इतिहास

Some Fact about Indian History

4225   29-Jun-2017, Thu

१८५७ चा उठाव व नेतृत्व


•  कानपूर - नानासाहेब पेशवे 
•  लखनौ - बेगम हजरत महल
•  बरेली - खान बहादूर 
•  जगदीशपूर-कुंवर शिंह 
•  फैजाबाद - मौलवी अहमदुल्ला 
•  झांशी - राणी लक्ष्मीबाई 
•  अलाहाबाद - लियाकत आली
•  ग्वालियर - तात्या टोपे 
•  गोरखपूर -गजाधर शिंग 
•  सुलतानपूर - शहीद हसन 
•  सम्भलपुर - सुरेंद्र साई
•  हरियाना - राव तुलाराम
•  मथुरा - देवी शिंह 
•  मेरठ - कदम शिंह
•  रायपुर - नारायण शिंह

 

सेवा सदन
▪  बेहरामजी मलबारी यांनी स्थापना केली
▪  हे सदन शोषित व समाजाद्वारे बहिष्कृत महिलाच्या उत्थापनासाठी प्रयत्न करत असे.

देव समाज
▪  शिव नारायण अग्निहोत्री यांनी लाहोर मध्ये स्थापन केली
▪  उद्देश: आत्म्याची शुद्धी, गुरूच्या श्रेष्ठत्वाची स्थापना, आणि चांगले मानवीय कार्य करणे

धर्म सभा
▪  राधाकांत देव 
▪  सामाजिक व धार्मिक बाबीत पुरातन आणि रूढीवादी तत्वांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न
▪  सती प्रथेचे समर्थन

जस्टीस चळवळ
▪  या आंदोलनाची सुरवात सी.एन.मुदलियार, टी.एम नायर, पी.त्यागराज यांनी मद्रास मध्ये केली
▪  उद्देश: गैरब्राम्हण जातीचे विधिमंडळात प्रतिनिधित्व वाढवणे

आत्म सन्मान चळवळ
▪  या चळवळीची सुरवात व्ही. रामास्वामी नायकर , बालाजी नायडू यांनी केली
▪  ब्राम्हणवादास विरोध

अरविप्पुरम चळवळ :
१८८८ मध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने नारायण गुरु यांनी केरळमधील अरविप्पुरम येथे शंकराची मूर्ती स्थापित केली आणि ब्राम्हणांच्या एकाधीकाराला शह दिला. ते मागास जातीचे होते. दक्षिण भारतात झालेल्या मंदिर प्रवेश चळवळी याच आंदोलनाने प्रेरित झाल्या होत्या.

भारतीय सामाजिक परिषद
▪  संस्थापक: म.गो.रानडे, रघुनाथ राव 
▪  पहिले संमेलन: १८८७ मध्ये मद्रास येथे झाले 
▪  ही राष्टीय कॉंग्रेसची सामाजिक सुधारक शाखा होती
▪  परिषदेचा उद्देश: आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, बहुपत्नी प्रथेला विरोध.
▪  या परिषदेने 'विनंती चळवळ' राबवली ज्या अंतर्गत लोकांना बालविवाह करू नये असि विनंती करण्यात येत असे.

वहाबी चळवळ
▪  मुस्लिमांची पाश्चात्य प्रभावा विरोधीची पहिली प्रतिक्रिया
▪  उद्दिष्ट : मुसलमानांचे राज्य स्थापन करणे.
▪  वलिउल्लाह आंदोलन असेही म्हणतात  
▪  शाह वलिउल्लाह यांनी सुरवातीला नेतृत्व केले 
▪  नंतर शाह अब्दुल अजीज , सय्यद अहमद बरेलवी
▪  सुरवातीला हे आंदोलन शीख सरकारच्या विरुद्ध होते नंतर पंजाब ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली आल्यानंतर ते ब्रिटीश विरोधी झाले 
▪  सय्यद अहमद यांचा गट जहाल होता. त्यांचे केंद्र पटना येथे होते

