India's 11th position in FDI Confidence Index 2018

 1. ए. टी. केर्नी या वैश्विक सल्लागार कंपनीने नुकताच ‘FDI कॉन्फिडेंस इंडेक्स 2018’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. या अहवालात थेट परकीय गुंतवणूकीसंदर्भात देशांवर असलेल्या गुंतवणूकदारांची विश्वसनीयता प्रदर्शित होते.
 3. FDI विश्वसनीयता निर्देशांकामध्ये भारत 2017 सालच्या 8व्या क्रमांकावरून तीन स्थानांनी खाली घसरत 11व्या क्रमांकावर आला आहे. या वर्षी यादीत फक्त सात आशियाई देशांचा समावेश आहे.
 4. ठळक बाबी:-
  1. जागतिक:-
   1. यादीतले प्रथम 10 देश – अमेरिका (1), कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, चीन, जपान, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, स्वित्झरलँड आणि इटली (10).
   2. सलग सहाव्या वर्षी अमेरिका या यादीत अग्रस्थानी आहे.
   3. याबाबतीत भारतानंतर सिंगापूर (12), न्यूझीलंड (16), दक्षिण कोरिया (18) हे देश दिसून आले आहेत.  
   4. यंदा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा वाटा सर्वाधिक कमी आहे.
   5. प्रथम 25 देशांमध्ये केवळ 4 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश करण्यात आला आहे, ते आहेत - चीन, भारत, मेक्सिको आणि ब्राझिल.
   6. गुंतवणूकदार युरोपमधील संधींवर केंद्रित आहेत.
   7. सर्व युरोपीय बाजारपेठांनी यावर्षीच्या निर्देशांकामध्ये निम्म्यापेक्षा अधिक जागा तसेच प्रथम 10 मध्ये देखील निम्म्या जागा बळकावलेल्या आहेत.
   8. विकसित बाजारपेठा 2018 सालच्या निर्देशांकामधील 84% जागांवर नवीन सर्वकाळ उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
   9. सलग चौथ्या वर्षीही गुंतवणूकदारांमध्ये वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे चिंता दिसून आली आहे.
   10. गुंतवणूकदारांच्या एकूण 95% कंपन्या उत्तर अमेरिकेत आपला व्यवसाय चालवितात.
   11. त्यामुळे उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार (NAFTA) मधील बदल FDIच्या प्रवाहाला प्रभावित करू शकते.
‘FDI कॉन्फिडेंस इंडेक्स 2018’
 1. भारताविषयी:-
  1. विशिष्ट उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याविषयीचा विश्वास कमी होत आहे.
  2. मात्र, असे असूनही बळकट आर्थिक कामगिरी आणि भारतीय बाजारपेठेचा आकार यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होण्याची शक्यता आहे.
  3. अमेरिकेमधील आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने भारताला सर्वोच्च पसंती दिली आहे.
  4. एप्रिल-डिसेंबर 2017 या कालावधीत भारतात होणारी थेट परकीय गुंतवणूक 0.27% नी वाढून USD 35.95 अब्जवर पोहचलेली आहे.


 Approval of courtesy of the WHO's work-related contract in relation to tobacco

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यचौकटीबाबतच्या करारांतर्गत तंबाखू नियंत्रणावरील शिष्टाचाराला अधिस्वीकृत करायला मान्यता दिली आहे.
 2. तंबाखूच्या उत्पादनांमधील अवैध व्यापार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 3. WHO FCTC संदर्भात:-
  1. भारत हा तंबाखू नियंत्रणावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यचौकटीबाबत करार (WHO Framework Convention on Tobacco Control -WHO FCTC) याचा सदस्य आहे.
  2. WHO FCTCच्या 15 व्या कलमान्वये स्वीकारलेल्या धूम्रपान आणि तंबाखू खाणे अश्या दोन्ही स्वरूपात किंवा धूर रहित तंबाखू (SLT) यांच्यासाठी लागू राहणार आहे.
  3. WHO FCTCच्या शिष्टाचारामध्ये सदस्य देशांसाठी पालन करायच्या अटींचा समावेश आहे.
  4. पुरवठा साखळी नियंत्रण उपाययोजनांचा यात समावेश असून तंबाखू उत्पादनाचे परवाने, तंबाखू उत्पादनांच्या उत्पादनासाठी यंत्रणा, उत्पादन, ट्रॅक-ट्रेस यंत्रणेद्वारे ठेवलेली योग्य ती काळजी, नोंद ठेवणे, सुरक्षा आणि ई-कॉमर्समध्ये सहभागी असलेल्या, मुक्त व्यापार क्षेत्रात उत्पादन आणि आयात शुल्क मुक्त  विक्रीत सहभागी असलेल्यांनी करायच्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. 
  5. शिष्टाचारामध्ये जप्ती आणि जप्त केलेल्या उत्पादनांची विल्हेवाट यासारख्या गुन्हे, सक्तीच्या उपाययोजना यांचा समावेश आहे.
  6. यामधून माहितीचे आदान-प्रदान, गोपनीयता राखणे, प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक बाबींमध्ये सहकार्य अश्या बाबतीत आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आवाहन केले जाते.
  7. अशा कराराला मान्यता दिल्यामुळे प्रचलित विरोधी प्रथेच्या विरोधात कारवाई करण्यायोग्य पर्याय  उपलब्ध होतील आणि भारत अशा अनैतिक व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांना प्रभावित करू शकणार आहे.


World Press Independence Day: May 3

 1. जगभरात दरवर्षी 3 मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन पाळला जातो.
 2. यावर्षी हा दिवस “किपिंग पॉवर इन चेक: मिडिया, जस्टीस अँड द रुल ऑफ लॉं” या विषयाखाली पाळला गेला.
 3. 1991 साली आफ्रिकन पत्रकारांनी पत्रकारितेचे बहुतत्व आणि स्वातंत्र्य यासंदर्भात विंडहोक जाहीरनामा सादर केला होता.
 4. याला प्रतिसाद म्हणून 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 3 मे हा दिवस “जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन” म्हणून पाळण्यास मान्यता देण्यात आली.
 5. 1948 साली घोषित मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहीरनामाच्या कलम 19 अन्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राखून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कर्तव्याची सर्व सरकारांना जान करून देण्यासाठी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण करण्याकरिता हा दिन पाळला जातो.


 Justin Langer: A new Australian coach

 1. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर जस्टिन लँगर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 2. ही नेमणूक माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्या जागी झाली आहे.
 3. लँगर यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.
 4. ते 22 मे 2018 पासून पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
 5. ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे.
 6. जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे.
 7. जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. 
 8. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे.
 9. कॅनबेरा हे राजधानी शहर तर ऑस्ट्रेलियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


 Deepa Ambekar: Judge in the interim civil court of the United States

 1. दिपा आंबेकर यांची अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात अंतरिम नागरी न्यायालयामध्ये न्यायाधीश पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. या नियुक्तीबरोबरच, भारतीय वंश असलेल्या आंबेकर या राजा राजेश्वरी (2015 साली) यांच्यानंतर न्यूयार्कमध्ये नियुक्त केल्या जाणार्‍या दुसर्‍या महिला न्यायाधीश आहेत.
 3. संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे.
 4. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.