MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताने बांगलादेशविरुद्ध 2-0 ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरील आपली स्थिती अधिक मजबूत केली.

2. ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीमध्ये डावाने विजय मिळवत भारताने आपली गुणसंख्या 360 केली. भारताने नऊ संघाच्या या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आतापर्यंत गुण गमावलेला नाही.

3. भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत 2-0 ने पराभूत केल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने पराभव केला आणि आता बांगलादेशविरुद्ध 2-0 ने विजय मिळवला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

2. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास 59 मिनिटे आणि 40.2 सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडवला.

3. अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत 52.2 सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. मग दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने 52.16 सेकंदांचा नव्या विश्वविक्रम साकारला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 59वा भाग आज प्रसारित झाला.

2. या कार्यक्रमात मोदींनी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर होईल, तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. या निर्णयावर मोदी यांनी भाष्य केलं.

3. नऊ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला. या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु 130 कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, देशाच्या हितापेक्षा मोठं
काहीच नाही. देशात शांती, एकता आणि सद्भावना कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद,” असं मोदी म्हणाले.

4. याचबरोबर मोदी यांनी महिलांसाठी नव्यानं सुरु केलेल्या ‘भारत की लक्ष्मी’ या योजनेबाबत माहिती दिली. “या योजनेमुळं महिलांचा विकास होईल. तसेच देशातील महिला सक्षमीकरणास मदत होईल”, असं मोदी म्हणाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना रविवारी दिला.

2. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले आमंत्रण आणि त्यांचा शपथविधी बेकायदा असून राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रिट याचिकेद्वारे केली आहे.

3. शनिवारी रात्री उशिरा दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजय खन्ना यांच्या तीनसदस्यीय पीठापुढे सुनावणी झाली.

4. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी बहुमत असल्याचा दावा करणारे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या पािठब्याचे अजित पवार यांनी दिलेले पत्र न्यायालयात सादर करण्याचा आदेश महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिला.

5. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलेले पत्रही सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भातील हे तीन दस्तावेज न्यायालयात सादर केल्यानंतर सुनावणी घेतली जाईल आणि या याचिकेसंदर्भात यथायोग्य आदेश दिला जाईल, असे न्यायालयाने रविवारच्या सुनावणीत स्पष्ट केले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

2. १९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

3. १९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

4. १८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

5. १९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

6. १९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.


Top