जनधन योजना आणि इतर वित्तीय सुविधांचे यश: एक अहवाल

 1. तीन वर्षापूर्वी 26 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ची घोषणा केली होती.
 2. या योजनेमधून देशातील प्रत्येक नागरिकाला वित्तीय सेवा प्रदान करण्याचा उद्देश ठेवण्यात आला.
 3. विशेषत: गरीबांना बँक खाते उघडणे, त्यांना लाभ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देणे, स्वयं कर्ज व विमा प्रदान करणे, अश्या सेवा देण्यात आल्या आहेत.

PMJDY योजनेमधून साधलेले यश:-

 1. PMJDY अंतर्गत एकूण खात्यांची संख्या जानेवारी 2015 मधील 12.55 कोटीवरुन 16 ऑगस्ट 2017 पर्यंत 29.52 कोटी इतकी झाली आहे.
 2. PMJDY अंतर्गत एकूण ग्रामीण खात्यांची संख्या जानेवारी 2015 मधील 7.54 कोटीवरुन 16 ऑगस्ट 2017 पर्यंत 17.64 कोटी इतकी झाली आहे.
 3. जारी करण्यात आलेल्या रुपे (Rupay) कार्डची एकूण संख्या जानेवारी 2015 मधील 11.08 कोटीवरुन 16 ऑगस्ट 2017 पर्यंत 22.71 कोटी इतकी झाली आहे.
 4. लाभार्थी खात्यांमध्ये एकूण शिल्लक राशी 65,844.68 कोटी रुपये इतकी आहे आणि प्रती खाते सरासरी शिल्लक राशी जानेवारी 2015 मधील 837 रुपयेवरून 16 ऑगस्ट 2017 पर्यंत 2231 रुपये इतकी आहे.
 5. PMJDY अंतर्गत शून्य रुपये शिल्लक असलेल्या खात्यांची संख्या सप्टेंबर 2014 मधील 76.81% वरून कमी होत ऑगस्ट 2017 मध्ये हे प्रमाण 21.41% इतके होते. 
 6. मार्च 2014 पर्यंत 33.69 कोटी खाते महिलांचे होते, जे की एकूण खात्यांच्या प्रमाणात 28% इतके होते.
 7. तर मार्च 2017 पर्यंत हे प्रमाण 40% वर पोहचलेले आहे. महिलांच्या एकूण 43.65 खात्यांमध्ये PMJDY अंतर्गत उघडलेल्या महिलांच्या एकूण खात्यांची संख्या 14.49 कोटी इतकी आहे.
 8. सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) अंतर्गत गरीबांना सुरक्षा प्रदान केले आहे.
 9. 7 ऑगस्ट 2017 रोजी PMJJBY अंतर्गत एकूण नोंदणीचा आकडा 3.46 कोटी होता तर PMSBY अंतर्गत 10.96 कोटी इतका होता.
 10. यात 40% इतके महिलांचे प्रमाण  आहे.

इतर वित्तीय पुढाकारांचे यश:-

 1. PMJDY चा भाग असलेल्या मुद्रा (MUDRA) योजनेमधून 18 ऑगस्ट 2017 पर्यंत 8.77 कोटी लाभार्थ्यांना 3.66 लाख कोटी रुपये वितरित केले गेले आहे.
 2. भारतात जवळपास 52.4 कोटी आधार क्रमांक 73.62 कोटी खात्यांशी जोडण्यात आले आहेत.
 3. सद्यपरिस्थितीत विविध योजनेमधून 35 कोटी लाभार्थ्यांना वार्षिक 74,000 कोटी रुपये थेट खात्यात हस्तांतरित केले जात आहेत.


अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना HIV ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी नवा मार्ग सापडला

 1. अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील केक स्कूल ऑफ मेडिसीन येथील शास्त्रज्ञांना ह्यूमन इम्युनोडिफिशियंशी वायरस (HIV) ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी नवा मार्ग सापडला आहे.
 2. या नव्या पद्धतीला “HIV कॉकटेल्स” किंवा “हायली अॅक्टिव अॅंटीरिट्रोव्हायरल थेरपी (HAART)” असे नाव देण्यात आले आहे. 
 3. या नव्या उपचार पद्धतीत HIV विषाणूचा प्रतिकार करण्याऐवजी, मनुष्याची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी हे शोधून काढले आहे.
 4. नव्या पद्धतीसाठी, आय-चूए हुआंग यांच्या नेतृत्वात चमूने 13 वर्षे मनुष्याच्या प्रतिकार शक्तीचा अभ्यास केला.
 5. हा शोधाभ्यास नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या प्रकाशनात प्रसिद्ध झाला आहे.
 6. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2016 साली जगभरात सुमारे 37 दशलक्ष लोक HIV ने ग्रासलेले आहेत.
 7. 20 दशलक्ष लोकांना अॅंटीव्हायरल थेरपी देण्यात आली आहे.