ब्रिटिशांचे जमीन महसुल धोरण 


•  बोली पद्धत – वारन हेस्टिंग 
•  मौजेवारी - लॉर्ड एलफिस्टन 
•  कायमधारा - लॉर्ड कॉर्नवालीस  
•  रयतवारी- थोमस मनरो, कॅप्टन रीड 
•  महालवारी- मार्टिन बर्ड , होल्ट माकेंझी

भारताची सर्वात पहिली महिला

First Indian Women

6290   27-Jun-2017, Tue

 1.  भारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडर/तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख - श्रीमती प्रतिभाताई पाटील
 2. भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका - आशापूर्णा देवी
 3. भारतातील प्रथम महिला भारतरत्न - इंदिरा गांधी
 4. भारतातील प्रथम महिला राज्यपाल - सरोजीनी नायडू
 5. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर) - मीरा कुमार
 6. भारताची पहिली महिला स्पीकर (विधानसभा) - सुशीला नायर
 7. राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा  - सरोजीनी नायडू
 8. भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला - आरती शहा
 9. भारतातील प्रथम महिला पंतप्रधान - इंदिरा गांधी
 10. एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला - बचेंद्री पाल
 11. भारतातील प्रथम महिला बॅरिस्टर कार्नलिया - सोराबजी
 12. भारतातील प्रथम महिला कुलपती - सरोजीनी नायडू
 13. भरतातील पहिली भारतीय डॉक्टर - डॉ. कादम्बनी गांगुली
 14. भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत - सी.बी. मुथाम्मा
 15. भारतातील प्रथम महिला महापौर - अरुणा आसफ
 16. अली भारतातील प्रथम महिला आय.ए.एस. - अन्ना राजम जॉर्ज
 17. भारतातील प्रथम महिला राजदुत - विजयालक्ष्मी पंडित
 18. भारतातील प्रथम महिला आय.पी.एस. - किरण बेदी
 19. भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी
 20. भारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा - अॅनी बेझंट
 21. भारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिला - देवीकाराणी
 22. जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला - उज्वला रॉय
 23. सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश - न्या.फातीमाबिबी
 24. भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री - देवीकाराणी
 25. भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी
 26. युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा - विजयालक्ष्मी पंडित
 27. भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला - मदर तेरेसा
 28. भारतातील पहिली महिला अंतरराळवीर - कल्पना चावला
 29. पहिली भारतीय महिला क्रांतिकारक - मॅडम भिकाजी कामा
 30. पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल - पद्मावती बंडोपाध्याय
 31. एम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिला - चंद्रमुखी बोस
 32. योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष - इंदिरा गांधी
 33. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला - राजकुमारी अमृतकौर
 34. युनोमध्ये नागरी पोलिस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला - किरण बेदी
 35. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारी पहिली भारतीय महिला - न्या. लैला शेठ
 36. दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती - रझिया सुलताना
 37. अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधीगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला - स्वाति दांडेकर (आयोवा राज्य अमेरिका)
 38. विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला - सुष्मिता सेन
 39. जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला - रिटा फॅरिया
 40. भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव - चोकीला अय्यर
 41. पॅराशूट जंप (उडी) झेप घेणारी पहिली भारतीय महिला - गीता चंद्र
 42. पहिली महिला वैमानिक - प्रेम माथूर
 43. एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला - गीता चंद्र
 44. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर - एस. विजयालक्ष्मी
 45. रॅमन मॅगसेस पारितोषिक मिळवणारी पहिली महिला - कमलादेवी चट्टोपाध्याय
 46. भारताच्या 13 लाख जवान असलेल्या संरक्षण दलात पहिली महिला जवान - शांती टिग्गा (सप्टेंबर 2011)
 47. भारतातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिला - मदर तेरेसा
 48. भारताच्या अग्निशामक दलातील पहिली महिला अधिकारी - हर्षींनी कानेकर
 49. पाचही खंड पोहून जाणारी पहिली महिला - बुला चौधरी
 50. भारतातील एखाधा राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालक - कांचन चौधरी (भट्टाचार्य) (उत्तरांचल प्रदेश)
 51. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार्या पहिल्या भारतीय महिला - कॅ. लक्ष्मी सहगल
 52. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा - कुसुमावती देशपांडे
 53. बूकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला - अरुंधती रॉय
 54. ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिला - सायना नेहवाल
 55. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला - अमृता प्रीतम

