Satya Tripathi appointed as Assistant Secretary-General and Head of the New York Office of UNEP

 1. भारतीय अर्थतज्ज्ञ सत्या त्रिपाठी यांची संयुक्त राष्ट्रांचे सहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. ते आता इलॉट हॅरिस यांची जागा घेतील. त्रिपाठी यांच्याकडे सध्या संयुक्त राष्ट्रांचे विकासविषयक पायाभूत धोरण ठरविण्याबाबतची जबाबदारी होती.
 3. त्रिपाठी यांनी कटकच्या रेवेन शॉ महाविद्यालयात वाणिज्य, गणित, अर्थशास्त्र व वित्त या विषयांत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
 4. १९७९ ते ८२ या कालावधीत ओदिशातील बेहरामपूर विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. पुढे याच विद्यापीठातून ते द्विपदवीधर झाले.
 5. कायदेविषयक अभ्यासात त्यांनी प्रावीण्य मिळवले. पीएचडीसाठी ‘आंतरराष्ट्रीय कायदे’ या विषयावर त्यांनी प्रतिष्ठेच्या अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला.
 6. विविध विषयांत पारंगत अशा त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने संयुक्त राष्ट्रांमध्ये यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गेली ३५ वर्षे ते संयुक्त राष्ट्रांशी संबंधित आहेत.
 7. विकासवादी अर्थतज्ज्ञ व वकील असलेल्या त्रिपाठींनी आशिया व आफ्रिका खंडांत टिकाऊ विकासाचे प्रारूप, मानवी हक्क, लोकशाहीवादी सरकार व कायदेविषयक बाबींवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
 8. यापूर्वी त्रिपाठी यांनी विकसनशील देशांमधील वनांच्या घटत्या प्रमाणाला आळा घालणे तसेच कार्बन उत्सर्जन रोखणे या महत्त्वाच्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाचे संचालक आणि कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
 9. याखेरीज ॲच आणि नियास येथे त्सुनामीनंतरची स्थिती तसेच संघर्षांनंतरच्या उभारणीत संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक म्हणून महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 10. १९९८पासून त्रिपाठी यांनी युरोप, आशिया व आफ्रिका खंडांत वातावरण बदलांमुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती केली आहे.
 11. पर्यावरणाचे संतुलन राखून विविध देशांना प्रगतीसाठी मदत करणे तसेच समन्वय राखण्याचे काम ते करीत आहेत.


Odisha Doctor Basant Mishra To Get Prestigious Dr. BC Roy Award

 1. मुंबईचे प्रसिध्द न्यूरोसर्जन डॉ. बसंत कुमार मिश्रा यांना प्रतिष्ठेचा डॉ. बी. सी. रॉय मेडिकल पर्सन ऑफ दी यिअर पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. भारतातील मेडिकल क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून, १ जुलै २०१९ रोजी (राष्ट्रीय डॉक्टर दिनी) राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 3. डॉ. बी. के. मिश्रा हे मुंबईतील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सा, न्युरोसर्जरी आणि गॅमा नाईफ रेडिओसर्जरी विभागाचे प्रमुख आहेत.
 4. दक्षिण आशियात गॅमा नाईफ रेडिओसर्जरी करणारे ते पहिले डॉक्टर असून, देशात ब्रेन ट्युमरवर जागृत क्रेनियोटॉमी करणारे ते पहिले सर्जन आहेत.

 डॉ. बी.सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार 

 1. भारतीय मेडिकल कौन्सिलने डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९६२मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली.
 2. वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान दरवषी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.
 3. हा पुरस्कार पुढील ६ श्रेणींमध्ये दिला जातो: Statesmanship of the Highest Order in India, Medical man-cum-Statesman, Eminent Medical Person, Eminent person in Philosophy, Eminent person in Science and Eminent person in Arts
 4. पहिला डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार १९७३साली विलिंग्टन हॉस्पिटलचे (सध्याचे राम मनोहर लोहिया हॉस्पिटल) डॉ. संदीप मुखर्जी यांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

 डॉ. बी.सी. रॉय 

 1. डॉ. बी.सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे बिधान चंद्र रॉय हे एक निष्णात डॉक्टर तसेच आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारीही होते.
 2. त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी पटना (बिहार) येथे झाला. तर १ जुलै १९६२ रोजी त्यांच्या जन्मदिवशी त्यांचे पश्चिम बंगालमध्ये निधन झाले. १ जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 3. १९४८-१९६२ दरम्यान ते पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांनी प. बंगालमध्ये दुर्गापूर. बिधाननगर, अशोकनगर, कल्याणी व हावडा या पाच शहरांची स्थापना केली.
 4. त्यांनी १९२८मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनची (IMA) स्थापना केली. भारतीय मेडिकल कौन्सिलच्या स्थापनेतही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
 5. ते ब्राम्हो समाजाचेही सदस्य होते. १९६१साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले.


