीमध्ये होते, प्रेमाचे धागे जुळतात आणि परंपरेची बंधने झुगारून ती तरुणी त्या तरुणाची जीवनसाथी होण्याची स्वप्ने पाहू लागते,

असे हे कथानक! याच कथानकाचा पहिला अंक जपानच्या राजघराण्यात २००५ मध्ये होऊन गेला होता. प्रिन्सेस सायाको हिने एका सामान्य माणसाशी विवाह केला आणि कायद्यानुसार साम्राज्यशाहीच्या साऱ्या सुखांना तिलांजली देऊन पतीसोबत एका लहानशा घरात संसार थाटला. आता जपानी साम्राज्याचा वारस कोण असणार असा राजघराण्याला भेडसावू लागल्याने,

साम्राज्यशाहीच्या वंशहिताचा हा पारंपरिक कायदा बदलण्याबाबत विचार सुरू झाला. शेवटी, पुढे सरकणारा काळ हाच परंपरेला छेद देऊ  शकणारे धारदार शस्त्र असते, हे वास्तव वर्तमान आता जपानच्या साम्राज्यशाहीलाही स्वीकारावे लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

जगाच्या पाठीवर वंशाभिमानाच्या संकल्पना अशी वळणे घेऊ  लागल्या असताना त्या बदलाच्या वाऱ्यांवर स्वार होणे ही आपलीही गरज ठरणार आहे. वंशशास्त्राच्या पारंपरिक संकल्पना खुंटीवर टांगाव्या लागतील असे बदल विज्ञानाच्या साह्य़ाने होऊ  घातले आहेत. वंध्यत्वावर मात करणाऱ्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करून, आपल्याला पाहिजे त्या गुणसूत्रांची व रूपांची मुले उत्पादित करणे आता वैद्यकशास्त्राला साध्य होणार आहे. एखाद्या पोल्ट्रीमध्ये जशी कोंबडय़ांच्या पिल्लांची पैदास होते, तशी माणसांच्या मुलांची पैदास करणाऱ्या प्रयोगशाळा सुरू करण्याएवढी मजल विज्ञानाने मारली आहे.

हे देखील या कराच्या मूळ तत्त्वास हरताळ फासणारे. आदर्श वस्तू आणि सेवा कायद्यात एकाही वस्तू आणि सेवेस वगळले जात नाही. आपण  ४० वगळणार आहोत. याचाच अर्थ विविध राज्य सरकारे या ४० घटकांवर आपल्याला हवा तसा कर लावू शकतील. राज्यांच्या महसुलाच्या गरजा लक्षात घेता तश

करसंहार =आदर्श वस्तू आणि सेवा कायद्यात एकाही वस्तू आणि सेवेस वगळले जात नाही.


5092   23-May-2017, Tue

वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) सध्याचे स्वरूप कायते कितपत स्वागतार्ह आणि त्याचे संभाव्य परिणाम काय याचा आढावा घेणाऱ्या मालिकेचा हा पहिला भाग..

वस्तू आणि सेवा कर कायदा आता येणार हे निश्चित झाले आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलपासून सुरू होते की १ सप्टेंबपर्यंत पुढे ढकलली जाते, हे आता कळेल. या कराच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्यांनी कंबर कसली असून गेल्या आठवडय़ात जम्मू-काश्मिरात झालेल्या सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील कराच्या चौकटी निश्चित केल्या गेल्या. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून या कराच्या अंमलबजावणीस हिरवा झेंडा दाखवला. देशातील जवळपास सर्वच राज्यांनी अशी अधिवेशने बोलावून या घटनादुरुस्तीस मान्यता दिली आहे.

याचा अर्थ या कराचा अंमल लवकरच आपल्याकडे सुरू होणार हे निश्चित. तेव्हा या वेळी या कराच्या गुणदोषांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ही वेळ आहे ती या कराच्या रूपाने आपणासमोर काय वाढून ठेवले आहे, हे तपशीलवार समजून घेण्याची. या कराच्या रूपाने देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी अर्थसुधारणा होत असल्याचे आपल्या मनावर बिंबवले गेल्यामुळे तर अशा चच्रेची अधिकच आवश्यकता आहे.  हेतू हा की कोणत्याही अभिनिवेशाशिवाय इतक्या महत्त्वाच्या मुद्दय़ावर साधकबाधक चर्चा व्हावी आणि त्यावर व्यक्त होणाऱ्या मतमतांतरांतून सदर विषयाचे जास्तीत जास्त पलू वाचकांसमोर यावेत. अशी अर्थसाक्षरता ही सद्य:स्थितीत गरजेची आहे.

