मानवी भूगोल

HUMAN GEO MPSC CURRENT

3073   02-Sep-2017, Sat

आजच्या लेखामध्ये आपण ‘मानवी भूगोल’ या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल या घटकांची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी याची महत्त्वाची माहिती घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने या विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयामधील घटकाची माहिती असणे महत्त्वाचे असते. गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर विचारण्यात आलेले आहेत याची माहिती मिळते.

पहिल्या लेखामध्ये आपण मानवी भूगोलामधील समाविष्ट असणाऱ्या घटकांचा तसेच या घटकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो याची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेखामध्ये या घटकाचे परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन कशा प्रकारे करावे, याचबरोबर या घटकावर गेल्या चार मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०१६) कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करून सखोल चर्चा करणार आहोत.

मानवी भूगोल या घटकावर २०१३मध्ये तीन, २०१४ मध्ये पाच, २०१५ मध्ये सहा आणि २०१६ मध्ये पाच प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील बहुतांश प्रश्न हे आर्थिक भूगोल या घटकाशी संबंधित होते.

२०१३ मध्ये ‘भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठीच्या घटकांचे विश्लेषण करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे.  भारताची प्राकृतिक रचना आणि भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांतील पोषक वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादीविषयी मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. या घटकामुळे भारतातील सुती उद्योग कशा पद्धतीने विकेंद्रित झालेला आहे . 

२०१४ मध्ये ‘नैसर्गिक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वतचे स्थान कशा प्रकारे पाहतो?’ हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचा कल हा भारताच्या आफ्रिकेविषयी एकत्रित आखल्या गेलेल्या धोरणाचा भाग आहे.  येथे भारताने आफ्रिका खंडामधील विविध देशांसोबत भारताने स्थापन केलेले संबंध, त्यातून होणारा भारताचा फायदा या मुद्दय़ांसोबतच आफ्रिका खंड हा नैसर्गिक संसाधनाने समृद्ध असलेला खंड आहे इत्यादी महत्त्वाच्या पलूंचा एकत्रित विचार करून आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वतचे स्थान कशा प्रकारे पाहतो याची चर्चा करणे महत्त्वाचे होते.

२०१५मध्ये ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत. या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न भारत सरकारने आखलेल्या स्मार्ट शहरे धोरणाशी संबंधित आहे. हा प्रश्न भारतातील नागरीकरण आणि ग्रामीण विकास या प्रक्रियेला आधारभूत मानून विचारण्यात आलेला होता.

या प्रश्नांची योग्य उकल होण्यासाठी स्मार्ट शहरे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि स्मार्ट शहरे ही नेमकी कशी असणार आहेत, याचा संबंध ग्रामीण भारतातील खेडय़ासोबत कशा प्रकारे येणार आहे हे जाणून घेतलं पाहिजे. जर स्मार्ट शहरे ही शाश्वत करावयाची आहेत तर यासाठी स्मार्ट खेडय़ाची आवश्यकता का गरजेची आहे?  तसेच भारतातील खेडी स्मार्ट बनविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? आणि यामुळे ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे हा या प्रश्नाचा मुख्य रोख होता. त्याआधारेच लिहिलेले उत्तर अपेक्षित होते.

२०१६ मध्ये ‘सिंधू नदी पाणी करार (Indus Water Treaty) याची माहिती द्या आणि बदलत्या द्विपक्षीय संबंधांच्या पाश्र्वभूमीवर याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि राजकीय परिणामाचे परीक्षण करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे सरळ दोन भाग पडतात – यातील पहिला भाग सिंधू नदी पाणी करार व यातील तरतुदी याची माहिती आणि दुसरा भाग सद्यस्थितीमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध. हा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे.

येथे प्रामुख्याने सिंधू नदीशी संबंधित प्राकृतिक माहिती आणि या दोन देशांमधील संबंध या दोन्हीची सांगड घालून जर हा करार मोडीत निघाला अथवा यामध्ये काही एकतर्फी बदल केले गेले तर याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात, तसेच हा प्रश्न भूगोल या घटकाशी संबंधित असल्यामुळे येथे पर्यावरणीय परिणामाची चर्चा अधिक करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचे आकलन करून उत्तर लिहिणे क्रमप्राप्त होते.

याव्यतिरिक्त भारतातील साखर उद्योग, आण्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी भारतामध्ये आणि जगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता, पूर्व भारतातील हरितक्रांती, जगामधील लोखंड आणि पोलाद उद्योगामधील स्थानिक प्रारूपातील बदल, भारतामधील अंतर्गत जल वाहतूक, भारतातील पाणलोट विकास इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. या घटकाशी संबंधित बहुतांश प्रश्न हे भारताच्या आर्थिक भूगोलशी संबंधित आहेत, तसेच काही प्रश्न ‘भारत व जगाचा मानवी भूगोल’ यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.

एकूणच विद्यार्थ्यांला या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना, यासंबंधीच्या चालू घडामोडी इत्यादीची योग्य माहिती असायला हवी. या विषयाच्या सर्व घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. त्यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Human Geography (XII), Indian People and Economy. (XII), या क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो, ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकते आणि या विषयाची सर्वकष तयारी करण्यासाठी  Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), India-Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) यासारख्या संदर्भग्रंथाचा आधार घेता येऊ शकतो. तसेच या विषयाशी संबंधित चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी आघाडीचे इंग्रजी वर्तमानपत्र उदा. द हिंदू आणि योजना व कुरुक्षेत्र यांसारख्या मासिकांमधील लेखांचा अभ्यास करावा लागतो. या पुढील लेखामध्ये भूगोल विषयाचा इतर पेपरमधील अभ्यासक्रमासोबत येणाऱ्या संबंधाविषयी चर्चा करणार आहोत.

