India won two bronze medals in Asian Wrestling championship

 1. भारताचा कुस्तीपटू आणि माजी विजेता बजरंग पुनियाने यंदाच्या कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
 2. २०१७साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 3. विनोद कुमार ओमप्रकाशने ७० किलो फ्रिस्टाईल वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 4. या दोन पदकासह भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ८ पदक कमावली आहेत, ज्यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
 5. याच स्पर्धेत भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहासाची नोंद केली होती.
 6. आशियाई स्तरावर सुवर्णपदक पटकावणारी नवज्योत पहिली भारतीय महिला ठरली होती.
 7. तर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने ६२ किलो फ्रिस्टाईल वजनीगटात कांस्यपदक मिळवले आहे.


Navjyot Courala gold medal in Asian wrestling championship

 1. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
 2. एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत नवज्योतने जपानच्या मिया इमेईला ९-१ असे सहज हरवले. यापूर्वी तिने २०१३मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य व २०१४मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
 3. याशिवाय ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला ६२ किलो गटात कांस्यपदक, तर विनेश फोगटने ५० किलो गटात रौप्यपदकावर नाव कोरले.
 4. या दोन पदकांमुळे भारताच्या खात्यावर १ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य अशी ६ पदकेजमा झाली आहे.
 5. साक्षीने कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या अयाल्यिम कासीमोवाला १०-७ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.
 6. राष्ट्रकुल क्रीडा विजेती खेळाडू विनेशला चीनच्या चुआन लेईने अंतिम लढतीत ३-२ असे पराभूत केले.
 7. भारताच्या संगीता कुमारीनेही ५९ किलो गटांत कांस्यपदक मिळवले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन खेळाडू जिऊन उमला पराभूत केले.


India's Manu Bhaker gold medal in ISSF World Cup

 1. मॅक्सिकोच्या ग्वादलजारा शहरात ISSF विश्वचषक 2018 स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर हिने महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
 2. या प्रकाराचे रौप्य मॅक्सिकोची अलेजांड्रा जवाला वजाक्वेज हिने तर कांस्यपदक सेलीन गॉबविलने जिंकले.
 3. 1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
 4. दरवर्षी चार स्पर्धां घेतल्या जातात.
 5. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून विश्वचषक अंतिम आयोजित करण्यात येत आहे.
 6. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली.


Rashid Khan Cricket's youngest captain in the world

 1. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.
 2. राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस असून, असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
 3. अफगाणिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकतेच आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
 4. राशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यात ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
 5. तर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
 6. क्रिकेट इतिहासातील युवा कर्णधार:-
  1. राशिद खान (अफगाणिस्तान) : १९ वर्षे १५९ दिवस
  2. रोडनी ट्रॉट (बर्मुडा) : २० वर्षे ३३२ दिवस
  3. राजिन सलेह (बांगलादेश) : २० वर्षे २९७ दिवस
  4. तेतेंदा तैबू (झिम्बाब्वे) : २० वर्षे ३४२ दिवस
  5. नवाब पतोडी (भारत) : २१ वर्षे ७७ दिवस


Roger Federer - 'Sportsman of the Year' and 'Comeback of the Year' by Laureus

 1. मोनॅकोमध्ये ‘2018 लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवार्ड्स’ समारंभात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याला ‘स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर’ आणि ‘कमबॅक ऑफ द इयर’ हे किताब प्रदान करण्यात आले आहेत.
 2. रॉजर फेडररचा हे पाचवे पारितोषिक आहे तर सन 2000 पासून दिले जाणारे लॉरियस पुरस्कारांमधले हे सहावे पारितोषिक आहे.
 3. अन्य विजेते:-
  1. वर्ल्ड स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर - सेरेना विल्यम्स (अमेरिका)
  2. टिम ऑफ द इयर - मर्सिडीज F1
  3. वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर (दिव्यांग) - मार्सेल हग (स्वित्झर्लंड)
  4. जीवनगौरव पुरस्कार - एडविन मोसेस (अमेरिका)


American women win Ice Hockey Olympics gold

 1. अमेरिकेच्या महिला आइस हॉकी संघाने 9-25 फेब्रुवारी या काळात IOC च्या वतीने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलंपिक 2018 मध्ये आइस हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.
 2. अमेरिकेच्या संघाने 20 वर्षांमध्ये प्रथमच महिला आइस हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकलेले आहे.
 3. अंतिम लढतीत अमेरिकेने कॅनडाचा पराभव केला.
 4. आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे.
 5. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे.
 6. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
 7. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.


