1. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन येत्या २३ व २४ डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे. पाच हजारहून अधिक कार्यकर्ते संमेलनाला येतील.
 2. महाराष्ट्र, गुजरातसह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील विचारवंत, साहित्यिक सहभागी होणार आहेत. ही माहिती विद्रोहीचे उपाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव, कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, ॲड. के. डी. शिंदे यांनी दिली. या वेळी प्राचार्य विश्‍वास सायनाकर व प्रा. विजयकुमार जोखे उपस्थित होते.
 3. ते म्हणाले, ‘‘शासनाकडून एक रुपयाही मदत न घेता समाजाच्या ताकदीवर चालणारे बहुजनांचे हे संमेलन आहे. १४ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी दलित आदिवासी, ग्रामीण साहित्यिक व कष्टकरी आदिवासी समाजाच्या नेत्या नजूबाई गावित यांची निवड केली आहे.
 4. संमेलनाला पद्मश्री गणेश व सुरेखा देवी, कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्यासह दिग्गज उपस्थित राहतील. आत्मजित सिंग उद्‌घाटक आहेत. चिन्ना स्वामी यांची प्रमुख उपस्थिती आहे. वाहरू सोनवणे हे विद्रोहीचे अध्यक्ष आहेत.
 5. खानदेशातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तर शहाद्याला संमेलन होत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन बुलढाण्याला होत असल्याने आम्ही हे संमेलन तिकडे घेत असल्याची टीका गैर आहे.
 6. विषमता समर्थक फॅसिस्ट शक्तींचा वाढणारा प्रभाव लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. भाषा, कला, साहित्य यात विचारवंत, कलाकारांची गळचेपी सुरू आहे. या विरोधात अभिव्यक्तीचा आवाज बुलंद करणारे हे संमेलन असेल.
 7. सामान्यांच्या वेदना व जनतेचे प्रश्‍न यावर साहित्यिक, कलावंतांचे नेमके म्हणणे चर्चेला येईल. तळागाळातील माणसे वर आली पाहिजेत हा मुख्य हेतू आहे. या वेळी दिग्विजय पाटील, दीपक कोठावळे उपस्थित होते.


 1. २० नोव्हेंबर २०१७ रोजी गोव्यात आयोजित ४८ व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) चे उद्घाटन इराणी दिग्दर्शक माजीद माजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाने केल्या जाणार आहे.
 2. माजीद माजीदी यांचा 'बियॉन्ड द क्लाउड्स' हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री मालवीका मोहनन ही आहे.
 3. भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) ची सन १९५२ मध्ये स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम गोवामध्ये आयोजित केला जातो. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.


 1. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) च्या फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) सल्लागार मंडळामध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
 2. स्वित्झर्लंडमधील बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) ने १९९८ साली तयार केलेल्या फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे.
 3. सध्या नव्या FSI सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष पदावर BIS चे महाव्यवस्थापक जेमी करुआना हे असतील, मात्र ३० नोव्हेंबर २०१७ नंतर ही जबाबदारी ऑगस्टिन केस्टरन्स यांना देण्यात येणार आहे.
 4. नव्या FSI सल्लागार मंडळामध्ये अन्य सदस्यांमध्ये विल्यम डुडले (फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कचे अध्यक्ष), तसेच ब्राझील, दक्षिण आफ्रिका, जपान आणि जगभरातील अन्य अग्रगण्य केंद्रीय बॅंकांचे गव्हर्नरांचा समावेश आहे.
 5. १७ मे १९३० रोजी स्थापित बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) ही एक वैश्विक वित्तीय संघटना आहे, जी जगभरातील ६० मोठ्या केंद्रीय बँकांच्या मालकीची आहे.
 6. BIS चे फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) जगभरातील वित्तीय क्षेत्रातील अधिकार्‍यांना त्यांच्या वित्तीय प्रणालींना बळकट करण्यासाठी मदत करते. याचे मुख्यालय बेसेल, स्वित्झरलँड येथे आहे.


 1. भारतीय प्रेस परिषद (Press Council of India) कडून दरवर्षी १६ नोव्हेंबरला 'राष्ट्रीय प्रेस दिवस' साजरा करण्यात येतो.
 2. प्रेस  परिषदची स्थापना सन १९५६ मध्ये झाली, जे की देशातील पहिले प्रेस आयोग होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर १९६६ रोजी भारतीय प्रेस परिषद (PCI) ची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा १६ नोव्हेंबर १९९७ पासून दोन दिवसीय सेमिनार भरवण्याची प्रथा तयार करण्यात आली
 3. या निमित्ताने भारतीय प्रेस परिषदकडून आयोजित समारंभात उपरा‍ष्‍ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते 'पत्रकारीतेमधील उत्कृष्टतेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार' चे वाटप करण्यात आले.
 4. राजाराम मोहन राय पुरस्‍कार प्रसिद्ध पत्रकार सेन राजप्‍पा आणि सरत मिश्रा यांना संयुक्‍त रूपाने देण्यात आला. तर ग्रामीण पत्रकारीता व विकासविषयक रिपोर्टिंगसाठी पुरस्‍कार शालिनी नायर (द इंडियन एक्‍सप्रेस) यांना प्रदान करण्यात आला.
 5. तपास विषयक पत्रकारीतेसाठी पुरस्‍कार के. सुजीत (मंगलम दैनिक) आणि चित्रांगदा चौधरी (ओडिशा), छायाचित्र पत्रकारीतेसाठी पुरस्‍कार सी. के. थानसीर (चंद्रिका दैनिक),  विजय वर्मा (PTI) आणि जे. सुरेश (मल्याळम मनोरमा) या तिघांना तर बेस्‍ट न्‍यूज पेपर आर्ट गिरिश कुमार (टाइम्‍स ऑफ इंडिया) यांना देण्यात आला.


Top