आता 'टीटी' ऐवजी 'टीडी' इंजेक्शन ‼️

Now, TD injection instead of TT

2325   17-Aug-2019, Sat

धनुर्वात प्रतिबंधासाठी (टिटॅनस टॉक्साइड) देण्यात येणारे इंजेक्शन हद्दपार झाले आहे. आता १० आणि १६ वर्षाच्या प्रौढांमध्ये घटसर्पाचे (डिप्थेरिया) प्रमाण अधिक आढळून येऊ लागल्याने धनुर्वातासह घटसर्पाची (टीडी) संयुक्त लस देण्याचा निर्णय़ राज्य सरकारने घेतला असून, त्याची अंमलबजावणी पुण्यासह सर्वत्र काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. ही लस प्रौढांना सरकारी रुग्णालयांत मोफत मिळणार आहे. या लसीमध्ये धनुर्वात लसीचे प्रमाण पूर्वीसारखेच अधिक असून घटसर्पाचे प्रमाण कमी असणार आहे. 

राज्याच्या सरकारी रुग्णालयात धनुर्वात प्रतिबंधक (टीटी) लस देण्यात येते. ही लस आतापर्यंत गर्भवतींसह १० ते १५ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना मोफत देण्यात येत होती. या लसीचा नियमित लसीकरणात समावेश होता. मात्र, धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प (डीपीटी) या तीन लसींसह हिपॅटायटिस बी आणि इन्फ्लूएंझा (हिप) अशा विविध प्रकारच्या लसी देण्यात येत होत्या. त्यासाठी केंद्र सरकारने 'पेंटाव्हॅलेंट' ही पाच लसींची संयुक्त लस एकत्रित करून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वारंवार सुई टोचण्यापासून लहान मुलांची सुटका झाली. दीड आणि पाच वर्षांच्या मुलांना 'डीपीटी' ही त्रिगुणी लस दिली जाते. त्यामुळे दीड, अडीच आणि साडेतीन महिन्याच्या बालकांसह पाच वर्षाच्या मुलांना 'डीपीटी', तसेच बूस्टर लसीमधून घटसर्पाच्या लसीचा डोस मिळत होता. आता धनुर्वातासोबत घटसर्पाची लस देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात नुकतीच सुरू झाली आहे. 

'घटसर्पाची लस पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना सहज मिळते. मात्र ५ ते १० वर्षे आणि १० ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये घटसर्पाच्या आजाराचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धनुर्वातासह (टीटी) आता घटसर्प (डिप्थेरिया) ही संयुक्त लस देण्याची सूचना केली. सध्या १० आणि १६ वर्षाच्या मुलांसह प्रौढांना 'टीटी' ऐवजी 'टीडी' ही लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीतून दोन्ही आजारांना प्रतिबंध होणार आहे,' अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या कुटुंब कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. डी. एन. पाटील यांनी दिली. 

पुण्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत या लसी देण्यास सुरुवात झाली आहे. मुलांमधील रोग प्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे घटसर्प लस संयुक्तपणे देण्यात येणार आहे. सध्या पुण्यातील सरकारी रुग्णालयात 'टीटी' इंजेक्शनचा साठा संपला असून, नव्याने 'टीडी' लसींचा साठा उपलब्ध झाला आहे,' अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या लसीकरणाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली. 

साधारणतः लोखंडी खिळा, पत्रा लागल्यास त्यामुळे जखम होते. त्या वेळी धनुर्वात प्रतिबंधक लस म्हणून टीटी इंजेक्शन आतापर्यंत घेतले जात होते. आता टीटी इंजेक्शन बंद होणार आहे. मात्र, अशा स्वरूपाच्या जखमांना प्रतिबंध करण्यासाठी टीडी इंजेक्शन देण्यात येऊ नये, अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्या वेळी धनुर्वाताचे टीटी इंजेक्शन देण्यात यावे. त्यासाठी स्वतंत्र साठा उपलब्ध केला जाणार आहे, तर 'टीडी' ही लस नियमित लसीकरणात दिली जाणार आहे. 

विज्ञान-तंत्रज्ञान

mpsc-exam-2019-science-technology-subject-in-mpsc-exam-zws-70-1923607/

1250   16-Jul-2019, Tue

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यावर हे लक्षात येते की, ‘तंत्रज्ञान’ व त्याचा मानवी कल्याणासाठी वापर या अनुषंगाने ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा घटक अभ्यासणे एमपीएससीला अभिप्रेत आहे. घटकवार अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.

ऊर्जा या घटकातील ऊर्जा साधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे.

ऊर्जा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे व प्रक्रिया, तंत्रज्ञान यांची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी.

ऊर्जेची गरज वेगवेगळया क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादीबाबतची आकडेवारी (टक्केवारी) भारत व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून पाहायला हवी. भारतातील याबाबतच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे स्थान माहीत असायला हवे. ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक माहीत करून घ्यावा.

ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीची विविध योजनांचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांच्या आधारे table तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

संगणक व माहिती तंत्रज्ञान संगणकाची कार्यपद्धती, नेटवर्किंग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास बेसिक व उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा.

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे आर्थिक महत्त्व वेगवेगळ्या पलूंनी अभ्यासायला हवेत. रोजगार निर्मिती, आयात-निर्यात, परकीय गुंतवणूक व GDP यामधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आर्थिक पाहणी अहवालातून पाहायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबींचा अभ्यास रोजच्या घडामोडी यातून करायला हवा.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीची शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास त्यांचे उद्देश, उद्दिष्टे, स्वरूप, अंमलबजावणी, खर्चाची विभागणी इत्यादी मुद्दय़ांच्या अनुषंगाने करायला हवा.