India ranked first in ICC ODI rankings

 1. भारताने पोर्ट एलिजाबेथमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या मालिकेत विजय मिळवून ICC एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रमवारीत प्रथम स्थान प्राप्त केले.
 2. ICC च्या ताज्या ODI क्रमवारीत भारतानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक आणि इंग्लंड तिसर्‍या स्थानी आहे.
 3. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 4. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती
 5. सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 6. ICC मध्ये 105 सदस्य आहेत, त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, 37 सहयोगी सदस्य आणि 56 संलग्न सदस्य आहेत.
 7. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


Jhulan Goswami is the first woman bowler to take 200 wickets

 1. भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाजझुलन गोस्वामी महिला वन-डे क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
 2. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलनने वन-डे क्रिकेटमधला आपला २०० वा बळी टिपला.
 3. २०११ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळताना झुलनने ३२ धावांत ६ बळी घेतले होते. ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे.
 4. सध्या सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत झुलन गोस्वामी २०० बळींसह आघाडीवरआहे.
 5. यानंतर ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रीक दुसऱ्या (१८० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचीच लिसा स्थळेकर (१४६ बळी) तिसऱ्या स्थानावर आहे.
 6. त्याखालोखाल चौथा स्थानी वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद (१४५ बळी) आणि पाचव्या स्थानी भारताची नितू डेव्हीड (१४१ बळी) आहेत.


India's silver medal in Asian Games

 1. जकार्ता (इंडोनेशिया) मध्ये सुरू असलेल्या ‘आशियाई खेळ’ मध्ये भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने 5x5 बास्केटबॉल चाचणी प्रकारात रौप्यपदक पटकावले.
 2. भारतीय संघाचा थायलंडकडून पराभव झाला.
 3. आशियाई खेळ (Asian Games) किंवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे.
 4. या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलंपिक मंडळाकडून केले जाते.
 5. आशिया ऑलंपिक मंडळ ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक मंडळाची (IOA) एक पाल्य संस्था आहे.
 6. 1951 साली नवी दिल्ली (भारत) मध्ये पहिल्यांदा आशियाई खेळांचे आयोजन केले गेले होते. 


Charlotte Kallah of Sweden won the first gold medal at the Winter Olympics

 1. स्वीडनच्या चार्लोट काल्ला हिने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे आयोजित हिवाळी ऑलंपिकमध्ये महिलांच्या स्किअॅथलॉन क्रास कंट्री रेस खेळात पहिले सुवर्णपदक आपल्या नावे करून घेतलेले आहे.
 2. काल्ला हिने महिलांच्या स्किअॅथलॉन क्रास कंट्री रेसमध्ये नॉर्वेच्या मेरिट ब्जॉर्गेनचा पराभव केला.
 3. 9-25 फेब्रुवारी या काळात IOA कडून आयोजित हिवाळी ऑलंपिकमध्ये 92 देशांमधून जवळपास 3000 खेळाडूंनी भाग घेतलेला आहे.
 4. खेळांमध्ये सात क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
 5. भारताकडून क्रॉस कंट्री स्कायर जगदीश सिंह आणि ल्यूज अॅथलीट शिवा केशवन यांचा सहभाग आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?

 1. भारतीय ऑलंपिक संघटना (IOA) ही भारतामधील खेळाडूंना ऑलंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करणारी आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्यास जबाबदार संघटना आहे.
 2. याची स्थापना 1927 साली करण्यात आली.


Top