austrelia new pm scott morrison

 1. ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पक्षामध्ये पंतप्रधान माल्कम टर्नबल यांच्याविरोधात बंड झाल्यानंतर, आता पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रदानपदाची शपथ घेतली आहे.
 2. पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये मॉरिसन यांनी माजी गृहमंत्री पीटर डटन यांचा पराभव केला.
 3. टर्नबल यांनी गेल्या आठवड्यामध्ये उर्जा कपातीसाठी एक ठराव आणला होता. यामध्ये विजेचे दर कमी करतानाच, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कार्बन उत्सर्जनामध्ये कपात करण्याचे उपाय होते. त्यावरून पक्षामध्ये त्यांच्याविरोधात बंड झाले आणि बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी त्यांच्याऐवजी अन्य नेत्याची निवड करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर टर्नबल यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
 4. तसेच त्यामुळे नव्या नेतेपदासाठी टर्नबल सरकारमधील अर्थमंत्री मॉरिसन आणि डटन यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यात मॉरिसन यांना 45, तर डटन यांना 40 मते मिळाली.
 5. ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, त्यामध्ये मॉरिसनच पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.


first pegvin of india passed away

 1. दोन वर्षांपासून राणीच्या बागेत वास्तव्यास आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनपैकी मिस्टर बोल्ट आणि फ्लिपर या जोडीने १५ ऑगस्टला एका पिल्लाला जन्म दिला होता.
 2. मात्र हे पिल्लू २२ ऑगस्टला दगावले आहे अशी माहिती समोर आली आहे. या पिल्लाला पिसे येऊन ते पोहण्याची शारिरीक क्षमता येण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता.
 3. मात्र २२ ऑगस्टला या पिल्लाची प्रकृती ढासळली. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने या पिल्लाचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न केले. मात्र २२ तारखेच्या रात्री हे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.
 4.  मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ज्ञ विभागातील प्राध्यापकांच्या पथकाने २३ तारखेला म्हणजेच गुरूवारी सकाळी ९.३० वाजता प्राणी संग्रहालय रूग्णालयात या पिल्लाचे शवविच्छेदन केले.
 5. नवजात पिल्लातील विसंगती आणि यकृतातील बिघाड यामुळे या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
 6. पेंग्विन व्यवस्थापनावरील विविध संदर्भांनुसार बऱ्याचदा अंडी किंवा पिल्ले मृत होण्याचे प्रमाणे हे सरासरी ६० टक्के इतके असते.
 7.  ज्यामध्ये अंडे फलित नसणे, अंड्यामध्ये पिल्लाची स्थिती योग्य नसणे, अंड्यातून पिल्लू स्वतःहून बाहेर न येणे, पिल्लाला अन्न भरवण्यात त्याच्या पालक पक्षांची असमर्थता, अंड्यातील पिवळा बलक तसाच राहणे अशी अनेक कारणे असू शकतात.
 8.  असोसिएशन ऑफ झूज अँड अॅक्वेरिअर स्पिसिज सर्व्हायवल प्लान आणि हम्बोल्ट पक्ष्यांच्या कृत्रिमरित्या उबविण्यात तसेच वाढवण्यासंबंधीच्या शास्त्रीय प्रबंधान्वये जन्मानंतरचे ३० दिवसापर्यंतच्या पिल्लांचा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के इतका असतो.
 9.  आता हे पिल्लू दगावल्याने भारतात जन्माला आलेले पहिलेवहिले पेंग्विनचे पिल्लू दगावले आहे.


 baudha conference 2018

 1. 6 वी परिषद

 2.  Theme(संकल्पना) - Buddha Path - The Living Heritage

 3. स्थळ - नवी दिल्ली

 4. उदघाटन - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 2018 रोजी

 5. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने - महाराष्ट्र , बिहार , उत्तरप्रदेश राज्यांच्या सहकार्याने आयोजित केलेली परिषद

 6. 2004 पासून आयोजित केली जाणारी द्विवार्षिक परिषद

 7. जवळपास 30 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


first india pakistan joint military excercise

 1. सीमा रेषेवरील तणावपूर्ण वातावरणात एकमेकांसमोर उभे ठाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला.
 2. शांघाय सहकार्य संघटनेतील देशांनी 24 ऑगस्ट रोजी संयुक्त लष्करी सराव केला असून यात भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे.
 3. रशियात हा संयुक्त सराव करण्यात आला.
 4. शांघाय सहकार्य संघटनेतील चीन, रशिया व अन्य देशांचे सैन्य 'शांतता मिशन 2018' अंतर्गत संयुक्त सराव करत आहेत.
 5. दहशतवादाविरोधात या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
 6. रशियात 24 ऑगस्ट पासून या लष्करी सरावाला सुरुवात झाली.
 7. शहरी भागात दहशतवादी कारवायांविरोधात कशी मोहीम राबवावी, याचे प्रशिक्षण यात दिले जाणार असून या सरावात मॉक ड्रील देखील घेतली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.
 8. संयुक्त लष्करी सरावात रशियाचे सुमारे 1,700 सैनिक, चीनचे 700 आणि भारतीय लष्कराचे 200 जवान सहभागी झाले आहेत. यात राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.
 9. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना 2001 मध्ये करण्यात आली असून चीन, कझाकस्तान,रशिया, किर्गीझस्तान, ताजिकिस्तान हे एससीओचे संस्थापक देश आहेत. सध्या एससीओमध्ये आठ स्थायी सदस्य आहेत.
 10. तसेच यात भारत, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.
 11. दहशतवाद, फुटिरतावादाविरोधात लढा देण्यासाठी आणि शांतता निर्माण करण्यासाठी एससीओची स्थापना करण्यात आली.


Top