Megha Arora From Daughter of Rikshaw driver to IAS

रिक्षा ड्रायव्हरची मुलगी संघर्षाने बनली आयएएस टॉपर...


2689  

तुम्ही प्रतिभावंत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण बनली आहे आग्र्याची मेघा अरोरा. मेघाने लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या आयएएस परीक्षेत संपुर्ण भारतातून ८ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मेघाचे वडील हे एक रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई प्राध्यापिका आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्या मेघा साठी मिळालेले यश हे खूप मोठी उपलब्धी आहे.

मेघा ही लहाणपणी पासूनच अभ्यासात हुशार होती. तिची शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाची कामगिरी सुद्धा प्रशंसनीय होती. मेघाने १२ वी मध्ये ९५ टक्के मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. चांगले मार्क्स मिळाल्यानंतर तिच्या स्वप्नांना एकप्रकारे भरारी मिळाली. त्यानंतर तिने दिल्लीच्या प्रसिद्ध हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बारावी पर्यंत सायन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या मेघाने पुढे आपल्या काकाच्या म्हणणे ऐकून कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅज्युएशन चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केले.

यानंतर मेघाने यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचा निर्धार केला. ती सांगते की तिला तिच्या काकांनी अभ्यासासाठी खूप मदत केली. मेघाने जिद्द आणि चिकाटीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत टॉपर बनून घवघवीत यश मिळवले आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात एवढे घवघवीत यश मिळवले आहे त्यावरून तिच्या मेहनतीचा तुम्ही अंदाजा लावू शकता. यावर्षी मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा पार पडली व निकाल जुलै मध्ये जाहीर झाले. यानंतर मेघाला इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले. अंतिम निकाल २३ सप्टेंबरला जाहीर झाला. आता ११ डिसेंबर पासून मेघा ट्रेनिंग साठी जाणार आहे.

मेघाच्या या यशानंतर तिचे ८ वी पर्यंत शिकलेले वडील सुनील अरोरा म्हणाले की, ‘ तिने आमच्या सर्वांचे नाव अभिमानाने वर नेले आहे. यासाठी तिने खूप कठीण परिश्रम घेतले. हे यश आमच्या सर्वांसाठी एखादं स्वप्न खरं झाल्यासारखे आहे’. मेघाची आई सविता या एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्या म्हणाल्या की, ‘ अभ्यासात मेघा नेहमी अव्वल राहिली आहे. ती आमच्या परिवारात एकमेव आहे जिने सरकारी अधिकारी होण्याची परिक्षा पास केली आहे. मेघाचे आई-वडिल म्हणून आम्हाला याचा खूप अभिमान आहे’.

विशेष म्हणजे दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधील मेघा सोबतच्या अजून १५ जणांनी ही परिक्षा दिली होती, परंतु त्यापैकी मेघा ही एकमेव आहे जिची यामध्ये निवड झाली आहे. मेघा सांगते की तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती. मेघाचा अर्थशास्त्र विषयात सखोल अभ्यास होता. परंतु मेघाला रोज ८-१० तास अभ्यास केल्यानंतर हे यश मिळाले आहे. मेघाला फिक्शन पुस्तके वाचण्याची आवड आहे व तिचे आवडते लेखक अमिताभ घोष आहेत.

M Shivaguru prabhakaran from labour to IAS

मजूर ते आयएएस…


2797  

हिंमत, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही काम कठीण नसते. याचा प्रत्यय तामिळनाडूतील एम शिवागुरू प्रभाकरनकडे पाहिल्यानंतर येतो. देशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत आयएएससाठी त्याची निवड झाली आहे. २००४ मध्ये पैशांअभावी इंजिनिअर होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच सोडावे लागले होते. त्यानंतर आयएएस होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी असा आहे.

तंजावर जिल्ह्यातील पट्टुकोट्टईमधील मेलाओत्तान्काडू गावाचा रहिवासी असलेल्या प्रभाकरनचा प्रवास मद्यपी वडील, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमधून आता प्रतिष्ठित सेंट जॉर्ज फोर्टच्या परिसरापर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी यूपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात शिवागुरू प्रभाकरनने एकूण ९९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १०१ वी रँक प्राप्त केली आहे. शिवागुरूशिवाय तामिळनाडूतून व्ही. कीर्ति वासन (२९), एल. मधुबालन (७१) आणि एस. बालाचंदर (१२९) यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.

बारावीनंतर हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले होते. वडील सतत दारूच्या नशेत असत. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी प्रभाकरनवर येऊन पडलेली. प्रभाकरनने दोन वर्षे लाकूड अड्ड्यावर आणि शेतात मजुरी केली. त्याला कोणत्याही परिस्थिती आपल्या स्वप्नावर पाणी फेरायचे नव्हते.