पर्यटन ही बाब पेपर १-भूगोल घटक

MPSC GEO TOURISM PAPER 1

1334   02-Sep-2017, Sat

पर्यटन ही बाब पेपर १-भूगोल घटक तसेच पेपर ४-अर्थव्यवस्था घटक या दोन्हीचा भाग आहे. त्यामुळे पेपर १ किंवा ४

यापकी कुठेही या घटकावरील प्रश्नांची अपेक्षा करता येईल. आर्थिक भूगोलाचा भाग म्हणून पारंपरिक पर्यटनस्थळांचा त्यांचे भौगोलिक स्थान, वैशिष्टय़े, ऐतिहासिक / पर्यावरणीय महत्त्व अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल फॉरमॅटमध्ये अभ्यास करण्याबाबत यापूर्वी चर्चा केली आहे.

या क्षेत्रातील चालू घडामोडींबाबत पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यादृष्टीने नव्या तसेच नावीन्यपूर्ण पर्यटन संकल्पना आणि नव्याने विकसित करण्यात येत असलेली पर्यटनस्थळे याबाबत या पुढील लेखामध्ये माहिती देण्यात येत आहे.

महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना सन १९५६ मध्ये करण्यात आली. महामंडळाक डून तसेच अन्य खासगी पर्यटन कंपन्यांकडून विकसित नवीन पर्यटन समकल्पना/ स्थळे पुढीलप्रमाणे;

* विविध महोत्सव

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यातील वारसास्थळे तसेच पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात. आपल्या उच्च सांस्कृतिक परंपरा व अभिजात कलांचे दर्शन, महाराष्ट्रात येणारे देशी-विदेशी पर्यटक व कलाप्रेमीना घडावे तसेच या ठिकाणांचा पर्यटनदृष्टय़ा विकास व प्रसार व्हावा हा यामागील उद्देश आहे.

महाराष्ट्रातील लघुउद्योग ( गाव - लघुउद्योग )

Industries in Maharashtra

1179   22-Aug-2017, Tue

सोलापूर - चादरी

 नागपूर - सूती व रेशमी साड्या

 येवले (नाशिक) - पीतांबर व पैठण्या

 इचलकरंजी - साड्या व लुगडी

 अहमदनगर - सुती व रेशमी साड्या

 भिवंडी - हातमाग उद्योग

 एकोडी (भंडारा) - कोशा रेशीम

 सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लाकडी खेळणी

 पैठण (औरंगाबाद) - पैठण्या व हिमरूशाली

 साबळी व नागभीड (चंद्रपूर) - रेशिम कापड

 वसई(ठाणे) - सुकेळी

 मालेगाव (नाशिक),  इंचलकरंजी (कोल्हापूर) - हातमाग उद्योग

 गोंदिया, सिन्नर, कामठी - बीडया तयार करणे

भारत व जग

India and world

1835   10-Dec-2017, Sun

आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकामध्ये अंतर्भूत ‘भारत व शेजारील देश’ यामधील संबंधांचा ऊहापोह केला. प्रस्तुत लेखांमध्ये भारताचे अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी महासत्तांशी असणारे द्विपक्षीय संबंध तसेच लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्य आशिया, पश्चिम आशिया, आग्नेय आशियायी देशांबरोबरचे संबंध व सार्क, इब्सा (कइरअ), ब्रिक्स (BRICS), असियान, युरोपियन युनियन इ. प्रादेशिक गट आणि यूनो, G-20,  जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना आदी जागतिक गट यामधील संबंधांचा आढावा घेऊ या.

भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा विचार करता संबंधित देश, प्रादेशिक व जागतिक गटांचे भारतासाठी महत्त्व, हे देश आर्थिक, लष्करी किंवा अणुशक्तींच्या दृष्टीने सामर्थ्यशाली आहेत का? यातील काही देशांचे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा उपयुक्त आहे का? याबरोबर व्यापार, परदेशी गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, परदेशस्थ भारतीयांची उपस्थिती व अंतिमत: भारताच्या स्वातंत्र्यापासूनच्या कालखंडांचा विचार करता भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये संबंधित देश, प्रादेशिक व जागतिक गटाचे स्थान, भारताच्या औद्योगिक, सरंक्षण आणि विज्ञान क्षेत्रांच्या विकासातील संबंधित देशाचे योगदान, विविध देशांशी भारताने केलेले करार, व भूतकाळामध्ये काही देशांबरोबर झालेले सघंर्ष व त्यांचा परिणाम आदी बाबी विचारार्थ घ्याव्यात.

भारताच्या इतर देशांशी विशेषत: महासत्तांशी असणाऱ्या संबंधांचे अध्ययन करताना दोन्ही देशांमधील लोकशाही, बहुलवादीसमाज, विकास, दोन्ही देश सामोरे जात असलेल्या समान समस्या अशी एककेंद्राभिमुखता (Convergence), सीमावाद, संसाधनांचे वाटप, बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार विवाद, पर्यावरणीय वाटाघाटी यांसारखे विवादास्पद (Confrontation) मुद्दे, दहशतवाद, अमली पदार्थाची तस्करी, प्रदूषण, पर्यावरणीय व जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटींमध्ये समान भूमिका, व्यापाराचा विकास, जागतिक शांतता व स्थर्य आदी सहकार्यात्मक (Co-Operation) क्षेत्रांना ओळखल्यास या घटकाची तयारी पद्धतशीरपणे करता येते.

