SIPRI ने अण्वस्त्र शक्तीच्या आकडेवारीविषयक अभ्यास प्रथमच प्रकाशित केला

स्टॉकहोम (स्वीडन) स्थित वैचारिक संस्था ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI)’ प्रथमच अण्वस्त्र शक्तीच्या आकडेवारीविषयक असलेला वार्षिक अभ्यास प्रथमच प्रकाशित केला आहे.

हा अहवाल जानेवारी 2017 पर्यंत प्राप्त माहितीवरून तयार करण्यात आला आहे.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जगातल्या एकूणच अण्वस्त्रांची संख्या कमी होत चालली आहे.

अण्वस्त्र ताब्यात असलेल्या सर्व राष्ट्रांनी त्यांच्या आण्विक शस्त्रागारांच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत कार्य करीत आहेत.

अहवालाच्या ठळक बाबी :-

वर्ष 2017 च्या सुरूवातीस

अमेरिका (1800),

रशिया (1950),

ब्रिटन (120),

फ्रान्स (280),

चीन, भारत, पाकिस्तान, इस्राइल आणि उत्तर कोरिया या नऊ देशांकडे अंदाजे 4150 अण्वस्त्रे मारा करण्यास तैनात आहेत.

जगात सर्व राष्ट्राकडे एकूण अण्वस्त्रांची संख्या ही जवळपास 14,935 इतकी आहे, जी वर्ष 2016 च्या सुरूवातीला 15395 होती.

वर्ष 2017 मध्ये राष्ट्रांकडे असलेल्या एकूण अण्वस्त्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे –

अमेरिका (6800),

रशिया (7000),

ब्रिटन (215),

फ्रान्स (300),

चीन (270),

भारत (120-130),

पाकिस्तान (130-140),

इस्राइल (80) आणि उत्तर कोरिया (10-20).

 1. जगातील अण्वस्त्रांच्या संख्येत 93% वाटा ठेवणार्या रशिया व अमेरिका यांनी अण्वस्त्रांमध्ये कमतरता आणली आहे.
 2. मात्र 2011 सालच्या ‘मेजर्स फॉर द फर्दर रीडक्शन अँड लिमिटेशन ऑफ स्ट्रेटेजिक ऑफेंसिव आर्म्स (न्यू स्टार्ट)’ या द्वैपक्षीय कराराच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने यांनी करावयाच्या कपात मधील गती कमी आहे.
 3. चीनने दीर्घकालीन आधुनिकीकरण कार्यक्रमाला शुभारंभ केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात दर्जेदार सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला जात आहे.
 4. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आपल्या आण्विक शस्त्रांचा साठा वाढवत आहेत आणि त्यांची क्षेपणास्त्र वितरण क्षमता विकसित करीत आहेत.
 5. उत्तर कोरियाकडे अंदाजे 10-20 अण्वस्त्रांसाठी पुरेसे अणुइंधनयुक्त पदार्थ असण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

3 जुलै 2017 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत -महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यास मंजूरी.

सरपंच थेट नागरिकांमधून

 1. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड थेट नागरिकांमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी मिळाली.
 2. सध्या कायद्यांतर्गत राज्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाते.

श्री साईबाबा संस्थान अधिनियमात सुधारणा करण्यास मंजूरी

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कार्यकारी अधिकारी या पदाचे पुनर्नामकरण ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ असे करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या अधिनियम, 2004 मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी मिळाली.

मोटार वाहन करामध्ये 2% वाढ करण्यास मंजूरी

 1. वाहन नोंदणी करताना एकरकमी आकारण्यात येणाऱ्या मोटार वाहन करामध्ये सर्वसाधारणपणे 2% वाढ करण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958 मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी मिळाली.
 2. 1 जुलै 2017 पासून जकात आणि LBT हे कर रद्द झाल्यामुळे होणारी महसुल हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
 3. तसेच, सर्वच वाहनांसाठी उच्चतम कर मर्यादा 20 लाख रुपये इतकी ठेवण्यास मंजूरी मिळाली.

महाराष्ट्र मुद्रांक नियमात सुधारणा करण्यास मंजूरी

 1. मार्गदर्शक सूचना लागू करण्याबाबत सुस्पष्ट उल्लेख असणारी तरतूद महाराष्ट्र मुद्रांक नियम, 1995 मध्ये समाविष्ट करण्यासाठी मंजूरी मिळाली.
 2. वार्षिक मूल्यदर तक्त्यांचा (रेडी रेकनर) अविभाज्य भाग असणाऱ्या मूल्यांकनाच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना प्रत्येक वर्षी वार्षिक मूल्यदर तक्त्यासोबत प्रसिद्ध केल्या जातात.
 3. मात्र, या तक्त्यासोबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याबाबत सध्या महाराष्ट्र मुद्रांक नियम, 1995 मध्ये तरतूद नाही.


अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी : प्रवीण दवणे

 1. आचार्य अत्रे यांच्या सासवड या जन्मगावी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली.
 2. स्वागताध्यक्षपदी दशरथ ऊर्फ बंडूकाका विठ्ठल जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
 3. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 4. अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखाअध्यक्ष रावसाहेब पवार यांनी ही माहिती दिली.
 5. दर वर्षी अत्रे यांच्या जयंतीनिमित्त सासवड येथे विभागीय साहित्य संमेलन अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आयोजित केले जाते.
 6. तसेच या वर्षी अत्रे यांच्या 119व्या जयंतीनिमित्त 20वे संमेलन 13 व 14 ऑगस्ट रोजी सासवड येथे आयोजित करण्यात आले आहे.


औरंगाबादमधील शासकीय दंत महाविद्यालयाचा  देशात 12 वा क्रमांक

 1. देशातील एका अग्रणी नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने 12 वे स्थान पटकाविले आहे.
 2. विशेष म्हणजे पहिल्या 15 महाविद्यालयांमध्ये राज्यातील केवळ तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
 3. तसेच या नियतकालिकेतर्फे दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर होते.
 4. यंदा म्हणजे 2016-17 मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
 5. यंदाच्या सर्वेक्षणानुसार मणिपालच्या 'मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस' या खासगी महाविद्यालयाने 563 गुणांच्या आधारे देशातून पहिले स्थान पटकाविले.
 6. यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाने 13 स्थान पटकाविले होते.
 7. यंदा 12 वे स्थान मिळविले.
 8. सर्वेक्षणातील 15 महाविद्यालयांच्या यादीमध्ये मुंबईतील दोन महाविद्यालयानंतर केवळ औरंगाबादतील महाविद्यालयाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.


Top