या विषयाची चर्चा करावयाची प्रमुख कारणे दोन. पहिले म्हणजे जगातील कोणत्याही संघराज्यीय देशाने वस्तू आणि सेवा कर आपापल्या देशात आणलेला नाही. म्हणजे ज्या देशांत अनेक राज्ये आहेत आणि राज्यांचे महसुलाचे मार्ग भिन्न आहेत, ते देश या कायद्यापासून लांब राहिले आहेत. उदाहरणार्थ अमेरिका. आपल्याइतक्याच, किंबहुना आपल्याहूनही अधिक राज्ये असणाऱ्या या देशाने वस्तू आणि सेवा कायदा आणलेला नाही. याचे कारण यामुळे राज्यांच्या उत्पन्न आणि उत्पादन व्यवस्थेवर गदा येते.

या कायद्याने सर्व अर्थाधिकार केंद्राच्या हातात जातात आणि राज्यांना केंद्राच्या तोंडाकडे पाहात बसण्याखेरीज पर्याय राहात नाही. म्हणून ही करव्यवस्था प्राधान्याने लहान आणि मध्यम आकाराच्या, एकसंध देशांनी अमलात आणलेली आहे. या संदर्भातील दुसरे कारण म्हणजे डॉ. विजय केळकर याच्या समितीने सुचविलेल्या मूळ कायद्यात झालेला आमूलाग्र बदल. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीची तयारी करण्यासाठी डॉ. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती.

त्या समितीने साद्यंत अभ्यास करून या कर विधेयकाचा मसुदा तयार केला. ‘लाख दुखों की एक दवा’ असे या कायद्याचे वर्णन त्या वेळी डॉ. केळकर करीत इतका हा मसुदा सर्वसमावेशक होता.

परंतु राजकीय सोयीसाठी या मसुद्यात पुढे इतके बदल झाले की या विधेयकाचे निर्माते डॉ. केळकर यांनादेखील त्याची ओळख पटणार नाही. मूळ मसुद्यात केलेले हे बदल इतके दूरगामी होते आणि आहेत की त्यामुळे या कायद्याचे जीएसटीपणच त्यातून निघून गेले. म्हणूनदेखील या कायद्याची सविस्तर चर्चा गरजेची ठरते.

या बदलातील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे वस्तू आणि सेवा कराच्या तत्त्वालाच या नव्या मसुद्याने हरताळ फासलेला आहे. ‘एक देश एक कर’ हे ते वस्तू आणि सेवा कराचे तत्त्व. हा कर लागू करू पाहणाऱ्या देशात सर्वत्र कराचा एकच दर असायला हवा असा त्याचा अर्थ. तसेच एकदा का हा कर लागू केला गेला की अन्य कोणताही कर नको. हे दोन्हीही मुद्दे आपल्याकडील वस्तू आणि सेवा कराने निकालात काढले आहेत. हा कर आपल्याकडे करआकारणीचे एकाच्या ऐवजी सहा टप्पे घेऊन सुरू होईल.

शून्य टक्के, पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशा करआकारणी गटांत सर्व वस्तू आणि सेवांचे वर्गीकरण केले जाईल. याच्या जोडीला २८ टक्के कर द्यावा लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर पाच टक्के ते १५ टक्के इतका अतिरिक्त अधिभार लावला जाईल. याचाच अर्थ प्रत्यक्षात २८ टक्के वर्गवारीतील वस्तू आणि सेवा ३३ टक्के ते ४३ टक्के इतका कर देतील. हे अतक्र्यच. प्रश्न येथेच संपत नाही. तूर्त जवळपास ४० वस्तूंना सेवा कराच्या जाळ्यातून वगळण्यात आले आहे.