सायबर कायद्याबाबतचा अभ्यास पेपर दोनमधील ‘विधि’ विभागामध्ये पूर्ण होईल.

अवकाश तंत्रज्ञान या घटकाचे ‘कालानुक्रमांवर’ आधारित tables बऱ्याच संदर्भ साहित्यात सापडते. या tables मध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाश याने, क्षेपणास्त्र १ व विविध अवकाश प्रकल्प यांचा अभ्यास पूर्ण होईल. यातून या तंत्रज्ञानाचा ‘विकास’ कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल.

कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामधील वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व त्यांचा उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्यातून अभ्यासायला हव्यात.

सुदूर संवेदनासाठी भूगोलविषयक पुस्तक उत्तम संदर्भ साहित्य आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमविणे, नव्या संकल्पना समजून घेणेही आवश्यक आहे.

जैव तंत्रज्ञान, आण्विक धोरण व आपत्ती व्यवस्थापन या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमातील विवेचन विस्तृतपणे केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मुद्दय़ाच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलूच आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत ‘चालू घडामोडी’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या तिन्ही घटकांच्या अभ्यासामध्ये लॉजिकल विचार आवश्यक आहे. विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी हे पलू महत्त्वाचे आहेत.

भारताचे आण्विक धोरण घटकामध्ये आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांवरही प्रश्न विचारण्यात येतात. या संकल्पना समजून घेतल्यावर देशाच्या आण्विक धोरणांचा अभ्यास सोपा होतो.

‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमातील नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत ‘चालू घडामोडी’ माहीत असणे आयोगाने गृहीत धरले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५च्या तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे.

‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. उमेदवारांनी विज्ञान आणि विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजे ‘तंत्रज्ञान’ मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळ्या ‘आर्थिक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. हे समजून घेऊन हा घटक तयार करायला हवा. त्यामुळे घटकासाठी पक्का संकल्पनात्मक अभ्यास व त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास हे अभ्यासतंत्र आवश्यक आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान

mpsc-exam-2019-science-technology-subject-in-mpsc-exam-zws

1097   03-Jul-2019, Wed

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यावर हे लक्षात येते की, ‘तंत्रज्ञान’ व त्याचा मानवी कल्याणासाठी वापर या अनुषंगाने ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा घटक अभ्यासणे एमपीएससीला अभिप्रेत आहे. घटकवार अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.

ऊर्जा या घटकातील ऊर्जा साधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे.

ऊर्जा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे व प्रक्रिया, तंत्रज्ञान यांची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी.

ऊर्जेची गरज वेगवेगळया क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादीबाबतची आकडेवारी (टक्केवारी) भारत व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून पाहायला हवी. भारतातील याबाबतच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे स्थान माहीत असायला हवे. ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक माहीत करून घ्यावा.

ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीची विविध योजनांचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांच्या आधारे table तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

संगणक व माहिती तंत्रज्ञान संगणकाची कार्यपद्धती, नेटवर्किंग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास बेसिक व उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा.

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे आर्थिक महत्त्व वेगवेगळ्या पलूंनी अभ्यासायला हवेत. रोजगार निर्मिती, आयात-निर्यात, परकीय गुंतवणूक व GDP यामधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आर्थिक पाहणी अहवालातून पाहायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबींचा अभ्यास रोजच्या घडामोडी यातून करायला हवा.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीची शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास त्यांचे उद्देश, उद्दिष्टे, स्वरूप, अंमलबजावणी, खर्चाची विभागणी इत्यादी मुद्दय़ांच्या अनुषंगाने करायला हवा.

सायबर कायद्याबाबतचा अभ्यास पेपर दोनमधील ‘विधि’ विभागामध्ये पूर्ण होईल.

अवकाश तंत्रज्ञान या घटकाचे ‘कालानुक्रमांवर’ आधारित tables बऱ्याच संदर्भ साहित्यात सापडते. या tables मध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाश याने, क्षेपणास्त्र १ व विविध अवकाश प्रकल्प यांचा अभ्यास पूर्ण होईल. यातून या तंत्रज्ञानाचा ‘विकास’ कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल.

कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामधील वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व त्यांचा उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्यातून अभ्यासायला हव्यात.

सुदूर संवेदनासाठी भूगोलविषयक पुस्तक उत्तम संदर्भ साहित्य आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमविणे, नव्या संकल्पना समजून घेणेही आवश्यक आहे.

जैव तंत्रज्ञान, आण्विक धोरण व आपत्ती व्यवस्थापन या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमातील विवेचन विस्तृतपणे केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मुद्दय़ाच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलूच आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत ‘चालू घडामोडी’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या तिन्ही घटकांच्या अभ्यासामध्ये लॉजिकल विचार आवश्यक आहे. विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी हे पलू महत्त्वाचे आहेत.

भारताचे आण्विक धोरण घटकामध्ये आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांवरही प्रश्न विचारण्यात येतात. या संकल्पना समजून घेतल्यावर देशाच्या आण्विक धोरणांचा अभ्यास सोपा होतो.

‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमातील नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत ‘चालू घडामोडी’ माहीत असणे आयोगाने गृहीत धरले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५च्या तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे.

‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. उमेदवारांनी विज्ञान आणि विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजे ‘तंत्रज्ञान’ मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळ्या ‘आर्थिक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. हे समजून घेऊन हा घटक तयार करायला हवा. त्यामुळे घटकासाठी पक्का संकल्पनात्मक अभ्यास व त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास हे अभ्यासतंत्र आवश्यक आहे.

गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा : सामान्य विज्ञानाचे घटक

general-science-complete-study-material-1878606/

2827   20-Apr-2019, Sat

मागील लेखामध्ये सामान्य विज्ञान या घटकावर पहिल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. गट क सेवेसाठी दहावी म्हणजेच शालान्त परीक्षेची काठीण्य पातळी विहित करण्यात आली आहे. विहित अभ्यासक्रम, प्रश्नांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रम यांचा एकत्रित विचार करून तयारीबाबतची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद न केलेला पण स्वतंत्रपणे विचारण्यात येणारा एक घटक आहे, मानवी शरीर रचनाशास्त्र. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचे उपलब्ध असल्याने काही प्रमाणात अभ्यासाला दिशा देण्यासाठी त्या विश्लेषणाचा नक्कीच उपयोग होणार हे दुसरे वर्ष आहे. तयारीसाठी असणारा पहिल्या वर्षीचा संभ्रम आता दूर झालेला आहेच शिवाय मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका विश्लेषणासाठी आहे.

 • आरोग्य, रोग व त्यांचे उपचार, वनस्पतींचे वर्गीकरण व त्या त्या वर्गाची वैशिष्टय़े यांवर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर रसायनशास्त्रावर केवळ दोनच प्रश्न. तरीही तयारी कोणत्याही एका उपघटकास इतर उपघटकांपेक्षा कमी किंवा जास्त महत्त्व देणे योग्य ठरणार नाही.

जीवशास्त्र हा घटक भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांपेक्षा जास्त गुणांसाठीच विचारण्यात येईल असे गृहीत धरता येईल. मात्र एकूणच विज्ञानाच्या प्रश्नांची काठीण्य पातळी पाहता सर्वच उपघटकांची तयारी करून सगळे १५ गुण मिळवता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वच घटक गांभीर्याने तयार करणे जास्त व्यवहार्य आहे.

 • बहुविधानी प्रश्न हे पारंपरिक मुद्दय़ांवर बेतलेले आहेत त्यामुळे त्यांचीही तयारी मूलभूत अभ्यासाच्या जोरावर पूर्ण होऊ शकते.

वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची पुढीलप्रमाणे तयारी करता येईल :

 • विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत, द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, धातू, अधातू आणि त्यांची वैशिष्टय़े, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, महत्त्वाची संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे हा रसायनशास्त्र घटकाचा अभ्यासक्रम गृहीत धरावा.
 • रसायनशास्त्र घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने टेबलमध्ये नोट्स काढून करता येतो. त्यासाठी वरील अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील मागचे प्रश्न पाहून सराव करणे हा महत्त्वाचा भाग आहे.
 • प्रकाश, ध्वनी, िभग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतीविषयक समीकरणे यांवर मूलभूत संकल्पना आणि गणिते विचारली जाऊ शकतात. गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
 • वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े, हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.
 • अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवर लक्ष द्यावे. अवयवांची काय्रे, रचना, संरक्षक बाबी, वैशिष्टय़े, ग्रंथींचे स्थान, त्या स्रवतात ती विकरे, संप्रेरके, त्याच्याशी संबंधित आजार व त्यावरील उपचार या बाबींचा टेबलमध्ये अभ्यास करता येईल.
 • रोगांचे प्रकार- जिवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत. या सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही टेबल तयार करता येईल.
 • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चच्रेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारांसाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात. म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
 • आरोग्याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना व त्यांची उद्दिष्टे माहीत असायला हवीत.
 • विज्ञानाशी संबंधित कृषीविषयक काही घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात ठेवायला हवे. वनस्पतींमधील खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे रोग, महत्त्वाची पिके व त्यांवरील रोग व त्यावरील उपाय, तणनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचा आरोग्यावरील परिणाम या बाबींच्या नोट्स टेबलमध्ये काढता येतील.
 • सर्व शाखांमधील शोध, सिद्धांत व वैज्ञानिक यांची नोट तयार करावी.

प्रश्नवेध एमपीएससी : गट क संयुक्त पूर्वपरीक्षा

group-pre-examination-1875013/

975   14-Apr-2019, Sun

प्रश्न १. पुढील विधाने विचारात घ्या.

अ.   बटाटे साठवून ठेवण्यासाठी गॅमा किरणांचा वापर करतात.

ब.   कांदे साठवून ठेवण्यासाठी गॅमा किरणांचा वापर करतात.

क.   गॅमा किरण हे उड-६० या समस्थानिकापासून मिळवतात.

ड.   गॅमा किरणे आयनीभवन घडवून आणणारी प्रावरणे आहेत.

वरीलपकी योग्य विधान/ने कोणते/ती?

१) अ, ब आणि क

२) ब, क, आणि ड

३) अ, क आणि ड

४) वरील सर्व

प्रश्न २. एका विद्युत परिपथामध्ये ३५ ओहम, १७ ओहम, ३३ ओहम आणि ११ओहम असे विद्युतरोध एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. तर त्या परिपथातील एकूण परिणामी विद्युतरोध किती?

१) ६१ ओहम    २) ९६ ओहम

३) ५२ ओहम    ४) ८० ओहम

प्रश्न ३. पुढीलपकी कोणत्या आनुवंशिक रोगामध्ये ४५ गुणसूत्रे आढळतात?

