Five cooperative contracts for education and investment between India and Australia

 1. दिनांक 21 नोव्हेंबर 2018 रोजी भारताने ऑस्ट्रेलियाशी पाच करार केले आहेत.
 2. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यादरम्यान हे करार केले गेले आहेत.
 3. ते पुढीलप्रमाणे:–
  1. दिव्यांग व्यक्तींना सेवा प्रदान करण्यासाठी दिव्यांगतेच्या क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी करार
  2. द्वैपक्षीय गुंतवणूक वाढविण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑसट्रेड यांच्यात करार
  3. केंद्रीय खणीकर्म नियोजन आणि संरचना संस्था (रांची, भारत) आणि कॅनबेराचे CSIRO यांच्यात वैज्ञानिक आणि नवकल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्यासाठी करार
  4. आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ (गुंटूर) आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी करार
  5. इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (नवी दिल्ली) आणि क्वीन्सलँड विद्यापीठ यांच्यात संयुक्त पीएचडी कार्यक्रमासंबंधी करार
 4. ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. 
 5. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे.
 6. कॅनबेरा हे राजधानी शहर तर ऑस्ट्रेलियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Foreign welfare ministry needs e-registration to get jobs abroad

 1. नव्या निर्णयानुसार, ‘नॉन-इमिग्रेशन चेक रीक्वायर्ड (नॉन-ECR)’ हा दर्जा असणार्‍या पारपत्र (पासपोर्ट) धारकांना परदेशात नोकरी मिळवण्यासाठी परराष्ट्र कल्याण मंत्रालयाकडे स्वतःची ई-नोंदणी करणे अनिवार्य केले जाणार आहे.
 2. परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी लागू होणार आहे.
 3. संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब, कुवैत, ओमान, बहरीन आणि कतार तसेच अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, लेबनन, लिबिया, मलेशिया, सुदान, दक्षिण सुदान, सीरिया, थायलंड आणि येमेन अश्या 18 देशांसाठी नोंदणी आवश्यक आहे.
 4. इच्छुक भारतीयांना ‘www.emigrate.gov.in’ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.


Declaration of the European Union's policy of promoting relations with India

 1. दिनांक 21 नोव्हेंबर 2018 रोजी युरोपीय संघाने भारतासोबतचे आपले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचे धोरण स्पष्ट करणारे दस्तऐवज प्रसिद्ध केले आहे.
 2. गुंतवणूक, पायाभूत सुविधा, संरक्षण, सुरक्षा आणि दहशतवादाविरोधी तसेच हिंद महासागर क्षेत्रात द्वैपक्षीय लष्करी सहकार्याला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 3. युरोपीय संघ (EU) हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे.
 4. जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत.
 5. युरोपीय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली
 6. याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.


Kim Jong-Yang (South Korea): new president of Interpol

 1. दक्षिण कोरियाचे किम जोंग-यांग यांची आंतरराष्ट्रीय गुन्हेगार पोलीस संघटनेचे (इंटरपोल) नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. अचानक बेपत्ता झालेले मेंग हाँगवेई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. 
 3. आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल / International Criminal Police Organisation) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जे आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्यासाठी सुविधा पुरवते.
 4. 1923 साली याची स्थापना करण्यात आली.
 5. फ्रान्समधील लिऑन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
 6. इंटरपोलमध्ये 192 देशांमधील (2017 सालापर्यंत) पोलीस दलांची सदस्यता आहे.


Top