हे देखील या कराच्या मूळ तत्त्वास हरताळ फासणारे. आदर्श वस्तू आणि सेवा कायद्यात एकाही वस्तू आणि सेवेस वगळले जात नाही. आपण  ४० वगळणार आहोत. याचाच अर्थ विविध राज्य सरकारे या ४० घटकांवर आपल्याला हवा तसा कर लावू शकतील. राज्यांच्या महसुलाच्या गरजा लक्षात घेता तशी मुभा आपल्याला द्यावी लागणार आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोल, डिझेल यांच्या जोडीला मद्याचा देखील यात अंतर्भाव करण्यात आला आहे.

वस्तूंच्या किरकोळ बाजारातील किमतीत इंधन खर्चाचा मोठा वाटा असतो. तूर्त आपल्याकडे विविध राज्यांत इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे इंधनाची आंतरराज्यीय तस्करी मोठय़ा प्रमाणावर होते. तसेच सीमावर्ती परिसरांतील नागरिक आपल्या इंधन गरजा शेजारील राज्यांत जाऊन भागवतात. नव्या करानंतर यात काहीही बदल होणार नाही. प्रत्येक राज्यांत हे इंधन दर यापुढेही वेगळेच असतील. तीच बाब मद्याबाबतही.

या संदर्भात जवळचेच उदाहरण द्यावयाचे तर गोवा आणि महाराष्ट्र यांचेच देता येईल. गोव्यात जाणारा पर्यटक परतताना हमखास मद्य खरेदी करतो. कारण कमी करांमुळे गोव्यात मद्याचे दर कमी आहेत. या कर तफावतीमुळे मोठय़ा प्रमाणावर मद्य तस्करीदेखील होते. वस्तू आणि सेवा करांत सर्वत्र एकच कर आकारले गेले असते तर हे सर्व गरप्रकार टळले असते. परंतु तेवढा धीर आपल्याला नसल्यामुळे प्रस्तावित वस्तू आणि सेवा करात करांचे विविध दर आणि कर-अपवाद करण्यात आले आहेत. यामुळे या कराच्या तत्त्वालाच हरताळ फासला जाणार असून त्यामुळे उलट नोकरशाहीचे फावणार आहे.

हा प्रकार विशेषत: आयुर्वेदिक उत्पादनांबाबत होऊ शकतो. विद्यमान रचनेत आपल्याकडे काही आयुर्वेदिक उत्पादने कर वाचवण्यासाठी औषधे या वर्गवारीत नोंदली गेली आहेत. परंतु प्रत्यक्ष बाजारांत त्यांची विक्री सौंदर्यप्रसाधने या वर्गवारीतून होते. अशी अनेक अन्य उदाहरणे दाखवता येतील. अशा वेळी कराचा एकच सरसकट दर ही व्यवस्था आपण मान्य केली असती तर नोकरशाहीचे हस्तक्षेप टळले असते. अनेक अर्थतज्ज्ञांनी एकच कर समान कर रचना जमत नसेल तर जास्तीत जास्त दोन टप्पे करा, पण त्यापेक्षा अधिक नकोत, असे सरकारला बजावले होते. परंतु अर्थतज्ज्ञांचे ऐकायचेच नाही, असा काहीसा सरकारचा दृष्टिकोन असल्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले.

याचा परिणाम म्हणून आपल्या देशात १ जुल वा १ सप्टेंबरपासून एकच एक वस्तू आणि सेवा कायदा नव्हे तर किमान ३६ असे कायदे अस्तित्वात येतील. केंद्र सरकारचा मुख्य वस्तू आणि सेवा कायदा अधिक ३५ राज्यांचे ३५ असे कायदे अशी ही रचना असेल. म्हणजेच आहे तो गोंधळ नव्या व्यवस्थेत वाढू शकेल. म्हणून हा करसंहार समजून घेण्याची गरज आहे. नव्या व्यवस्थेत उत्पादक, विक्रेता, व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि मुख्य म्हणजे विविध राज्य सरकारे आदींचे काय होणार हे उद्याच्या अंकात.

