प्रादेशिक समग्र आर्थिक भागीदारी (आरसेप)

MPSC chalu ghadamodi, current affairsRegional Comprehensive Economic Partnership Rcep Abn 97

4451   16-Nov-2019, Sat

मागच्या आठवडय़ात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉक येथे भरलेल्या आरसेप (रीजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप) व्यापार गटाच्या बैठकीला हजेरी लावत या व्यापार गटात भारत सक्रिय सहभागी असणार नाही, अशी घोषणा केली आणि त्यावरून प्रादेशिक आर्थिक करार योग्य का अयोग्य यावर खल सुरू झाला.

काय असतात असे करार?

व्यापार करताना दोन देशांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित असले तर व्यापाराला चालना मिळते. अशा प्रकारे जर समविचारी आणि सर्वानाच फायदेशीर पडेल या विचाराने अनेक देशांनी एकत्र येऊन त्यांच्या व्यापारी धोरणाची आखणी केली, फक्त स्वत:चा स्वार्थी दृष्टिकोन थोडासा बाजूला ठेवून सर्वाना रुचेल आणि आपल्यालाही परवडेल अशा प्रकारचे व्यापारी नियम बनवले तर व्यापारातील फायदे एकाच वेळी अनेक देशांना अनुभवता येतात.

सार्क, आसियान यांसारख्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या गटापेक्षा ‘आरसेप’ ही संकल्पना वेगळी ठरते. कारण ‘फेस व्हॅल्यू’ म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार दिसत असले तरी त्यामागे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे निराळे पदर असतात. जेव्हा प्रादेशिक समग्र आर्थिक भागीदारी करार अस्तित्वात येतात, तेव्हा त्या गटात समाविष्ट असणाऱ्या सर्व राष्ट्रांना आपली आयात-निर्यातविषयक धोरणं मध्यम आणि दीर्घ काळात बदलून एकसमान ठेवावी लागतात. बहुधा अशा व्यापारी गटात मुक्त व्यापारालाच चालना दिली जाते.

समजा, भारत अशा गटाचा सदस्य असेल तर आपल्या मित्रगटातील अन्य राष्ट्रांमधून आपल्या देशात येणाऱ्या वस्तूंवर कोणताही कर लावायचा नाही किंवा तुलनात्मकदृष्टय़ा नगण्य कर आकारायचा हे मूलभूत तत्त्व असते. याउलट भारतातून मित्रगटातील दुसऱ्या देशात आपण ज्या वस्तू वा सेवा निर्यात करू त्यांच्यावर मित्रदेश कोणतेही कर लावत नाहीत. एकूणच सीमारेषा धूसर झालेल्या आणि परस्परसहकार्य असलेल्या बाजारपेठा असेच याचे वर्णन करता येईल.

भारतासारख्या देशाचा विचार करता कोणत्याही व्यापारी गटात भारताने सहभागी होणे यात आपला फायदा कमीच व भविष्यकालीन धोके जास्त अशी परिस्थिती सध्या आहे. आपल्या देशातील निम्म्यापेक्षा जास्त कर्ती लोकसंख्या शेती व त्याच्यावर आधारित उद्योगधंद्यांमध्ये आहे. मात्र त्याचे उत्पन्नातील योगदान अगदीच तुटपुंजे आहे. कोणे एके काळी भारत अन्नधान्यांची निर्यात करायचा, मात्र तेलबिया आणि डाळी यांची आयात करणारा देश अशी भारताची नवी ओळख निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र आर्थिक भागीदारी गटात आपण सहभागी झालो तर आपल्यापेक्षा खूपच कमी किमतीत वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या देशांना आपल्या बाजारपेठेचे दरवाजे सताड उघडे  करून दिल्यासारखेच ते आहे आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके माहिती तंत्रज्ञान आणि थोडेफार आर्थिक क्षेत्र सोडले तर भरभक्कम निर्यात करून अशा गटाचा आपण फायदा उठवू शकू अशी उद्योगधंद्यांची परिस्थिती सध्या तरी नाही. अशा व्यापारी गटांमध्ये समाविष्ट होताना आपल्यातील मर्यादा लक्षात घेत सरकारी धोरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपला दबदबा निर्माण व्हावा यासाठी व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे अत्यंत महत्त्वाचे असते. जागतिक पातळीवर तंत्रज्ञान कोणत्या दिशेला जात आहे? बाजारपेठेला नेमकं काय अपेक्षित आहे? याचा अंदाज घेऊन वस्तू व सेवांची निर्मिती करण्यासाठी सरकार व उद्योगांमध्ये समन्वय हवा.

प्रश्नवेध एमपीएससी : चालू घडामोडींविषयक सराव प्रश्न

MPSC chalu ghadamodi, current affairs-Current Practice Questions Abn 97

490   16-Nov-2019, Sat

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाची तयारी आणि सराव यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. या लेखामध्ये चालू घडामोडीबाबतचे सराव प्रश्न देण्यात येत आहेत.

प्रश्न १ – पुढीलपकी कोणती विधाने योग्य आहेत?

अ) महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवटी लागल्या आहेत.

ब)   १९७८ मध्ये पुलोदचे सरकार बरखास्त झाल्यामुळे पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागली होती.

क) २०१४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

ड)   राज्यांमध्ये राष्ट्रपती राजव)ट कलम ३५२ नुसार लावली जाते.

पर्याय

१)अ,ब,क               २)अ, क

३) अ,क, ड             ४) वरीलपैकी सर्व

प्रश्न २ – आयएनएस खांदेरीबाबत कोणती गोष्ट खरी आहे?

अ) ही फ्रान्सच्या डीसीएनएसच्या साहाय्याने सुरू असलेल्या प्रोजेक्ट ७४ या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत आहे.

ब) ही पाणबुडी २८ जुल २०१९ रोजी नौदलात दाखल झाली .

क) फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरीत्या या पाणबुडीची बांधणी केली आहे.

ड) ही कलवरी श्रेणीतील पाणबुडी नाही.

प्रश्न  ३ – भारत, अमेरिका आणि जपान नौदलादरम्यानचा पुढीलपकी कोणता त्रिपक्षीय सागरी सराव आहे.

अ) सागर २०१९

ब) अपेक्स २०१९

क) काझाइंड २०१९

ड) मलबार २०१९

प्रश्न ४ – योग्य जोडय़ा लावा.

अ)जागतिक कर्करोग जागृती दिन     I)   ८ नोव्हेंबर,

ब) राष्ट्रीय बाल दिन             II) २६ नोव्हेंबर

क) संविधान दिन                 III)  १४ नोव्हेंबर

ड) जागतिक रेडिओग्राफी दिन        IV)  ७ नोव्हेंबर

अ   ब   क   ड

१)  IV  I    II   III

२) III   IV  II   I

३)  IV  III   II   I

४)  IV  II   I    III

प्रश्न ५ – उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना कोमोरोस या देशाच्या पुढीलपकी कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

१)ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रीन्सेंट

२) ऑर्डर ऑफ द केमोरोस

३)ऑर्डर ऑफ द ग्रीन कोमोरोस

४) ऑर्डर ऑफ द रिष्ट्रीत

प्रश्न ६ – २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळणारे अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफलो यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

अ) अभिजीत बॅनर्जी भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ आहेत.