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास

mpsc exam

1767   14-May-2017, Sun

स्वातंत्र्योतर भारताचा अभ्यास करताना अंतर्गत राजकारण व व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय भूमिका असे दोन भाग करून अभ्यास करावा.

अंतर्गत राजकारण व व्यवस्था

फाळणीचे कारण, स्वरूप, परिणाम व करण्यात आलेले उपाय असे मुद्दे पाहावेत. संस्थानांचे विलीनीकरण त्याचा क्रम, जुनागढ, हैद्राबाद संस्थाने तसेच गोवामुक्ती या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

भाषावर प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व त्यांच्या शिफारशी, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारशी बारकाईने अभ्यासायला हव्यात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास त्यात सहभागी झालेले महत्त्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती, त्यांच्या भूमिका, ठळक घडामोडी या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

राज्यघटनेची निर्मिती, त्यासाठीचे  ब्रिटिश कायदे व इतर देशांतील कायद्यांचे संदर्भ यांचा आढावा पेपर २ मध्ये समाविष्ट असला तरी इथेही महत्त्वाचा आहे.

अंतर्गत मुद्दय़ांमध्ये आíथक व वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल व राजकीय घडामोडी समांतरपणे अभ्यासाव्यात. कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, राज्यांतील आघाडीची सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी या सगळ्या घटकांचा अभ्यास एकमेकांशी जोडून परस्परसंबंध समजून घेऊन करायला हवा.

पहिल्या सहा पंचवार्षकि योजनांचा संदर्भ पंजाब व आसाममधील दहशतवाद, नक्षलवाद व माओवाद यांचा अभ्यास करताना घेणे आवश्यक आहे. पर्यावरण, महिला व वंशिक चळवळींचा अभ्यास ४०च्या दशकापासून पुढे करायला हवा.

अंतर्गत व्यवस्थेच्या अभ्यासामध्येच नेहरू, शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील आंतरराष्ट्रीय भूमिकांचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय भूमिका

नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण, शेजारील राष्ट्राशी संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, बांगलादेशाची मुक्ती, इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्ततावादाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असला तरी त्यानंतरच्या पंतप्रधानांची ठळक ऐतिहासिक कारकीर्द, जागतिकीकरणाची सुरुवात या बाबींचा आढावा घेणेही आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करताना त्याची आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी, नेमके स्वरूप, ठळक वैशिष्टय़े, त्यामध्ये कालंतराने झालेले बदल व त्यांची कारणे; धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यांचा अभ्यास करायला हवा. याबाबतचे तज्ज्ञांचे मूल्यमापन समजून घ्यायला हवे.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा अभ्यासताना महाराष्टातील लोककला, शास्त्रीय संगीत, चित्रपट, दृष्यकला व वाङ्मय अशा पाच मुख्य विभागांतून सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करावा.

दृश्यकलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करावा. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ, त्यांचे स्वरूप (वापरलेले तंत्रज्ञान, आकार इ.) हे मुद्दे प्राचीन कलांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत. मध्ययुगीन दृश्यकलांसाठीही हे मुद्दे पायाभूत आहेत. मात्र त्यामध्ये समकालीन इतर कलाकृतींचा तुलनात्मक आढावा घेणे महत्त्वाचे आहे.

वाङ्मय / साहित्याच्या अभ्यासक्रमात उल्लेख केलेल्या साहित्य प्रकाराची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व तसेच वेगवेगळ्या वाङ्मय कालखंडांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्रायोगिक कलांपकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे धार्मिक पलू, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, विशिष्ट भौगिलिक स्थान, महत्त्वाचे प्रसिद्ध कलाकार व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये व त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे पाहावेत. इतर प्रायोगिक कलांसाठी वैशिष्टय़े, महत्त्वाचे कलाकार, विकासाचे प्रमुख टप्पे या बाबी महत्त्वाच्या आहेत.

महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील महत्त्वाचे उत्सव स्वरूप, त्यांचे धार्मिक पलू, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, त्यांचे विशिष्ट भौगिलिक स्थान व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासायला हवेत. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील महत्त्वाचे नृत्यप्रकार, क्रीडा प्रकार, विशिष्ट कला यांचा आढावाही त्यांचे विशिष्ट भौगिलिक स्थान, महत्त्वाचे प्रसिद्ध कलाकार व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७)

mpsc gs 1

4992   14-May-2017, Sun

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना पुढील काही मुद्दय़ांचा समावेश असावा.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर -१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून टेबल स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल.

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना पुढील काही मुद्दय़ांचा समावेश असावा. आधुनिक शिक्षणाची ओळख, वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना त्यांच्या विकासाचे टप्पे, संबंधित राज्यकत्रे यांचा समावेश असावा. या मुद्दय़ांची भूमिका, त्यांचे १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये काय महत्त्व होते याचा अभ्यास करावा.

सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी उदा. – ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृशता निर्मूलनासाठी चळवळी इ. चा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, म.गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, विनायक दामोदर सावरकर, अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील, लहूजी साळवे व कर्मवीर भाऊराव पाटील आदींचे विचार व कार्य याचा अभ्यास करताना थोडे नियोजन आवश्यक आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्र, त्यांचे साहित्य, काय्रे, खास वक्तव्ये, असल्यास वाद आणि इतर माहिती याचा अभ्यास टेबल करून करता येईल.

सामाजिक व आर्थिक जागृती तसेच भारतीय राष्ट्रवादीची निर्मिती व विकासाचा अभ्यास करताना १८५७चा उठाव आणि त्यानंतर असे कालखंड करता येतील. राष्ट्रीय संघटनांची स्थापना व त्यामागची सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमी समजून घ्यावी. शेतकऱ्यांचे उठाव, आदिवासींचे बंड, क्रांतिकारी संघटना/घटना, आझाद हिंद सेनेची स्थापना व काय्रे यांची कारणे, स्वरूप / वैशिष्टय़े, प्रमुख नेते, ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, त्यांच्याबाबतच्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करायला हवा.

इंडियन नॅशनल काँग्रेसचा अभ्यास करताना काँग्रेसची स्थापना, मवाळ व जहाल गटाची वाढ, दोन्हींच्या मागण्या, कार्यपद्धती, यशापयश, महत्त्वाचे नेते, मोर्ल- मिंटो सुधारणा, स्वराज्याची चळवळ, लखनौ करार, मॉट  फोर्ड सुधारणा इ. अभ्यासावे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, त्यांचे साल, अध्यक्ष, ठराव, ठिकाण पाहायला हवे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ अभ्यासताना गांधीजीचे नेतृत्व, त्यांचे प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोक चळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अस्पृशता निर्मूलन, डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन अभ्यासावा. मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र चळवळीचा अभ्यास करताना सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, मो. इक्बाल, मोहंमद अलि जीना असा फोकस आवश्यक आहे. संयुक्त पक्ष युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्यवादी चळवळ, काँग्रेस समाजवादी पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग,

संस्थानातील जनतेची चळवळ, साम्यवादी (डावी) चळवळ, शेतमजुरांची चळवळ, आदिवासींचे बंड, ट्रेड युनियन चळवळ व आदिवासी चळवळ आदी गोष्टी अभ्यासताना कारणे, परिणाम, स्वरूप, यशापयश, स्वातंत्र्य चळवळीतील वाटा इ. मुद्दे पाहावेत. मुस्लीम लीग व हिंदू महासभा यांचे राजकारण हे मुद्दे स्वातंत्र चळवळीतील प्रवाह म्हणून अभ्यासावेत.

फारूक नाईकवाडे


Top