कराचा एकच सरसकट दर ही व्यवस्था आपण मान्य केली असती तर नोकरशाहीचे हस्तक्षेप टळले असते. अनेक अर्थतज्ज्ञांनी ‘जास्तीत जास्त दोन टप्पे करा,’ असे बजावूनही चार टप्पे आणि अनेक वस्तू व सेवांना वगळणे असे सध्याच्या ‘जीएसटी’चे स्वरूप झाले..

mpsc exam

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या परंपरेचा वारसा आता डॉ. नितीन करमळकर यांच्या हाती आला आहे.


6693   23-May-2017, Tue

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या परंपरेचा वारसा आता डॉ. नितीन करमळकर यांच्या हाती आला आहे. हे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू आहेत. विधि, भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या बहुतेक कुलगुरूंनी विद्यापीठाला नवी दिशा दिली. आता पर्यावरणतज्ज्ञ कुलगुरू विद्यापीठाला मिळाले आहेत. जवळपास पस्तीस वर्षांहून अधिक काळ ते पुणे विद्यापीठाशी जोडले गेले आहेत. विद्यार्थिदशेपासून ते पुणे विद्यापीठाशी जोडले गेले आहेत. विद्यापीठाची खडान्खडा माहिती, विद्यापीठाच्या विकासाबाबत दूरदृष्टी, शिक्षण क्षेत्रातील बदलांची तसेच विद्यार्थ्यांच्या गरजांची जाणीव, संशोधन क्षेत्रातील काम, प्रशासकीय शिस्त, विद्यापीठाचा परिसर आणि पर्यावरणाबाबत असलेली आस्था या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

मूळचे कणकवली येथील डॉ. करमळकर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुणेकर झाले. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्यापीठातूनच भूरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. केली. पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये त्यांनी काही काळ संशोधक म्हणून काम केले. विद्यापीठात १९८८ मध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. विद्यापीठात भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत काम पाहिले. पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी २०१३ पासून ते सांभाळत आहेत.  त्याचबरोबर विद्यापीठातील अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्याही पेलल्या आहेत. विद्यापीठाच्या ‘इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल’चे प्रमुख म्हणून ते २०११ पासून काम पाहत आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेचे, परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यंदा विद्यापीठाला मिळालेली ‘नॅक’ची अ + श्रेणी, राष्ट्रीय मूल्यांकन प्रणालीत स्थान मिळण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. दगडांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध नियतकालिकांमधून त्यांचे ३५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सध्या १० राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध प्रकल्पांसाठी ते काम करत आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स येथील संस्थांबरोबर त्यांचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. कच्छ, लडाख, हिमालय पर्वतरांगा, दख्खनचे ज्वालामुखीय पठारावरील दगड यांवर त्यांचे संशोधन सुरू आहे. पर्यावरणशास्त्रावरील त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पर्यावरण अहवाल तयार करणे, ऊर्जा प्रकल्प, धरणे यांच्या निर्मिती आणि देखभालीसाठी ते मार्गदर्शक म्हणूनही काम पाहतात. कच्छमधील भूखनिजांवरील संशोधनासाठी त्यांना ‘मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’कडून भूगर्भशास्त्रातील मानाचे ‘प्राध्यापक सी. नागण्णा सुवर्णपदक’ मिळाले आहे. त्यांच्या हाताखाली २००७ पासून पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे, तर पाच विद्यार्थी सध्या संशोधन करत आहेत.

donald trump edt

मोकाटांची मनमानी


8691   14-May-2017, Sun

रशियाप्रकरणी आपली चौकशी होऊ नये म्हणूनच ट्रम्प यांनी एफबीआयच्या प्रमुखांना दूर केले, असा समज तेथील जनतेचा झाला असून तो अनाठायी म्हणता येणार नाही.

धडाडी म्हणजे पुढचा-मागचा विचार न करता वाटेल ती कृती करणे असे वाटणाऱ्या जगभरातील नेत्यांचे डोनाल्ड ट्रम्प हे मुकुटमणी. त्यांनी आपल्या ताज्या धडाडीदर्शक निर्णयाद्वारे अमेरिकी अंतर्गत गुप्तचर यंत्रणेचे, म्हणजे फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, एफबीआयचे प्रमुख जेम्स कोमी यांना सरळ पदावरून दूर केले. एफबीआयचे प्रमुख कोमी हे किती उत्तम कामगिरी करीत आहेत, ते किती धडाडीचे आहेत आणि आपल्याला त्यांचे कसे कौतुक आहे असे संदेश ट्वीट करून काही दिवस उलटायच्या आत ट्रम्प यांचे कोमी यांच्याबद्दलचे मत बदलले आणि त्यांनी ही कारवाई केली. एफबीआयच्या प्रमुखाची नियुक्ती ही दहा वर्षांसाठी असते.