हा घटक अधिक विस्तृत असल्याने भारताचे अमेरिका, रशिया; असियान (अरएअठ) हा प्रादेशिक गट व आफ्रिका, आग्नेय आशिया पश्चिम आशिया, या प्रदेशांशी असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेऊ या. भारत – अमेरिका द्विपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत, याचे प्रतििबब मोदी आणि ओबामा यांच्या परस्पर देशांतील दौऱ्यामध्ये पडल्याचे दिसते. दोन्ही नेत्यांमध्ये वॉिशग्टन आणि नवी दिल्ली येथे झालेल्या दोन शिखर परिषदांमध्ये नागरी ऊर्जा सहकार्यासह विविध क्षेत्रांतील दोन करांरावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांमध्ये दोन देशांतील हितसंबंधांमध्ये एककेंद्राभिमुखता (Convergence) वाढत असल्याचे दिसते. शिवाय अमेरिकेच्या पुर्नसतुलन धोरणांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणून भारताचे असलेले महत्त्वही अधोरेखित होते. तरीही बौद्घिक संपदा अधिकार, व्यापार सुलभता करार (TFA), यूएनएफसीसीसीमध्ये दोन्ही देशांच्या भूमिकांतील अंतर तसेच अलीकडचा देवयानी खोब्रागडे मुद्दा. इ. बाबींमध्ये दोन्ही देशातील संबंधांमध्ये तणाव दिसून आला.

भारत – रशिया संबंध भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. हे संबंध काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहेत. भारत आणि रशिया यातील धोरणात्मक भागीदारी ही परंपरेनेच राजकारण, संरक्षण, नागरी अणुऊर्जा, दहशतवादविरोधी सहकार्य आणि अंतरिक्ष विज्ञान या पंचसूत्रीवर आधारित असल्याचे दिसून येते. तसेच यूनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व प्राप्त होण्याबाबत रशियाने भारताला पािठबा दिला आहे.

असे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अमेरिका, फ्रान्स आणि इस्रायल या देशांबरोबर केलेल्या प्रचंड रकमेच्या संरक्षणविषयक खरेदी करारांबाबत रशिया नाराज आहे. तसेच भारताचा दीर्घकालीन व निकटचा मित्र असूनही रशियाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे विकण्यासंदर्भातील संरक्षण करार केल्याने भारत आणि रशिया यादरम्यानचे संबंध तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे.

भारताचे पश्चिम आशियायी देशांशी असणारे संबंध व्यावहारिक (Pragmatic) दिसून येतात. उदा. भारताचे इस्रायल व पॅलेस्टाइन व सौदी अरेबिया व इराण यांच्यासोबतचे संबंध व्यावहारिकता दर्शवतात. भारताला ऊर्जेची नितांत आवश्यकता आहे.  पश्चिम आशियायी राष्ट्रे मुख्यत: तेल आणि वायूचा पुरवठा करणारी राष्ट्रे असून, ती अर्थव्यवस्थेला साहाय्यभूत ठरू शकतात. भारताने या प्रदेशाशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पश्चिमेकडे पाहा (Look West Policy) या धोरणाची आखणी केली आहे. मोदी यांनी अलीकडे केलेला संयुक्त अरब अमिराती दौरा ‘लुक वेस्ट’ धोरणाचा प्रारंभ मानला जातो.

भारत व १० राष्ट्रांचा समावेश असलेल्या आसियान संघटनेबरोबर गेल्या २० वर्षांपासून संवाद आणि शिखर परिषद भागीदारी निर्माण झाल्याचे तर दोन वर्षांपासून धोरणात्मक भागीदारी निर्माण झाल्याचे आढळते. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या भारत-आसियान शिखर परिषदेमध्ये गेल्या २० वर्षांदरम्यान दोन्ही बाजूंनी आकाराला आलेल्या राजकीय आणि आर्थिक सहकार्याचे दर्शन झाले. भारत-आसियान या दरम्यानच्या सहकार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो-व्यापार आणि गुंतवणूकविषयक करार, दहशतवादविरोध, क्षमता उभारणी, सागरी सुरक्षा. भारताच्या ‘लुक ईस्ट’ धोरणामध्ये ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ वर भर दिल्याने आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या नेत्यांनी स्वागत केले.

हा घटक चालू घडामोडींवर आधारित आहेत. याकरिता पंतप्रधानांचे विदेश दौरे, यामध्ये झालेले करार, शिखर परिषदा इ. बाबींचा नियमित मागोवा घेणे उचित ठरेल.

या घटकांच्या तयारीकरिता परराष्ट्र मंत्रालय, व कऊरअचे संकेतस्थळ, ‘द हिंदू’, इंडियन एक्स्प्रेस, वर्ल्ड फोकस नियतकालिक उपयुक्त ठरते.

