India Smart City Award 2018

 1. भारत स्मार्ट शहर पुरस्कार (India Smart Cities Award) अंतर्गत तीन श्रेणींमध्ये एकूण नऊ पुरस्कारांची घोषणा केली गेली आहे.
 2. हे पुरस्कार प्रकल्प पुरस्कार, अभिनव कल्पना पुरस्कार आणि शहर पुरस्कार या श्रेणींमध्ये दिले जात आहे.
 3. शहर पुरस्कार – सूरत (गुजरात)
  1. विशेषत: शहरी पर्यावरण, वाहतूक आणि गतिशीलता आणि शाश्वत एकात्मिक विकासाच्या श्रेणीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये दाखविलेल्या जोमासाठी शहर पुरस्कार दिला जात आहे.
 4. अभिनव कल्पना पुरस्कार - भोपाळ (मध्यप्रदेश) आणि अहमदाबाद (गुजरात)
  1. शाश्वत एकात्मिक विकासाच्या यशप्राप्तीसाठी अभिनवता, तळागळापर्यंत संपर्क आणि परिवर्तनीय अश्या दृष्टिकोनासाठीचे उल्लेखनीय प्रकल्प / कल्पनांना अभिनव कल्पना पुरस्कार दिला जात आहे.
 5. प्रकल्प पुरस्कार - सात श्रेणींमध्ये 1 एप्रिल 2018 पर्यंत तयार झालेल्या सर्वात अभिनव आणि यशस्वी प्रकल्पांना प्रकल्प पुरस्कार दिला जात आहे.
  1. 'प्रशासन' श्रेणी – पुणे (शासकीय रुग्णालये)
  2. ‘पर्यावरण निर्मिती' श्रेणी - पुणे (स्मार्ट प्लेस तयार करण्यासाठी)
  3. 'सामाजिक दृष्टी' श्रेणी – NDMC आणि जबलपूर (स्मार्ट वर्गांसाठी), विशाखापट्टनम (स्मार्ट परिसर), पुणे (दीपगृह)
  4. 'संस्कृती आणि अर्थव्यवस्था' श्रेणी – भोपाळ (बी नेस्ट इनक्यूबेशन सेंटर) आणि जयपूर (राजस्थान स्कूल ऑफ आर्ट्स)
  5. 'शहरी पर्यावरण' श्रेणी - भोपाळ, पुणे, कोयंबतूर (सार्वजनिक दुचाकी सामायिक करण्याकरिता) आणि जबलपूर (कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प)
  6. 'वाहतूक आणि गतीशीलता' श्रेणी - अहमदाबाद आणि सुरत (एकात्मिक संप्रेषण व्यवस्थापन प्रणाली/TMS)
  7. 'जल व स्वच्छता' श्रेणी – अहमदाबाद (SCADA द्वारे स्मार्ट जलव्यवस्थापन)
 6. भारत स्मार्ट शहर पुरस्कार :-
  1. शहरांमध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी शहर, प्रकल्प आणि अभिनव कल्पनांना पुरस्कृत करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 25 जून 2017 रोजी ‘भारत स्मार्ट शहर पुरस्कार’चा शुभारंभ केला.
  2. फक्त स्मार्ट शहरेच या पुरस्कारासाठी पात्र आहेत. 3 श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.
  3. ते म्हणजे :-
   1. प्रकल्प पुरस्कार
   2. अभिनव कल्पना पुरस्कार
   3. शहर पुरस्कार


 Haryana State Government's '7-Star Gram Panchayat Rainbow Scheme'

