29 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस

 1. संबंध जगभरात आज आण्विक उत्क्रांतीचे पेव फुटलेले दिसून येत आहे. ज्याप्रमाणे आण्विक घटक देशाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकते त्याचप्रमाणे ते देशाच्या रक्षणार्थ सुद्धा उपयोगात आणले जाऊ शकते हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच देशाची संरक्षण व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये एकप्रकारची होड लागली आहे. मग त्यासाठी अनेक अणुचाचण्यांचा क्रम लागला आहे.
 2. याची सुरुवात आपल्याला विसाव्या शतकाच्या मध्यकाळात झाल्याचे दिसून आले आहे. 16 जुलै 1945 रोजी पहिली आण्विक शस्त्र चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास 2000+ चाचण्या घेतल्या गेलेल्या आहेत.
 3. अश्या आण्विक चाचण्यांमुळे त्या-त्या प्रदेशातील जीवन संरचना समूळ नष्ट झाल्याचे परिणाम दिसून आले आहेत. म्हणूनच आणखीन अणुचाचण्या रोखण्यास एकीने प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी आणि जगाचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने शैक्षणिक कार्यक्रमे, उपक्रमे आणि संदेश यांच्या माध्यमातून जगभर जागृती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस (International Day against Nuclear Tests) पाळण्यात येतो. 
 4. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य राज्ये, आंतरशासकीय आणि अशासकीय संघटना, शैक्षणिक संस्था, युवा-प्रकल्पे आणि प्रसारमाध्यमे यांच्यामार्फत सुरक्षित जग साध्य करण्याच्या दिशेने एक मौल्यवान पाऊल म्हणून अणुचाचण्यावर बंदी आणण्याची गरज असल्याचे दर्शवते. 
 5. याचाच भाग म्हणून, या अंतर्गत 5 मार्च 1970 मध्ये आण्विक शस्त्रे बंदी स्पष्ट करण्यासाठी आण्विक शस्त्रे हाताळणी कमी करण्यावरचा करार (Treaty on the Non-proliferation of Nuclear Weapons-NPT) सादर करण्यात आला. 
 6. तसेच 1996 व्यापक आण्विक चाचणी बंदी करार (Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty- CTBT) आणण्यात आलेला आहे. हे आण्विक चाचणी मधील सर्व प्रकारांचे शेवट करण्यासाठीचे एक आंतरराष्ट्रीय साधन आहे. 
 7. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन या संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच कायमस्वरूपी सदस्यांनी प्रथम NPT करार मान्य केलेला आहे. आणि भारत, इस्रायल, पाकिस्तान आणि दक्षिण सुदान या संयुक्त राष्ट्रसंघ च्या पाच सदस्य राष्ट्रांनी अजूनही NPT ला स्वीकारले नाही आहे.
 8. अलीकडील याविषयी उचललेले पाऊल म्हणजे, 2010 साली नॉन-प्रोलिफेशन ऑफ न्यूक्लियर वेपन्स (NPT) वरील संधिच्या पुनरावलोकन परिषदेत अंतिम दस्तऐवज तयार करण्यात आले, ज्यात अणुचाचण्यांमुळे होणार्‍या मानवतावादी परिणामांची तीव्र चिंता व्यक्त केली आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून आपल्या सर्व गरजा पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 9. 29 ऑगस्ट 1991 रोजी सेमीपॅलटिंस्क अणुचाचणी ठिकाण बंद करण्याच्या समर्थणार्थ मोठ्या प्रमाणात प्रायोजक आणि सहप्रायोजक यांच्यासह कझाकस्तान प्रजासत्ताककडून या दिनासंबंधीचा ‘ठराव 64/35’ सादर करण्यात आला होता.
 10. 2 डिसेंबर 2009 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या 64 व्या सत्रात सर्व सदस्यांकडून एकमताने ‘ठराव 64/35’ चा अवलंब करीत 29 ऑगस्ट हा “आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस” म्हणून जाहीर केले गेले. त्यानंतर 2010 साली आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पहिल्यांदा चिन्हांकित केले गेले.
 11. पण, आण्विक शस्त्रांचे जगभरातून पुर्णपणे निष्कासन याशिवाय हे लक्ष सध्या केले जाऊ शकत नाही, म्हणून 26 सप्टेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आयोजित आण्विक शस्त्रसंन्यास (nuclear disarmament) वरच्या उच्च स्तरीय बैठकीनंतर ऑक्टोबर 2013 मध्ये पहिल्यांदा ठराव (A/RES/ 68/32) प्रस्तावित करण्यात आला.
 12. आंतरराष्ट्रीय आण्विक शस्त्रांचे संपूर्ण उच्चाटन दिवस (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons) सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.


ओबीसी क्रिमिलेअरच्या मर्यादेत वाढ

 1. केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणासाठी क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.
 2. वार्षिक ८ लाख रूपये उत्पन्न असलेले ओबीसी क्रिमिलेअर अंतर्गत येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे.
 3. पूर्वी ही मर्यादा ६ लाख रूपये इतकी होती. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील गरजवंत आणि तळागाळातील लोकांना आरक्षणाचा फायदा मिळेल.
 4. आतापर्यंत ६ लाख किंवा यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ओबीसी कुटुंबियांना लाभ घेणाऱ्या सूचीतून हटवून क्रिमिलेअरमध्ये ठेवण्यात आले होते.

