1. गारगुंडी (ता. पारनेर) येथील सीए शिवाजी झावरे यांची अशिया खंडामधील एशियन ओशानियन स्टँडर्ड सेंटर (एओएसएसजी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अंकोंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नवी दिल्ली यांचे प्रतिनीधी म्हणून निवड झाली आहे.
 2. अशिया खंड सागरी पट्टयामधील  26 देशांमधून 2009 साली प्रस्थापित झालेली संस्था आहे. ही संस्था अद्यावत आंतरराष्ट्रीय हिशोब प्रणाली व आंतरराष्ट्रीय संस्थांना या बाबतीत सल्ला देणारी एकमेव संस्था आहे. 
 3. शिवाजी झावरे यांना  चीन, ऑस्ट्रेलिया या देशांच्या सरकारनेही याबाबत अधिकृत पत्र दिले आहे. या पदासाठी भारतामधुन प्रथमच दोन वर्षे व नंतरची दोन वर्षे अध्यक्षपदी काम करण्याचा मान झावरे यांना मिळाले आहे.
 4. तसेच झावरे हे  आयसीएआयच्या केंद्रीय मंडळाचे सभासद असून भारताच्या हिशोब नियामक मंडळाचे मानद अध्यक्ष आहेत.


 1. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पातळीवर व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. 
 2. सुमारे चाळीस हजार महाविद्यालयांमधून  बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास व्दितीय क्रमांक प्राप्त झाल्याने विद्या प्रतिष्ठानच्या नावलौकीकात या निमित्ताने भर पडली.
 3. 14 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन महाविद्यालयाला गौरविण्यात आले. 
 4. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. भरत शिंदे यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. 
 5. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने देशभरातील या  174 महाविद्यालयांची यादी तयार करुन  अंतिम दहा महाविद्यालयांची निवड केली. 
 6. तसेच यातून  विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास दुस-या क्रमांकाचे गुण मिळाल्याने त्यांना गौरविण्यात आले.


 1. 15 सप्टेंबर 2017 रोजी संपूर्ण भारतात 15 दिवस चालविला जाणार्‍या ‘ स्वच्छता ही सेवा’ या नव्या स्वच्छतेसंबंधी पुढाकाराला सुरुवात झाली आहे.
 2. अभियानाचा शुभारंभ भारताच्या राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते बिहारमधील ईश्वरगंज गावात (जिल्हा कानपुर) केला गेला.
 3. हा कार्यक्रम  15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या काळात राबवला जाणार आहे. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या समन्वयाने स्वच्छ भारत अभियान मंत्रालयाद्वारे हा कार्यक्रम चालविला जात आहे.
 4. कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आणि पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेवर भर दिला जाईल. कार्यक्रमामध्ये भारताच्या  राष्ट्रपतीपासून ते जनसामान्यांपर्यंत सहभाग दिसून येणार आहे.


 1. भारत सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. कें द्री य गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 2015 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून हा निर्णय घेतला गेला.
 2. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मांडला आहे की  चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भूमीचे मालकी हक्क सोबतच इतर अधिकार दिले जाणार नाहीत, जे अधिकार  अरुणाचल प्रदेशमधील अनुसूचित जमातीला आहेत. मात्र अरुणाचल प्रदेशाबाहेर वास्तव्यास असलेल्यांना इनर लाइन परमिट्स दिले जाऊ शकते.
 3. या निर्वासितांना अरुणाचल राज्यामधील अनुसूचित जमातींसारखे  जमिनीचे अधिकार न देता व्यावहारिक तोडगा काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे.
 4. चकमा समाज हा बौद्ध संप्रदायाशी संबंधित आहे. या समाजाचे मूळ पूर्व पाकिस्तानच्या चितगोंग पर्वतीय क्षेत्रातले आहे. आज हा समाज हिमालय क्षेत्रात,  अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतासह विविध भागात उपस्थित आहे.
 5. हाजोंग हा हिंदू संप्रदायामधील एक आदिवासी समुदाय आहे. बांग्लादेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात हे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. जे हाजोंग भारताचे नागरिक आहेत, त्यांना  अनुसूचित जमाती (ST) चा दर्जा मिळाला आहे. मात्र हा दर्जा बांग्लादेशमधून आलेल्यांना लागू राहणार नाही.
 6. 1964 साली कप्ताई धरण प्रकल्पामुळे चकमा आणि हाजोंग समाजातील सुमारे  एक लाख नागरिकांनी बांग्लादेशमधून ईशान्य भारतात विशेषतः अरुणाचल प्रदेशमध्ये आश्रय घेतला होता. तेव्हापासून या लोकांचे भारतात वास्तव्य आहे. त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे असा  आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली दिला होता. 2011 च्या जनगणनेनुसार, केवळ अरुणाचल प्रदेशात चकमा समुदायाची लोकसंख्या 47,471 इतकी होती.


Top

Whoops, looks like something went wrong.