२००८ मध्ये प्रभाकरनने लहान भावाचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आणि आपल्या बहिणीचे लग्नही केले. त्यानंतर त्याने आयआयटीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न घेऊन चेन्नई गाठले. तेथे तो दिवसभर अभ्यास करत आणि सेंट थॉमस माऊंट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर रात्र घालवत. मेहनतीच्या जोरावर प्रभाकरनने आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवला आणि २०१४ मध्ये एम.टेक पूर्ण केले. येथेही तो गुणवत्ता यादीत चमकला. त्यानंतर प्रभाकरनने चौथ्या प्रयत्नात यूपीएससीत यश मिळवले. त्याचा हा संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

Alankrita Pandey, Came out of Depression to get Rank 85

Alankrita Pandey, Came out of Depression to get Rank 85,


3855  

In January 2014, I decided to start the preparation. But in mid 2014, I had to go through a personal crisis. It brought me to the level of using anti-depressants, anger management sessions and counseling by friends and family.

I had planned to write prelims in January 2014 and started reading some basic books but due to the aggravated situation, I could not even write the exam. These circumstances went on till October and finally I had it under control. By this time, I had decided to focus only on my career and plans for the next year and make my dream come true. This crisis gave me a clear sense of purpose.

The life changing moment was not 10th May 2016 for me, when the results came out, but it was the day when I had stuck a paper on a wall in my room saying- “I want a 2-digit AIR in CSE-2015.”

It has been said that – all things in this universe are created twice, once in your mind and then in the physical world. The first time was that day. Then began the hard work of day in-day out studies. I planned my preparation first at macro level and then at micro level eg completing full mains syllabus by May 15, then reducing it to topic wise scheduling and then hour wise everyday.

There used to be moments of doubt, depression and stress quite often for me. To tackle it, I used to run in the mornings, meditate and exercise. Sometimes, I would lose patience to go on. Then, I used to write on a paper as to why I started all this and this would provide me the motivation to move forward with more enthusiasm. Whenever I used to feel lethargic, I would see the newspaper and problems faced by various sections of society and think as to how could I help.

This always used to give me a sense of urgency to get into that position. I would also like to take this opportunity to thank my parents, family, teachers(Prof BRA Rao and institute) and my friends (Lokesh, Deepankar, Odyssey, my college gang and seniors) for supporting me throughout. Talking to my father always used to be such an encouraging experience. He used to make me believe that it is going to happen for sure, the belief and faith that he showed always kept me positive. Rao sir too had believed in me right from the first day and never refused any kind of help despite his old age and other difficulties. It was not a coaching institute for me but an extended family. I would not have been able to achieve this without the support of these people.

With these experiences, I kept going and cleared this examination in my first attempt.

From a primary teacher to ACP

From a primary teacher to ACP


2367  

Poonam Dalal says she is slightly different from many others yet at the same time very similar to a lot of us. She has her ancestral roots at Chhara village in Jhajjar District, Haryana. But she was born and brought up in Delhi.

Poonam started her career as a primary teacher in a government school at Delhi. Along with the job she did her graduation as an external student from Delhi University.

After completing her graduation she appeared for different Bank PO Exams and SSC Graduate Level Exam and cleared all of them. SBI PO, SBI Associates PO, Union Bank Of India PO, SSC Graduate Level 2005 etc are some of them.

She finally chose SBI PO. She regrets that there was nobody to guide me about UPSC Exam.  (Had there been somebody at that time to guide her about UPSC Exam, you would have been reading this interview much earlier!)

She also shares the fact that at that stage she used to be very under-confident about her chances at CS Examination. She says, “I am sharing these thoughts so that all of those who are somehow feeling the same as I had once been, can come out of it and not repeat the mistake which I did”.

After 3 years in SBI, she joined the Income Tax Department securing a very decent rank (7) at all India level in SSC graduate level Examination 2006 which gave her the confidence of writing UPSC. This is also a time she realised that being a General Category candidate her attempts were going to be wasted anyhow because of her age (Poonam was around 28 by then, and 30 was then the upper age limit for General Category candidates.)

She gave her first attempt at UPSC CSE in 2009 at the age of 28 and got Railways (RPF).

She didn’t join that service and sat for CSE 2010. She again got Railways, but a different service (IRPS).

Meanwhile, she had cleared Haryana PSC and joined as Dy.SP in Haryana Police in 2011.

In 2011, she couldn’t qualify Prelims. She thought her tryst with UPSC was over due to the age-limit. (As hinted before it was only 30 years for general category candidates then, and even now it’s only 32 years).

‘Fortune favors the brave’ – many say. Life has kept more surprises for her. In 2015, because of agitations and petitions from candidates who were affected by pattern change in 2011, the government gave an extra attempt to all those who wrote for Civil Services Exam in 2011. Thus, Poonam got an opportunity to appear again for UPSC.