१) डाउन्स सिन्ड्रोम

२) क्लीन्फेल्टर्स सिंड्रोम

३) टर्नर्स सिंड्रोम

४) वरीलपकी नाही

प्रश्न ४. खालील विधाने विचारात घ्या.

अ. बाष्पीभवनाचा दर हा तापमान, क्षेत्रफळ, आर्द्रता आणि दाब यावर अवलंबून असतो.

ब.   बंदिस्त भांडय़ातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग हा उघडय़ा भांडय़ातील पाण्याच्या बाष्पीभवनाच्या वेगापेक्षा कमी असतो.

क.   पाण्याचा उत्कलनांक त्याच्या बाष्पीभवन बिंदूपेक्षा जास्त आहे.

वरील विधानांमधून अयोग्य विधान निवडा.

१) अ सोडून सर्व  २) ब सोडून सर्व  ३) क सोडून सर्व  ४) वरील सर्व

प्रश्न ५. पुढीलपकी कोणत्या सृष्टीमध्ये लंगिक प्रजन, मियॉसिस व मायटॉसिस या प्रक्रिया घडून येत नाहीत?

१) सृष्टी मोनेरा

२) सृष्टी प्रोटीस्टा

३) सृष्टी फन्जाय

४) सृष्टी मोलुस्का

प्रश्न ६. पुढीलपकी मूलद्रव्यांचे प्रकार आणि त्यांचे वैशिष्टय़ यांची कोणती जोडी योग्य आहे?

१)   आयसोबार – समान अणूभार पण असमान अणूअंक

२)   आयसोटोप – समान अणू अंक पण असमान अणुभारांक

३)   आयसोटोन – न्यूट्रॉनव्ही संख्या समान पण इलेक्ट्रॉनची संख्या असमान

४)   आयसोमर – समान संरचना सूत्र पण असमान रेणूसूत्र

प्रश्न ७. पुढील विधानांचा विचार करा

अ.   दृष्य प्रकाश, अवरक्त तरंग, मायक्रोवेव्ह, रेडिओ लहरी हे आयनीभवन करणाऱ्या प्रारणांचे प्रकार आहेत.

ब.   अतिनील किरणे, क्ष किरण, गॅमा किरण हे आयनीभवन न करणाऱ्या प्रारणांचे प्रकार आहेत.

क.   आयनीभवन न करणारी प्रारणे मनुष्याला हानीकारक असतात.

ड.   आयनीभवन करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोन्ही प्रारणांना विद्युत चुंबकीय प्रारणे असेही म्हणतात.

वरीलपकी योग्य विधान निवडा

१) अ सोडून सर्व

२) ब सोडून सर्व

३) क सोडून सर्व

४) ड सोडून सर्व

प्रश्न ८. पुढील मूलद्रव्यांची मांडणी रासायनिक अभिक्रियांमधील सक्रियतेच्या प्रमाणानुसार चढत्या क्रमाने करा.

१)   सोने, तांबे, झिंक, अ‍ॅल्युमिनियम, पोटॅशियम

२) सोने, अ‍ॅल्युमिनियम, पोटॅशियम, तांबे, झिंक

३) पोटॉशियम, अ‍ॅल्युमिनियम, झिंक, तांबे, सोने

४) झिंक, तांबे, अ‍ॅल्युमिनियम, पोटॅशियम, सोने

उत्तरे आणि स्पष्टीकरणे

प्रश्न क्रमांक. १ – योग्य पर्याय क्र. (४)

प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र.(2)

प्र.क्र. ३ – योग्य पर्याय क्र.(३)

प्र. क्र. ४ – योग्य पर्याय क्र.(3)

प्र.क्र. ५ – योग्य पर्याय क्र.(१)

प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(३)

आयसोटोन- न्यूट्रॉनव्ही संख्या समान पण इलेक्ट्रॉनची संख्या असमान

 प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र.(४)

म्हणजेच प्रश्नातील ड हा पर्याय सोडून इतर तिन्ही पर्याय योग्य आहेत.

दृष्य प्रकाश, अवरक्त तरंग, मायक्रो वेव्ह, रेडिओ लहरी व कमी तरंगलांबीची किरणे ही अणूंचे आयनीभवन करू शकत नाहीत. क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील किरणे हे त्यांच्या तीव्र वेगामुळे अणूंचे आयनीभवन करण्यास सक्षम असतात. बीटा किरण, अल्फा किरण हे आयनीभवन न होणाऱ्या प्रारणांचे प्रकार आहेत. आयनीभवन न करणारी प्रारणे मनुष्याला हानीकारक असतात. दृष्य प्रकाश, अवरक्त तरंग, मायक्रोवेव्ह, रेडिओ लहरी व कमी तरंगलांबीची किरणे, क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील किरणे अशी सर्व आयनीभवन करणारी व न करणारी प्रारणे विद्युत चुंबकीय प्रारणेच असतात.

प्र.क्र. ८ – योग्य पर्याय क्र.(१)

दिलेल्या मूलद्रव्यांमध्ये सोने हा सर्वात कमी सक्रिय धातू आहे. तांबे, िझक, अ‍ॅल्युमिनियम यांची अभिक्रिया आम्लाबरोबर होते तसेच त्यांची सक्रियता त्यांच्या अणूतील बाह्य़ कक्षेमध्ये उपलब्ध इलेक्ट्रॉन्समुळे त्याच क्रमाने वाढते. पोटॅशियमची रासायनिक अभिक्रिया पाण्याबरोबरही होते.

दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सामान्य विज्ञान

secondary-service-united-pre-exam-general-science

1594   16-Mar-2019, Sat

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद न केलेला; पण स्वतंत्रपणे विचारण्यात येणारा एक घटक आहे मानवी शरीर रचनाशास्त्र. दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे तिसरे वर्ष आहे. तयारीसाठी असणारा पहिल्या वर्षीचा संभ्रम आता दूर झालेला आहेच, शिवाय दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणासाठी उपलब्ध असल्याने काही प्रमाणात अभ्यासाला दिशा देण्यासाठी त्यांचा नक्कीच उपयोग होणार आहे. मागील दोन वर्षांमध्ये या घटकाचे प्रश्नविश्लेषण पुढीलप्रमाणे

वरील सारणी तसेच प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता पुढील मुद्दे लक्षात येतात.

कोणत्याही उपघटकास इतर घटकांपेक्षा कमी किंवा जास्त महत्त्व देण्यात येत नाही. प्रश्नसंख्या बदलली तरी साधारणपणे १५ प्रश्न व सहा उपघटकांपकी प्रत्येकाला किमान एक प्रश्न बहाल करून इतर प्रश्नांची संख्या उपघटकनिहाय, शक्यतो समान ठेवण्याकडे कल दिसतो.

बहुविधानी प्रश्नांची संख्या कमी आहे आणि पारंपरिक पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न जास्त आहेत.

बहुविधानी प्रश्नांमध्येही काठिण्य पातळी ही मूलभूत अभ्यास झालेल्या उमेदवारांना कॉमन सेन्सने सोडविता येतील अशा प्रकारची आहे.

सर्व शाखांमधील शोध व शोधकत्रे वैज्ञानिक यांवरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

मूलभूत संज्ञा आणि संकल्पनांवर बहुतेक प्रश्न विचारलेले आहेत. उपयोजित प्रकारचे प्रश्न भौतिकशास्त्राच्या गणितांपुरते मर्यादित असल्याचे दिसते.

वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची पुढीलप्रमाणे तयारी करता येईल.

विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत, द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, धातू, अधातू आणि त्यांची वैशिष्टय़े, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, महत्त्वाची संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे हा रसायनशास्त्र घटकाचा अभ्यासक्रम गृहीत धरावा.

यांवर थेट आणि जीवशास्त्र किंवा कृषी संबंधित अशा प्रकारचे पण कमी काठिण्य पातळीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

रसायनशास्त्र घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने सारणी पद्धतीत टिप्पणे काढून करता येतो. त्यासाठी वरील अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील मागचे प्रश्न पाहून सराव करणे हा महत्त्वाचा भाग आहे.

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतीविषयक समीकरणे यांवर मूलभूत संकल्पना आणि गणिते विचारली जाऊ शकतात.

गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.

वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े, हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्घतीने करावा.

अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयवसंस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर प्रश्न तयार केल्यास अशी तयारी जास्त प्रभावी ठरते.

रोगांचे प्रकार- जीवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत. या सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही त्याची सारणी तयार करून अभ्यास करता येईल.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चच्रेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

आरोग्याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना व त्यांची उद्दिष्टय़े माहीत असायला हवीत.

रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी

chemistry-and-physics-preparation-for-mpsc-exam

4083   09-Jan-2019, Wed

जीवशास्त्र आणि आरोग्य व पोषण या घटकांच्या तयारीबाबत मागच्या लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

रसायनशास्त्र

या घटकावरचे प्रश्न थेट आणि अधिक वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात. या घटकाचा अभ्यास करताना मुद्दय़ांचा योग्य क्रम ठरवून घेतला आणि मागील प्रश्नांची ओळख करून घेतली तर हा घटकही ‘गुणवर्धक’ आहे.

रसायनशास्त्राचा अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांवर भर देणे आवश्यक आहे.

द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातूसदृश धातुके, संयुग व त्यांची निर्मिती, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे, मिश्रण व त्यांची निर्मिती.

वरील मुद्दय़ांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. यासाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी तसेच नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या मुद्दय़ांच्या उपयोजनाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत असे दिसून येते. थिअरी समजली की उपयोजन समजणे फारसे अवघड वाटत नाही.

काही प्राथमिक स्वरूपाच्या अभिक्रियांवर प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक पाहणे आवश्यक आहे.

विज्ञानाच्या इतर घटकांच्या तुलनेत या विषयामध्ये एक शिस्तबद्धता आहे. या विषयावर साधारणपणे ३ ते ४ प्रश्न विचारले जातात आणि तेही वर मांडलेल्या मुद्दय़ांवरच! त्यामुळे मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिकांमध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत त्यासंबंधी अधिक माहितीचा समावेश आपल्या नोट्समध्ये करायला हवा.

रसायनशास्त्राच्या प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण केल्यास अवघड प्रश्न सोडवायला एलिमिनेशन पद्धत उपयोगी ठरते हे दिसून येते. उत्तर माहीत नसेल आणि बहुविधानी प्रश्नांमध्ये किमान दोन चुकीची उत्तरे बाद करता आली तर योग्य उत्तर कॉमन सेन्सने देणे शक्य होऊ शकते हे लक्षात ठेवावे.

भौतिकशास्त्र

मागील प्रश्नपत्रिकांचे एकत्रितपणे बारकाईने विश्लेषण केले तर लक्षात येते की, भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारित असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणितेसुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्या उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो.

बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापनपद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्दय़ांच्या स्वरूपात पुरेशा ठरतात. त्यामुळे सर्व मिळून एक ते दोन पानांमध्ये मावतील इतक्या काढल्या तरी चांगली तयारी होते.