 1. जानेवारी 2018 मध्ये हरियाणा राज्य शासनाने राज्यात ‘7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना’ लागू केली. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1120 गावांना स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.
 2. यासोबतच, सात सामाजिक मापदंडांच्या आधारावर ग्रामपंचायतींना स्टार मानांकन देणारा हरियाणा देशातला पहिला राज्य ठरला आहे.
 3. स्टार-प्राप्त सर्वोत्कृष्ट गावे:-
  1. अंबाला (407 स्टार) जिल्ह्याला सर्वाधिक स्टार मिळून ते या यादीत अग्रस्थानी आहे. त्याच्यानंतर गुरुग्राम (199 स्टार) आणि कर्नाल (75 स्टार) यांचा क्रम लागतो.
  2. पडवल जिल्ह्यातील जैनपूर, जनचौली आणि नांगला भिकू या तीन गावांना 6-स्टार मानांकन प्राप्त झाले.
  3. पडवल जिल्ह्यातील भांडोली आणि घारोट ही गावे, रोहतक जिल्ह्यातील काहनौर या तीन गावांना 5-स्टार मानांकन प्राप्त झाले.
  4. अकबरपूर आणि हारबोन (अंबाला जिल्हा), मडदलपूर (फरीदाबाद जिल्हा), बनवाली सोत्तर आणि मल्हार (फतेहबाद जिल्हा), वाजिरपूर (गुरुग्राम जिल्हा), बाहबालपूर (हिसार जिल्हा), रामगढ आणि कर्ना (पडवल जिल्हा) या नऊ गावांना 4-स्टार मानांकन प्राप्त झाले.
  5. शांती आणि सौहार्द श्रेणीत सर्वाधिक 1,074 स्टार प्रा प्त झालीत आणि त्यानंतर चांगले शिक्षण यामध्ये 567 स्टार आणि स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये 109 स्टार प्राप्त झालीत.
 4. 7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना:-
 5. 7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजनेच्या अंतर्गत सात सामाजिक मापदंडांच्या आधारावर ग्रामपंचायतींना मानांकन दिले जाते. या सात मापदंडांमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सुशासन आणि सामाजिक भागीदारी यांचा समावेश आहे.
 6. सर्व मापदंडांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणार्‍या ग्राम पंचायतींना इंद्रधनुष ग्राम पंचायत म्हणून ओळखले जाईल. त्यांना राज्य शासनाच्या विकास व पंचायत विभागाकडून त्यांच्या प्रदर्शनाच्या आधारावर विकासकार्यांसाठी विशेष अनुदान देखील दिले जाईल.
  1. 6-स्टार प्राप्त करणार्‍या गावांना 20 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त विकास कामांचे दावेदार असतील.
  2. 5-स्टार प्राप्त करणार्‍या गावांना 15 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त विकास कामांचे दावेदार असतील.
  3. 4-स्टार प्राप्त करणार्‍या गावांना 10 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त विकास कामांचे दावेदार असतील.
 7. इंद्रधनुष्यात असलेल्या 7 रंगांप्रमाणेच सात रंग या स्टारला दिले गेले आहेत.
  1. गुलाबी – हा स्टार त्या गावांना दिला जाणार, ज्यांनी स्त्री-पुरुष गुणोत्तरात सुधारणा करण्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलेले आहे.
  2. हिरवा – हा स्टार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दिला जाणार.
  3. पांढरा - हा स्टार स्वच्छतेसाठी दिला जाणार.
  4. तांबडा - हा स्टार गुन्हेगारी मुक्ततेसाठी दिला जाणार.
  5. आकाशी निळा – हा स्टार शिक्षण सोडलेले नसलेल्या गावांना दिला जाणार.
  6. सुवर्ण - हा स्टार सुशासनासाठी दिला जाणार.
  7. रौप्य – हा स्टार गावांच्या विकासात भागीदारीसाठी दिला जाणार.
 8. सर्व मापदंडांवर उत्कृष्ट प्रदर्शन दाखविणार्‍या गावाला 1 लक्ष रूपयांचा पुरस्कार दिला जाणार.
 9. स्त्री-पुरूषांचे गुणोत्तर समान किंवा स्त्रिया अधिक असलेल्या गावाला 50,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच स्वच्छता अभियानाला अंगिकारलेल्या गावांना 50,000 रुपयांचे अतिरिक्त बक्षीस दिले जाईल.