9 months pregnant at the time of Prelims; had to take care a 3 months old baby while writing mains!

This attempt came as a great challenge as Poonam was out of touch with preparation, being working 24*7 in police force. Much more than that she was 9 months pregnant at the time of prelims. She cleared UPSC prelims in flying colors by self-study. While preparing for mains she had also to take care of her son who was just 3 months old. It was never easy. But as Poonam puts it, she got her best rank in her most challenging circumstances

Karad Deputy Superintendent Navnath Dhavale

कऱ्हाडचे उपअधीक्षक करताहेत सोशल इंजिनिअरिंग


3688  

कऱ्हाड - चावडीवर होणारी चर्चा चौकात आली, चौकात होणारी चर्चा व्यासपीठावर आली अन्‌ व्यासपीठावर होणारी चर्चा अलीकडच्या काही वर्षांत सोशल मीडियावर आली. सोशल मीडिया म्हणजे समाजातील चर्चा करण्याचे एक नवीन व्यासपीठ बनले आहे. आता ते नवे राहिलेले नाही. मात्र, याच सोशल मीडियाचा वापर करून पोलिस खात्याचे महत्त्वाचे संदेश समाजापर्यंत पोचवण्याची हातोटी जपत त्याचा पुरेपूर वापर करण्याची किमया पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना साध्य झाली आहे. त्यांची वॉट्‌सर्अपवरील चर्चा किंवा एखाद्या घटनेबद्दलच मत व्यक्त करण्याची हातोटी चांगली आहे. 

समाजातील अनेक घटनांची चर्चा ज्या सोशल मीडियावर होत असते, त्या सोशल मीडियाचाच वापर करून दक्षता बाळगण्याची किंवा अफवांना बळी पडू नका, असा संदेश देण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न ढवळे यांच्याकडून होत आहे. समाजाची चर्चा करण्याची माध्यम अथवा सोशल मीडिया बनली आहे. त्यात वॉट्‌सऍपच्या अनेक ग्रुपवर वेगवेगळी चर्चा असते. त्या चर्चेवर ढवळे लक्ष ठेवून असतात. तसेच त्याशिवाय तेथे येणाऱ्या सूचनांना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठीचे प्रयत्न करतात. विशेषकरून शहरातील घटनांवर त्यांचा वॉट्‌सऍपच्या माध्यमातून मोठा "वॉच' आहे. एखाद्या वॉट्‌सऍप ग्रुपवर चर्चा सुरू असेल, तर त्या चर्चेचीही ते दखल घेऊन त्याला अंतिम स्वरूप देताना दिसत आहेत. 

पोलिसांचे संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचे काम ढवळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चोखंदळपणे करत आहेत. त्यांनी कालच टाकलेला सतर्कता बाळगा... बंद घरे फोडून दागिन्यांसह रोकड पळवणारा संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्याकडून घरफोड्यांचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. चोरटा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर थेट सामान्य कऱ्हाडकरांशी एक संवाद साधत असल्याचे सांगताना ढवळे यांनी त्यांच्याकडून म्हणजेच एक अपेक्षा व्यक्त करत पोलिसांनी बंद घरांबाबत केलेल्या सूचनाही ते लोकांपर्यंत पोचवत आहेत. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचा ढवळे  यांचा वेगळ्याच धाटणीचा फंडा लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. 

वास्तविक गडचिरोलीनंतर पहिलीच नियुक्ती मिळालेले ढवळे जिल्ह्यातील तरुण उपअधीक्षक आहेत. सोशल मीडियाचा वापर कसा व किती करावा, याबद्दलचे त्यांचे ज्ञान त्यांनी पोलिस खात्यासाठी वापरून त्यांनी त्याच माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगवर भर दिला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचा त्यांच्याशी थेट संपर्क वाढला आहे

Inspirational Story of Tukaram Munde

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास


6356  

एखादा कर्तबगार अधिकारी जनहितासाठी काही धडक निर्णय घेतो त्यावेळी ते निर्णय हितसंबंधी किंवा वरिष्ठांच्या हिताचेच असतात असे नाही. अशा वेळी काय होतं याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मात्र एक सनदी अधिकारी असा आहे ज्याला हितसंबंधाविषयी काहीही घेणं-देणं नसतं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला. त्यांच्या बदल्यांचे कारण हर प्रामाणिक व धडाडीचे कामच असल्याचे दिसून आले आहे. अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तुकाराम मुंढेे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत खासरेवर.

बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला.त्यांचा जन्म 3 जून 1975 ला झाला. त्यांनी आणि त्यांच्या बंधूनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. घरच्या संस्कारात तुकाराम मुंढे यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम हरिभाऊ मुंढे आहे.मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2001 मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.

