
1879 21-Jul-2019, Sun
1. राजधानी दिल्लीचे १९९८ ते २०१३ दरम्यान सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी एका खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
2. सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या दीक्षित यांच्या निधनाबद्दल दिल्ली सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
3. ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबच्या कपूरथलामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली होती.