परिवहन विकासासाठी धोरणे आणि निर्णय

Road Development programmes

3474   09-Dec-2017, Sat

सार्वजनिक हिताचे प्रकल्प उभारण्यासाठी राज्यात स्विस चॅलेंज पद्धत -राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे गतीने होण्यासह नावीन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर व्हावेत यासाठी स्विस चॅलेंज पद्धतीने कामे हाती घेण्याविषयीचे धोरण राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक परिवहन, नागरी सुविधा आणि कृषी क्षेत्रातील सार्वजनिक हिताचे विविध प्रकल्प उभारण्यास मदत होणार आहे. खासगी व सार्वजनिक सहभागातून करायच्या प्रकल्पांसाठी ही स्विस चॅलेंज पद्धत राबविण्यात येणार आहे.

राज्यात या पद्धतीअंतर्गत परिवहन क्षेत्रातील किमान २०० कोटी, नागरी क्षेत्रातील किमान ५० कोटी आणि कृषी क्षेत्रातील किमान २५ कोटी रुपये किमतीचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.

स्पर्धात्मक पद्धतीने निविदा प्राप्त झाल्यानंतर मूळ सूचकाने सादर केलेला प्रस्ताव हा अन्य उद्योजकाच्या कमी दराच्या किंवा किफायतशीर प्रस्तावाच्या अंतिम निविदा किमतीच्या कमाल १० टक्क्यांपर्यंत अधिक असेल तरच मूळ सूचकास कमी दराच्या अथवा किफायतशीर प्रस्तावास मॅच करण्याची संधी देण्यात येणार आहे.

मूळ सूचक यांनी मूळ प्रस्ताव अन्य उद्योजकाप्रमाणे करून दिल्यास त्यांना प्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.

अन्यथा हा प्रकल्प राबविण्याची परवानगी न्यूनतम दराची निविदा सादर करणाऱ्या संस्थेस देण्यात येईल.

स्विस चॅलेंज पद्धतीने यशस्वीरीत्या राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या सूचकास सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाची (स्विकृत प्रकल्प किमतीच्या कमाल ०.१ टक्क्यांपर्यंत) भरपाई देण्यात येणार आहे. ही भरपाई प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिलेल्या उद्योजकाकडून मिळालेल्या रकमेतून करण्यात येईल.

कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार शासनास राहाणार आहे.

स्विस चॅलेंज कार्यपद्धती

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विस चॅलेंज पद्धती (SCM) ही एक नव्याने उदयास आलेली निविदा प्रक्रिया आहे. या पद्धतीमध्ये खासगी व्यक्ती किंवा संस्था स्वत:हून (Su Moto) सार्वजनिक हितासाठी आवश्यक असलेली नावीन्यपूर्ण कामे निवडतात. अशा कामाची अंमलबजावणी करण्याबाबत स्वत: पुढाकार घेऊन शासनास प्रस्ताव सादर करतात. त्यानंतर शासनाकडून त्या कामासाठी निविदा

प्रक्रिया हाती घेण्यात येऊन अन्य पात्र कंत्राटदारांकडून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा मागविण्यात येतात. या प्रक्रियेत निविदेत सहभागी झालेल्या अन्य उद्योजकांकडून जर मूळ सूचकाच्या प्रस्तावापेक्षा अधिक नावीन्यपूर्ण आणि किफायतशीर प्रस्ताव शासनास सादर झाला तर मूळ सूचकास स्पर्धात्मक निविदेमधून प्राप्त प्रस्तावानुसार त्याचा प्रस्ताव मॅच (मिळताजुळता) करण्याची संधी देण्यात येते.

स्विस चॅलेंज पद्धत ही अनेक देशांत व्यापक प्रमाणात वापरण्यात येते. भारतातदेखील केंद्र शासनाबरोबरच काही राज्यांनी स्विस चॅलेंज पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करून तिचा अवलंब केला आहे. देशात सध्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश व राज्यस्थान आदी राज्यांमध्ये काही वैशिष्टय़पूर्ण कामांसाठी या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

हायब्रीड अ‍ॅन्युईटी रस्ते सुधारणा प्रकल्प

राज्यात राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांचे तीन लाख कि.मी. लांबीचे जाळे आहे. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती केंद्र सरकारकडून केली जाते तर इतर मार्गाची दुरुस्ती राज्य शासनाकडून केली जाते. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जाते.

मात्र अलीकडच्या काळात रस्तेदुरुस्ती व नूतनीकरणाची कामे अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने राज्यातील रस्त्यांचा सर्वागीण विकास करण्याच्या कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ पासून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी हायब्रीड अ‍ॅन्युईटी रस्ते सुधारणा धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणातील नव्या तरतुदींनुसार ठेकेदारास उर्वरित रक्कम देण्याचा कालावधी १५ वर्षांऐवजी १० वष्रे करण्यात आला आहे. तर शासनाचा सहभाग ४० टक्क्यांवरून ६० टक्के इतका वाढविण्यात

आला आहे. तसेच कामाची निविदा मागविताना किमान १०० कि.मी चे पॅकेजेस करून त्या मागविण्याऐवजी ते आता ५० कि.मी.चे पॅकेजेस करून मागविण्यात येणार आहेत.

भारतीय नदी (INDIAN RIVERS)

Some Information about Indian Rivers

5955   29-Jun-2017, Thu

सिन्धु नदी :-

लम्बाई: (2,880km)

उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास, झेलम, चिनाब, रावी, शिंगार, गिलगित, श्योक.

