MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगात विशेष महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एच 1 बी व्हिसाची इलेक्ट्रॉनिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 2021 या वर्षांसाठीची ही नोंदणी असून कामासाठी व्हिसाची मागणी करणाऱ्यांची संख्या यात जास्त होती.

2. तर दरम्यान, 1 एप्रिल 2020 पासून नवीन अर्ज माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांकडून स्वीकारण्यात येणार आहेत. एच 1 बी व्हिसा हा अस्थलांतरित स्वरूपाचा असून त्यात अमेरिकी कंपन्या कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकतात, किंबहुना त्यासाठीच हा व्हिसा दिला जातो.

3. तसेच अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्या या चीन व भारतातील तंत्रज्ञांवर जास्त विसंबून आहेत. व्हिसा अर्ज मंजूर करण्याचा अधिकार हा अमेरिकन नागरिकत्व व स्थलांतर सेवा संस्थेला असून एच 1 बी व्हिसाची 2021 मधील इलेक्ट्रॉनिक नोंदणी पूर्ण झाली आहे.

4. त्यापुढील आर्थिक वर्षांसाठी 1 एप्रिल 2020 पासून व्हिसा अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हिसा पद्धतीने कागदपत्रे कमी झाली असून माहिती आदानप्रदान सोपे झाले आहे, तसेच नियोक्तयांचा खर्चही वाचला आहे.

5. तर नवीन पद्धतीत कर्मचाऱ्यांची मूलभूत माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिली जाते. आता 1 मार्च ते 20 मार्च 2020 या काळात या व्हिसा अर्जाची अंतिम छाननी होणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडण्याची किमया साधली. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर शनिवारी भारताने 29 सुवर्णपदकांसह 49 पदकांची कमाई केली.

2. तर भारताच्या खात्यावर आता 214 पदके (110 सुवर्ण, 69 रौप्य, 35 कांस्य) जमा आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यजमान नेपाळने एकूण 142 पदके जिंकली आहेत.

3. कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान, सुमित मलिक, गुरशरणप्रीत कौर आणि सरिता मोर यांनी सोनेरी यश मिळवले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सत्यवर्तने पाकिस्तानच्या ताबियार खानचा पराभव केला.

4. भारतीय नेमबाजांनी वर्चस्वाची यशोमालिका कायम राखताना तीन सुवर्णपदके प्राप्त केली. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिश भानवालाने सुवर्णपदक पटकावले. मग त्याने भाबेश शेखावत आणि आदर्श सिंगच्या साथीने पुरुषांचे सांघिक विजेतेपद पटकावले. 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात मेहुली घोष आणि यश वर्धन यांनी सुवर्णपदक मिळवले.

5. जलतरण क्रीडा प्रकारात भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना सात सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक कमावले.तर अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकाराच्या अखेरच्या दिवशी भारताने आठ पदकांची कमाई केली. परंतु यात सुवर्णपदकाचा अभाव जाणवला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या फेडरेशन चषक आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताच्या इर्शाद अहमद आणि एस. अपूर्वा यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटात अजिंक्यपद मिळवले. भारताच्याच प्रशांत मोरे आणि ऐशा खोकावाला यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर राजेश गोहिल आणि रश्मी कुमारी यांनी तिसरा क्रमांक मिळवला.

2. तर 16 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या इर्शादने मुंबईच्या प्रशांतला 3-25, 25-14, 25-24 असे तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत केले.

3. इर्शादचे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलेच विजेतेपद ठरले. त्यापूर्वी, सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत इर्शादने स्विस लीग विजेत्या झहीर पाशावरविजय मिळवला, तर प्रशांतने राजेशवर सरशी साधून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

4. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत माजी विश्वविजेत्या अपूर्वाने अपेक्षेप्रमाणे ऐशावर मात करून जेतेपदावर नाव कोरले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मुंबई सेंट्रल हे देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक ठरले आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन अशा विविध पातळ्यांवर देशातील पहिले ‘इट राइट’ (खाण्यासाठी योग्य) स्थानकाचा मान मुंबई सेंट्रलला मिळाला आहे.

2. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारे मुंबई सेंट्रलला ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. त्याला 4 स्टारचे रेटिंग मिळाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

3. भारतीय रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्यासाठी एफएसएसएआयने ‘इट राइट स्थानक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ‘इट हेल्दी’ आणि ‘इट सेफ’ अशा दोन टप्प्यांत स्थानकाचे आॅडिट करण्यात येते. या अभियानात मुंबई सेंट्रल हे एकमेव स्थानक सहभागी झाले होते.

4. देशातील अन्य कुठलेही स्थानक अद्याप या अभियानात सहभागी झालेले नाही. स्थानकावरील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन आदींचे आॅडिट करून स्थानकाला देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक म्हणून घोषित करण्यात आले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

2. महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली.

3. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

4. राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.

5. तसेच त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरीत्या घेण्यात येईल.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म 8 डिसेंबर 1897 मध्ये झाला होता.

2. भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत सन 1937 पासून धावू लागली.

3. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर सन 1971 मध्ये हल्ला केला.

4. सन 1985 मध्ये सार्क परिषदेची स्थापना झाली.

5. ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने सन 2004 मध्ये भेट दिली.


Top