त्यानंतर मे 2005 ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. विशेष म्हणजे ते देशात 20 वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून 10-12 टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण 1-2 टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच CEO ने डाॅक्टरला निलंबित केले होते.

2009 सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे 2010 ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जिथे जेल तिथे आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महीन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली.

पुढे 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर 2012 साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात 143 कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर गेला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील 282 गाव घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त 150 कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान 50-60 कोटींचे होते. वर्षाला 400 टँकर लागणार्‍या सोलापूरात टँकरची संख्या 30-40 वर आली.

सोलापूर मध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण 14-15 लाख लोकं यावेळी वारीला हजेरी लावतात.त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते.परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या 21 दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी 3 हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी CM सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केले.

नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘आयुक्तासोबत चाला’ हा Walk With Commissioner चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला ज्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा,पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.

सध्या ते पुणे महानगरपालिकेच्या PMPML चे अध्यक्ष आहेत. महीन्याला PMPML ची 6 लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या 9 लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केंव्हाही या तिकीटींग यंत्रणेवर नियंत्रण आणि निरिक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्के वरून शंभर टक्के अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे.

Inspirational Surabhi Gautam  Success Story

जिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी सुरभी गौतम


3110  

लोक खरे सांगतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अशीच काही सतना तालुक्यातील अमदरा गावातील सुरभी गौतम यांची कथा आहे. सुरभीचे वडील मैहर सिविल कोर्टमध्ये वकील आहे आणि आई डॉक्टर सुशीला गौतम अमदरा येथे शाळेत शिक्षिका आहे. सुरभी लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. दहावीत सुरभीला ९३.४% एवढे गुण मिळाले होते. हेच ते गुण आहेत ज्या गुणामुळे सुरभीच्या यशाचा पाया रचला होता. हे मार्क मिळविल्यानंतर सुरभीने कलेक्टर होण्याचे स्वप्न बघितले. आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्याकरिता तमाम एशो आराम पासून ती दूर गेली. चला आज खासरेवर तिचा हा प्रवास बघूया.

सुरभी चे गाव अमदरा एक छोटेस खेड आहे. अमदरा येथूनच तिने १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले. १२वी पर्यंत तिने सरकारी शाळेतच शिक्षण घेतले. या शाळेत मुलभूत सुविधा सुध्दा नव्हत्या त्या शाळेत तिने शिक्षण पूर्ण केले. सुरभीच्या गावात वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत सुविधा नव्हत्या तर परिपूर्ण शिक्षण दूरच राहिले. ती सांगते कि लहानपणी ती दिव्यात अभ्यास करत असे. बारावी नंतर तिने इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा दिली आणि त्यामध्ये चांगले गुण घेऊन तिने परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सुरभीने भोपाळ येथून इलेक्ट्रोनिक आणि कम्युनिकेशन मध्ये इंजिनियरिंग पदवी पूर्ण केली. इथे सुध्दा सुरभीने पहिला नंबर मिळवायची सवय सोडली नाही तिने सुवर्ण पडत घेत विद्यापीठातून पहिला नंबर मिळविला. कॉलेजनंतर सुरभी ने BARC मध्ये वैज्ञानिक म्हणून नौकरी केली त्यानंतर सुरु झाली घोडदौड परीक्षा पास होण्याची एका वर्षात सुरभी ने SAIL, GATE, ISRO, MPPSC PRE,SSC LGL, Delhi Police आणि FCI एवढ्या परीक्षा चांगल्या मार्काने पास केल्या. २०१३ मधील IES परीक्षेत सुरभीने पूर्ण भारतातून पहिला नंबर मिळविला. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपूर्ण भारतात ५०वी rank मिळवून IAS झाली आहे. सुरभी प्रमाणे यश फार कमी लोकांना मिळते. तिने परीक्षा सुध्दा पहिल्याच प्रयत्नान पास केली.

सुरभी लहानपणापासून एक जवाबदार आणि मोठे स्वप्न बघणारी मुलगी आहे. ती सांगते या सर्व गोष्टीची प्रेरणा तिला पालकाकडून मिळत होती. सुरभीने कधीही कोणत्या विषयाची शिकवणी वर्ग लावला नाही. स्वतः अभ्यास करून तिने शिक्षण पूर्ण केले. शाळेत तिला वेळेवर कधी पुस्तके मिळत नसे किंवा पूर्ण सुविधा मिळत नव्हत्या. ती सांगते कि तिला ह्या सुविधा मिळत नसे म्हणून तिला मोठे काम करायची प्रेरणा मिळाली. लहानपणी तिला चित्रकलेची देखील आवड होती. स्केचिंग, रांगोळी आणि भरतकाम तिला चांगल्या प्रकारे जमते. १२ वी पर्यंत ती संपूर्ण गावाकरिता सेलेब्रिटी होती आणि आत्ताही आहे. लोक म्हणायचे हि मुलगी काहीतरी मोठे काम करणार आणि तिने आज हे काम पूर्ण केले आहे.

