India's growth rate will be 7.3%: India Barometer Report 2019

 1. PwC संस्थेच्या सहकार्याने भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry -FICCI) कडून ‘भारत बॅरोमीटर अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. भारताच्या उत्पादन निर्मिती क्षेत्रामध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उत्पादकांचा दृष्टीकोन, पुढील 12 महिन्यांसाठी व्यवसायाचे वातावरण आणि व्यापारामधील स्पर्धात्मकता निर्धारित करणारे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
 3. महत्त्वाचे निष्कर्ष:-
 4. उत्पादन निर्मिती क्षेत्र हे देशाच्या संपत्तीच्या एका महत्त्वाच्या भागासाठी एक आर्थिक क्षेत्र खाते आहे.
 5. 2025 सालापर्यंत भारत USD 1 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढी उत्पादन निर्मिती अर्थव्यवस्था असण्याची अपेक्षा आहे.
 6. पुढील 12 महिन्यांमध्ये भारत सरासरी 7% किंवा त्याहून अधिक वृद्धीदराने वाढण्याची क्षमता ठेवतो.
 7. हा अंदाज जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सारख्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थांच्या अंदाजपत्रकांशी जुळलेला आहे.
 8. आगामी 12 महिन्यात उद्योजकांनी त्यांच्या क्षेत्रात वेगाने वाढ होण्याची अपेक्षा दर्शविलेली आहे.
 9. वस्तू व सेवा कर (GST) यामुळे मालवाहतुकीमधील वेग आणि सुलभतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
 10. 85% उद्योजकांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की त्यांची भविष्यातली वाढ वाढत्या निर्यातीमुळे होणार.
 11. वित्त वर्ष 2017-18 मध्ये भारताच्या निर्यातीमधला वृद्धीदर 9 .8% इतका आहे, जो गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.
 12. भारताची अर्थव्यवस्था 7.3% ते 7.7% या दरम्यान वाढू शकते आणि देशांतर्गत बाजारपेठेतली मागणी ही देशासाठी चालक ठरणार आहे, असा अंदाज आहे.


Ashok Chawla resigned as the president of TERI

 1. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दि. 13 जानेवारी 2019 रोजी अशोक चावला यांनी दिल्लीच्या ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (TERI) या ना-नफा संस्थेच्या अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
 2. केंद्र सरकारकडून CBIला ‘एयरसेल-मॅक्सिस’ प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला दाखल करण्याला परवानगी मिळालेली आहे.
 3. आर्थिक घोटाळा आणि सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी चावला अडकले आहेत.
 4. संस्थेविषयी:-
 5. ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (The Energy and Resources Institute -TERI) ही नवी दिल्लीतली एक ना-नफा संशोधन संस्था आहे.
 6. जी ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संशोधन कार्य चालवते.
 7. सन 1974 मध्ये या संस्थेची स्थापना ‘टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ या नावाने करण्यात आली होती.


UAE and Saudi Arabians choose India for agricultural income

 1. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि सौदी अरब या दोन आखाती देशांमधील अन्न सुरक्षेसंबंधी समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताचा आधार घेण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
 2. मुंबईत झालेल्या भारतीय उद्योग संघ (CII) याच्या 25व्या ‘भागीदारी शिखर परिषद’मध्ये याबाबत घोषणा करण्यात आली.
 3. भारताच्या निर्यात धोरणाला चालना देणारा हा निर्णय पहिल्यांदाच कृषीमाल तसेच दुग्ध, फलोत्पादन आणि मत्स्यपालन अश्या शेती-पूरक यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.
 4. ‘फार्म-टू-पोर्ट’ प्रकल्प
  1. त्यासाठी आखण्यात आलेला भारत सरकारचा ‘फार्म-टू-पोर्ट’ प्रकल्प हा विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरचनेप्रमाणेच आहे, परंतु यात कॉरपोरेट पद्धतीने शेती करण्याची शैली वापरात आणली जाणार जेथे आखाती देशांच्या बाजारपेठेने ठरवून दिलेल्या मानदंडाप्रमाणे पीक घेतले जाईल.
  2.  भारताची ही संकल्पना दोन्ही आखाती देशांच्या सरकारांनी स्वीकारलेली आहे.
  3.   त्यादृष्टीने संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतात सेंद्रीय आणि अन्न-प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहे.
 5. सद्यपरिस्थिती
  1. देशातल्या शेतकर्‍यांना आधीच किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणून उत्पादन खर्चाच्या 150% किंमत मिळत आहे. नव्या योजनेमुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यात अधिकच मदत मिळणार.
  2. यावर्षी भारत 290 दशलक्ष टन कृषी-उत्पन्न आणि सुमारे 310 दशलक्ष टन फलोत्पादन अश्याप्रमाणे एकूण 600 दशलक्ष टनपेक्षा जास्त शेतमालाचे उत्पादन घेणार, असा अंदाज आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.