कोमी यांनी जेमतेम तीन वर्षे पूर्ण केली आहेत. ते माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात नेमले गेले. यंदाच्या जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प हे कोमी यांच्या संदर्भात काही निर्णय घेतील, असे बोलले जात होते. परंतु ट्रम्प यांनी तसा निर्णय घेतला नाही आणि उलट आपला कोमी यांच्यावर किती विश्वास आहे, अशीच बतावणी सातत्याने केली. गतसाली ऐन निवडणुकीच्या काळात या कोमी यांनी ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या खासगी मेल वापरण्याच्या कृतीवर टीका केली होती. त्या वेळी ट्रम्प यांनी असे धैर्य दाखवणाऱ्या कोमी यांचे कौतुकच केले. त्यानंतर दोन वेळा ट्रम्प यांनी कोमी यांची स्तुती केली. आणि अचानक अध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकले. हे का घडले?

यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोमी करीत असलेली रशिया आणि ट्रम्प यांच्यातील साटेलोटय़ाची चौकशी. ट्रम्प यांना निवडणुकीच्या काळात रशियाकडून विविध मार्गानी रसद पुरवली गेली. ती आर्थिक नव्हती. तर ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांची बाजू जास्तीत जास्त लंगडी करणे हे या रसदीमागचे उद्दिष्ट होते. ते साध्य करण्यासाठी हिलरी यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयातील संगणकांत रशियन माहिती महाजाल चाच्यांनी घुसखोरी केली आणि ती विकिलिक्सच्या जुलियन असांज याच्या मदतीने ही घटना सर्वदूर पसरेल अशी व्यवस्था केली. हिलरी यांचा वैयक्तिक संगणक आणि हिलरी यांनाही यात लक्ष्य केले गेले.

याचा फायदा अर्थातच ट्रम्प यांना होत गेला आणि जनमत त्यांच्या बाजूने झाले. अमेरिकेच्या या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा हा हस्तक्षेप इतका ढळढळीत होता की त्याचा चांगलाच बभ्रा झाला. परिणामी या सगळ्याच्या चौकशीचे आदेश माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना द्यावे लागले. या चौकशीत ट्रम्प यांचा संभाव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी रशियाशी संधान बांधलेले आढळून आले. युक्रेन आदी ठिकाणच्या रशियाच्या कृतीबद्दल अमेरिकेने त्या देशावर र्निबध जारी केले आहेत. ट्रम्प यांची एकदा का निवड झाली की हे र्निबध उठवले जातील असे आश्वासन या फ्लिन महाशयांनी रशियाला दिल्याचे या चौकशीत आढळून आले.

ही बाब उघड झाली कारण एफबीआयकडून फ्लिन आणि रशियाचे अमेरिकेतील राजदूत किस्लियाक यांचे दूरध्वनी संभाषण नोंदवण्याचे आदेश दिले गेले होते म्हणून. या सगळ्याकडे काणाडोळा करीत ट्रम्प यांनी सत्ताग्रहणानंतर याच फ्लिन यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. मात्र त्या वेळी फ्लिन यांच्या रशियन चुंबाचुंबीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली गेली आणि परिणामी फ्लिन यांना पायउतार व्हावे लागले. ट्रम्प यांना हा मोठा धक्का होता.

त्यामुळे एफबीआयने आपल्या रशियन संबंधांपेक्षा सरकारी माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत जाते कशी याची चौकशी अधिक जोमाने करावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. ट्रम्प हे जगात सध्या अन्यत्र दिसून येतात तशा आत्मकेंद्री नेत्यांतील एक आहेत. व्यवस्था, परंपरा आदींची त्यांना काही पर्वा नाही.

