एमपीएससी मंत्र : कृषिसेवा पूर्वपरीक्षा इंग्रजीची तयारी

MPSC chalu ghadamodi, current affairs-Mpsc-English

34   12-Dec-2019, Thu

प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी १५ प्रश्न इंग्रजी भाषा घटकाचे आहेत. पेपरचा स्तर पदवी परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशा काठिण्य पातळीचा असल्याचे लक्षात येते.

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे ढोबळमानाने भाषिक आकलन (शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार व उताऱ्यावरील प्रश्न) आणि व्याकरण (शब्दांचे प्रकार, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती (case), आणि वाक्यरचनेतील काळ, प्रयोग आणि वाक्याचे प्रकार, Degrees of comparison, direct & indirect speech) असे दोन भाग दिसून येतात.

भाषिक आकलन

* समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे / स्पेलिंगचेपण वेगळे अर्थ असणारे शब्द अशा वेळी फसवे ठरतात. उदा. Decent आणि descent या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

* एकाच शब्दाचे पूर्णपणे वेगळे असे अर्थ असू शकतात. उदा. Sanction या शब्दाचे मान्यता देणे आणि शिक्षा देणे असे जवळजवळ विरोधी अर्थ आहेत. ते वाक्यातील संदर्भातून समजून घेणे आवश्यक आहे.

* म्हणी व वाक्प्रचार हा या पेपरमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील

प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन सेन्स यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो.

* तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले

छोटेसे पुस्तक किंवा पिंट्रआउट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा.

* उताऱ्यावरील प्रश्न आतापर्यंत विचारलेले नसले तरी त्यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचीही तयारी आवश्यक आहे. यासाठी सराव हाच महत्त्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष पेपर सोडविताना आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

व्याकरण

* अभ्यासक्रमामध्ये वाक्यरचना आणि व्याकरण यांचा वेगवेगळा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांवरील प्रश्नांची संख्या कमी-जास्त होऊ शकते हे लक्षात घेऊन वाक्यरचना हा भाग जास्त भर देऊन अभ्यासावा लागेल.

* वाक्यरचनेमध्ये काळ आणि प्रयोग यांची उदाहरणे नुसती पाठ करून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविता येत नाहीत. त्या त्या काळाची किंवा प्रयोगाची वाक्यरचना, त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद, अव्यये यांचे स्थान व इतर घटकांशी संबंध व्यवस्थित समजून घेतले तर हे प्रश्न सोडविणे सहज सोपे होते.

* इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचे कोष्टक पाठ करायला हवे. या कोष्टकामध्ये रोज एका वाक्याचे सगळ्या काळ आणि प्रयोगात रूपांतर करायचा सराव करत राहिल्यास नियम पक्के लक्षात राहतील. या सरावाने वाक्यातील काळ आणि प्रयोगाच्या रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात.

* Degrees of comparison, direct & indirect speech यांच्यासाठीसुद्धा नियमाच्या आधारे सराव करणे हाच तयारीचा उत्तम पर्याय आहे. वाक्य पृथकरण (Clauses) हा घटक अवघड वाटत असल्यास त्याचा आढावा घेऊन बाजूला ठेवला तरी चालण्यासारखे आहे.

* उर्वरित व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमामध्ये शब्दांच्या जातीचा (Parts of Speech) स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच व्याकरणदृष्टय़ा कोणते वाक्य बरोबर आहे, अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषी वाक्यरचना यासाठीचे कोष्टक आणि महत्त्वाच्या क्रियापदांची past participle, past perfect participle यांचे कोष्टक पाठच असायला हवे.

व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतील. अर्थात पदवी परीक्षेची काठिण्य पातळी आहे म्हटल्यावर व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागणार नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येतील. या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

कृषिसेवा पूर्वपरीक्षा इंग्रजी प्रश्न विश्लेषण

MPSC chalu ghadamodi, current affairs- Mpsc Exam Study Akp 94 2

131   06-Dec-2019, Fri

सन २०१७ मध्ये नवीन पॅटर्न लागू झाल्यानंतर महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा सन २०१९ वगळता प्रत्येक वर्षी आयोजित झाली असल्याचे दिसते. त्यामुळे सन २०२० मध्ये ही परीक्षा आयोजित होण्याची शक्यता गृहीत धरून तयारी करणे आवश्यक आहे. या घटकाच्या पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण व त्याआधारे तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येईल.

या लेखामध्ये मागील प्रश्नपत्रिकांमधील इंग्रजी घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांतील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

(या प्रश्नांतील योग्य उत्तरांचे पर्याय ठळक केलेले आहेत.)

Q – What do underlined words below respectively mean?

Q – What do underlined words below respectively mean?The defusion has been effective.The diffusion has been effective.1) release of tension & distribution2) distribution & release of tension3) separation & obliteration4) obliteration & separation

Q –  Although no goals were scored, it was an exciting game.Identify the type of clause underlined.1) Noun clause2) Adjective clause3) Adverb clause of condition4) Adverb clause of contrast

Q –  Choose the best active voice structure for the following sentence;She was given three increments for her outstanding performance.1) Three increments were given to her for her outstanding performance.2) Her employers gave herthree increments for her outstanding performance.3) Three increments for her outstanding performance were given to her.4) Her outstanding performance fetched her three increments.