One life made life - Prachi Bhivse

एका गुणाने आयुष्य घडविले - प्राची भिवसे


8030  

कोल्हापूर - एसटीआय आणि राज्यसेवा परीक्षेत एका गुणाने मागे पडले आणि ते जिव्हारी लागले. एवढा अभ्यास करून एका गुणाने गुणवत्ता यादी हुकल्याची खंत लागून राहिली. त्यातून निराश न होता पुन्हा जिद्दीने अभ्यास केला आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आले, याचा निश्‍चित अभिमान असल्याचे प्राची सखाराम भिवसे हिने सांगितले.

एसएससी बोर्डजवळील पद्मा कॉलनीतील रहिवासी असलेल्या भिवसे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्राची राज्यात पहिली आल्याची बातमी समजताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी तिच्या अभिनंदनासाठी गर्दी केली. प्राचीचे वडील कामानिमित्त परगावी होते. आपल्या यशात सर्वाधिक वाटा वडिलांचा असल्याचे तिने नमूद केले.

आई सुनीता म्हणाल्या, की प्राची एका गुणाने मागे पडली, त्या वेळी आम्हालाही क्षणभर विश्‍वास बसला नाही. त्या दिवशी रात्री आम्हाला झोप लागली नाही. पहिली ते बारावीपर्यंत तिने कधीही क्रमांक सोडला नाही. एका गुणाच्या अपयशानंतर नंतर तिने ज्या जिद्दीने अभ्यास केला, त्याला तोड नाही. प्राचीची बहीण स्मिता मोहिते याही आजच्या आनंद सोहळ्यात सहभागी झाल्या.

प्राची म्हणाली, ‘‘दहावीला ९६.५ टक्के गुण मिळवून विभागात पहिली आले. बारावीला ९५.६७ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला. पदवीचे शिक्षण सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये बी. टेक. पदवी घेतली. जानेवारी २०१७ मध्ये मंत्रालयात सहायक म्हणून रुजू झाले. वेगळे काही तरी करण्याची इच्छा असल्याने तेथेही मन रमेना. ८ मार्चला एसटीआय आणि १६ मार्च २०१७ ची पोस्ट केवळ एका गुणाने हुकली. नोव्हेंबर २०१७ च्या परीक्षेत प्रतीक्षा यादीद्वारे निवड झाली. एसटीआयमध्ये राज्यात पहिली आल्याची बातमी समजली आणि आठ महिन्यांपासून जे परिश्रम घेतले, त्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले.’’

‘‘स्पर्धा परीक्षा सर्वांचीच परीक्षा पाहते. आजही जे मुले-मुली आपली भवितव्य अनुभवत आहेत, त्यांनी एक-दोन गुणाने मेरिट हुकले म्हणून निराश न होता प्रयत्न कायम ठेवावेत. एक ना एक दिवस निश्‍चित यश मिळते, यावर विश्‍वास ठेवावा,’’ असे आवाहनही प्राची भिवसे हिने केले.