त्याचमुळे त्यांनी ओबामा यांच्यावर काही हीन आरोप केले. ओबामा यांनी आपल्या कार्यालयात हेरगिरीचा आदेश दिला होता हा त्यातील एक. एफबीआयने त्या आरोपास दुजोरा द्यावा असे त्यांचे म्हणणे. कोमी यांनी ते केले नाही. कारण तसे घडलेच नव्हते. तरीही एफबीआयने आपली तळी उचलावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाविषयी चौकशी समितीसमोर कोमी यांची साक्ष झाली. त्या वेळी कोमी यांनी हा हस्तक्षेप नाकारावा असे ट्रम्प यांना वाटत होते. कोमी यांनी तेही केले नाही.

उलट रशियन हस्तक्षेपाच्या चौकशीची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेव्हा कोमी आपल्याला डोईजड होत आहेत असा रास्त समज ट्रम्प यांनी करून घेतला आणि कायदा विभागातील आपल्या हुजऱ्या अधिकाऱ्यांकरवी कोमी यांच्या विरोधात अहवाल तयार केला. त्याचीच परिणती अखेर त्यांच्या हकालपट्टीत झाली. परंतु हा निर्णय जाहीर केल्यापासून ट्रम्प यांच्याच अडचणीत वाढ झाली असून जनमताचा झोका त्यांच्या विरोधातच जाताना दिसतो.

mpsc exam

ऑर्डर ऑफ कॅनडा’ डॉ. जगन्नाथ वाणी


6186   14-May-2017, Sun

कॅनडा सरकारने डॉ. वाणी यांच्या कार्याचा गौरव ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने केला

भारतातून अमेरिका वा अन्य देशांत उच्च शिक्षणासाठी गेलेले अनेक जण तेथेच स्थायिक होतात, तसेच अनेक जण तेथे शिक्षण घेऊन पुन्हा मायदेशात परतही येतात.  धुळ्याचे डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी हे व्यक्तिमत्त्व मात्र निराळेच होते. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या डॉ. वाणी यांनी भारतासह कॅनडात विविध सामाजिक उपक्रमांतून आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

भारतातून अमेरिका वा अन्य देशांत उच्च शिक्षणासाठी गेलेले अनेक जण तेथेच स्थायिक होतात, तसेच अनेक जण तेथे शिक्षण घेऊन पुन्हा मायदेशात परतही येतात.  धुळ्याचे डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी हे व्यक्तिमत्त्व मात्र निराळेच होते. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या डॉ. वाणी यांनी भारतासह कॅनडात विविध सामाजिक उपक्रमांतून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे त्यांचे सदैव लक्ष असायचे. त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था ही त्याची पावती.

त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९३४ रोजी धुळ्यात झाला. तल्लख बुद्धिमत्ता लाभलेल्या वाणी यांनी मुंबई बोर्डाच्या मॅट्रिक परीक्षेत नववा क्रमांक मिळवला होता. पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर आणि नंतर विद्यावाचस्पती पदवी मिळवल्यानंतर त्यांच्या कार्याची झळाळी दिसू लागली. धुळे कृषी महाविद्यालयात व्याख्याता, पुणेस्थित गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधक साहाय्यक पदावर काम केल्यानंतर त्यांनी कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठ, मेरीज विद्यापीठ, कॅलगिरी विद्यापीठात अध्यापन केले. कॅलगिरी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे प्रमुखपद सांभाळताना विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची निर्मिती केली.

या अभ्यासक्रमांतर्गत ‘शिका आणि कमवा’ उपक्रम राबवला. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास त्यांनी चालना दिली. अध्ययन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे वाणी हे सामाजिक कार्यात तितक्याच आत्मीयतेने कार्यरत राहिले. मराठी भाषा संशोधन व विकासासाठी धुळ्यात त्यांनी का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची स्थापना केली. मनोरुग्ण व उपेक्षितांसाठी कॅनडा व भारतात अनेक उपक्रम राबविले. स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना करत या आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

‘देवराई’ आणि ‘एक कप चहा’ असे काही चित्रपट व लघुपटांची निर्मिती, शारदा नेत्रालयाद्वारे हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा, मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा, विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार, गरजू रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया आदी कामांत वाणी यांनी सक्रिय सहभाग घेतला. कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगिरी आणि महाराष्ट्र मंडळ, भारतीय संगीताचा प्रसार करण्यासाठी ‘रागमाला म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगिरी’ची स्थापना केली.