Adv. Shantaram Datar passed away

 1. मराठी भाषा मंचचे संस्थापक आणि न्यायालयीन कामकाज मराठीतून होण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा उभारणारे अॅड. शांताराम दातार यांचे निधन झाले.
 2. उच्च न्यायालयात मराठी भाषेतून न्यायदान केले जावे यासाठी त्यांनी आग्रह धरला. कनिष्ठ न्यायालयांतील कामकाज मराठीत सुरू होण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
 3. महाराष्ट्रात मराठीची होत असलेली गळचेपी आणि शासनाचे मराठीविरोधी धोरण या सर्व गोष्टींविरूद्ध आवाज उठवण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे दातार संस्थापक होते.
 4. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासनाला अधिसूचना काढावी लागली.
 5. दातार यांचा जन्म ९ जून १९४२ला मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
 6. निरनिराळ्या ठिकाणी नोकऱ्या करून त्यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण इंदूरमध्ये घेतले. वकिली व्यवसाय करण्यासाठी ते १९६८साली कल्याणमध्ये आले.
 7. दातार यांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले असले, तरी त्यांनी मराठी भाषेसाठी कायम लढा दिला.
 8. दातार हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. तेव्हापासून त्यांना समाजसेवेची आवड होती.
 9. कल्याण येथे वकिली व्यवसायास सुरूवात केल्यानंतर त्यांनी १९७२मध्ये भारतीय मजदूर संघाच्या व १९७२पासून जनसंघाच्या कामास सुरूवात केली.
 10. जून १९७५मध्ये देशात आणीबाणी घोषित झाली. तेव्हा ते आणीबाणीविरूध्दच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता. 
 11. ते भाषा सल्लागार समितीचे निमंत्रित सदस्य आणि महाराष्ट्र राज्याच्या विधी सल्लागार परिभाषा समितीचेही सदस्य होते. ते अनेक बँकांचे व संस्थांचे कायदेशीर सल्लागारम्हणूनही काम पाहत होते. 
 12. मराठी राजभाषा नियम १९६६मध्ये दुरूस्ती करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य होते.
 13. महाराष्ट्र शासनाने दोन महिन्यापूर्वी मराठीच्या न्यायव्यवहारासाठी उपाययोजना करता यावी, यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीत दातार होते.
 14. ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा या पुस्तकाच्या निमिर्तीमध्ये त्यांचा सहभाग होता.


 2026 FIFA World Cup in Mexico, Canada and the US

 1. २०२६च्या फिफा वर्ल्डकपच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेलादेण्यात आली आहे.
 2. मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेमे मोरोक्कोला मागे टाकत फिफा वर्ल्डकपचे यजमानपद पटकावले. 
 3. यामुळे सुमारे ३२ वर्षांनंतर उत्तर अमेरिकेत फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येणार आहे.
 4. यापूर्वी अमेरिकेने १९९४मध्ये फिफा वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले होते. त्यावेळी अमेरिकन संघ पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
 5. याआधी उत्तर अमेरिकेने ३ वेळा फिफा वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले आहे. तर आफ्रिकेने एकदा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
 6. फिफाचे अध्यक्ष : जिआनी इन्फेंटिनो


 Sujeet Bukhari, editor of Raising Kashmir Kashmir, murdered

 1. ज्येष्ठ पत्र कार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक सुजात बुखारीयांची श्रीनगर येथे  दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
 2. श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले, तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
 3. यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला होता.
 4. जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेली शस्त्रसंधी अंतिम टप्प्यात असताना बुखारी यांची हत्या झाली आहे. ते ५० वर्षांचे होते.
 5. हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बुखारी यांच्यावरील हल्ल्याचे कारणही समजू शकलेले नाही.
 6. जम्मू-काश्मीरमध्ये १५ वर्षांनी दहशतवाद्यांनी पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे.
 7.  सुजात बुखारी:- 
  1. सुजात बुखारी हे जम्मू काश्मीरमधून प्रकाशित होणाऱ्या ‘रायझिंग काश्मीर’ दैनिकाचे संपादक होते. त्यांनी मनिलातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
  2. त्यापूर्वी ते ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राचे श्रीनगरमधील ब्यूरो चिफ होते. बुखारी यांचीधाडसी पत्रकार म्हणून ओळख होती. 
  3. ते काश्मीरच्या शांतता प्रक्रियेसाठी नेहमीच आग्रही असायचे. काश्मीरचा प्रश्न शांततेने सुटेल, अशी त्यांची भूमिका होती.
  4. काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे होणारे उल्लंघनाबाबतही त्यांनी आवाज उठवला होता. काश्मीरमध्ये त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळही सुरु केली होती.
  5. सुजात बुखारी यांचे बंधू सय्यद बशरत बुखारी हे मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये कायदा मंत्री आहेत.
  6. बुखारी यांना वर्ल्ड प्रेस इन्स्टिट्यूट फेलोशिप, अमेरिका आणि एशियन सेंटर फॉर जर्नालिझम, सिंगापूरची फेलोशिप मिळाली होती.


Top