• सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कृषी आयुक्त,पुणे  - विकास देशमुख यांची बदली यशदा पुणेच्या उपमहासंचालकपदी करण्यात आली. एस.एम. केंद्रेकर हे राज्याचे नवे कृषी आयुक्त असतील.
 • व्ही.एन. कळम पाटील यांची बदली चित्रपट महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी तर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अरुण उन्हाळे यांची बदली मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव म्हणून मंत्रालयात केली आहे.
 • अमित सैनी हे विक्रीकरण विभागात सहआयुक्त असतील.
 • शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव कमलाकर फंड यांची बदली एकात्मिक बाल विकास योजना,नवी मुंबईच्या आयुक्तपदी झाली.
 • ठाण्यातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी झाली.


 1. The forex reserves touched a fresh life-time high of $375.71 billion after rising by $2.985 billion in the week ending May 5, helped by increase in foreign currency assets, the Reserve Bank said.The reserves had risen by $1.594 billion to $372.73 billion in the previous week.
 2. Foreign currency assets (FCAs), a major component of the overall reserves, rose by $2.474 billion to $351.53 billion in the reporting week, the RBI said.
 3. The gold reserves  increased $569.9 million to $20.438 billion. SDRs’ value decreased marginally by $0.4 million to $1.459 billion. RBI’s reserve position with the IMF declined $58.4 million to $2.288 billion.
 4. The components of India’s Foreign Exchange Reserves includes
 5. Foreign currency assets (FCAs),
 6. Gold,
 7. Special Drawing Rights (SDRs) and
 8. RBI’s Reserve position with International Monetary Fund (IMF).


 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. 
 2. राज्यभर २५ ते २८ असे चार दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी यांच्या शिवार संवाद सभा होणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. 
 3.  
 4. तसेच या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे हे शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत.


 1. खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालकभीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी नाशिकमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. 
   
 2. मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योग विद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोसळले. 
   
 3. क्रीडामानसोपचार तज्ज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या बाम यांनी क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह 'द वॉल' राहुल द्रविड या जगभरातील महान क्रिकेटपटूंसह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला. 
   
 4. तसेच त्यांनाच नव्हे तर नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत २०११-१२ या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.