ब)   अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणाऱ्या एस्थर डफलो या द्वितीय महिला असून सर्वात तरुण विजेत्या आहेत.

क) अभिजीत बॅनर्जी हे अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे भारतीय मूळ असलेले प्रथम व्यक्ती आहेत.

ड)   वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान देण्यात आला.

पर्याय

१)वरीलपैकी सर्व

२) अ,ब,ड

३) अ,ब,क

४) अ,ड

प्रश्न ७ – अलीकडे शोडोल नृत्याची गिनीज बुक ऑफ

वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. ते भारतातील कोणत्या प्रदेशातील नृत्य आहे.

१) लडाख

२) त्रिपुरा

३) श्रीनगर

४) हिमाचल प्रदेश

उत्तरे आणि स्पष्टीकरणे

प्रश्न १  – योग्य पर्याय क्र. – २

राज्यात लागू झालेली ही तिसरी राष्ट्रपती राजवट आहे. यापूर्वी १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचे पुलोदचे सरकार बरखास्त केल्यावर आणि २०१४ मध्ये राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राजवट घटनेच्या कलम ३५६ नुसार लावली जाते.

प्रश्न क्र. २ – योग्य पर्याय क्र.- ३

आयएनएस खांदेरी फ्रान्सच्या डीसीएनएसच्या साहाय्याने सुरू प्रोजेक्ट ७५ या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आली असून २८ सप्टेंबर २०१९ रोजी नौदलात दाखल झालेली आत्याधुनिक कलवरी श्रेणीतील पाणबुडी आहे.

 

प्रश्न क्र. ३ – योग्य पर्याय क्र. ४

मलबार १०२९ हा भारत अमेरिका आणि जपानच्या नौदलादरम्यांनचा त्रिपक्षीय सागरी सराव आहे. हा सराव जपानच्या समुद्रकिनाऱ्यानजीक सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू झाला.

प्रश्न क्र. ४ – योग्य पर्याय क्र. ३

१)  जागतिक कर्करोग जागृती दिन   – ७ नोव्हेंबर

२) राष्ट्रीय बाल दिन   – १४ नोव्हेंबर

३) संविधान दिन      – २६ नोव्हेंबर

४) जागतिक रेडिओग्राफी दिन –  ८ नोव्हेंबर

प्रश्न क्र. ५ – योग्य पर्याय क्र. १

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंना कोमोरोसच्या ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रीन्सेंट या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

प्रश्न क्र. ६ – योग्य पर्याय क्र. २

अभिजीत बॅनर्जी हे अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे भारतीय मूळ असलेले द्वितीय व्यक्ती आहेत. त्यांच्याआधी अमर्त्य सेन (१९९८) यांना अर्थशास्त्रातील नोबेल प्रदान करण्यात आले होते.

प्रश्न क्र. ७ – योग्य पर्याय क्र.१

शोडोल नृत्याची सर्वात मोठे सामूहिक लडाखी नृत्य म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. हे लडाखचे शाही नृत्य म्हणून ओळखले जाते.

चालू घडामोडी

MPSC chalu ghadamodi, current affairs-Mpsc Exam Preparation Akp 94 16

1665   15-Nov-2019, Fri

सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठी पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यास चालू घडामोडी या घटकाचा सामान्य आणि अभियांत्रिकीशी संबंधित अशी दोन स्वरूपात उल्लेख करण्यात आला आहे. सन २०१७ला झालेल्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील या घटकावरील काही प्रश्न पाहू.

या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.

प्रश्न –  एखाद्या इंजिनामध्ये २४स्र्ी१ूँं१ॠ्रल्लॠ चा वापर करण्याचे कारण –

१)      थंड हवा दाबाने पुरविण्यसाठी

२)      एक्झॉस्ट दाब वाढविण्यासाठी

३)      जास्त भार असताना अधिक इंधन इनजेक्ट करण्यासाठी

४)      बाहेरील हवेच्या घनतेपेक्षा जास्त घनतेने हवा इनटेकमध्ये पुरवठा करण्यासाठी र्

 

  प्रश्न –  ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये बाँडला नियंत्रित करण्यासाठी –

१) क्लच वापरतात                             २) सर्वो वापरतात

३) अक्यूम्युलेटर वापरतात               ४) ड्रमचा वापर करतात

प्रश्न –  विद्युत ब्रेक कुठे वापरतात?

१) दुचाकी वाहने        २) कार                   ३) ट्रक                    ४) ट्रेलर्स

 

 प्रश्न –  खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

१) साक्षी मलिक ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय आहे.

२) दीपा मलिक ही पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.

३) पी. व्ही. सिंधू हिचे पिता हे अर्जुन पदक मिळवलेले व्हॉलीबॉल खेळाडू आहेत.

४) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवडलेल्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला आहेत. या प्रातिनिधिक प्रश्नांचे विश्लेषण केल्यावर चालू घडामोडींबाबत पुढील बाबी लक्षात येतात.

 •  अभ्यासक्रमामध्ये यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी असा उल्लेख असला तरी प्रश्नांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते की प्रत्यक्षात यंत्र व स्वयंचल अभियांत्रिकी क्षेत्रातील उपयोजनावर  (Application of Mechanical and Automobile Engineering)) प्रश्न विचारलेले आहेत.
 •   त्यामुळे अभियांत्रिकीशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करताना ‘चालू घडामोडी’ याचा अर्थ या क्षेत्रातील अद्ययावत आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचे उपयोजन असा अभिप्रेत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
 •    बरेच वेळा क्लिष्ट बाबी अभ्यासताना मूलभूत व तुलनेने सोप्या वाटणाऱ्या बाबी आणि आधीचा अभ्यास कमी लेखला जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी या गृहीत धरलेल्या बाबींबाबत सरळ मुद्दा विचारला तर माहीत आहे पण नेमके आठवत नाही अशी अवस्था होऊ शकते. या २० प्रश्नांची काठिण्यपातळी पाहता अभियांत्रिकीच्या मूलभूत अभ्यासाची उजळणी अत्यंत महत्त्वाची आहे.
 •   विज्ञान, क्रीडा, राज्यव्यवस्था, पर्यावरण, व्यक्तिविशेष (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) आणि शासकीय उपक्रम व योजना या मुद्यांवर प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण जास्त आहे.
 •     यामध्ये भारताचे द्विपक्षीय तसेच संघटना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पहायला हव्यात.
 •   नैसर्गिक आपत्ती, वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक घटना, त्यांची वैशिष्टय़े समजून घ्यावीत.
 •     आर्थिक कास दर, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्देशांक, जनगणना, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.
 •     विविध शासकीय योजना, त्यांच्या तरतुदी, लाभार्थी यांचा आढावा घ्यायला हवा.
 •    स्वतंत्र चालू घडामोडीमध्ये व्यक्तिविशेष, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, पुस्तके व लेखक, संमेलने, नेमणूकी व नियुक्त्या अशा घटकांचा समावेश होतो.
 •    आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते यांचा आढावा घ्यायला हवा.
 •     आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.
 •   महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.
 •   चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा. या व्यक्तींची इतर

काही कामगिरी, अन्य ठळक माहिती पहायला हवी.

