Nikesh Arora: The highest paid CEO

 1. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे जन्मलेले निकेश अरोरा यांची अमेरिकेतील पालो अल्टो नेटवर्क्स इंक या सिक्युरिटी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. पालो अल्टोकडून अरोरा यांना १२.८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास ८५९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
 3. त्यामुळे सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचे नाव दाखल झाले आहे.
 4. निकेश यांच्याआधी अॅपलचे सीईओ टीम कुक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळवणारे सीईओ होते. त्यांचे पॅकेज ११.९ कोटी डॉलर आहे.
 5. जगभरातल्या सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर निर्माता पालो नेटवर्क्स कंपनीची जगभरातल्या जवळपास ५० हजार कंपन्यांबरोबर भागीदारी आहे. यात ५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
 6. टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये क्लाऊड आणि डेटा डीलिंगचा अरोरा यांचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. यापूर्वी ते सॉफ्ट बॅंक आणि गुगलमध्ये कार्यरत होते.
 7. पालो अल्टोमध्ये अरोरा यांनी मार्क मिकलॉकलीन यांची जागा घेतली आहे. मार्क २०११पासून पालो अल्टोचे सीईओ होते.
 8. मार्क मिकलॉकलीन हे कंपनीमध्ये मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत, तर अरोरा हे मंडळाचे अध्यक्ष असतील.
 9. ६ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे निकेश अरोरा यांचा जन्म झाला. वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते.
 10. त्यांनी १९८९साली आयआयटी वाराणसीमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि त्यानंतर काही काळ त्यांनी विप्रोमध्ये नोकरी केली.
 11. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जाण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली. नंतर अमेरिका नॉर्थ-ईस्टर्न यूनिव्हर्सिटीतून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली.


 Nandan Nilekani's semi-wealth donation

 1. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलेकणी, त्यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी यांच्यासह तीन अनिवासी भारतीय अब्जाधीश आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कारणांसाठी दान करणार आहेत.
 2. बिल आणि मेलिंडा गेट्‌स, वॉरेन बफे या प्रसिद्ध उद्योजकांनी जनहितार्थ सुरू केलेल्या ‘द गिव्हिंग प्लेज’ उपक्रमाअंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
 3. नीलेकणी यांसह अनिल व एलिसन भुसरी, शमशेर व शबीना वायलिल, बीआर शेट्टी आणि त्यांच्या पत्नी चंद्रकुमारी ही अनिवासी भारतीय दांपत्ये ही आपली संपत्ती दान करणार आहेत.
 4. गेल्यावर्षी ‘द गिव्हिंग प्लेज’ या संस्थेशी जोडल्या गेलेल्या १४ जणांमध्ये या दांपत्यांचा समावेश आहे.
 5. ‘द गिव्हिंग प्लेज’ ही संस्था जगभरातील धनाढ्य उद्योजकांना आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कामांसाठी दान करण्यासाठी प्रोत्साहित करते.
 6. या संस्थेची स्थापना गेट्स दाम्पत्याने वॉरन बफे यांच्या सहकार्याने २०१०साली केली.
 7. या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारणारे नीलेकणी हे चौथे भारतीय आहेत. याआधी विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी, बॉयकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ आणि पी. एन. सी. मेनन यांनी या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे.


 Krishibahushan Dadaji Khobragade passed away

 1. तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे चंद्रपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते नांदेडमधील नागभीड तालुक्यातील होते.
 2. दादाजी खोब्रागडे हे मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले होते.
 3. त्यांनी आपल्या संशोधनातून शेतकऱ्यांना पर्यायाने देशाला समृद्ध केले होते. प्रसिद्ध ‘एचएमटी’ या तांदळाचा प्रकारासह त्यांनी इतर ८ वाणे शोधली आहेत.
 4. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही.
 5. मात्र त्यांनी आपल्या अवघ्या दीड एकर शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले.दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे.
 6. १९८५-९०च्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या एचएमटी कंपनीच्या घड्याळ्यांमुळे त्यांनी शोधलेल्या एका प्रसिद्ध वाणाला ‘एचएमटी’ हे नाव देण्यात आले होते.
 7. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१०मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.
 8. ५ जानेवारी २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 9. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील तांदूळ संशोधनातील त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित केले.
 10. शालेय पाठ्यपुस्तकात ‘थोरांची ओळख’ या शिर्षकाखालील एका धड्यात त्यांच्या कार्याची ओळख करुन देण्यात आली आहे.
 11. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते.
 12. दादाजींनी विकसित केलेले नऊ वाण : एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू


Tamil poet M. L. (Lenin) Thangappa passed away

 1. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तमिळ कवी एम. एल. (लेनिन) थंगप्पा यांचे निधन झाले.
 2. तमिळनाडूच्या कुरुम्बळपेरि गावात (जि. तिरुनेलवेलि) १९३४साली जन्मलेल्या थंगप्पांचे वयाच्या २१व्या वर्षी बालकवितांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्या १९५५च्या पुस्तकाच्या आवृत्त्या आजही निघतात.
 3. १९६७पर्यंत त्यांनी पुद्दुचेरीमध्ये विविध शाळांमध्ये इंग्रजी शिकवले आणि १९६८ पासून १९८८ पर्यंत त्यांनी टागोर आर्ट्स कॉलेजमध्येत इंग्रजीचे अध्यापन केले.
 4. भारतीसदन महिला महाविद्यालयात पुढे त्यांना प्राध्यापकपद मिळाले.
 5. त्यांच्या नावावर आयुष्यभरात ५० हून अधिक पुस्तके आहेत. त्यांपैकी अनेक अनुवाद आहेत.
 6. तमिळमधून इंग्रजीत थंगप्पांनी अनुवादित केलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके ही पद्यानुवाद आहेत.
 7. त्यांच्या ‘चोलक कोल्लइ बोम्मई’ (बुजगावणे) या तमिळ बालकविता संग्रहाला २०११चा साहित्य अकादमी बालवाङ्मय पुरस्कार मिळाला होता.
 8. त्यानंतर पुढील वर्षी (२०१२) ‘लव्ह स्टँड्स अलोन’ या संगम काव्याच्या इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कारही मिळाला होता.


 Maharashtra Agriculture Minister Pandurang Phundkar passes away

 1. महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
 2. फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते.
 3. पांडुरंग फुंडकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे झाला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय झाले.
 4. आणीबाणीच्या काळात त्यांनी ३ महिने तुरुंगवासही भोगला. यानंतर मिसाबंदी म्हणूनही ९ महिने ते तुरुंगात होते.
 5. १९७७मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रीय झाले. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाऱ्या पहिल्या चार आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.
 6. फुंडकर यांनी ३ वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे तर १९७८ व १९८०मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
 7. फुंडकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे.
 8. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट कृषीमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
 9. १९८३ मध्ये कापूस प्रश्नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
 10. त्याकाळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपाचे स्थान मजबूत केले.
 11. अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय पांडुरंग फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. मुंडे आणि फुंडकर यांची मैत्री सर्वश्रृत होती.
 12. २००९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना २००६-०७ या वर्षाचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


 Famous director and producer Mukta Srinivasan passes away

 1. ‘मुक्ता फिल्म्स’ कंपनीचे संस्थापक तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते व्यंकटचारी श्रीनिवासन उर्फ मुक्ता श्रीनिवासन यांचे ३० मे रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
 2. १९५७साली श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेला पहिला ‘मुधलळ्ळी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ठरला होता.
 3. ‘दयावान’ हा हिंदी चित्रपट ज्याची अनुवादित आवृत्ती होता, त्या ‘नायकन्’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचे मुक्ता श्रीनिवासन निर्माते होते.
 4. १९५७पासून पुढली ६० वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी १९८४पासून चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासही सुरुवात केली.
 5. त्याआधी त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित निबंध असे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते.
 6.  ९०हून अधिक कथासंग्रह आणि सुमारे २५० पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.
 7. जयललितांसह अनेक प्रख्यात अभिनेत्री-अभिनेते त्यांच्या दिग्दर्शनातून झळकले.
 8. श्रीनिवासन यांच्यामुळे अभिनेते जेमिनी गणेशन यांची सामाजिक चित्रपटांमधील अभिनेता म्हणून कारकीर्द घडली.
 9. उग्र अभिनयाची दाक्षिणात्य शैली बदलण्यासही १९६५नंतरचा काळ आणि त्यातील श्रीनिवासन यांचे चित्रपट कारणीभूत ठरले होते.


 Veteran actress Geeta Kapur passed away

 1. पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले.
 2. कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.
 3. वर्षभरापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी गीता कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला.
 4. त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला होता.
 5. त्यावेळी निर्माते रमेश तौरानी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला.
 6. गीता यांनी त्यावेळी त्यांचा मुलगा राजा त्यांना कशापद्धतीने त्रास द्यायचा हे प्रसारमाध्यमांसमोर दुःख कथन केले.