 

झेलम नदी

लम्बाई: 720km

उद्गम स्थल: शेषनाग झील,

सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,सिंध

 

चिनाब नदी

लम्बाई: 1,180km

उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

सहायक नदी: चन्द्रभागा 

 

रावी नदी

लम्बाई: 725 km

उद्गम स्थल:रोहतांग दर्रा, कांगड़ा

सहायक नदी :साहो, 

 

सतलुज नदी

लम्बाई: 1440 (1050)km

उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

सहायक नदी : व्यास, स्पिती, बस्पा 

 

व्यास नदी

लम्बाई: 470

उद्गम स्थल: रोहतांग दर्रा

सहायक नदी:तीर्थन, पार्वती,हुरला

गंगा नदी

लम्बाई :2,510 (2071)km

उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

सहायक नदी: यमुना, रामगंगा,गोमती, बागमती, गंडक, कोसी,सोन, अलकनंदा, भागीरथी, पिण्डार, मंदाकिनी.

 

यमुना नदी

लम्बाई: 1375km

उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन, टोंस, गिरी, काली, सिंध

 

रामगंगा नदी

लम्बाई: 690km

उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

सहायक नदी:खोन

 

घाघरा नदी

लम्बाई: 1,080 km

उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

सहायक नदी:हिमनद शारदा, करनली, कुवाना, राप्ती, चौकिया,

 

 

गंडक नदी

लम्बाई: 425km

उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट

सहायक नदी :काली गंडक,त्रिशूल, गंगा

 

कोसी नदी

लम्बाई: 730km

उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी (गोंसाईधाम)

सहायक नदी: इन्द्रावती, तामुर, अरुण, कोसी

 

चम्बल नदी

लम्बाई: 960 km

उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

सहायक नदी :काली सिंध, सिप्ता, पार्वती, बनास

 

बेतवा नदी

लम्बाई: 480km

उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

 

सोन नदी

लम्बाई: 770 km

उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

सहायक नदी:रिहन्द, कुनहड़

 

दामोदर नदी

लम्बाई: 600km

उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

सहायक नदी:कोनार,जामुनिया,बराकर

 

ब्रह्मपुत्र नदी

लम्बाई: 2,880km

उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

सहायक नदी: घनसिरी,कपिली,सुवनसिती,मानस, लोहित,नोवा, पद्मा,दिहांग

 

महानदी

लम्बाई: 890km

उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

सहायक नदी: सियोनाथ,हसदेव, उंग, ईब,ब्राह्मणी,वैतरणी

 

वैतरणी नदी

लम्बाई: 333km

उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

 

स्वर्ण रेखा

लम्बाई: 480km

उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार

 

गोदावरी नदी

लम्बाई: 1,450km

उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

सहायक नदी:प्राणहिता, पेनगंगा, वर्धा,वेनगंगा,इन्द्रावती, मंजीरा, पुरना

 

कृष्णा नदी

लम्बाई: 1,290km

उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

सहायक नदी: कोयना, यरला,वर्णा, पंचगंगा,दूधगंगा,घाटप्रभा,मालप्रभा,भीमा, तुंगप्रभा,मूसी

 

कावेरी नदी

लम्बाई: 760km

उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

सहायक नदी:हेमावती, लोकपावना, शिमला, भवानी,अमरावती,स्वर्णवती

नर्मदा नदी

लम्बाई: 1,312km

उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,दूधी, बर्ना

ताप्ती नदी

लम्बाई: 724km

उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

सहायक नदी: पूरणा, बेतूल, गंजल, गोमई

 

साबरमती

लम्बाई: 716km

उद्गम स्थल: जयसमंद झील (उदयपुर)

सहायक नदी:वाकल, हाथमती

लूनी नदी

उद्गम स्थल: नाग पहाड़

सहायक नदी:सुकड़ी, जनाई,बांडीमिरूडी,जोजरी

बनास नदी

उद्गम स्थल: खमनौर पहाड़ियों से

सहायक नदी :सोड्रा, मौसी,खारी

माही नदी

उद्गम स्थल: मेहद झील से

सहायक नदी:सोम, जोखम,अनास, सोरन

 

हुगली नदी

उद्गम स्थल: नवद्वीप के निकट

सहायक नदी: जलांगी

 

उत्तरी पेन्नार

लम्बाई: 570km

उद्गम स्थल: नंदी दुर्ग पहाड़ी

सहायक नदी:पाआधनी,चित्रावती,सागीलेरू

 

तुंगभद्रा नदी

उद्गम स्थल: पश्चिमी घाट में गोमन्तक चोटी

सहायक नदी:कुमुदवती, वर्धा,हगरी, हिंद, तुंगा,भद्रा

 

 

मयूसा नदी

उद्गम स्थल: आसोनोरा के निकट

सहायक नदी: मेदेई

 

 

साबरी नदी

लम्बाई: 418km

उद्गम स्थल: सुईकरम पहाड़ी

सहायक नदी:सिलेरु

 

 

इन्द्रावती नदी

लम्बाई: 531km

उद्गम स्थल :कालाहाण्डी,

सहायक नदी: नारंगी, कोटरी

 

क्षिप्रा नदी

उद्गम स्थल: काकरी बरडी पहाड़ी, इंदौर

सहायक नदी: चम्बल नदी

 

शारदा नदी

लम्बाई: 602km

उद्गम स्थल: मिलाम हिमनद,हिमालय, कुमायूँ

सहायक नदी:घाघरा नदी

 

तवा नदी

उद्गम स्थल: महादेव पर्वत,पंचमढ़ी

सहायक नदी:नर्मदा नदी

 

हसदो नदी

सहायक नदी: सरगुजा में कैमूर पहाड़ियाँ

सहायक नदी:महानदी

 