स्वतंत्र चालू घडामोडी हा घटक पूर्णपणे तथ्यात्मक आणि म्हणूनच स्मरणशक्तीवर विसंबून असलेला मुद्दा आहे. त्याचेच प्रमाण चालू घडामोडीवरील स्वतंत्र प्रश्नांमध्ये जास्त आहे. त्यामुळे कोष्टकामध्ये टिप्पणी काढणे आणि त्यांची उजळणी हा यासाठी महत्त्वाचा भाग आहे.

परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारणपणे मागील एक वर्षांच्या घडामोडींवर विचारले जातात. ‘एक वर्ष’ असा लिखित नियम नाही. अजून खोलात जायचे तर मागील आठ-नऊ महिन्यांच्या घडामोडींवर अधिक भर असतो. त्यामुळे या काळातील घडामोडींवर बारकाईने लक्ष   दिले पाहिजे. प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिका अभ्यासणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक  जाणून घेणे आवश्यक आहे.

तर्कक्षमतेचा कस 

current affairs, loksatta editorial-Mpsc Exam Preparation Akp 94 14

1217   14-Nov-2019, Thu

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या सन २०१७मध्ये झालेल्या पेपरच्या विश्लेषणाच्या आधारावर या घटकाची तयारी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील. राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये बुद्धिमापनविषयक घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र गट क सेवेसाठी असलेल्या या परीक्षेतील बुद्धिमापनविषयक प्रश्नांची काठिण्य पातळी हे तुलना करायची झाल्यास राज्यसेवा परीक्षा किंवा बँक, पी.ओ. परीक्षेइतकी असल्याचे लक्षात येते. तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

 •    एकूणच या घटकातील प्रश्न हे जास्त लांबीचे त्यामुळे वेळखाऊ असे आहेत.
 •     अभाषिक तार्किक क्षमतेमध्येही थोडेसे अपारंपरिक असेच प्रश्न विचारण्यावर भर दिलेला दिसून येतो.
 •    अंकगणितावर आधारित काळ- काम- वेग, गुणोत्तर, नफा, तोटा किंवा आकृत्यांमधील गणिती प्रक्रिया अशा पारंपरिक प्रश्नांची संख्या कमी आहे. मात्र त्रिकोणमिती, क्षेत्रमिती आणि संख्यामालिका हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
 •   भाषिक व अभाषिक तर्कक्षमतेचे एकत्र उपयोजन करावे लागेल अशा प्रकारचे permutation / combination चे प्रश्नही विचारलेले दिसतात.
 •   भाषिक तर्कक्षमतेवरील प्रश्नांमध्ये वैविध्य आहे. व्यक्ती व त्यांच्या वैशिष्टय़ांचे संयोजन, विधानांवरून अनुमान, निष्कर्ष, तर्कक्षमता (Syllogism) यावरील प्रश्नांची संख्या जास्त आहे.
 •  

अभाषिक तर्कक्षमता

या घटकावर ३० पकी १० प्रश्न विचारलेले आहेत.

 •    पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर त्रिकोणमिती, क्षेत्रमिती आणि संख्यामालिका कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
 •    आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. यामध्ये घडय़ाळाच्या काटय़ाच्या किंवा उलटय़ा दिशेने ठराविक कोनांतून बदलणारे स्थान किंवा दोन आकृत्यांच्या बेरीज वा ठरावीक स्थांनावरील घटकांची वजाबाकी अशा प्रक्रियांच्या आधारे उत्तरे शोधता येतात.
 •  दिलेल्या कागदाच्या घडय़ा आणि त्यावर काढलेल्या आकृत्या किंवा तो कागद कापून बनविलेले आकार यांवर आधारित प्रश्नांमध्ये बरीच कसोटी लागते. यामध्ये प्रत्येक घडीबरोबर आकृत्यांचे बदलणारे स्थान, दिशा किंवा स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. आरशातील प्रतिमांची जाण असेल तर असे प्रश्न जास्त आत्मविश्वासाने सोडविता येतात.
 •  

    भाषिक तर्कक्षमता

 •  निष्कर्ष पद्धतीमध्ये (Syllogism) दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
 •     बठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
 •   वय, उंची, वजन, गुण अशा बाबींच्या तुलनेचे प्रश्न सोडवताना प्रत्येक वाक्यातील तुलनेची आकृती एकमेकांच्या शेजारी काढत     गेल्यास उत्तर लवकर सापडते.
 •   व्यक्तींच्या माहितीच्या संयोजनावरील प्रश्न सोडविताना कोष्टकामध्ये माहिती भरत गेल्यास अचूक उत्तर आणि कॉम्बिनेशन्स सापडतात. मागील वर्षीच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या यंत्रांची कार्यक्षमता आणि किंमत यांच्या संयोजनावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव खूप महत्वाचा ठरतो.
 •   सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.

भाषिक तर्कक्षमता ही त्या भाषेचे ज्ञान आणि आकलन यावर पुष्कळ प्रमाणात अवलंबून असते. दिलेल्या विधान / उताऱ्याच्या आधारे निष्कर्ष / अनुमान काढणे, त्यांना पाठबळ देणारे युक्तीवाद किंवा त्यांच्यामागील गृहीतके शोधणे अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी भाषेची किमान जाण असणे आणि लक्षपूर्वक वाचनाची सवय महत्त्वाची आहे. यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला प्रश्न पाहू

‘गर्भिलगनिदान विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.’ या प्रतिपादनाला तर्कसंगत व कायदेशीर पाठबळ देणारा युक्तिवाद निवडायचा आहे.

१) एखाद्याला बहीण, सून व पत्नी कोठून मिळेल?

२) गर्भामध्ये काही विकृती असल्याखेरीज कोणत्याही स्त्रीला गर्भपाताची परवानगी दिली जाऊ नये.

३) शासनाच्या आरोग्य सेवामार्फत प्रत्येक स्त्रीला सुरक्षित गर्भपात सुविधा मिळणे हा तिचा हक्क आहे.

४) गर्भपात हा स्त्रीचा हक्क असायला हवा.

वरील चारही विधानांमध्ये गर्भपाताबाबत काही युक्तिवाद केलेले आहेत. चारही विधाने तर्कसंगत आणि कायदेशीरदृष्टय़ा योग्य आहेत. मात्र दिलेल्या प्रतिपादनामध्ये गर्भिलगनिदान विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा मुद्दा असला तरी प्रत्यक्षपणे कुठेही गर्भपाताचा उल्लेख नाही. अशा वेळी दोन विधानांतील परस्परसंबंध हे आकलनाशिवाय प्रस्थापित करणे शक्य नाही. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या करण्यासाठी गर्भिलगनिदान केले जाते हे समजून घेतल्यास त्या प्रतिपादनासाठीचा युक्तिवाद शोधणे सोपे होते. मग २, ३ आणि ४ क्रमांकाच्या पर्यायांमध्ये कोठेही गर्भिलगनिदानाशी संबंधित मुद्दा नाही हे लक्षात येते. आणि पर्याय १ हा तर सरळसरळ जीवनातील महिलांचे महत्त्व सांगणारा आणि म्हणून स्त्रीभ्रूण हत्येचा व त्यासाठी गर्भिलगनिदान करण्यास विरोध अप्रत्यक्षपणे मांडतो.  यासाठी दिलेल्या विधानांचा, पर्यायांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवून प्रश्नाचे वाचन करणे आवश्यक आहे.