कॅनडातील विविध शहरांतून भारतीय संगीताच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करत उत्तर अमेरिकेतही भारतीय संगीत, नृत्याचा प्रचार आणि प्रसार केला. विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांची धुरा सांभाळली. त्यात कॅनडा असोसिएशन ऑफ कॅलगिरीचे खजिनदार,  गुरू गुहा अ‍ॅकॅडमी, कॅमरोज इन्स्टिटय़ूट आदी संस्थांचे संचालक यांचा समावेश होता. वाणी यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलने फुलली. पश्चिम कॅनडात  त्यांनी मराठी संमेलन घडवून आणले.

वाणी यांच्या कार्याचा गौरव अल्बर्ट कल्चर, इंडिया-कॅनडा असोसिएशन ऑफ गॅलरी, जीवन गौरव, ऑर्डर ऑफ कॅनडा आदी पुरस्कारांच्या माध्यमातून करण्यात आला. गेल्या शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा एक बहुआयामी आणि विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

केला होता. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे त्यांचे सदैव लक्ष असायचे. त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था ही त्याची पावती.

त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९३४ रोजी धुळ्यात झाला. तल्लख बुद्धिमत्ता लाभलेल्या वाणी यांनी मुंबई बोर्डाच्या मॅट्रिक परीक्षेत नववा क्रमांक मिळवला होता. पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर आणि नंतर विद्यावाचस्पती पदवी मिळवल्यानंतर त्यांच्या कार्याची झळाळी दिसू लागली. धुळे कृषी महाविद्यालयात व्याख्याता, पुणेस्थित गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधक साहाय्यक पदावर काम केल्यानंतर त्यांनी कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठ, मेरीज विद्यापीठ, कॅलगिरी विद्यापीठात अध्यापन केले. कॅलगिरी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे प्रमुखपद सांभाळताना विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची निर्मिती केली.

या अभ्यासक्रमांतर्गत ‘शिका आणि कमवा’ उपक्रम राबवला. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास त्यांनी चालना दिली. अध्ययन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे वाणी हे सामाजिक कार्यात तितक्याच आत्मीयतेने कार्यरत राहिले. मराठी भाषा संशोधन व विकासासाठी धुळ्यात त्यांनी का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची स्थापना केली. मनोरुग्ण व उपेक्षितांसाठी कॅनडा व भारतात अनेक उपक्रम राबविले. स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना करत या आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

‘देवराई’ आणि ‘एक कप चहा’ असे काही चित्रपट व लघुपटांची निर्मिती, शारदा नेत्रालयाद्वारे हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा, मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा, विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार, गरजू रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया आदी कामांत वाणी यांनी सक्रिय सहभाग घेतला. कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगिरी आणि महाराष्ट्र मंडळ, भारतीय संगीताचा प्रसार करण्यासाठी ‘रागमाला म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगिरी’ची स्थापना केली.

कॅनडातील विविध शहरांतून भारतीय संगीताच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करत उत्तर अमेरिकेतही भारतीय संगीत, नृत्याचा प्रचार आणि प्रसार केला. विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांची धुरा सांभाळली. त्यात कॅनडा असोसिएशन ऑफ कॅलगिरीचे खजिनदार,  गुरू गुहा अ‍ॅकॅडमी, कॅमरोज इन्स्टिटय़ूट आदी संस्थांचे संचालक यांचा समावेश होता. वाणी यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलने फुलली. पश्चिम कॅनडात  त्यांनी मराठी संमेलन घडवून आणले.

वाणी यांच्या कार्याचा गौरव अल्बर्ट कल्चर, इंडिया-कॅनडा असोसिएशन ऑफ गॅलरी, जीवन गौरव, ऑर्डर ऑफ कॅनडा आदी पुरस्कारांच्या माध्यमातून करण्यात आला. गेल्या शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा एक बहुआयामी आणि विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


Top