काली सिंध नदी

लम्बाई: 416 km

उद्गम स्थल:बागलो, ज़िला देवास,विंध्याचल पर्वत

सहायक नदी:यमुना नदी

 

सिन्ध नदी

उद्गम स्थल: सिरोज, गुना ज़िला

सहायक नदी: चम्बल नदी

 

केन नदी

उद्गम स्थल: विंध्याचल श्रेणी

सहायक नदी:यमुना नदी

 

पार्वती नदी

उद्गम स्थल: विंध्याचल, मध्य प्रदेश

सहायक नदी :चम्बल नदी

 

घग्घर नदी

उद्गम स्थल: कालका,

 

बाण गंगा नदी

लम्बाई: 494km

उद्गम स्थल: बैराठ पहाड़ियाँ, जयपुर

सहायक नदी:यमुना नदी

 

सोम नदी

उद्गम स्थल: बीछा मेंड़ा,उदयपुर

सहायक नदी: नजोखम, गोमती,सारनी

 

आयड़ या बेडच नदी

लम्बाई :190km

उद्गम स्थल:गोमुण्डा पहाड़ी, उदयपुर

सहायक नदी:बनास नदी

 

दक्षिण पिनाकिन

लम्बाई: 400km

उद्गम स्थल: चेन्ना केशव पहाड़ी,

 

दक्षिणी टोंस

लम्बाई: 265km

उद्गम स्थल: तमसा कुंड, कैमूर पहाड़ी

 

दामन गंगा नदी

उद्गम स्थल: पश्चिम घाट

महाराष्ट्रातील पहिला

first in maharashtra

3116   08-Jun-2017, Thu

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल - श्री. प्रकाश

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका - मुंबई

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण - गंगापूर

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य - कर्नाळा ( जि.रायगड )

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र - खोपोली ( जि.रायगड )

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प - तारापुर

महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ - राहुरी

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी -  विणकर सहकारी संस्था इचलकरंजी ( जि.कोल्हापूर )

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे - देवगड (जि. सिंधुदुर्ग)

महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र - आर्वी ( जि.पुणे )

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प - चंद्रपुर

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा - पुणे

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा - सातारा 

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी - मुंबई 

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति - श्री. सुरेन्द्र चव्हाण

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति - महर्षि धोंडो केशव कर्वे

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति - आचार्य विनोबा भावे

महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर - आनंदीबाई जोशी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष - न्यायमूर्ती महादेव रानडे

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) - मुंबई ते ठाणे

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला

महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक - सुरेखा भोसले (सातारा)

महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा - सिंधुदुर्ग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा - कुसुमावती देशपांडे

महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त - डॉ. सुरेश जोशी

महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग - वडूज

महाराष्ट्रातील नदी प्रणाली

MAHARASHTRA RIVER SYSTEM

7510   21-May-2017, Sun

महाराष्ट्रात . घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.

 • पश्चिम वाहिनी  

  • या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी - पूर्णा  नद्या खचदरीतून वाहत जातात.


) तापीही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा बुराई या नद्या मिळतात.

 • तापी पूर्णा संगमचंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी पांझरा यांचा संगममुडावद धुळे

) कोकणातील नद्या

 • सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी४९ ते १५५ कि.मी.

 • कोकणातील नद्यांची वैशिष्टयेवेगवान हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.

 • कोकणातील सर्वाधिक लांबीची नदीउल्हास (१३० कि.मी.)

 • कोकणातील दुस-या क्रमांकाची नदीवैतरणा (१२४ कि.मी.)

 • उत्तर कोकणातील नद्यादमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास

 • मध्य कोकणातील नद्यापाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.

 • दक्षिण कोकणातील नद्याकाजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, तेरेखोल

 

पुर्व वाहिनी नद्याया सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.


) गोदावरी खोरे गोदावरी खो-याने देशाचे १०% राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.

 • गोदावरी नदीहिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे.

 • गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते कि.मी. वाहत जाऊन परत  तेलंगणातजाते.

 

गोदावरीच्या उपनद्या
उपनदी उगम गोदावरी बरोबर संगम
दारणा कळसूबाई शिखराजवळ (इगतपूरी) दारणा सांगवी
प्रवरा भंडारद-याच्या ईशान्येस नेवाशाजवळ टोके
मुळा भंडारद-याच्या ईशान्येस नेवाशाजवळ टोके
सिंदफणा बालाघाट डोंगर (बीड) माजलगाव  
मांजरा पाटोदा पठार (बालाघाट) बीड कुंडलवाडी (नांदेड) ७२४ कि.मी.
कादवा तौला डोंगर (नाशिक) नांदूरमधमेश्वर
शिवना सुरपालनाथ (सातमाळा) औरंगाबाद गंगापूरच्या अग्नेयेस
दुधना चौक्याचा डोंगर (औरंगाबाद) संगम परभणी जिल्हा
पूर्णा शिरसाळा (अजिंठा डोंगर) संगम परभणी जिल्हा

 

 

 • गोदावरीची उपनदी-प्राणहिता
  पेनगंगा नदी वर्धा नदीस येऊन मिळाल्यानंतर वर्धा वैनगंगेचा संगम होतो. या प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरीला येऊन मिळते.