आर्थिक विकास : औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि संबंधित मुद्दे

current affairs, loksatta editorial-Economic Development Industrial Sector Infrastructure And Related Issues Abn 97

2040   09-Nov-2019, Sat

प्रस्तुत लेखामध्ये आपण आर्थिक विकास या घटकातील औद्योगिक क्षेत्र व पायाभूत सुविधा आणि संबंधित मुद्दे याची चर्चा करणार आहोत.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न

‘‘देशात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अवलंबिलेली सार्वजनिक आणि खासगी भागीदारीची पद्धत (ढढढ) टीकामुक्त नाही. या पद्धतीच्या गुण आणि दोषांची समीक्षात्मक चर्चा करा.’’ (२०१३).

‘‘स्पष्ट करा कशी खासगी सार्वजनिक भागीदारीची आखणी दीर्घकालीन परिपक्वता अवधी असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामुळे, अशाश्वत दायित्वाचे हस्तांतरण भविष्यावर करू शकतात. या जागी कोणत्या प्रकारच्या आखणीची गरज आहे की ज्यामुळे पुढील येणाऱ्या पिढीच्या क्षमतेशी तडजोड करण्याची वेळ येऊ नये याची तजवीज करून सुनिश्चितता करता येऊ शकेल?’’ (२०१४).

‘‘विशेष आर्थिक क्षेत्राविषयी (एसईझेड) स्पष्ट स्वीकृती आहे की हे औद्योगिक विकास, उत्पादन आणि निर्यातीचे एक साधन आहे. या संभाव्यतेला ओळखून एसईझेडच्या संपूर्ण कारकत्वामध्ये वृद्धी करण्याची गरज आहे. एसईझेडच्या यशस्वीतेसाठी अडथळा ठरणाऱ्या मुद्याची कर आकारणी, शासनाचे कायदे आणि प्रशासन या संदर्भात चर्चा करा.’’ (२०१५)

स्मार्ट शहरे काय आहे? भारतातील शहरीकरणाच्या विकासामधील यांच्या उपयुक्ततेचे परीक्षण करा. याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी भेदभाव वाढेल का? पी.यू.आर.ए (P.U.R.A.) आणि आर.यू.आर.बी.ए.एन. (RURBAN) मिशनच्या संदर्भामध्ये स्मार्ट खेडय़ाविषयी युक्तिवाद करा. (२०१६)

‘‘सुधारणोत्तर काळामध्ये औद्योगिक वाढीचा दर हा एकूणच स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीच्या दरापेक्षा पिछाडीवर राहिलेला आहे.’’ कारणे द्या. अलीकडील काळामध्ये औद्योगिक धोरणामध्ये करण्यात आलेले बदल औद्योगिक वाढीचा दर वाढविण्यासाठी किती सक्षम आहेत? (२०१७).

२०१८ आणि २०१९मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. उपरोक्त पद्धतीचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न सरकारने आखलेल्या धोरणात्मक नीतीवर भाष्य करणारे आहेत.

औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्राची अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असणारी उपयुक्तता.

औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक जलदगतीने घडवून आणण्यासाठी पायाभूत सुविधाचे सक्षम जाळे उभे करणे आवश्यक असते. भारतातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा पाया १९४८मध्ये पारीत करण्यात आलेल्या पहिल्या औद्योगिक धोरणाद्वारे घातला गेलेला आहे. तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावरही पंचवार्षकि धोरणाद्वारे भर देण्यात आलेला होता.

भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला असला तरी यामध्ये सार्वजनिक कंपन्यांना अधिक महत्व होते. तर खासगी कंपन्यांवर अनेक र्निबध होते. तसेच सरकारच्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.  याच्या जोडीला असणारी भांडवल उपलब्धतेची कमतरता यामुळे देशातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासावर मर्यादा

आलेली होती.

१९९१मध्ये भारत सरकारने ‘उखाजा’ (उदारीकरण खासगीकरण आणि जागतिकीकरण) नीतीचा स्वीकार करून भारतीय अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला. याद्वारे  सरकारने या क्षेत्रांचा विकास अधिक वेगाने घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि यामध्ये सरकारने नियामकऐवजी साहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली. १९९१ मध्ये नवीन औद्योगिक धोरण पारीत करण्यात आले, ज्याद्वारे औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये रचनात्मक बदल करण्यात आले. हे बदल आर्थिक उदारीकरणाच्या तत्त्वांना पूरक होते.

या धोरणानुसार देशातील तसेच बहुराष्ट्रीय खासगी कंपन्यांना देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मुक्त व्यवसाय करण्यासाठी उत्तेजन देण्यात आले. ज्यामुळे या कंपन्यांकडे असणारे भांडवल भारतामध्ये गुंतविले जाऊन देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रगतीला अधिक मोठय़ा प्रमाणात विस्तृत करता येईल हा १९९१ च्या नवीन आर्थिक नीतीचा मुख्य उद्देश होता. याचबरोबर याला देशांतर्गत आलेल्या आर्थिक संकटाची आणि जागतिक स्तरावर झालेल्या बदलाचीही पाश्र्वभूमी होती. या नीतीमुळे भारतात विदेशी गुंतवणुक आणि देशांतर्गत गुंतवणूक वाढीला चालना मिळाली. याचा फायदा औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला मिळायला सुरुवात झाली. कारण या क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाची समस्या होती ते अपुरे उपलब्ध असणारे भांडवल आणि या नीतीमुळे ही समस्या सोडविली गेली.

भारताला पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पुढील दहा वर्षांमध्ये जवळपास १ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे. हे जर साध्य करायचे असेल तर थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्याबरोबरच देशांतर्गत गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे. सरकारमार्फत यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. २०१८-१९ च्या भारताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये वार्षकि २०० अब्ज डॉलर पायाभूत सुविधांवर खर्च करावे लागतील असे प्रतिपादन केलेले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांचा अपवाद वगळता जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला मुभा देण्यात आलेली आहे, ज्यात औद्योगिक आणि पायाभूत क्षेत्राचाही समावेश आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने घडवून आणण्यासाठी पुरेशा प्रमाणत पायाभूत सुविधांची उपलब्धता असणे गरजेचे असते. त्याशिवाय औद्योगिक क्षेत्राचा विकास साध्य करणे कठीण असते व याची कमतरता भारतातील औद्योगिक क्षेत्राला सध्यस्थितीतही भेडसावत आहे.

पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी भारतात सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. याद्वारे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या धोरणाचा स्वीकार करण्यात आलेला आहे.