क्रिमिलेअर :-

 1. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, ओबीसींना सरसकट आरक्षण न देता ठराविक उत्पन्न मर्यादेच्या आतील व्यक्तींनाच आरक्षण देणे, १९९०च्या दशकात सुरू झाले.
 2. सुरुवातीला क्रिमिलेअरची मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये होती. कालांतराने महागाई लक्षात घेऊन, ती वेळोवेळी वाढविण्यात आली. ओबीसी आरक्षणाची शेवटची समीक्षा २०१३मध्ये करण्यात आली होती. 
 3. मागास वर्गीयांमधील ज्यांचे उत्पन्न अधिक असते अशा लोकांना क्रिमिलेअर म्हटले जाते. ते आरक्षणासाठी पात्र नसतात.
 4. सरकारी नोकरी, शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण आहे. परंतु, यासाठी संबंधित कुटुंबियाचे उत्पन्न क्रिमिलेअरच्या मर्यादेत नसले पाहिजे.
 5. क्रिमिलेअरमध्ये येणारे इतर मागास वर्गातील लोक आरक्षणाच्या बाहेर येतात. या उत्पन्न गटातील वर्गाला ओबीसीचे कोणतेही फायदे दिले जात नाहीत.

 उपप्रवर्ग बनवण्यासाठी नवा आयोग:- 

 1. ओबीसीच्या यादीत सब कॅटगरी (उपप्रवर्ग) बनवण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारसही सरकारने राष्ट्रपतींकडे केली आहे.
 2. ओबीसी प्रवर्गातील पुढारलेल्या जातींनाच आरक्षणाचा मोठा वाटा मिळतो व तुलनेने मागासलेल्या जाती वंचित राहतात.
 3. त्यामुळे ओबीसींमधील दुर्लक्षित, दुबळ्या आणि आरक्षणाचे लाभ मिळविण्यात मागे राहिलेल्या जातींकडे विशेष लक्ष देण्यासाठी हा आयोग कार्य करेल.
 4. ओबीसींच्या आरक्षणाचे लाभ सध्या विविध जातींना कसे विषमतेने मिळतात, याचा अभ्यास करणे व हे लाभ ओबीसींमधील सर्व जातींना नीट मिळावेत, यासाठी निकष व प्रक्रिया सुचविणे हे काम आयोगाने करायचे आहे.
 5. उपप्रवर्गाचे नेमके प्रमाण, त्यांचे निकष, वैज्ञानिक आधारांवर उपप्रवर्गामधील जाती निवडण्याची कार्यपद्धती आदींबाबत हा आयोग शिफारस करेल.
 6. अध्यक्षांची नेमणूक झाल्यापासून बारा आठवडय़ांमध्ये अहवाल देण्याचे बंधन आयोगावर असणार आहे. 
 7. केंद्रीय नोकऱ्यांसाठी ओबीसींमध्ये उपप्रवर्ग करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास वर्ग आयोगाने २०११मध्ये केली होती.
 8. आंतरमंत्रालयीन सल्लामसलतीनंतर सरकारने त्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
 9. १९९२मधील इंद्रा सहानी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उपप्रवर्गाच्या निर्मितीचा निर्णय वैध असल्याचे नमूद केले होते.
 10. केंद्राने हा निर्णय आता घेतला असला तरी, महाराष्ट्रासह देशातील ९ राज्यांनी यापूर्वीच ओबीसींमध्ये उपप्रवर्गाची निर्मिती केली आहे.
 11. त्यात महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगण, बिहार, झारखंड, पुदुच्चेरी, हरयाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि जम्मू व काश्मीरचा (फक्त जम्मू विभाग) समावेश होतो.


रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अश्विनी लोहानी

 1. एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी राजीनामा दिला होता.
 3. याच प्रकरणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला होता. परंतु, मोदींनी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे.
 4. गेल्या सात दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन रेल्वे अपघात झाले आहेत. त्यात २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू तर शेकडो प्रवासी जखमी झाले.
 5. या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर अश्विनी लोहानी यांची वर्णी लागली आहे. 
 6. ए के मित्तल २०१६मध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्यांना मोदी सरकारने २ वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती.
 7. गेल्या २ वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले असून शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका होत आहे.
 8. उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातानंतर सुरेश प्रभू यांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.


कॉमेडी किंग जेरी लुईस यांचे निधन

 1. दिग्गज विनोदवीर आणि प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक जेरी लुईस यांचे अमेरिकेतील लास वेगासमध्ये निधन झाले.
 2. ते ९१ वर्षांचे होते.
 3. जेरी लुईस यांचा जन्म १६ मार्च १९२६ रोजी झाला होता.
 4. हॉलिवूडमध्ये त्यांना कॉमेडी किंग म्हणूनही ओळखले जात होते.
 5. लुईस यांनी १९५०च्या दशकात गायक डीन मार्टीन यांच्यासोबत १६ चित्रपट केले.
 6. या चित्रपटांतील लुईस यांच्या अभिनयाला सिनेप्रेमींनी चांगली दाद दिली.
 7. नॉटी प्रोफेसर, द बेलबॉय, लेडीज मॅन या चित्रपटांतील लुईस यांचा अभिनय गाजला.
 8. गेल्या वर्षी ‘द ट्रस्ट’ चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका बजावली.
 9. ते अनेक टीव्ही शो, नाइट क्लब आणि कॉन्सर्टमध्ये आपल्या स्टँडअप कॉमेडी प्रोग्रामसाठी प्रसिद्ध होते.
 10. डीन मार्टीन आणि लुईस यांचा ‘मार्टिन आणि लुइस’ हा कॉमेडी शो देखील प्रचंड प्रसिद्ध झाला होता.
 11. जेरी लुईस यांना अमेरिकन कॉमेडी अवॉर्ड, लॉस अँजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन आणि व्हेनिस फिल्म फेस्टिवल अशा अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


Top