Inauguration of "Adi Festival" in Leh

 1. दि. 17 ऑगस्ट 2019 रोजी लदाखच्या लेह येथे नऊ दिवस चालणार्‍या "आदी महोत्सव" या राष्ट्रीय आदिवासी उत्सवाचा शुभारंभ झाला.
 2. केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
 3. "ए सेलीब्रेशन ऑफ द स्पिरिट ऑफ ट्रायबल क्राफ्ट, कल्चर अँड कॉमर्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 4. हा महोत्सव आदिवासी कल्याण मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाद्वारा (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेलेला कार्यक्रम आहे.
 5. दि. 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत हा महोत्सव चालणारआहे.
 6. लदाख प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर भारत सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा पहिला मोठा कार्यक्रम आहे.
 7. लदाखमध्ये जवळपास 97 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे.
 8. देशभरातून 20 हून अधिक राज्यातून सुमारे 160 आदिवासी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.


Ravi Shastri: Head coach of Team India by November 2021

 1. 17 ऑगस्ट रोजी कपिल देव (अध्यक्ष), अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड केली.
 2. आता रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2021 पर्यंत असणार आहे.
 3. रवी शास्त्री यांची तिसऱ्यांदा प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे.
 4. रवी शास्त्रींसमोर चार प्रमुख आव्हाने आहेत आणि ते आहेत –
  1. 2020 साली टी-20 विश्वचषक;
  2. 2021 साली टी-20 विश्वचषक,
  3. 2021 विश्व कसोटी अजिंक्यपद
  4. 2021 विश्व एकदिवसीय अजिंक्यपद.
 5. रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली होती.
 6. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 21 कसोटी सामने खेळले. त्यातल्या 13 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला.
 7. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला.
 8. यासोबतच एकदिवसीय सामन्यात 60 पैकी 43 सामन्यांमध्ये विजय मिळवला.


Top