MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई तिरंदाजी स्पध्रेतील रीकव्‍‌र्ह प्रकारात दीपिका कुमारीने सुवर्ण आणि अंकिता भाकटने रौप्यपदकाची कमाई केली. या दोघींनीही पदकांसहित ऑलिम्पिकमधील एका स्थानाची निश्चितीसुद्धा केली आहे.

2. तर टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेची तीन वैयक्तिक स्थाने गुरुवारी निश्चित होणार होती. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पध्रेत सहभागी झाले होते. परंतु याही स्थितीत अग्रमानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने लक्षवेधी कामगिरी केली.

3. तसेच महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असणाऱ्या दीपिकाने मलेशियाच्या नूर अफिसा अब्दुल हलिला 7-2, इराणच्या झाहरा नेमातीला 6-4 आणि थायलंडच्या नरीसारा खुनहिरनचायोचा 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठताना ऑलिम्पिकमधील स्थान पक्के केले.

4. नरीसाराविरुद्धच्या सामन्यात दीपिकाने आपला आयुष्याचा जोडीदार अतानू दासकडे 28 गुण साधेन, असा दावा केलाहोता. परंतु तिने एकूण 29 गुण कमावले. यापैकी दोनदा 10 आणि एकदा 9 गुण मिळवले. मग दीपिकाने एनग्युऐटला6- 2 अशा फरकाने नामोहरम करीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा 6-0 असा सहज पाडाव केला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.

2. मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला.

3. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.1. 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.


2. अभिषेक-ज्योती जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा १५८-१५१ असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.

3. दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने २३३-२३२ असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रातसुद्धा अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली.

4. परंतु दुसऱ्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून २१५-२३१ अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
 

5. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्‍‌र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.

2. भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.

3. तर कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा 6-5 असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा 6-2 असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले.

4. त्यानंतर, महिलांच्या रीकव्‍‌र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याच्या नावाचं स्टॅण्ड आता नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिसणार आहे.

2. तर मंगळवारी छोटेखानी सोहळ्यात औपचारिक घोषणा करण्यात आली. या स्टेडियमवर बिशन सिंह बेदी, मोईंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावाचं स्टॅण्ड आहे.

3. तर या स्टेडियमच्या एका गेटला वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांचे नाव दिलेले आहे.

4. 38 वर्षीय गंभीरनं याच स्टेडियमवरून क्रिकेटची सुरुवात केली. त्यानं भारतासाठी 58 कसोटी, 147 वन डे आणि 37 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयी संघाचा तो सदस्य होता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. BCCI च्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागली. गांगुलीच्या आगमनानंतर बीसीसीआय संघटनेत मोठे बदल व्हायला सुरुवात झाली.

2. तर गेली अनेक वर्ष दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देणाऱ्या भारतीय संघाने गांगुलीच्या पुढाकारामुळे बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना मिळाला.

3. मात्र लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार गांगुलीचं हे अध्यक्षपद औट घटकेचं ठरणार आहे.

4. तरीही सौरव गांगुली  बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदी रहावा यासाठी आता बीसीसीआय आपल्या संविधानातील महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.  बीसीसीआय आपल्या संविधानातील Cooling-off period या नियमात बदल करण्याच्या विचारात आहे. आपल्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवीन अधिकारी या विषयावर चर्चा करतील. संघटनेचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिली.

5. तसेच लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार, सर्वोच्च न्यायालयाने BCCI च्या संविधानात महत्वाच्या बदलांना मान्यता दिली आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने राज्य किंवा BCCI मध्ये 3 वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले असतील, त्याला पुढील 3 वर्ष कोणतंही पद भूषवता येणार नाही.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताने बांगलादेशविरुद्ध 2-0 ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरील आपली स्थिती अधिक मजबूत केली.

2. ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीमध्ये डावाने विजय मिळवत भारताने आपली गुणसंख्या 360 केली. भारताने नऊ संघाच्या या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आतापर्यंत गुण गमावलेला नाही.

3. भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत 2-0 ने पराभूत केल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने पराभव केला आणि आता बांगलादेशविरुद्ध 2-0 ने विजय मिळवला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

2. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास 59 मिनिटे आणि 40.2 सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडवला.

3. अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत 52.2 सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. मग दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने 52.16 सेकंदांचा नव्या विश्वविक्रम साकारला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरचा कसोटी सामना हा संस्मरणीय ठरणार आहे.

2. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी 106 धावांवर माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दिवसाच्या खेळात 32 वी धाव काढत
अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

3. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 5 हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

4. तसेच त्याने 86 डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने 97 डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.

2. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.

3. आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.

4. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

5. ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.


Top