नव्या उपचार पद्धतीबाबत:-

 1. हा अभ्यास HIV 1 वर केंद्रित आहे, जो जगभरात सर्वाधिक आढळतो.
 2. HIV ला R5 आणि X4 विषाणू स्ट्रेन असे वर्गीकृत केले जाऊ शकते. 
 3. R5 विषाणू हे केवळ प्राथमिक संक्रमणाशी निगडीत आहेत, तर HIV च्या पुढील टप्प्यात X4 विषाणू आढळतात.
 4. नव्या शोधात असे आढळून आले आहे की, एका विशिष्ट प्रथिनांचा वर्ग HIV संक्रमण होण्याच्या प्रारंभिक काळात काही अत्यंत संक्रामक विषाणूला प्रतिबंधित करू शकते. 
 5. यात SARS, इन्फ्लूएन्झा, डेंग्यू आणि वेस्ट नाइल या विषाणूंचा समावेश आहे.
 6. शिवाय, संशोधकांनी X4 विषाणूंना प्रतिबंध करण्याचा मार्ग शोधला आहे. 
 7. “डेल्टा 20” या नावाचे विशिष्ट प्रथिने X4 विषाणूंना प्रतिबंधित करू शकतात, असे आढळले.


पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू

 1. निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सवात पालिकेच्या सहकार्याने प्रथमच पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे.
 2. हा प्रकल्प 27 ऑगस्टपासून कार्यरत झाली असल्याची माहिती रोटरी क्लबच्या वतीने पुणे रोटरी वॉटर कमिटी प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
 3. गणेशपूजा, आरतीसाठी सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये शेकडो टन फुले, दुर्वा वापरल्या जातात.
 4. त्याचे विसर्जन गणेशमूर्ती विसर्जनावेळी केले जाते.
 5. पालिकेतर्फे या निर्माल्याचे नदीत विसर्जन होऊन नदी प्रदूषित होऊ नये, म्हणून जागोजागी घाटांवर, पुलांवर निर्माल्य कलश उभारले जातात.
 6. मात्र, या निर्माल्यातून खतनिर्मिती करुन पालिका हद्दीतील बागांमध्ये वापरण्याचा प्रकल्प रोटरीच्या पुढाकाराने पुण्यात प्रथमच सुरू होत आहे.
 7. तसेच या प्रकल्पात निर्माल्याचे श्रेडरद्वारे बारीक तुकडे करुन कंपोस्ट खत केले जाणार आहे.


क्वालकॉमचे प्रेसिडेंट डेरेक एबर्ले यांचा पदाचा राजीनामा

 1. अॅपल कंपनीसोबत कायदेशीर लढाई लढत असलेल्या क्वालकॉम कंपनीचे प्रेसिडेंट डेरेक एबर्ले यांनी 17 वर्षांच्या यशस्वी कामगिरीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 2. एबर्ले हे कामकाज सोपवण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत पदावर कार्यरत राहतील.
 3. गेल्या 30 वर्षांमध्ये, क्वालकॉमने मोबाईल क्रांती घडविण्यासाठी अनेक मुख्य तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.
 4. आधुनिक स्मार्टफोन घडविण्यासाठी तंत्रज्ञान शक्य केले आहे.
 5. अॅपलने त्याच्या आयफोन7 सारख्या उपकरणांमध्ये क्वालकॉमचे इलेक्ट्रॉनिक चिपचे पेटंट वापरल्याच्या वादावरून क्वालकॉम आणि अॅपल यांच्यात वाद सुरू आहे.
 6. यामुळे अॅपलने क्वालकॉमचे प्रतिस्पर्धी चिप उत्पादक इंटेलद्वारा तयार केलेल्या सेल्युलर बेसबँड मॉडेम प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या आयफोनची विक्री थांबविली आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.