The first university in the country of Marathi language at Bandra

 1. वाचक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे मुंबई महापालिकेच्या जागेत सुरू होणार आहे.
 2. यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनात होणार आहे.
 3. वांद्रे पश्चिम येथे हे विद्यापीठ सुरू व्हावे याकरिता भाजपाचे आमदार आशिष शेलार या विषयावर दीड वर्षापासून काम करत आहेत.
 4. वांद्रेमधील बँडस्टँड येथील जागा मुंबई महापालिकेने विद्यापीठाला देण्याचे मान्य केले आहे.
 5. राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे.
 6. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनातूनही करण्यात आली. मात्र गेल्या साठ वर्षांत त्याला मूर्त रुप आलेले नाही.
 7. ग्रंथालीचे संस्थापक : दिनकर गांगल

विद्यापीठाची रचना

 1. मराठी भाषेतील सर्व ग्रंथ व पुस्तकांनी सज्ज असे अद्ययावत ग्रंथालय असेल.
 2. मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.
 3. परीक्षा, संशोधन, लेखन असे उपक्रम विद्यापीठामार्फत राबविण्यात येतील.
 4. अन्य भाषांची विद्यापीठे:-
  1. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (२००४), संस्कृत (२००५), तेलुगू व कन्नड (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
  2. त्यांपैकी तमीळ (१९८१), तेलुगू (१९८५), कन्नड (१९९१), मल्याळम (२०१२) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत.
  3. संस्कृत भाषेचीही केंद्रीय, अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत आहेत.
  4. शिवाय ऊर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकीय भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठ (१९९८) हे हैद्राबादला आहे, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (१९९७) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे.


Bollywood actress Sridevi dies

 1. बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले.
 2. श्रीदेवी यांनी मद्यपान केल्यामुळे त्यांचा तोल गेल्याने बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे दुबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून उघड झाले आहे.
 3. श्रीदेवी उर्फ अम्मा यंगर अय्यपन यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील शिवकाशी येथे झाला.
 4. त्या १९९६साली निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
 5. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे.
 6. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
 7. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी तमिळ चित्रपट ‘थुनैवन’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
 8. १९७१साली ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.
 9. वयाच्या १२व्या वर्षी ‘ज्युली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले. तर १५व्या वर्षी ‘सोलवा सावन’ हा त्यांचा प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट ठरला.
 10. त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. १९८३मध्ये ‘हिम्मतवाला’ हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. तर मॉम हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला.
 11. लग्नानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर ६ वर्षानंतर त्यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केली. 
 12. त्यानंतर २०१२साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
 13. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 14. श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 15.  श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट:- 
  1. जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले, गैर क़ानूनी, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.


In Rajasthan, the second project of 'Swajal' scheme launched

 1. केंद्रीय पेयजल व स्‍वच्‍छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी 2018 रोजी राजस्‍थानमधील भिकमपुरा (करौली जिल्हा) गावात ‘स्‍वजल’ प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
 2. 54.17 लक्ष रूपयांहून अधिकचा खर्च असलेल्या या प्रकल्पामधून संपूर्ण वर्षभर स्‍वच्‍छ पिण्याच्या पाण्याची उपलब्‍धता सुनिश्चित करण्यात येणार आहे.
 3. हा ‘स्‍वजल’ योजनेचा दुसरा प्रकल्प आहे. पहिला प्रकल्प उत्तराखंडच्या बागोरीमध्ये आहे.
‘स्‍वजल’ योजना
 1. ‘स्‍वजल’ योजना शाश्वत पेयजल पुरवठ्यासाठी समाजाच्या मालकीचा एक उपक्रम आहे. या योजनेंतर्गत प्रकल्पासाठी लागणार्‍या खर्चाचा 90% हिस्सा केंद्र शासन आणि उर्वरित 10% खर्च लोकसहभागातून आलेल्या योगदानाचा असणार आहे.
 2. प्रकल्पांची संपूर्ण जबाबदारी स्थानिक ग्रामीण लोकांची असणार आहे.
 3. योजनेनुसार गावात 4 तळ्यांची निर्मिती केली जाणार आणि सुमारे 300 घरांना नळाची जोडणी उपलब्‍ध करून दिली जाणार आहे.


Inauguration of 'Aviation Bahu-Skill Development Center' in Chandigarh

 1. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री पी. अशोक गजपती राजू यांच्या हस्ते हरियाणाच्या चंदीगडमध्ये ‘उड्डयन बहू-कौशल्य विकास केंद्र (MSDC)’ याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 2. उड्डयन बहू-कौशल्य विकास केंद्र (Aviation Multi Skill Development Centre -MSDC) हा त्याच्या प्रकारचा एकमेव असा भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) चा CSR उपक्रम आहे.
 3. हे केंद्र राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) च्या सहकार्याने स्थापन करण्यात आले आहे.
 4. तसेच या संस्थेला भारताच्या अंतराळशास्त्र व उड्डयन क्षेत्र कौशल्य परिषद (AASSC) या संस्थेचे समर्थन लाभलेले आहे.
 5. देशात नागरी विमानवाहतूक क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे विमानातील कुशल कर्मचार्‍यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुढील 3 वर्षांत विमानासंबंधी रोजगाराभिमुख 8 विषयात 2,400 युवांना प्रशिक्षित केले जाणार आहे. 


First Mega Food Park in Maharashtra, Satara

 1. महाराष्ट्र राज्यातले पहिले मेगा फूड पार्क ‘सातारा मेगा फूड पार्क प्रा. लिमिटेड’ सातारा जिल्ह्याच्या देगाव खेड्यात सुरू केले जात आहे.
 2. 1 मार्च 2018 रोजी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 3. हे देशातले दहावे मेगा फूड पार्क आहे.
 4. 64 एकरच्या भूखंडावर 139.30 कोटी रुपये खर्चून हे मेगा फूड पार्क उभारण्यात आले आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. भारत सरकारच्या मेगा फूड पार्क योजनेंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
 2.  मेगा फूड पार्क ही योजना "समूह" पध्दतीवर आधारित आहे. पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.
 3. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेकल (SPV) द्वारे चालवले जातात, जे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असतात. 


Roger Federer - 'Sportsman of the Year' and 'Comeback of the Year' by Laureus

 1. मोनॅकोमध्ये ‘2018 लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवार्ड्स’ समारंभात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याला ‘स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर’ आणि ‘कमबॅक ऑफ द इयर’ हे किताब प्रदान करण्यात आले आहेत.
 2. रॉजर फेडररचा हे पाचवे पारितोषिक आहे तर सन 2000 पासून दिले जाणारे लॉरियस पुरस्कारांमधले हे सहावे पारितोषिक आहे.
 3. अन्य विजेते:-
  1. वर्ल्ड स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर - सेरेना विल्यम्स (अमेरिका)
  2. टिम ऑफ द इयर - मर्सिडीज F1
  3. वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर (दिव्यांग) - मार्सेल हग (स्वित्झर्लंड)
  4. जीवनगौरव पुरस्कार - एडविन मोसेस (अमेरिका)


The Importance of Today's Day in History 2

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
  2. १९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
  3. १९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
  4. २०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
 2. जन्म:-
  1. १८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे१९०४)
  2. १८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
  3. १९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
  4. १९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
  5. १९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.
 3. मृत्यू:-
  1. १७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)
  2. १७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
  3. १९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)
  4. १९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.


Top

Whoops, looks like something went wrong.