Organizing Re-Invest 2018 in Noida

 1. रि-इन्व्हेस्ट (RE-Invest) २०१८ या दुसऱ्या जागतिक नूतनीकरणक्षम ऊर्जा गुंतवणूक सभा आणि प्रदर्शनाचे आयोजन नोएडामध्ये करण्यात आले होते.
 2. केंद्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाद्वारे ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 3. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रि-इन्व्हेस्ट २०१८चे उद्घाटन केले.
 4. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पहिली बैठक आणि हिंदी महासागर रिम असोसिएशनच्या ऊर्जा मंत्र्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती.
 5. रि-इन्व्हेस्ट २०१८ या ३ दिवसीय परिषदेत नूतनीकरणक्षम ऊर्जा, क्लीनटेक आणि भविष्यातील उर्जेची गरज यावर चर्चा झाली.
 6. या परिषदेत नूतनीकरणक्षम ऊर्जा उपकरण निर्माते, गुंतवणूकदार आणि संशोधकांनी भाग घेतला.
 7. विविध संस्थांसाठी व्यवसाय कौशल्य, कर्तुत्व आणि महत्वाकांक्षा प्रदर्शित करण्याचा ही एक उत्कृष्ट संधी होती.
 8. या परिषदेत इंडियन ओशन रिम असोसिएशन आणि आंतराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्य देशांसह ६०० जागतिक उद्योगपती आणि १० हजारहून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.
 9. इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या (आयओआरए) २१ सदस्य देशांनी नूतनीकरणक्षम ऊर्जेवरील दिल्ली घोषणापत्र या परिषदेत स्वीकारले.
 10. रि-इन्व्हेस्ट:-
  1. नूतनीकरणक्षम उर्जा विकास आणि अंमलबजावणी यासाठी हा एक जागतिक मंच आहे.
  2. रि-इन्व्हेस्ट २०१५ यशस्वी झाल्यानंतर ही दुसरी जागतिक रि-इन्व्हेस्ट परिषद आयोजित करण्यात आली होती.
  3. या मंचावर गुंतवणूकदार आणि उद्योजक नवकल्पना आणि त्यासंबंधित गोष्टींवर चर्चा करू शकतात.
  4. या परिषदेत भारतातील हरित उर्जा मार्केटचे प्रदर्शन करण्यात आले आणि उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला.
  5. जगात नूतनीकरणक्षम उर्जेच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानी, पवन उर्जेच्या बाबतीत चौथ्या स्थानी आणि सौर उर्जेच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे.
  6. भारत जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा बाजारांपैकी एक आहे, भविष्यात याची मागणी आणि पुरवठा यात लक्षणीय वाढ होणार आहे.
 11. नूतनीकरणक्षम ऊर्जेवरील दिल्ली घोषणापत्र:-
  1. आयओआरएच्या सदस्य देशांची ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी नूतनीकरणक्षम उर्जेच्या प्रचारासाठी दिल्ली घोषणा करण्यात आली आहे.
  2. याद्वारे तंत्रज्ञान विकास आणि हस्तांतरण, नूतनीकरणक्षम सार्वजनिक खाजगी भागीदारीचे सशक्तीकरण याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
  3. याशिवाय आयओआरए आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्य देशांमध्ये सहकार्याला चालना देणे हाही यामागील उद्देश आहे.
  4. याव्यतिरिक्त आयओआरएच्या सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा एजन्सीसह (IRENA) सहकार्य करण्यासही सहमती दर्शविली आहे.


Approval of establishment of National Mental Rehabilitation Institute in Madhya Pradesh

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था मध्यप्रदेशमधील सिहोर जिल्ह्यात उभारण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी ही संस्था भोपाळ येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 2. मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात देशात अशा प्रकारे उभारण्यात येणारी ही पहिली संस्थाअसेल.
 3. या संस्थेची स्थापना सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६०च्या अंतर्गत केली जाईल. ही संस्था दिव्यांग सशक्तीकरण विभागांतर्गत काम करेल.
 4. मानसिक आजार ग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी धोरण तयार करणे, मानसिक आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनास चालना देणे, ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत.
 5. या संस्थेत मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात १२ अभ्यासक्रमांमध्ये डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल इत्यादी पदव्या प्रदान करण्यात येतील.
 6. या संस्थेमुळे मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात मानव संसाधन आणि संशोधन क्षमता उभारणीला मदत होणार आहे.