Idea and Vodafone merge complete

 1. आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 2. विलीनीकरणानंतर तयार झालेल्या नव्या कंपनीचे नाव व्होडाफोन आयडिया लिमिटेड असे असून, ही कंपनी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.
 3. नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनचा हिस्सा ४५.१ टक्के आहे. तर आयडिया सेल्युलरची मालकी असलेल्या आदित्य बिर्ला समूहाकडे २६ टक्के हिस्सा असेल.
 4. असे असले तरीही दोन्ही समूहांकडे समान अधिकार असून, येत्या काही वर्षात दोन्ही समूहांचा हिस्सा समान केला जाईल.
 5. विलीनीकरण झाले असले तरी व्होडाफोन आणि आयडिया हे ब्रँड कायम राहणार आहेत. दोघांचा मिळून महसुलातील ३२.२ टक्के बाजारहिस्सा कंपनीकडे असेल.
 6. नव्या कंपनीसाठी १२ सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. त्यात ६ स्वतंत्र संचालक आहेत.
 7. कुमारमंगलम बिर्ला हे नव्या कंपनीचे चेअरमन आहेत.याशिवाय व्होडाफोन इंडियाचे सीओओ बालेश शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 8. नव्या कंपनीच्या ग्राहकांची संख्या सुमारे ४०.८ कोटी असून, या कंपनीचा टेलिकॉम क्षेत्रातील एकूण महसुलात हिस्सा ३२.२ टक्के आहे.
 9. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेली भारती एअरटेल आता दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. या कंपनीचे ३४.४५ कोटी ग्राहक असून टेलिकॉम क्षेत्रातील महसुलात हिस्सा ३०.५ टक्के आहे.
 10. २१.५२ कोटी ग्राहकांसह रिलायन्स जिओ तिसरी दूरसंचार कंपनी आहे. जिओचा टेलिकॉम क्षेत्रातील महसुलातील हिस्सा १८.७८ टक्के आहे.
 11. रिलायन्स जिओचे दूरसंचार क्षेत्रात आगमन झाल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.
 12. या कंपनीवर १,०९,२०० कोटी रुपयांचे कर्ज असून, या कंपनीला १४ हजार कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. विलीनीकरणामुळे कंपनीच्या महसुली खर्चात ८४०० कोटींची बचत होणार आहे.
 13. विलीनीकरण शुल्कापोटी या कंपनीने एकत्रितरित्या दूरसंचार विभागास ७२६८.७८ कोटी रुपये दिले आहेत.

 


September 5: India's' Teachers' Day '

 1. संपूर्ण देशभरात दरवर्षी 5 सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ पाळला जातो. शिक्षणतज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीत आणि यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतात पाळला जातो.
 2. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 3. यावर्षी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वाटप केले गेले.
 4. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट  शिक्षक आणि मुत्सद्दी  राजकारणी होते.
 5. 1962 सालापासून दरवर्षी 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन साजरा केला जात आहे.
 6. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला.
 7. भारतरत्न (1954) प्राप्तकर्ता डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उप-राष्ट्रपती (1952-62) आणि दुसरे राष्ट्रपती (1962-67) होते. 


The United States has blocked Pakistan's financial assistance

 1. वारंवार सूचना करुनही दहशतवादाविरोधात कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानला देण्यात येणारी ३०० दशलक्ष डॉलर्सची (२१३० कोटी रुपयांहून अधिक) आर्थिक मदत अमेरिकेकडून रोखण्यात आली आहे.
 2. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी डागाळली आहे.
 3. ‘कोअॅलिशन सपोर्ट फंड’ या नावाने दिला जाणारा हा निधी, पाकिस्तान मदतीच्या बदल्यात केवळ फसवणूक करतो, असा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला आहे.
 4. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि अमेरिकेमध्ये दहशतवादाच्या मुद्यावरुन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. अमेरिकेशी पा किस्तानशी आधीच तणावपूर्ण असलेले सबंध या नव्या निर्णयानंतर ते आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
 5. अमेरिकेकडून आतापर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी एकूण ८० कोटी डॉलर्सची रक्कम रोखण्यात आली आहे.
 6. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशारा दिला होता.


Top