या धर्तीवर भारतात रस्ते वाहतूक, ऊर्जानिर्मिती, बंदर (ढ१३) विकास, विमान वाहतूक, ग्रामीण भागातील वाहतूक, रेल्वे वाहतूक इत्यादी क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारकडून भर देण्यात आलेला आहे. यामुळे भारताला भेडसावणारी बेरोजगारीचे समस्याही संपुष्टात आणता येऊ शकेल कारण यासारख्या धोरणामुळे भारतात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळून अधिक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि भारत सरकारने अंगीकारलेले सर्वसमावेशक वृद्धीचे ध्येय पूर्ण करता येईल.

या आधीच्या लेखामध्ये जे संदर्भ साहित्य नमूद केलेले आहे तेच या घटकाचा अभ्यास करण्यासाठी वापरावे. या घटकाशी संबंधित चालू घडामोडीसाठी भारत सरकारची आर्थिक पाहणी अभ्यासावी. वेळोवेळी सरकारमार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या उपाययोजना याची माहिती वर्तमानपत्रामधून संकलित करून अभ्यासावी, ज्यामुळे या घटकाची कमीतकमी वेळेमध्ये र्सवकष पद्धतीने तयारी करता येऊ शकते. पुढील लेखामध्ये आपण आर्थिक उदारीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था याचा आढावा घेणार आहोत.

प्रश्नवेध एमपीएससी : कर सहायक पदनिहाय पेपर सराव प्रश्न

current affairs, loksatta editorial- Tax Assistant Designation Paper Practice Questions Abn 97

1451   02-Nov-2019, Sat

कर सहायक पदनिहाय पेपर ३ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पेपरसाठी सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

*  प्रश्न १) पुढीलपकी कोणत्या विषयावर राज्यपाल वटहुकूम काढू शकतात?

१)   सातव्या परिशिष्टातील राज्य व समवर्ती सूचीमधील विषय

२)   सातव्या परिशिष्टातील कोणत्याही सूचीमध्ये समाविष्ट नसलेले विषय.

३)   राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असलेल्या विधेयकांचे विषय.

४)   वरीलपैकी एकही नाही.

*       प्रश्न २) पुढीलपकी चुकीचे विधाने ओळखा.

अ. मूलभूत अधिकारांवर व्यवहार्य निर्बंध घालता येतात तर मार्गदर्शक तत्त्वांवर असे र्निबध घालण्याची तरतूद नाही.

ब.   मूलभूत अधिकार ही राज्याची नकारात्मक जबाबदारी आहे.

१) अ बरोबर ब चूक

२) ब बरोबर अ चूक

३) अ आणि ब दोन्ही चूक

४) अ आणि ब दोन्ही बरोबर

*       प्रश्न ३) पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

अ. पहिली पंचवार्षकि योजना सन १९५५मध्ये सुरू झाली.

ब.   भारतीय स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षी नववी पंचवार्षिक योजना सुरू झाली.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ    ३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

*  प्रश्न ४) अकराव्या पंचवार्षकि योजनेमधील समावेशक विकासामध्ये पुढीलपकी कोणती बाब समाविष्ट नाही?

१) कृषी क्षेत्रामध्ये ४ टक्के वाढ करणे

२) रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करणे

३) लिंग गुणोत्तर कमी करणे

४) भांडवली बाजाराचे सक्षमीकरण

* प्रश्न ५) वस्तू व सेवा करासंदर्भात खालील विधाने वाचा.

अ. वस्तू व सेवा करासंदर्भात असीम दासगुप्ता समिती नेमण्यात आली होती.

ब.   वस्तू व सेवा कर हा जगात सर्वप्रथम ब्राझील देशात लावण्यात आला होता.

१) अ आणि ब दोन्ही बरोबर

२) फक्त अ बरोबर

३) फक्त ब बरोबर

४) अ आणि ब दोन्ही चूक

*       प्रश्न ६) खालीलपकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ. देशीनामा पद्धतीमध्ये माहिती ही भारतीय भाषांमध्ये जतन केली जाते.

ब.   लेखाकर्माची देशीनामा ही पद्धत दुहेरी नोंद पद्धतीवर आधारित आहे.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

*       प्रश्न ७) खालीलपकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ.       विक्रीहक्क हा भांडवली स्वरुपाचा हक्क आहे.

ब.   ज्या स्वरूपात माल खरेदी केला जातो त्याच स्वरूपात त्याची विक्री केल्यास ती फेरविक्रीमध्ये समाविष्ट होत नाही.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

*       प्रश्न ८) कांचन चौधरी यांच्याबाबत कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ. त्या देशातील पहिल्या महिला पोलिस संचालक होत्या.

ब.   सन १९९७मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देउन सन्मान करण्यात आला.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

उत्तरे व स्पष्टीकरणे

*      प्र.क्र.१ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(१)

*      प्र.क्र.२ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४)

*      प्र.क्र.३ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(३) पहिली पंचवार्षकि योजना सन १९५१ मध्ये सुरू झाली होती.

*       प्र.क्र.४ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४)

अकराव्या पंचवार्षकि योजनेची उद्दिष्टे

*   योजनेच्या अंतापर्यंत जीडीपीमध्ये १० टक्के विकास दर साध्य करण्यासाठी वार्षकि वाढीचा सरासरी ९ टक्के विकास दर गाठावा.

*   अधिक सर्वसमावेशक वाढ मिळविणे जेणेकरून विकासाचे फायदे सर्व घटकांपर्यंत पोहोचतील.

*   शेतीत चार टक्क्यांची वाढ.

*   सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी करणे.

*   २००९पर्यंत सर्वासाठी विजेची व्यवस्था करणे.

*   नोव्हेंबर २००७ पर्यंत देशातील सर्व खेडय़ांमध्ये टेलिफोन सेवांची व्यवस्था करणे.

*   लिंग-गुणोत्तर किंवा पुरुष-महिला प्रमाण सुधारणे.

*   सर्वाना मूलभूत भौतिक पायाभूत सुविधा तसेच आरोग्य आणि शिक्षण सेवेत प्रवेश सुनिश्चित करणे.

*   २००९ पर्यंत १००० आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (डोंगराळ आणि आदिवासी भागात ५००) सर्व वस्तीसाठी बारमाही रस्ता जोडणी.

*   ७० दशलक्ष नवीन कामाच्या संधी निर्माण करणे.

*   ७ वष्रे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी साक्षरता दर ८५ टक्क्यांपर्यंत वाढविणे.

*   स्त्री-पुरुष साक्षरतेमधील फरक १० टक्क्यांपर्यंत खाली आणणे.

*   बालमृत्यू दर २ पर्यंत कमी करणे आणि माता मृत्यू दर १००० थेट जन्मासाठी १ पर्यंत कमी करणे.

*   एकूण प्रजनन दर कमी करणे

*  २००९ पर्यंत सर्वाना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे.

*      प्र.क्र.५  – योग्य उत्तराचा पर्याय

क्र. (२) GST जगात सर्वप्रथम फ्रान्स या देशात लावण्यात आला होता. दि. १ जुल २०१७ रोजी वस्तू व सेवा कर देशभरामध्ये लागू करण्यात आला. असीम दासगुप्ता यांना भारताच्या जीएसटीचे आर्किटेक्ट म्हणून ओळखले जाते.