DG Travel Program

 1. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळावर प्रवाशांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल प्रोसेसिंगसाठी डीजी यात्रा नावाच्या उपक्रमाची घोषणा केली आहे.
 2. कोणत्याही अडचणीशिवाय पेपररहीत हवाई प्रवासाला प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
 3. फेब्रुवारी २०१९मध्ये बंगळूर आणि हैदराबाद विमानतळापासून या उपक्रमास सुरूवात करण्यात येईल.
 4. नंतर एप्रिल २०१९पासून भारतीय विमानतळ प्राधिकरण कोलकाता, वाराणसी, पुणे आणि विजयवाडा येथे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु करेल.
 5. डीजी यात्रा:-
  1. या उपक्रमांतर्गत प्रवाशाचे विमानतळावर केवळ एकदाच पडताळणी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर प्रवाशाच्या चेहऱ्याची ओळख आणि बायोमेट्रिक माहिती डीजी ट्रॅव्हल आयडीवर संग्रहित केली जाईल.
  2. यासाठी प्रवाशांची केंद्रीकृत सिस्टममध्ये नोंदणी केली जाईल आणि त्यांना डीजी ट्रॅव्हल आयडी देण्यात येईल.
  3. यामुळे तिकीट बुकिंग, बोर्डिंग पास सुरक्षा तपासणी हे सर्व डिजिटल होण्यास मदत होईल.
  4. या आयडीमध्ये प्रवाश्याचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि ओळखपत्र साठवलेले असेल.
  5. या आयडीचा वापर प्रवाशी तिकिट बुक करण्यासाठी करू शकतात. याचा फायदा प्रवाशांसह विमानतळ ऑपरेटर्सलाही मिळणार आहे.


Lokmanya Tilak lifetime achievement journalism award announced by the Government of Maharashtra

 1. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा २०१६ आणि २०१७ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात आला.
 2. १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे.
 3. विकास वार्तांकनासाठी २०१६ साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. पुढारी, रत्नागिरीचे राजेश जोष्ठे यांना तर २०१७ साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे, दै. सकाळ,कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला.


The 36th National Games are organized in Goa

 1. ३६व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन ३० मार्च ते १४ एप्रिल २०१९ दरम्यान गोव्यामध्ये करण्यात येणार आहे.
 2. सायकलिंग आणि नेमबाजी इव्हेंट्ससाठी गोव्यामध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या दोन स्पर्धा मात्र वी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
 3. राष्ट्रीय खेळ:-
  1. भारतात राष्ट्रीय खेळांचे आयोजन सर्वप्रथम १९२४मध्ये दिल्लीमध्ये करण्यात आले होते. १९२४च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी खेळाडूंची निवड करणे हे त्यामागील उद्दीष्ट होते.
  2. सुरुवातीला राष्ट्रीय खेळांना भारतीय ऑलिंपिक खेळ संबोधले जात. १९४०मध्ये भारतीय ऑलिंपिक खेळांचे नामांतर राष्ट्रीय खेळ असे करण्यात आले.
  3. या खेळांचे आयोजन भारतीय ऑलिंपिक संघटनेद्वारे केले जाते. ‘गेट सेट प्ले’ हे राष्ट्रीय खेळांचे घोषवाक्य आहे.
  4. राष्ट्रीय खेळांमध्ये भारतातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडू सहभागी होतात.
 4. भारतीय ऑलिंपिक संघटना:-
  1. स्थापना: १९२७
  2. मुख्यालय: नवी दिल्ली
  3. अध्यक्ष: नरिंदर बत्रा
  4. ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडू निवडणे हे या संघटनेचे मुख्य कार्य आहे.


Top