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित असे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुद्दय़ांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे.

सर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठय़ा घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.

गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.

भौतिकशास्त्राच्या तयारीसाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाचा जुनी तसेच नवीन (नवीन पुस्तके अधिक उपयुक्त) पुस्तके वाचणे आवश्यक आहे तसेच सोबत (ल्युसेंटचे) General Science हे पुस्तक वाचल्यास त्याचा अधिक फायदा होईल.

विज्ञान विषयाच्या संज्ञा व संकल्पना यांची ओळख असलेल्या उमेदवारांसाठी आणि ज्यांची या घटकाशी फारशी दोस्ती नाही त्यांच्यासाठीही आणखी एक गोष्ट करणे आवश्यक आहे. अभ्यास, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वाचन, आकलन, नोट्स, उजळणी हे टप्पे तर हवेतच, पण त्याचसोबत जुने आणि नवे दोन्ही प्रश्न सोडवायचा सराव अतिशय गरजेचा आहे. किंबहुना प्रश्न सोडवण्यातूनच या घटकाची उजळणी केली तर ती अधिक फायद्याची ठरेल.

भारताची ‘मिसाईल पॉवर’ 

missile power of india

2610   30-Dec-2018, Sun

भारताची ‘मिसाईल पॉवर’ 

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते.

बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला.

पृथ्वी-1 :-

 1. सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय.
 2. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती.
 3. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.


अग्नि-1 :- 

 1. अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र.
 2. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले.
 3. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.


आकाश:-

 1. जमिनीवर आकाशात मारा करणार्या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते.
 2. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो.
 3. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली.
 4. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.


नाग:-

 1. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय.
 2. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे.
 3. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे.
 4. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.


त्रिशूल:-

 1. जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते.
 2. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.याची क्षमता 9 कि.मी.


अग्नि 2:-

 1. एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली.
 2. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे.
 3. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.
   

पृथ्वी 3:-

 1. नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते.
 2. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.


ब्राह्मोस:-

 1. भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे.
 2. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली.
 3. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे.
 4. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे.
 5. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

 

सागरिका:-

 1. समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते.
 2. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली.
 3. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.


धनुष:-

 1. पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्यासाठी हे खास तयार करण्यात आले.
 2. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

 

अग्नि-3:-

 1. अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे.
 2. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.

 

अग्नि-4:-

 1. पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.

 

अग्नि-5:-

 1. भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.

 

निर्भया:-

 1. जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.


प्रहार:-

 1. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली.
 2. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

पाणी आणि अर्थव्यवस्था

article-about-water-and-economy

5207   28-Dec-2018, Fri

केनियामध्ये २६-२८ नोव्हेंबरदरम्यान शाश्वत ब्लू इकॉनॉमीवर पहिली जागतिक परिषद पार पडली. शाश्वत विकास उद्दिष्टांपकी चौदावे उद्दिष्ट पूर्ण करणे, संयुक्त राष्ट्र सागरी परिषद, २०१७ आणि जागतिक हवामान परिषदेच्या पॅरिस कराराची अंमलबजावणी यासाठी कार्य योजना तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम या बाबी लक्षात घेता ही परिषद, तिच्यामध्ये झालेली चर्चा व निघालेले निष्कर्ष परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

परिषदेचे मुख्य हेतू

 1.      रोजगार निर्मिती, भूक व गरिबी निर्मूलन करणे यासाठी ब्लू इकॉनॉमीच्या क्षमतांचा पुरेपूर वापर कशा प्रकारे करता येईल त्याबाबत उपाययोजनांचा विचार करणे.
 2.      आरोग्यपूर्ण जलस्रोत आणि आíथक विकास एकमेकांवर अवलंबून आहेत ते दर्शवून देणे.
 3.      सद्य:स्थितीमध्ये शक्य असलेल्या व व्यवहार्य उपाययोजनांबाबत प्रतिबद्धता निश्चित करणे.
 4.      ब्लू इकॉनॉमीशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणणे.

परिषदेमध्ये सहभागी १९१ देशांपकी काहींनी वेगवेगळ्या क्षेत्रांतील आपली बांधिलकी उद्दिष्टे परिषदेमध्येच जाहीर केली. यामध्ये भारताने शाश्वत सागरी पायाभूत सुविधांमध्ये योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून सागरमाला प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची बांधिलकी जाहीर केली. इतर बांधिलकी क्षेत्रे पुढीलप्रमाणे होती-

प्लास्टिक आणि कचरा व्यवस्थापन, सागरी आणि जल संसाधनांचे संरक्षण, धोरणात्मक आणि संनियंत्रण उपाय, जैवविविधता आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने उपाय, छोटी बेटे आणि लहान समुद्री देश किंवा किनारी देश यांना तांत्रिक साहाय्य, मासेमारी क्षेत्राचे संवर्धन आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रयत्न.

आनुषंगिक मुद्दे

 •      ब्लू इकॉनॉमी

पृथ्वीवरील सागरी, किनारी आणि जलीय पर्यावरणापासून होणारे फायदे आणि आíथक लाभ यांची एकत्रित व्यवस्था म्हणजे ब्लू इकॉनॉमी असे थोडक्यात म्हणता येईल. यामध्ये मासेमारी, पर्यटन, मालवाहतूक, सागरी ऊर्जा, खनिजप्राप्तीसाठी सागरी उत्खनन, कार्बन शोषून घेणारे स्रोत अशा सर्व बाबींचा समावेश होतो.