 The well-known economist Dr. D. Ra Pendse's death

 1. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. टाटा समूहाचे वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
 2. ६ सप्टेंबर १९३० रोजी पुणे येथे जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली.
 3. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापाठीतून बी.ए. (ऑनर्स) करून १९५७मध्ये याच विद्यापीठातून एम.ए. केले.
 4. १९६७मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून ते दाखल झाले होते. सुमारे २० वर्षे टाटा उद्योगसमूहाचे अर्थसल्लागार होते.
 5. टाटा समूहात सामील होण्याआधी भारत सरकारच्या वित्त, व्यापार व उद्योग मंत्रालयामध्येही डॉ. पेंडसे यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या.
 6. आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य गुणवत्तेमुळे अनेक शेअर बाजार व वायदेबाजारांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
 7. डॉ. पेंडसे यांच्या अर्थशास्त्राची भाषा मात्र, सहज आणि प्रत्येकास सहज आकलन होईल एवढी सोपी होती.
 8. डॉ. द. रा. पेंडसे यांची ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अ‍ॅडव्हाइस’ ही संस्था वित्तीय सल्लागार क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर होती.


Shivangi Pathak made the sixteenth year of Sir Mount Everest

 1. जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणे कसलेल्या गिर्यारोहकालाही आव्हानात्मक असते. मात्र, अवघ्या 16 वर्षांच्या शिवांगी पाठक हिने गुरुवारी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे.
 2. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं शिवांगीने सांगितलं.
 3. अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्टची यशस्वी चढाई करणं, हे स्वप्न होतं आणि याद्वारे महिला कोणतंही लक्ष्य पार करण्यासाठी सक्षम आहेत हे दाखवून द्यायचं होतं, असं शिवांगी म्हणाली.
 4. वयाच्या दहाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा यांचा व्हिडीओ शिवांगीने पाहिला होता.
 5. अरुणिमा यांचा व्हिडीओ पाहून ती इतकी प्रभावित झाली की तेव्हापासून तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर शिवांगीने गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं.
 6. प्रशिक्षणादरम्यान शिवांगीने केदारनाथ, बद्रीनाथच्या मोठमोठ्या टेकड्या पार केल्या.
 7. हरिणायाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या शिवांगीने ‘सेव्हन समिट ट्रेक’मध्ये सहभागी होऊन एव्हरेस्टची चढाई करण्याचा पराक्रम केला आहे. शिवांगीचे वडील राजेश पाठक हे व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.
माउंट एव्हरेस्ट
 1. उंची - २९,०२९ फूट (८,८४८ मीटर) उंचीमध्ये क्रमांक
 2. ठिकाण -  सागरमाथा अंचल, नेपाळ, तिबेट, चीन
 3. पर्वतरांग - हिमालय
 4. गुणक - 27°59′17″N 86°55′31″E
 5. पहिली चढाई - २९ मे १९५३ ( एडमंड हिलरी, तेनसिंग नोर्गे)
 • माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
 • सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली.
 • ह्या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता.
 • त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.

 


Renowned yogurt doctor Dr. Dhananjay Gunde passed away

 1. योगोपचाराने आरोग्यसंपदेचे जतन करण्याचा वस्तुपाठ घालून देणारे विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे  निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
 2. इचलकरंजीलगतचे बोरगाव (ता. चिकोडी) हे त्यांचे मूळ गाव. स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक अशी त्यांची ओळख होती.
 3. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरात व्यवसाय करू केला. १८८८मध्ये त्यांच्याकडे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या योग विभागाची जबाबदारीराज्यात सर्वप्रथम देण्यात आली.
 4. योगसाधनेने हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदि रोगांना आवर कसा घालता येतो, याची माहिती त्यांनी डॉक्टरसह रुग्णांना दिली.
 5. यासह वृत्तपत्र, नियतकालिके, मासिके यांतून त्यांनी याविषयावर भरपूर लिखाण करून योग विद्येबाबत जागृती केली.
 6. त्यांच्या ‘निरोगी राहू या आनंदाने जगू या’ हा संदेश देणाऱ्या शिबिरांनी आजवर ९००चा आकडा पूर्ण केला आहे. त्यांनी परदेशातही १४५ शिबिरे घेतली आहेत.
 7. त्यांनी पहिली हास्ययोग चळवळ १९८८साली सुरू केली. पहिला शेतकरी लढा, जैन धर्मीय तरुणांत लोकप्रिय ठरलेल्या वीर सेवा दलाच्या कामाची पायाभरणी त्यांनीच केली.
 8. त्यांची योग विषयी ६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याच्या सीडी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषेत उपलब्ध आहेत.
 9. तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन, माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यावर त्यांनी योगोपचार केले होते.


Top