*      प्र.क्र.६ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(२)

*      प्र.क्र.७ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४) विक्रीहक्क हा महसुली स्वरुपाचा हक्क आहे. ज्या स्वरूपात माल खरेदी केला जातो त्याच स्वरूपात त्याची विक्री केल्यास ती फेरविक्रीमध्ये समाविष्ट होतो.

*      प्र.क्र.८ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(१)

कांचन चौधरी या किरण बेदी यांच्यानंतरच्या देशातील दुसऱ्या आयपीएस अधिकारी आहेत, तर पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. दूरदर्शनवरील उडान मालिका ही त्यांच्या जीवनावर आधारित होती.

एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा विश्लेषण

current affairs, loksatta editorial-Assistant Motor Vehicle Inspector Retrospective Analysis Abn 97

683   02-Nov-2019, Sat

सन २०१७ मध्ये गट क संवर्गातील सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठीचा नवा पॅटर्न लागू करण्यात आला. या पॅटर्ननुसार परीक्षा आत्तापर्यंत केवळ २०१७सालीच झाली आहे. त्यामुळे आता २०२०मध्ये या पदासाठीची भरती होण्याची शक्यता गृहीत धरता येईल.

सन २०१७ मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास पुढील तयारीसाठी उपयुक्त ठरेल. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या सोबतच्या कोष्टकामध्ये देण्यात आली आहे.

सन २०१७च्या पूर्वपरीक्षेतील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.

*  प्रश्न –  खालीलपकी कोणता दिवस हा महाराष्ट्रातील वृक्षरोपणासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदला गेला?

१)   १ जुलै २०१६

२)   १५ जुलै २०१५

३)   ९ ऑगस्ट २०१६

४)  १५ ऑगस्ट २०१६

*       प्रश्न – ओटावा करारासंबंधी योग्य विधान ओळखा.

१)   ओटावा करार सांस्कृतिक देवाणघेवाणीविषयी होता.

२)   ब्रिटिश साम्राज्यातील उद्योगप्रधान राष्ट्रांनी परस्परांना जकात सवलती द्याव्यात.

३)   हुकूमशहांना आळा घालण्यासाठी हा करार होता.

४)   भारतीय कृषी उद्योगाचा विकास करण्यासाठी हा करार होता.

 

*      प्रश्न – वेस्टर्न ब्लॉटिंग कसल्या संशोधनासाठी वापरतात?

१) आरएनए    २) प्रथिने

३) डीएनए     ४) कर्बोदके

*       प्रश्न-  जेव्हा —– स्त्रियांनी इल्बर्ट बीलमधील ‘भारतीय न्यायाधीशांना युरोपियनांसंबंधी खटले चालविण्यास परवानगी दिली’ या गोष्टीला पाठिंबा देणारे पत्र लिहिले, तेव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयीचा दृष्टिकोन बदलला.

१) महाराष्ट्रीयन २) गुजराती         ३) बंगाली          ४) पंजाबी

*       प्रश्न – महाराष्ट्राच्या खालील हवामान विभागांचा काळजीपूर्वक अभ्यास करा.

 1. i) उष्णकटिबंधीय वर्षां अरण्यांचा विभाग -अट
 2. ii) उष्णकटिबंधीय निम्नशुष्क किंवा स्टेपी हवामानाच प्रदेश- इर

iii) उष्णकटिबंधीय दमट, कोरडे किंवा मानसून सॉव्हाना हवामानाचे प्रदेश – AW

वरील हवामान विभाग खालीलपकी कोणत्या हवामान शास्त्रज्ञाशी / शास्त्रज्ञांशी संबंधित आहेत?

 1. a) डॉ. त्रिवार्था b) कुमारी सेंपल
 2. c) कोप्पेन d) थॉर्नवेट

उत्तरांसाठी पर्याय –

१) a, c आणि d

२) c आणि d

३) फक्त a

४) फक्त b

*       प्रश्न – जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार हा (कलम २१) ——-

१)   राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात.

२)   सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात.

३)   सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वमंजुरीने राष्ट्रपती केव्हाही निलंबित करू शकतात.

४)   कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही.

*       प्रश्न – स्नो टायर सोडून सर्व टायरसाठी खालीलपकी कोणता पर्याय युनिफॉर्म टायर ग्रेडिंग्साठी वापरला जातो?

१)   टायरमधील हवेचा दाब, टायरचे मटेरियल, ट्रेडची मांडणी

२)   ट्रेडची झीज, ट्रक्शन, उष्मारोधक

३)   ट्रेडची झीज, ट्रेडची मांडणी

४)   वरीलपकी कोणतेही नाही.

*       प्रश्न – उच्च दाबाची कुलिंग सिस्टीम याकरिता वापरतात की—–

१)   सिस्टीममध्ये कुलंट हे उच्च तापमान ठेवून न उकळता सरक्युलेट केले जाते.

२)   सिस्टीममध्ये कुलंट हे कमी तापमान देऊन न उकळता सरक्युलेट केले जाते.

३)   कुलंट वाया जाते तेव्हा सिस्टीममधून वाफ व गळती होते.

४)   वरीलपैकी कोणतेही नाही.

या प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे पुढील बाबी अभ्यास करताना लक्षात घ्यायला हव्यात.

*  सामान्य अध्ययन घटकामधील उपघटकांवरील प्रश्नांची संख्या प्रत्येक वेळी एकसारखी राहण्याची शक्यता नाही. प्रत्येक उपघटकावर किमान पाच प्रश्न विचारण्यात येतील याची दक्षता घेऊन सर्व सहा घटकांचे मिळून ५० प्रश्न विचारले जाण्याची शक्यता गृहीत धरता येईल.

*  काही घटकांवर सरळसोट तर नागरिकशास्त्रासारख्या घटकावर सर्वच प्रश्न बहुविधानी अशी पद्धत वापरलेली आहे. मात्र प्रश्नांचे स्वरूप प्रत्येक वेळी प्रत्येक घटकासाठी एकसारखेच असेल असे नाही. त्यामुळे प्रत्येक घटकासाठी मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि तथ्यांचा नेमका अभ्यास आवश्यक आहे.

*   सामाजिक सुधारणा मुद्यावर तथ्यात्मक प्रश्नांची अपेक्षा जास्त असली तरी समाजसुधारकांबाबत नेमकी माहिती असणे बहुविधानी प्रश्नांसाठी आवश्यक असल्याचे दिसते.

*  बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गणितावर आधारित प्रश्नांची संख्या कमी आहे. व्यक्ती व त्यांच्या वैशिष्टय़ांचे संयोजन, अनुमान, निष्कर्ष, तर्कक्षमता (Syllogism) यावरील प्रश्नांची संख्या जास्त आहे. एकूणच अभाषिक तार्किक क्षमतेपेक्षा भाषिक तार्किक क्षमतेवर आधारीत प्रश्नांची संख्या जास्त आहे.

