The victory of the former president of the Maldives is a huge victory

 1. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद (५१) यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवित पुनरागमन केले आहे. या दणदणीत विजयानंतर नशीद यांनी सरकारी भ्रष्टाचार संपवण्याचा आणि सुधारणा करण्याचा संकल्प जाहीर केला.

 2. झालेल्या संसदीय निवडणुकीत नशीद यांच्या मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टीने ८७ सदस्यांच्या सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवले. त्यामुळे हद्दपारी संपवून मायदेशी परतल्यानंतर नशीद यांनी केवळ पाच महिन्यांमध्ये प्रचंड विजय मिळवत संसदेचे सर्वोच्च पद प्राप्त केले आहे.

 3. नशीद यांच्या प्रचंड विजयामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि एकाधिकार कारभार करणारे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यमीन यांना मतदारांकडून सणसणीत चपराक मिळाली आहे.


'Dhanush' will be filed in the army

 1. भारतीय बनावटीची आणि पहिली ‘स्वदेशी बोफोर्स’ म्हणून ओळखली जाणारी ‘धनुष’ तोफ लष्करामध्ये दाखल होण्यास सज्ज झाली आहे.दारुगोळा कारखान्याकडून (ओएफबी) लष्कराला ही तोफ देण्यात येईल.

 2. भाजप सरकारच्या काळात ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत ‘धनुष’ तोफेची निर्मिती करण्यात आली. या तोफेसाठी जवळपास ८१ टक्के भागांचा पुरवठा देशातूनच झाला आहे.

 3. १५५मिमी / ४५ कॅलिबर ची ही तोफ आहे. ‘देसी बोफोर्स’ म्हणूनही या तोफेला ओळखले जाते. सर्व प्रकारच्या भूभागामध्ये या तोफेचा वापर होऊ शकतो. ‘इनर्शिअल नेव्हिगेशन बेस्ड् साइटिंग सिस्टीम’, ‘ऑटो लेइंग’ सुविधा, ‘ऑनबोर्ड बॅलिस्टिक कॉम्प्युटेशन’ आणि दिवसा-रात्री तोफा डागण्याच्या यंत्रणेचा यामध्ये समावेश आहे.


the first voteThe Lok Sabha election was done by ITBP deputy Sudhakar Natarajan

 1. आयटीबीपीचे डीआयजी (एटीएस) सुधाकर नटराजन यांनी प्रथम मतदान केलं, अशी माहिती आयटीबीपीच्या प्रवक्त्यांनी दिली.

 2. इंडो-तिबेट पोलीस दलाच्या (ITBP) ८० जवानांनी आज अरुणाचल प्रदेशातील लोहितपूरमध्ये अॅनिमल ट्रेनिंग स्कूलमधील मतदान केंद्रावर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलं.

 3. अरुणाचल प्रदेशमधील दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आयटीबीपीच्या दुसऱ्या युनिटमधील जवानही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


India earn 12 medals

 1. भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी घाना कनिष्ठ खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सात सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या अनन्या चांदे आणि दिया चितळे यांनी चमकदार कामगिरी करत एकूण नऊ पदके (७ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य) पटकावली.

 2. दियाने मुलींच्या कनिष्ठ एकेरी गटात पहिले सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर तिने पदकांचा धडाका कायम ठेवला. दियाने मॉरिशसच्या नंदेश्वरी जलीमसह कनिष्ठ दुहेरी आणि सांघिक गटात आणखीन दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

 3. अनन्या चांदेने दियापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिने मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवतआपल्या अभियानाची सुरुवात केली. अनन्याने मागे वळून न पाहता एकापाठोपाठ पदके पटकावली. मुलींच्या कॅडेट एकेरी, दुहेरी आणि सांघिक गटातही तिने सुवर्णपदक पटकावले. अनन्याने कनिष्ठ दुहेरी गटातही इंग्लंडच्या रुबी चॅनसह रौप्यपदक आणि मुलींच्या कनिष्ठ एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली.


Top