 •      शाश्वत ब्लू इकॉनॉमी

या संकल्पनेमध्ये पुढील बाबी समाविष्ट होतात सध्याच्या आणि पुढील पिढय़ांसाठी जल संसाधनांचे आíथक आणि सामाजिक लाभ शाश्वतपणे होत राहावेत या दृष्टीने त्यांचा सक्षम वापर, जलस्रोतांची जैवविविधता, उत्पादकता आणि अनुकूलता पुर्नस्थापित करणे आणि तिचे संरक्षण आणि देखभाल करणे, नवीकरणीय ऊर्जासाधनांचा वापर करणे, मूलद्रव्यांच्या नसíगक चक्रांमध्ये अडथळा न आणता नसíगक संसाधनांचा वापर करणे या मूलभूत संकल्पना आणि त्यांचे उपयोजन यामध्ये समाविष्ट आहे.

ब्लू इकॉनॉमीचे महत्त्व व संबंधित मुद्दे

 1.      देशांना मिळालेल्या सागरी, किनारी आणि इतर अंतर्गत जलस्रोतांचा परिपूर्ण वापर त्यांना करता यावा मात्र त्यातून जलीय पर्यावरण, परिसंस्था यांवर कसलाही नकारात्मक परिणाम होऊ नये व त्यांचे प्रदूषण टाळून आíथक व सामाजिक वापर करता यावा हा ब्लू इकॉनॉमी ही संकल्पना विकसित करण्यामागचा हेतू आहे. परिषदेमध्ये या संकल्पनेच्या विकासावर भर देण्यात आला. एकदा या संकल्पनेची योग्य व्याख्या निर्धारित झाली की त्याबाबतच्या नियमन आणि संनियंत्रणाचे मार्ग खुले होतील हा यामागचा विचार आहे.
 2.      शाश्वत ब्लू इकॉनॉमी ही संकल्पना जास्त नेमकी आणि जबाबदारी सांगणारी आहे असे म्हणता येईल. ब्लू इकॉनॉमी विकसित करताना नसíगक संसाधनांचे शोषण होऊ नये किंवा त्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये याची काळजी घेणे तिला शाश्वत बनवते. यामध्ये प्रवाळ भित्ती, बेटे यांचे नुकसान होऊ न देणे, नद्या तलावांमध्ये घन कचरा व प्रदूषित पाणी /सांडपाणी न टाकणे, ओढय़ांचे, नद्यांचे प्रवाह यांमध्ये अडथळे निर्माण न करणे अशा बाबीही यामध्ये समाविष्ट होतात.
 3.      अन्नसुरक्षा, पायाभूत सुविधा, पर्यावरण संरक्षण, मान्सून निर्मिती, मनोरंजन, सांस्कृतिक मूल्ये अशा वेगवेगळ्या पलूंनी सर्व प्रकारचे जलस्रोत मानवासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांचा सर्व प्रकारे वापर करताना भविष्यातील पिढय़ांसाठी त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही आजच्या काळाची जबाबदारी आहे. त्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये पुढील उद्दिष्टे समाविष्ट करण्यात आली आहेत.

शाश्वत विकास उद्दिष्टे पाण्याखालील जीवन –

 1.     सन २०२५ पर्यंत सर्व प्रकारचे सागरी प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करणे व त्यास आळा घालणे.
 2.     सन २०२० पर्यंत सर्व सागरी व किनारी परिसंस्थांचे शाश्वत व्यवस्थापन करणे.
 3.     सागरी आम्लीकरणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणे.
 4.     सन २०२० पर्यंत बेकायदेशीर, अतिरिक्त आणि अनियंत्रित मासेमारी कमी करणे तसेच जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांनुसार मासेमारीसाठीची अनुदाने बंद               करणे.
 5.      किनारी प्रदेशातील अविकसित देश आणि बेटांचे देश यांना आथिक विकासामध्ये सागरी साधनसंपत्तीचा योग्य वापर करता यावा यासाठी साहाय्य करणे.

केंद्र शासनाचे संलग्न आरोग्य सेवा

mpsc-exam-preparation-mpsc-exams-guidance-mpsc-exams-2018-

1195   26-Dec-2018, Wed

मनुष्यबळ विकास व मानवी हक्क या दोन्ही बाजूंनी आरोग्य सेवा या महत्त्वाच्या आहेत. भारतामध्ये या सेवा उपलब्ध करून देण्याबाबत विविध योजना राबविण्यात येतात. मुख्य प्रवाहातील आरोग्य व्यावसायिक, सेवा प्रदाते यांबाबत नियमनही केंद्रशासन व संबंधित स्वायत्त संस्था यांच्याकडून करण्यात येते. त्याव्यतिरिक्त आयुष मंत्रालयाकडून सर्व समांतर उपचारपद्धतींबाबतची जागृती व प्रसारासाठी त्या त्या उपचारपद्धतींचा एक राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सन २०१७ पासून सुरुवात झाली आहे. संलग्न आरोग्य सेवा विधेयकाच्या निमित्ताने भारतातील आरोग्यसेवा क्षेत्राबाबत परीक्षोपयोगी चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

भारतातील आरोग्य सेवांची मागणी आणि सेवा प्रदाते यांमध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे समांतर उपचारपद्धतींना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू झाले असले तरी याबाबतच्या नियमन आणि प्रमाणीकरणाची व्यवस्था अस्तित्वात नाही. त्या दृष्टीने केंद्र शासनाकडून संलग्न आरोग्य सेवा विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येत आहे. समांतर उपचार तसेच आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील उतर व्यावसायिक अशा संबद्ध आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचे शिक्षण व त्यांच्या सेवांचे नियमन आणि प्रमाणन करणे हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे.

विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी –

 1. संलग्न आरोग्य सेवांचे प्रमाणीकरण व त्यांना साहाय्य करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य स्तरावर परिषदांची स्थापना करण्यात येईल.
 2. विधेयकामध्ये केंद्रीय परिषद आणि राज्य परिषदेच्या रचना, कार्येआणि जबाबदारी याबाबतच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. धोरणे तयार करणे, व्यावसायिक आचारसंहिता, प्रत्यक्ष नोंदवह्यांची निर्मिती आणि देखभाल तसेच एकत्रित प्रवेश परीक्षा याबाबतची मानके विहित करण्याबाबत परिषदांचे अधिकारक्षेत्र विहित करण्यात येईल.
 3. अधिनियमाच्या उत्तीर्ण होण्याच्या ६ महिन्यांच्या आत केंद्रीय परिषद स्थापन होईपर्यंत एक अंतरिम परिषद दोन वर्षांच्या कालावधीसाठी नेमण्यात येईल.

परिषदांची रचना

 1. केंद्रीय परिषदेत ४७ सदस्य असतील, ज्यामध्ये १४ सदस्य आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध भूमिका निभावणाऱ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतील तर उर्वरित ३३ सदस्य १५ व्यावसायिक श्रेण्यांचे प्रतिनिधित्व करतील.
 2. परिषदांचे कार्य व अधिकार –
 3. या परिषदांच्या रचना, काय्रे, कार्यपद्धती यांबाबत सविस्तर नियम बनविण्याचे अधिकार केंद्र व राज्य शासन दोहोंना असणार आहे. त्याचबरोबर परिषदांचे नियमन करणे, त्यांना आवश्यकतेप्रमाणे निर्देश देणे याबाबत केंद्र शासनास अतिरिक्त अधिकार देण्यात येतील.

परिषदांचे वित्त व्यवस्थापन

 1. विविध स्रोतांकडून निधी प्राप्त करता यावा, या हेतूने या परिषदा या कॉर्पोरेट मंडळ म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.
 2. केंद्रीय आणि राज्य सरकारांनी संबंधित परिषदांना अनुदान देणे अपेक्षित आहे. मात्र राज्य शासनाने अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देण्यात असमर्थता व्यक्त केल्यास केंद्र सरकार राज्य परिषदेला प्रारंभिक काळात काही अनुदान देऊ शकेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

पाश्र्वभूमी

 1. भारतातील सध्याची आरोग्य सेवा नियमन प्रणाली डॉक्टर्स, नर्स, आशा आणि अंगणवाडी सेविका यांसारखे आरोग्य कर्मचारी अशा मर्यादित आरोग्य व्यावसायिकांचे / सेवा प्रदात्यांचे नियमन व सबलीकरण इतक्या मर्यादित मुद्यापुरती कार्यरत आहे. तथापि, सध्याच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये, अनेक संलग्न आरोग्य सेवक देखील कार्यरत आहेत. रोगनिदान करणारे व्यावसायिक, समांतर उपचारपद्धतीतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, व्यायाम प्रशिक्षक अशा व्यावसायिकांचा यामध्ये समावेश होतो. कोणत्याही नियामक व प्रमाणीकरण प्रणालीच्या अभावी त्यांचे परिणामकारक उपयोजन, नियमन आणि मुख्य म्हणजे त्यांची अधिकृत ओळख स्थापित करणे शक्य होत नाही.
 2. वास्तविक कोणत्याही आरोग्य सेवेमध्ये कुशल आणि कार्यक्षम अशा संलग्न आरोग्य सेवा प्रदात्यांमुळे उपचारांचा खर्च कमी होण्यास आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांची व्याप्ती व विस्तार वाढविण्यास लक्षणीयरीत्या हातभार लागतो हे सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञांनी मान्य केले आहे.
 3. जागतिक पातळीवर, संलग्न आरोग्य सेवा प्रदाते सामान्यत: पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून व्यवसाय सुरू करतात आणि त्यांच्या संबंधित प्रवाहामध्ये पीएच.डी. पातळीपर्यंतची पात्रता मिळवू शकतात. पण भारतीय संस्थांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अशा संलग्न / समांतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे बहुतेक वेळा मानकीकरण झालेले नसते.
 4. अशा व्यावसायिकांची पात्रता आणि योग्यता ठरविणे आणि त्यांचे अधिप्रमाणन करणे यासाठी जगभरातील बहुतेक देशांमध्ये वैधानिक परवाना किंवा नियामक संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. विशेषत: थेट रुग्णांच्या देखभालीत (जसे की फिजिओथेरेपिस्ट, पोषण विशेषज्ञ) किंवा थेट रुग्णाची देखभाल प्रभावित होते (जसे की लॅब तंत्रज्ञानशास्त्रज्ञ) अशा व्यवसायांचे नियमन या संस्था करतात.

विधेयकामुळे होणारे संभाव्य फायदे

 1. आरोग्य सेवा कर्मचारी व व्यावसायिकांचे मानकीकरण व प्रमाणीकरण शक्य झाल्यास भारतातील आरोग्य सेवेमध्ये पात्र, उच्च कुशल आणि सक्षम व्यक्तींसाठी करिअरच्या मोठय़ा संधी निर्माण होऊ शकतील.
 2. आयुषमान भारत योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पात्र मनुष्यबळाची निर्मिती यातून शक्य होईल.


Top