Inspirational Story of Sudhir Jadav

प्रेरणादायी कहाणी


2234  

उनाड पोरगं सुधीर शंकर जाधव यु पी एस सी परीक्षेत महाराष्ट्रात नववा. थक्क करणारा प्रवास नक्की वाचा.
सैन्यातील शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं.
शंकरने गावी फोन केला. "मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. सगळा पसारा बांधलाय. तिथं पोहोचल्यावर फोन करतो. सुधीर कुठं आहे? अभ्यास कसा आहे? सुजाता कुठं आहे? तिचा अभ्यास कसा आहे? ऊस कसा आहे? अाण्णा शेताकडे जातात का? त्यांची तब्बेत कशी आहे? आई आता चालतीय का? म्हादू ट्रॅक्टर वर जातोय का?
शंकर मिलिट्रीत भरती होऊन 15 वर्ष झालेली. आता चार पाच वर्षात रिटायरमेंट. नंतर गावाकडं कायमचं जायाचं. वर्षात दोन दोन बदल्या. प्रमोशने. कुठंच स्थिर नाही. म्हणून शंकरने बायका पोरं गावाकडं ठेवलेली. शेताकडे लक्ष राहतयं. पोरांना दूध दुभतं मिळतंय. चांगलं शिक्षण मिळतंय.
सुधीर यंदा 12 वीत होता. सुजाता 10 वीत. त्यांची परीक्षा जवळ आलेली. मालन त्यांना काही कमी पडू देत नव्हती. सुधीर कधीतरी हट्ट करायचा. मालन तो पूर्ण करायची. शंकर मालनला म्हणायचा, "दोन पोरं हीच आपली प्रॉप्रर्टी. दोन पोरं हीच आपली जायदाद. म्हातारपणाची काठी. रिटायर होऊन मी गावाकडं आलो कि निवांत राहणार. माझा वाघ तोपर्यंत नोकरीला लागल. त्यानं कलेक्टर व्हावं हे आपलं स्वप्न तो पूर करणारच. तो नोकरीला लागला कि आपल्या दोघांना एकच काम. चांगली सून आणि चांगला जावाय बघायचा".
मालन हसायची. म्हणायची, "तुमाला स्वप्नं बघायची लई सवय. पण असं झालंच नाही तर" ?? शंकर म्हणायचा, "अशुभ बोलू नकोस. आपण आपल्या पोरांसाठी केलेलं कष्ट वाया नाही जाणार. ती आपल्याच रक्तामांसाची आहेत."
तुला आठवतय? सुधीर तिसरीत होता. तुम्ही सगळी सुट्टीला एर्नाकुलमला आला. आठ दिवसांनी तुम्हाला परत पाठवलं. गावी आल्यावर त्याला कावीळ झाली. मी रजा टाकून आलो. डॉ. वडवेकरांच्यात अँडमिट केेलं. डॉक्टर म्हणाले, "कावीळ मेंदूपर्यत गेली तर अवघड आहे. मी प्रयत्न करतोय. परंतू......
मी हबकलोच. पण तरी डॉक्टरना सांगितलं, "कितीही पैसा लागू दे. नोकरीचा सगळा पैसा खर्चीन. माझ्या वाट्याची सगळी जमीन विकीन. पण माझ्या पोराला वाचावा". मालु.. तुला कधी बोललो नाही. पण त्या आठ दिवसात मी रात्रभर जागा असायचो. पोराच्या काळजीनं राञी उशी ओलि व्हायची...आणि तू म्हणतेस तस घडलंच नाही तर ?
गावी आलं कि शंकर दोन्ही पोरांना घेऊन शेतात जायचा. जाताना सुधीरला ट्रॅक्टर चालवायला द्यायचा. कधी पंढरपूर तर कधी म्हाळसोबाला जायचा. कधी पिक्चरला न्यायचा.
रजा संपली कि शंकरला भरून यायचं. बायका पोरं सोडून जायाला नको वाटायचं. सुधीरला म्हणायचा, तू शिकून कोण होणार? तो म्हणायचा, कलेक्टर. शंकरची छाती फुगायची. सुधीरला जवळ घेवून म्हणायचा, अभ्यास कर. खूप मोठा हो. आमचं नाव काढ. मी आणि तुझ्या मायनं उभा केलेल्या जायदादीचा तूच मालक होणार आहेस. तुझ्या आणि सुजाताच्या शिक्षणासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. कायबी कमी पडू देणार नाही. सुजाताच्या पाठीवर, तोंडावर हात फिरवायचा. सुधीरला मीठीत घेऊन डोकं कुरवाळायचा. काळजावर दगड ठेवून सगळ्यांचा निरोप घ्यायचा..
सुधीरची 12 वीची परीक्षा सुरु झाली. शंकर सकाळ संध्याकाळ फोन करायचा. पेपर कसा गेला? सगळा लिहिला का? वाचलेलं सगळं आलतं का? जीवाला एकच घोर, सुधीरला चांगले मार्क्स पडायला पाहिजेत.
बुधवारी सुधीरचा शेवटचा पेपर होता. दुपारी 2 वाजता पेपर सुटला. 3 वाजले तरी सुधीर घरी घरी आला नव्हता. मालन वाट बघत होती....आणि अचानक त्याच्या मित्राचा फोन आला. तुमच्या सुधीरला पोरांनी मारलय. लवकर या. शिवाजी चौकात तो पडलाय. मालनला धस्स झालं. ताबडतोब त्या उठल्या. शिवाजी चौकात गेल्या. सुधीर खाली पडलेला. कापडं फाटलेली. सायकल गटारात पडलेली. दफ़्तर विस्कटलेलं. मालननं त्याला उठवलं. बरीच माणसं जमलेली. वह्या, पुस्तकं, सायकल सगळं घेऊन मालनने गर्दीतून वाट काढली.
घरी आल्यावर मालनने शंकरला फोन केला. सुधीर सायकलवरनं पडलाय. लवकर या. दुसऱ्या दिवशी शंकर रजा टाकून आला. विचारपूस करायला लागला. एवढ्यात दोन पोलीस आले. सुधीरला स्टेशनात घेऊन गेले. पाठोपाठ शंकर आणि मालनही गेले.
पोलिस स्टेशनात 10-12 पोरं. त्यांची चौकशी चाललेली. दोन तासांनी पोलिसांनी शंकरला आत बोलावलं. हा मुलींच्या भानगडीतला सारा प्रकार आहे. यावेळी त्याला सोडतोय.
तुमचं लक्ष नाही पोरावर. पुन्हा सापडला तर गुन्हा नोंद होईल. करियर बरबाद झाले तर कोण जबाबदार?