*   अभ्यासक्रमामध्ये यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी असा उल्लेख असला तरी प्रश्नांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते की प्रत्यक्षात यंत्र व स्वयंचल अभियांत्रिकी क्षेत्रातील उपयोजनावर (Application of Mechanical and Automobile Engineering) प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना ’चालू घडामोडी’ याचा अर्थ या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचे उपयोजन असा अभिप्रेत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

वरील विश्लेषणाच्या आधारे पूर्वपरीक्षेची तयारी कशा प्रकारे करता येईल याबाबत पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येईल.

घटक विषय        प्रश्नसंख्या

सामाजिक व औद्योगिक सुधारणा         ७

सामान्य विज्ञान         ९

इतिहास       ७

भूगोल        ९

नागरिकशास्त्र       ८

चालू घडामोडी       १०

एकूण सामान्य अध्ययन        ५०

बुद्धिमापनविषयक प्रश्न         ३०

यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी           २०

एकूण         १००

एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा योजना

MPSC chalu ghadamodi, current affairs-Assistant Motor Vehicle Inspector Examination Scheme Abn 97

664   01-Nov-2019, Fri

सन २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीतील गट क संवर्गातील सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठीचा नवा पॅटर्न लागू करण्यात आला. या पॅटर्नप्रमाणे भरतीबाबत अर्हता इत्यादी बाबींची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या लेखामध्ये परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा परीक्षा योजना

एकूण गुण – १०० प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालीलप्रमाणे

अभ्यासक्रम

(१) सामान्य अध्ययन चालू घडामोडी, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, सामान्य विज्ञान, भारताचा सामान्य इतिहास व भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह) नागरिकशास्त्र

(२) बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो, याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर चाचणीमध्ये प्रश्न विचारण्यात येतात.

(३) यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी (Latest trends and technological development in the field of Mechanical and Automobile Engineering.

पूर्वपरीक्षेचा निकाल

*   वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका बरोबर प्रश्नाचे गुण मिळालेल्या गुणांमधून वजा करण्यात येतात.

2   भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे ८ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील, अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा (Cut Off Line) निश्चित करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक प्रवर्गातील पदांसाठी एकूण १०पट उमेदवार उपलब्ध होतील, अशा रीतीने सीमारेषा खाली ओढली जाते. मात्र, अशा पद्धतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या राखीव प्रवर्गासाठीच्या पदावरच निवडीसाठी पात्र ठरतात.

*   केवळ सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांच्या सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाते. सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांसाठी असलेली सीमारेषा शिथिल करत मुख्य परीक्षेासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदासाठी पात्र ठरतात.

मुख्य परीक्षा : परीक्षा योजना

परीक्षेचे टप्पे  – एक,

एकूण गुण – ३००

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

ही प्रश्नपत्रिका तीन विभागांमध्ये विभागलेली असते. यातील पहिला म्हणजे विभाग अ (Section A) अनिवार्य आहे तर दुसरा व तिसरा म्हणजेच विभाग ब आणि क (Section B & C) यापकी कोणत्याही एका विभागातील प्रश्न सोडवायचे असतात. विभाग ‘अ’ मध्ये २४० गुणांसाठी १२० प्रश्न तर विभाग ‘ब’ आणि ‘क’ मध्ये प्रत्येकी ६० गुणांसाठी प्रत्येकी ३० प्रश्न विचारण्यात येतात.

विभागवार घटकविषय पुढीलप्रमाणे

*    विभाग अ (SECTION A) – Mechanical and Automobile Engineering  (यंत्र आणि स्वयंचल अभियांत्रिकी)

*    विभाग ब (SECTION B) – Mechanical Engineering (यंत्र अभियांत्रिकी)

*    विभाग क (SECTION C) – Automobile Engineering (स्वयंचल अभियांत्रिकी)

मुख्य परीक्षेचा निकाल

प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. अंतिम निकालासाठी केवळ मुख्य परीक्षेतील गुणांचाच विचार करण्यात येतो. शिफारशीसाठी म्हणजेच अंतिम निकालासाठी शतमत पद्धतीचा अवलंब केला जातो. याचा अर्थ मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे गुण मिळवणारे उमेदवार शिफारशीसाठी पात्र ठरतात.

१) सर्वसाधारण (अमागास) – किमान ३५ शतमत

२) मागासवर्गीय – किमान ३० शतमत

३) अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू –  किमान २० शतमत

४) माजी सैनिक किमान – २० शतमत

मागास प्रवर्गातील उमेदवार तसेच विकलांग, महिला, पात्र खेळाडू आणि माजी सनिक उमेदवार मुख्य परीक्षेत केवळ त्यांच्यासाठी विहीत केलेल्या निम्नसीमारेषेनुसार शिफारसपात्र ठरल्यास त्यांचा संबंधित प्रवर्गातील जागांसाठीच विचार करण्यात येतो.

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा

MPSC chalu ghadamodi, current affairs-Mpsc Exam Study Akp 94

1328   25-Oct-2019, Fri

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध विभागातील पदांवर भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात येतात. राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीतील तांत्रिक पदांवरही आयोगाकडून भरती करण्यात येते.  यापकी सहायक मोटार वाहन निरीक्षक  या गट क संवर्गातील पदांच्या भरतीबाबत या आणि पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

पदाचा तपशील    संवर्ग – अराजपत्रित, गट – क नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्रात कोठेही

उच्च पदावर बढतीची संधी – ज्येष्ठता व पात्रतेनुसार परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि त्यापुढील संवर्ग.

परीक्षा योजना

परीक्षा खालील दोन टप्प्यात घेण्यात येते

 पूर्व परीक्षा – १०० गुण. (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप)

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या सिमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांस मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. गुणांकनामध्ये २५ टक्के नकारात्मक गुणपद्धती लागू करण्यात आली आहे.

   मुख्य परीक्षा – ३०० गुण. (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप)

मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतिम निकाल व निवडीची शिफारस करण्यात येते.

गुणांकनामध्ये २५टक्के नकारात्मक गुणपद्धती आणि किमान गुणरेषा ठरविण्यासाठी शतमत पद्धत लागू करण्यात आली आहे.

       अर्हता

 • शैक्षणिक अर्हता
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने एस. एस. सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि
 • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी ((Mechanical Engineering) विषयातील किमान
 • वर्षांची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली पदवी / पदविका.
 • स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र
 • अभियांत्रिकी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा उच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

वरील अर्हतांना समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून पुढील पदवी/पदविका स्वीकारार्ह आहेत.

 • डिप्लोमा इन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी
 • डिप्लोमा इन मेटलर्जी
 • डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनीअिरग
 • बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन मशिन टूल्स मेन्टेनन्स
 • बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी
 • बॅचलर डिग्री इन प्रॉडक्शन इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन फॉब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनीअिरग
 • बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन प्लॅन्ट इंजिनीअरिंग

  अनुभव

 • उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास त्यांच्याकडे हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे. वरील ठिकाणी प्रशिक्षाणार्थी अथवा अ‍ॅप्रेंटिस म्हणून घेतलेला अनुभव यासाठी गृहित धरला जातो.
 • ज्या उमेदवारांना किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर परिविक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक असते.