 

नदी उगम मिळते
वर्धा बैतुल (सातपूडा / मध्यप्रदेश) वैनगंगेस
पेनगंगा अजिंठा टेकड्या बल्लापूर (यवतमाळ) येथे वर्धेस येऊन मिळते.
वैनगंगा भाकल-दरकेसा टेकड्या मैकल (मध्यप्रदेश), उपनद्या – कन्हान, पेंच, बाग आष्टी जवळ वर्धा व वैनगंगा संगम होतो.
पेंच छिंदवाडा (मध्यप्रदेश) वैनगंगेस मिळते.
इंद्रावती कलहंडी (मध्यप्रदेश) छत्तीसगढ – महाराष्ट्र सीमेवरून वाहते. भद्राचंल येथे गोदावरीस मिळते.

 

) भीमा खोरे

१) भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते. महाराष्ट्रात किचा प्रवाह ४५१ कि.मी. असून ती कर्नाटकात रायचुरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते.

२) तिची एकूण लांबी ८६७ कि.मी. आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात. मुळा मुठा या नद्यांचा संगम पुणे येथे होऊन त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो.

३) निरा नदी भोर जवळ उगम पावून भीमा नदीला येऊन मिळते. भीमेच्या प्रमुख उपनद्या उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा माण तर डावीकडून वेळ, घोड सीना या नद्या येऊन मिळतात.
 

) कृष्णा नदी खोरे कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रात २८२ कि.मी. चा प्रवास करुन ती तेलंगणात जाते. तिची एकूण लांबी १२८० कि.मी. आहे

कृष्णा नदीच्या उपनद्या व त्यांचा संगम

उपनदी उगम कृष्णेबरोबर संगम
वेण्णा महाबळेश्वर माहुलीजवळ (सातारा)
कोयना महाबळेश्वर प्रितीसंगम कराड (सातारा)
पंचगंगा सह्याद्री कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त) मिळून नरसोबाची वाडी येथे कृष्णेस मिळते.
वारणा   कोल्हापूरच्या ईशान्येस कोप-यात हरिपूर येथे कृष्णेस मिळते.
वेरळा   ब्रम्हनाळ (सांगली)
तुंगभद्रा   कर्नाटक संगमेश्वर (कर्नुल-कर्नाटक)

 

 • कोयनाकोयाना खो-यात राज्यातील सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होते. त्यामुळे कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात.
 • कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी वशिष्ठी नदीत सोडतात.
 • महाराष्ट्रातील नद्यांची एकूण लांबी३२०० किमी.
 • महाराष्ट्रात नदी खोरे उतरता क्रम) गोदावरी ) भीमा ) तापी ) कृष्णा
 • महाराष्ट्रातील प्रवरा नदीतील धबधबारंधा फॉल्स ६० मी
 • महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हागोंदिया
 • प्रमुख तलावताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर), नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),रामसागर (नागपूर), लोणार (बुलढाणा), अंबाझरी (नागपूर), आंध्रलेक (पुणे), धामापूर (रत्नागिरी),कळवण (पुणे), लेक बिले (अहमदनगर), व्हिक्टोरीया लेक (पुणे), सेवनी भंडारा
 • मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलावभातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)
 • महाराष्ट्रातून दोनदा वाहणा-या नद्यामांजरा, तापी, गोदावरी

नदी व नदीच्या काठावरील शहरे

नदी काठावरील शहरे नदी काठावरील शहरे
गोदावरी नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगांव, राजमहेंद्री पंचगंगा कोल्हापूर
कृष्णा वाई, सागली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडी इंद्रायणी देहू व आळंदी (पुणे)
पांझरा धुळे मौसम मालेगांव
क-हा जेजुरी भीमा पंढरपूर
सिना अहमदनगर प्रवरा नेवासे (संगमनेर)

 

 

महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या
नदी उपनद्या
तापी पुर्णा, गिरणा
पुर्णा मोर्णा, काटेपुर्णा,नळगंगा
गोदावरी दारणा, कादवा, प्रवरा, मांजरा, सिंदफना, दक्षिण-पुर्णा, प्राणहिता (वर्धा+वैनगंगा
वैनगंगा कन्हान, पेंच, वर्धा व पेनगंगा, सिंधफना
द.पुर्णा दुधना, गिरजा
कृष्णा कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा
भिमा दुधनी, सिना, माण, निरा, धोंड, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, पवना, क-हा

 

महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण

soil in maharashtra

4692   20-May-2017, Sat

१. गाळाची मृदा :
भारतीय उपखंडाच्या खंडांतर्गत भागात नद्यांनी वाहून आणलेला गाळ व सागर किनारपट्टीवर सागरी लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा तयार झाली आहे. प्रामुख्याने सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.उत्तरेकडील मदानी प्रदेशात गाळाच्या संचयन काळानुसार त्याचे दोन उपप्रकार आहेत : जुनी गाळाची मृदा-भांगर, नवीन गाळाची मृदा-खादर.

२. काळी मृदा/ रेगूर मृदा :
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे. महाराष्ट्रात काळी मृदा विस्तृत प्रमाणात आढळते. कर्नाटकात उत्तरेकडे या मृदेचा रंग अधिक काळा होत जातो. आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते. या मातीत लोह, अ‍ॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते. तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे. उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात. मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात.
पिके : काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते. कापूस, ऊस, तंबाखू यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तृणधान्ये, तेलबिया, विविध प्रकारचा भाजीपाला, संत्री- मोसंबी- द्राक्षांसारखी फळे पिकवली जातात. या जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कोरडवाहू शेतीसाठी ही जमीन आदर्श मानली जाते.