शंकर सुधीरला घेऊन घरी आला. काळीज फाटलेलं. स्वप्नांचा चुराडा झालेला. ज्याच्या जीवावर म्हातारपण घालवायच ते उंडगाळ निघालं. त्याला उंडगा नाद लागला. वाटलं होतं नाव काढल. 12 वीला जिल्ह्यात पहिलां येईल. पुढं मागं कलेक्टर होईल. लाल दिव्याची गाडी. मागं पुढं शिपाई. भोंग्याच्या गाड्या. गावात घरापुढं गाड्या लागतील. आमची जिंदगी सार्थकी होईल. ऊन म्हणलं न्हाई, तहान म्हणली न्हाई. राबतच राहिलो. मालन शेतावर आणि मी सीमेवर.
सुधीर 6 वीत होता. बाटुक काढताना मालनच्या पायात सड घुसला. रक्तबंबाळ पाय घेऊन दिवसभर राबत होती. का तर सुधीरच्या शाळेचा खर्च. 12 वी नंतर पुण्याला यू पी एस सी ला पाठवायचा. जरूर तर मुंबईला. पण कलेक्टर करायचा...आणि ....पोरगं पोरींच्या मागं लागलेलं..शंकरचं मस्तकच उठलं. जीवनात राम उरला नाही. स्वप्नांचा कोळसा झाला. आता राबण्यात काय अर्थं आहे?? झिजायचं तरी कशाला? शंकर काहीच बोलला नाही. बरोबरीला आलेलं पोरगं. मारून तर काय उपयोग? रात्री झोप लागली नाही. दोन मोठे पेग मारले. फॅनकडे बघत तसाच पडून राहीला.
दुसऱ्या दिवशी पोराला घेऊन शंकर शेतात गेला. पोरगं घाबरून गेलेलं. आता मार खावा लागणार. मिलटरीतला बाप. हतोड्यासारखा हात. शाळापण बंद होणार. नुसत्या विचारानं थरथर कापायला लागलं.
नारळी आंब्याखाली दोघेजण बसली. अर्धा तास शंकर काहीच बोलला नाही. नंतर त्याने मुलाला जवळ घेतलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाला, या वयात अशा चूका होतात. पण तू करशील असं वाटलं नव्हतं. तू तर कलेक्टर व्हायचं ठरवलयस. लाईन मारत मारत कोण कलेक्टर झालेलं ऐकीवात नाही,,पोरा...या वयातलं प्रेम झूठ असतं. वासनेचा खेळ असतो सारा.. भादव्यात एका कुत्रीमागं 10-12 कुत्री लागतात. कळवंड करतात. त्यात काही मरतात. काय फरक त्यांच्यात आणि आपल्यात? मरायचं तर देशासाठी मर. मार खायचा तर आई बापाच्या नावासाठी खा. अभ्यासासाठी जेवण कमी केलस. खेळ बंद केलास. मित्रांकडे जाणं बंद केलस. पिक्चर बंद केलास. तसा ह्यो नादपन 5-7 वर्ष बंद केलास तर खूप मोठा होशील. तू फक्त ठरवलं पाहिजेस. एकदा ठरवलं कि डोक्यात तोच विषय राहतो.. शेवटी तो नाद हा दोन मांड्यांच्या मध्ये नसतो तर डोक्यातच असतो.
18 ते 25 वयातल्या वासनेला सिनेमावल्यानी प्रेम म्हणलं. प्रेम ब्रिम खोटं सारं... हे वय सोडून राहिलेल्या आयुष्यात प्रेम असतं कि नसतं? दोन्हीत फरक काय? आंधळ करतं ते प्रेम नसतं. आंधळं करतं ती वासना असते. ज्यांना आई बाप नाहीत, ज्यांना कुणी बघणारं नाही. त्यांनी साथीदार स्वतः शोधणं ठीक आहे. पण तुझ्यासारख्यानं
...आम्ही कुठं गेलोय काय? आम्हाला तुझ्या साथीदाराबद्दल कळणार नाही का? करिअर केलस तर पोरी मागं लागतील. नाहीतर तुलाच मागं लागावं लागेल. तू ठरव काय करायचं ते. नंतर शंकर काहीच बोलला नाही. अबोला धरून दोघेही घरी आले.
12 वीचा निकाल लागला. सुधीरला 64% मार्क्स पडले. त्याने शंकरला फोन केला. निकाल लागला. पुण्याला जाऊ का ? शंकर कोरडेपणानं म्हणाला "बघ तुझ्या बेतानं......."
मालनला वाटायचं सुधीरने इथच कुठंतरी अँडमिशन घ्यावं. अभ्यास करावा. पण त्याची इच्छा पुण्याला जायची होती. सुधीर पुण्याला गेला.
पोराला पुण्याला जाऊन 2 वर्ष झाली. शंकरने स्वेछानिवृती घ्यायचं ठरवलं. नोकरीत मन रमत नव्हतं. घराकडं जायला पण पूर्वीसारखं भरून येत नव्हतं. वाटायचं मालुला घेऊन दूर कुठतरी जावावं.
शंकर कायमचा गावी आला. शेतातील कामे करू लागला. कधीतरी पोराचा फोन यायचा. फी भरायची आहे . पैसे पाठवा. बाकी काही विचारपूस नाही. शंकर जास्तच उदास व्हायचा.
बुधवारी उसाची लागण करायची होती. शंकर शेतात सार्टी सोडत होता. ट्रँक्टरमागं गडी तन वेचित होता.... आणि लांबून सुजाता येताना दिसली..धापा टाकत...पळत...शंकरच्या काळजाचं पाणी झालं. मालनला काही झालं का काय? शंकरने ट्रँक्टर बंद केला. खाली उतरला. तोवर सुजी जवळ आलेली. तिला बोलता येत नव्हतं. घामाघुम झालेली. धाप लागलेली.
शंकरने विचारलं, काय झालं? सुजाताने हातातली पिशवी शंकरपुढं टाकली आणि गप्पकन खाली बसली...शंकरने पिशवी बघितली...त्यात पेपर होता...पेपरात पहिल्या पानावर ठळक बातमी होती...यु पी एस सी परीक्षेत सुधीर शंकर जाधव महाराष्ट्रात नववा...... शंकरनं पेपरासहित पोरगिला गच्चं मिठीत घेतलं. वादळात मोठं झाड हालावं तसा तो गदगदायला लागला. आनंदाला पारा उरला नाही. शंकरच्या दोन्ही डोळ्यातल्या पाण्यानं पोरगीचं डोळे ओलचिम्ब झालं.....!
मुलांचे आयुष्य घडवायचे असेल तर अशा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपल्या मुलांना सांगा. कारण आपण शिक्षक आहोत .