 

   इतर

 • उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास त्यांच्याकडे गिअर्स असलेली मोटार सायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन (जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन) या संवर्गातील वाहन चालविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुज्ञप्ती (License) असणे आवश्यक आहे.
 • मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास अशी अनुज्ञप्ती उमेदवाराकडे नसेल तर नियुक्तीनंतरच्या दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक आहे अन्यथा उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येते.
 • उमेदवार रंगांध नसावा आणि त्याची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली असायला हवी.
 • उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
 • शालान्त परीक्षा मराठी आणि हिंदी विषयासह न दिलेल्या उमेदवारांनी तसेच मुख्य परीक्षेपर्यंत संगणक हाताळणी प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या उमेदवारांनी निवड झाल्यानंतर याबाबतच्या परीक्षा विहीत कालावधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • परिविक्षाधीन कालावधी संपल्यावर किमान पाच वष्रे परिवहन विभागात काम करण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • परीक्षेची सविस्तर योजना आणि अभ्यासक्रमाबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

कर सहायक पदनिहाय पेपरची तयारी

MPSC chalu ghadamodi, current affairs-Mpsc Exam Preparation Akp 94 12

695   23-Oct-2019, Wed

पंचवार्षकि योजना 

 • पंचवार्षकि योजनांच्या अभ्यासासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत.
 •  योजनेचा कालावधी, योजनेची घोषित ध्येये हेतू आणि त्याबाबतची पाश्र्वभूमी, योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा, योजनेतील सामाजिक पलू, सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, योजना
 •   योजनेचे मूल्यमापन व यश / अपयशाची कारणे, परिणाम
 •    योजनाकाळात घडलेल्या उल्लेखनीय आर्थिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना
 •    योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक व शैक्षणिक धोरणे
 •     योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पाहावी.

पुस्तपालन आणि लेखाकर्म

 •  पुस्तपालन आणि लेखाकर्म या दोन्ही बाबी रोजच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा पाया आहेत. त्यामुळे दोन्हीमधील तरतुदींमागची कारणे समजून घेतल्यास कुठे काय चपखल बसते हे सामान्यज्ञानाच्या आधारावर लक्षात येऊ शकते. म्हणून या घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी यातील पारंपरिक बाबी म्हणजेच व्याख्या, तरतुदी, नोंदींची कारणमीमांसा, स्थान व मर्यादा, किंमती आणि मूल्यांच्या गणनेच्या पद्धती व त्यामागील कारणमीमांसा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
 •  या घटकावरील प्रश्नांची काठिण्य पातळी ही पदवीच्या स्तराची असेल हे आयोगाने विहीत केले आहे. संकल्पनात्मक आणि पारंपरिक प्रश्नांवर भर देण्यात आलेला आहे. हे प्रश्न मूलभूत संकल्पना समजून घेतल्यास आणि नेमका आणि मुद्देसूद अभ्यास केल्यास आत्मविश्वासाने सोडविता येतील. त्यामुळे अभ्यास करताना अभ्यासक्रमातील कोणताच मुद्दा वगळू नये.
 •   मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तरी त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन माहीत असायला हवे. कारण एखादे उदाहरण देऊन त्यामध्ये नियमांच्या आधारे किंवा पुस्तपालनातील कोणती पद्धत व्यवहार्य ठरते तो पर्याय शोधण्यासारखे प्रश्नही विचारलेले दिसून येतात. त्यामुळे नियम वा पद्धतींचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे खूप उपयोगी ठरेल.
 •  बँक जुळवणी पत्रक, घसारा मूल्य इत्यादी बाबत गणिते विचारण्यात आली आहेत. गणितांचे स्वरूप पाहता ती कमी वेळेत सोडविता येतील अशी असल्याचे दिसते. यासाठी नियमांची माहिती आणि त्यांचा योग्य वापर करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे पदवीपर्यंतच्या पुस्तकांमधील वेगवेगळी उदाहरणे आणि गणिते सोडवण्याचा सराव महत्त्वाचा आहे.

 

आर्थिक सुधारणा आणि कायदे

 •     या घटकावर २० प्रश्न विचारण्यात आले आहेत. पारंपरिक, तथ्यात्मक, बहुविधानी, मूलभूत संकल्पनांवर आधारीत अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत.
 •    घटकाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट प्रत्येक मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे त्यामुळे तयारी करताना सर्व मुद्दे व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.
 •    आर्थिक सुधारणांशी संबंधित सर्व मूलभूत संकल्पना समजून घेणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. आर्थिक सुधारणामध्ये समाविष्ट कर, आयात, निर्यात, उद्योगस्न्ोही धोरणे, शासनाची भूमिका याबाबतचे मुद्दे समजून घ्यायला हवेत.
 •    उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना आणि त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुरू करण्यात आलेले बदल, नव्या बाबी कालानुक्रमे व कारणमीमांसा समजून घेऊन अभ्यासणे आवश्यक आहे. यामध्ये तथ्यात्मक बाबींवरही सारखाच भर द्यावा.
 •   जागतिकीकरणामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ठळक व दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णय, ठराव आणि इतर घडामोडींचा अभ्यास कालानुक्रम लक्षात घेऊन करावा. प्रत्येक ठळक निर्णयामागील कारणे, पाश्र्वभूमी, आणि परिणाम समजून घ्यावेत. याबाबतच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.
 •     उदारीकरण आणि खासगीकरणाबाबतच्या निर्णयांची पाश्र्वभूमी, स्वरूप आणि त्यामूळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले लक्षणीय बदल समजून घ्यावेत. याबाबत सार्वजनिक वित्त आणि सूक्ष्म अर्थशास्त्र (Macro & Micro economics) या दोन्हींवरील परिणाम समजून घेणे उपयुक्त ठरेल. याबाबतच्या चालू घडामोडींबाबत सजग राहणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे.
 •  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, बँकिंग, परकीय चलन व्यवस्थापन, परकीय गुंतवणूक, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, सार्वजनिक खर्चावरील मर्यादा या सर्व बाबींमधील मूलभूत संकल्पना समजून घ्याव्यात. तसेच यांचेशी संबंधित महत्त्वाचे आणि सध्या लागू असलेले कायदे पाहायला हवेत. यामध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायदा, वित्तीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा, वस्तू व सेवा कर कायदा, विविध क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा या बाबींचा आढावा घ्यायला हवा.
 •    कररचना, बँकिंग, सार्वजनिक वित्त याबाबत शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचा आढावाही उपयुक्त ठरेल. समिती, विषय व ठळक शिफारशी अशा मुद्यांच्या आधारे कोष्टकामध्ये टिप्पणे काढणे पुरेसे ठरेल.
 •   जागतिक बँक समूह, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, एशियन डेव्हलपमेंट बँक या आणि तत्सम आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक संघटना / संस्थांचा अभ्यास स्थापनेची पाश्र्वभूमी, उद्देश, सदस्य, महत्त्वाचे अद्ययावत निर्णय, त्याबाबत भारताची भूमिका या मुद्यांच्या आधारे करावा. या बाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.


Top

Whoops, looks like something went wrong.