CVC Annual Report 2017: There is a shortage of about 52% in the complaints

  1. केंद्रीय दक्षता आयोग (CVC) च्या ताज्या अहवालामधून असे स्पष्ट झाले आहे की, मागील वर्षात त्यांना भ्रष्टाचाराशी संबंधित सर्वाधिक तक्रारी रेल्वे आणि सार्वजनिक बँकांच्या विरुद्ध प्राप्त झाल्या.
  2. वार्षिक अहवालानुसार 2017 साली आयोगाला प्राप्त होणार्‍या तक्रारींमध्ये 2016 सालाच्या तुलनेत 52% हून अधिक कमतरता आली आहे.

ठळक बाबी

  1. 2017 साली एकूण 23609 तक्रारी प्राप्त झाल्या. ही संख्या 2011 सालानंतर सर्वात कमी आहे. 2016 साली हा आंकडा 49847 इतका होता.
  2. बहुतांश तक्रारींमध्ये आरोप अस्पष्ट आणि गैर-सत्यापित बघितले गेले आहे. प्राप्त तक्रारी राज्य शासन आणि अन्य संस्था (जे आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत किंवा जे प्रशासनाखाली येतात) यांच्या शासकीय कर्मचार्‍यांविरुद्ध आहेत.
  3. सन 2015 मध्ये प्राप्त तक्रारींची संख्या 29838 इतकी होती. तर याचे प्रमाणे 2014 साली 62362, 2013 साली 31432 आणि 2012 साली 37039 एवढे होते. 2011 साली भ्रष्टाचाराविरुद्ध मिळालेल्या तक्रारींची संख्या 16929 इतकी होती.
  4. जवळजवळ 60 हजार तक्रारी विभिन्न विभागांच्या मुख्य दक्षता अधिकार्‍यांना देखील प्राप्त झाल्या आहेत.
  5. 12089 एवढ्या सर्वात जास्त तक्रारी रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधात प्राप्त झाल्या. रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधातल्या एकूण 1037 तक्रारी सहा महिन्यांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत.
  6. एकूण 8243 भ्रष्टाचार संबंधित तक्रारी दिल्ली जल मंडळ (DJB), उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिल्ली नागरी पालिका आणि नवी दिल्ली नगरपालिका परिषद (NDMC) विरुद्ध प्राप्त झाल्या आहेत. तर, 8018 तक्रारी विविध बँकांच्या अधिकार्‍यांच्या विरोद्धत प्राप्त झाल्या.

 

केंद्रीय दक्षता आयोग (CVC) बाबत

  1. भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना सन 1964 मध्ये केली गेली.
  2. ही कोणत्याही कार्यकारी अधिकारांच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते.

 


Top