Egg vendor who cracked civil service exams

Egg vendor who cracked civil service exams


1943  

He sold eggs, worked as a vegetable vendor and even mopped the floors of an office to earn a living during his struggling days in Delhi.

Sheer grit and hard work only helped Manoj Kumar Roy, who hails from Bihar, brave all odds and bag the 870th rank in the coveted central services exam in 2010.

Roy, 35, - now an Indian Ordnance Factory Service (IOFS) officer - spends his weekends grooming poor students of his state to help them crack the UPSC exam.

Changing lives: Manoj Kumar Roy with one of his students, Reshu Krishna, who came 13th in the BPSC exam

"The service is absolutely free," he said.

Roy travels 110km from Nalanda, where he is posted as an administrative officer at Rajgir Ordnance factory, to Patna every weekend.

"When I cracked the civil services in my fourth attempt, I thought about many youngsters who could not afford the costly coaching," he said. "So I decided to extend my help to them."

Roy said he was lucky to get his first posting at Rajgir in his home state. "I was allotted the IOFS on the basis of my rank in the UPSC exam," he said.

Roy started providing free coaching to deserving and poor children soon after he was posted at Rajgir. "Most of my students belong to poor or lower middle class families," he said.

Valuable experience: Manoj Kumar previously made a living selling eggs and vegetables

Roy's mission is supported by his wife Anupama Kumari, a deputy collector in Patna City.

"My wife has qualified the Bihar Public Service Examination," he said. "I asked her to coach and share her experiences with my students. She readily agreed to my request."

Most of his successful students owe their success to Roy. Reshu Krishna, who scored the 13th rank in the BPSC examination and qualified for the post of deputy superintendent of police, said she had benefited immensely from Roy's classes.

"Sir (Roy) used to teach us geography and general studies," she said. "His tips were invaluable to all of us."

Arun Kumar, who came 390th in the same examination, said Roy inspired him to appear for the BPSC exam.

"I came in contact with Roy sir during my college days," he said. "When I failed to qualify in the UPSC examination and the Bihar Police's recruitment test for sub-inspectors, Roy sir motivated me and helped me crack the state civil services examination," Arun said.

As many as 45 students, who were trained by Roy, have qualified the recent combined BPSC exam of three batches.


Top