महाराष्ट्रातील काळी मृदा :
सहय़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळय़ा मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते.
पिके : महाराष्ट्रातील सर्वोत्तम मृदेत काळी मृदा प्रसिद्ध आहे. कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, जवस तसेच कडधान्यांचे उत्पादनही घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाच्या उत्तम सोयी उपलब्ध झाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. तसेच काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. विशेषत: गोदावरी, भीमा व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील ऊस, कापूस, तंबाखू, भुईमूग वगरेंसारखी नगदी पिके, विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. खानदेशमध्ये तापी नदीच्या खोऱ्यात कापसाच्या खालोखाल केळीच्याही बागा व इतर पिकेही आहेत.

३. जांभी मृदा :
सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर, पूर्व घाट, राजमहल टेकडय़ांवर, केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये राधानगरी, आंध्रप्रदेशात मेडक, ओडिशात मयूरभंज येथे जांभा मृदा आढळते.उष्ण कटिबंधीय प्रदेशात आद्र्र हवामानात जांभा जमीन तयार होते. पावसाचे प्रमाण २०० सें.मी.पेक्षा जास्त असल्याने खडकाचे अपक्षरण होते. खडकामधील सिलिकांवर अपक्षयाची क्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साइड तयार होते. अशा तांबूस पिवळसर जमिनीस ‘जांभा मृदा’ असे म्हणतात. अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइड व लोह ही द्रव्ये या मृदेत असतात. ही मृदा फारशी सुपीक असत नाही. परंतु खताला लगेचच आणि चांगला प्रतिसाद देते. या मृदेतून नाचणी, भात, कडधान्ये, ऊस ही पिके तसेच आंबा, काजूसारखी फळझाडे चांगली वाढतात.

पिके : जांभा मृदा जरी साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खनच्या पठारावरील काळ्या मातीपेक्षा कमी असते. या मातीपासून कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठय़ा प्रमाणात केलेली आहे. रत्नागिरीमधील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची निर्यातीतून परकीय चलन प्राप्त होते. याशिवाय काजू, चिक्कू वगरे फळझाडांचे उत्पादन मिळते.
 

४. तांबडी माती :
प्रदेश : तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते. गुणधर्म : तांबडय़ा मातीत सेंद्रिय घटक आणि नायट्रोजनचा अभाव असतो. त्यात मॅग्नेशिअम, लोह, अ‍ॅल्युमिनिअम संयुगे आढळतात. या मातीचा रंग त्यात असलेल्या लोहाच्या अंशामुळे लाल, तांबूस किंवा पिवळसर दिसतो.
पिके : पाणी व खतांचा योग्य पुरवठा केल्यास या मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात. नाचणी, भात, तंबाखू, भाजीपाला या पिकांना ही माती अधिक उपयुक्त आहे. या मातीत भुईमूग, ऊस, रताळी यांची लागवड केली जाते.

 

५. महाराष्ट्रातील तांबडी व पिवळसर माती :
महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा िवध्ययन आणि कडाप्पा तसेच आíकयनकालीन गॅ्रनाइट व नीस खडकांवर विदारण क्रिया होऊन तांबडी माती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील तांबडी व पिवळसर माती मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे. सहय़ाद्रीच्या पर्वतमय भागात विशेषत: उत्तर कोकणालगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर माती आढळते.

 

६. पर्वतीय मृदा :
हिमालयाच्या पर्वतरांगा, सह्य़ाद्रीचा घाटमाथा, पूर्व घाट आणि द्वीपकल्पीय भारताच्या अरण्याच्या प्रदेशात ही माती आढळते. दगड-गोटय़ांच्या मिश्रणातून पर्वतीय व डोंगराळ प्रदेशातील माती तयार झालेली असते. उत्तराखंडातील तराईच्या भागात अरण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे येथे पर्वतीय माती आढळते. या जमिनीत पोटॅश, फॉस्फरस आणि चुनखडीचे प्रमाण कमी असते. चांगल्या उत्पन्नासाठी जमिनीला खतांचा पुरवठा करावा लागतो. अरण्यांचे प्रकार जास्त असल्याने जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो. चहा, कॉफी, फळझाडे, मका, गहू, बार्ली यांच्या लागवडीसाठी ही जमीन पोषक आहे.

 

७. वाळवंटी मृदा :
अतिउष्णता, कोरडे हवामान, अत्यल्प पर्जन्य यामुळे प्रदेशातील खडकांचे अपक्षय होऊन वाळू व रेती तयार होते. राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.
गुणधर्म : या मातीत विरघळलेले क्षार अधिक प्रमाणात असतात. हय़ुमसचे प्रमाण कमी असते. ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते, परंतु नायट्रोजनचे प्रमाण कमी असते.
पिके : कृत्रिम जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध केल्यास या जमिनीतून विविध पिके घेता येतात.

 

८. किनाऱ्याची गाळाची मृदा :
कोकणामधून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहाबरोबर आणलेला गाळ या प्रदेशात पसरतो. खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात. ही मृदा कोकणात उत्तर-दक्षिण दिशेने किनारपट्टीलगत असून अतिशय चिंचोळ्या प्रदेशात आढळते. ही माती वाळुमिश्रित लोम प्रकारची आढळते. या मातीत प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जाते, तसेच किनाऱ्यालगतच्या प्रदेशात नारळ- पोफळीच्या बागा आढळतात.


Top