Q –  Fill in the blank with correct degree of comparison.Between the two options you have, ____________1) the former is best2) the former is the best3) the former is good4) the former is better

Q –  Select the appropriate meaning of the underlined expressionoNew banking policy was presented to us as fait accompli.1) best policy2) fateful3) leaving no option but to accept4) decision that can be changed

Q –  Upheaval in the country came as a sudden unexpected events for the government.Select the most appropriate idiomatic expression for the underlined words in the above sentence.1) bolt from the blue2) bolt upright3) have shot onels bolt4) make bolt for

Q –  Identify adjectives from the following sentences.a. My father bought a large house.b. Weird noises disturbed us in the night.c. It was a ghastly appreciation of an old man.Answer options1) large, weird, ghastly,       appreciation2) large, noises, ghastly,       appreciation3) large, weird, ghastly, old4) none of the above

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या विश्लेषणावरून पुढील गोष्टी लक्षात येतात.

सन २०१७मध्ये सर्व १५ पकी १४ प्रश्न हे थेट (Straight forward) प्रकारचे होते तर सन २०१८मध्ये बहुविधानी प्रश्नांची संख्या एकवरून पाचवर गेलेली दिसते.

भाषाविषयक आकलनावरील प्रश्नांचा विचार करता २०१७ आणि २०१८ मध्ये १५ पकी ८ प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजेच शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार यांना एकत्रितपणे जवळपास ५० टक्के महत्व दिले आहे. त्यातही म्हणींवर कमी भर आहे. सर्वाधिक भर शब्दसंग्रहावर आणि वाक्प्रचारावर दिलेला दिसून येतो.

वाक्यरचनेवर चार ते पाच प्रश्न विचारलेले दिसून येतात. वाक्याचे प्रकार (साधे, संयुक्त आणि मिश्र तसेच सकरात्मक व नकारात्मक), काळ, प्रयोग .degrees of comparison, direct & indirect speech, वाक्य पृथ:करण (Clauses) ) हे घटक वाक्यरचनेवरील प्रश्नांसाठी विचारात घेता येतील.

शब्दांच्या जाती (Parts of Speech) या व्याकरणाच्या भागावर सर्वात कमी प्रश्न विचारलेले आहेत.

अभ्यासक्रमामध्ये उताऱ्यावरील प्रश्नांचा उल्लेख असला तरी दोन्ही वर्षी या घटकाचा समावेश प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला नाही. मात्र कोणत्याही घटकावरील प्रश्नांची संख्या आयोगाने निश्चित ठेवलेली नाही, हे पाहता या घटकाचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटकाचा सराव करणे टाळू नये.

पदवी परीक्षेची काठिण्य पातळी आहे म्हटल्यावर केवळ व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागणार नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येईल. एकूणच वस्तुनिष्ठ भाषा म्हटले तरी भाषेतील वेगवेगळ्या अर्थछटा माहीत करून घेतल्या तर हा पेपर कमी वेळेमध्ये यशस्वीपणे सोडविता येईल.

इंग्रजी

/article-about-analysis-of-english-questions

7119   11-Oct-2018, Thu

मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. दोन्ही भाषांची शब्द योजना, वाक्यरचना इत्यादी बाबी वेगळ्या आहेत. या लेखामध्ये तिन्ही पदांसाठीच्या परीक्षांमध्ये इंग्रजी भाषेसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा व त्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.

Que : A company secretary must be conversant with labour law. Which one of the following does the model ‘must’ in the sentence above?

1) Obligation       2) advice

3) suggestion      4) necessity

Que :  Identify grammatically correct sentence(s).

I.The cow is a useful animal.

  1. Cow is a useful animal.

Options :

1)  Only I is correct

2)  Only II is correct

3)  Both I & II are correct

4)  Both I & II are incorrect

Que : Rice is not more nutritious than some other grains are.

Identify the correct positive degree of the sentence.

1)    Some grains are at least as nutritious as rice.

2)    Very few grains are as nutritious as rice.

3)    Some grains are not less nutritious than rice.

4)    Rice is not more nutritious than some other grains are.

Que : Choose the correct meaning of expression

‘A white Elephant’

1) An unusual event

2) A beautiful object

2) A possession that is burdensome

4) An elephant that is white in color

Que : Match the following :

(a) Carry can      (i) To help

(b) Carry through  (ii) To win

(c) Carry the day  (iii) To be in love with

(d) Carry a torch for  (iv) To take the blame

Options :

1) (a) – I , (b) – IV, (c) – III, (d) -II

2) (a) – I , (b) – IV, (c) – II, (d) – III

2) (a) – IV , (b) – I, (c) – II, (d) – III

4) (a) – IV , (b) – I, (c) – III, (d) – II

Que : Identify the part of speech of the underlined wordo

He is an idle boy, he does not work.

1) Noun            2) Verb

3)  Adverb         4) Adjective

Que : Select the correct options underlinedo

(a) Indians are good to/of/at cricket.

(b) It is very good to/of/at to help me.

(c) He is very good to/of/at others though he is reach.

Options :

1) (a)- to  , (b) – at, (c) – of

2) (a) -of  , (b) – to, (c) – at,

2)(a) – at , (b) – of, (c) – to,

4) (a) – of , (b) – at, (c) – to,

Que :  The following sentence is divided into four parts (a), (b), (c), (d) one of which contains error. Spot the error and mark the part as incorrect.

The  / two brothers / hated / one another.

(a)             (b)                   (c)            (d)

Options :

1) (a) Only  2) (b) Only

3) (c) Only  4) No error.

Que : Choose the option with all four words spelt correctly.

2)     Lightening, noticeable, vacuum, occasional

3)     Lightning, noticeable, vacuum, occasional

4)     Lightening, noticeble, vaccum, occasional

5)     Lightning, noticeable, vaccum, occasional

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे समजून घेता येतील. :

इंग्रजी वाक्यरचनेचे प्रकार व त्याचे नियम बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. प्रयोग, काळ आणि तुलनांचे स्तर (Degrees of Comparison) या घटकाचा अभ्यास कसा करावा, यासाठी सिव्हिल्स महाराष्ट्र – राज्य लोकसेवा आयोग परीक्षा माहितीकोश हे पुस्तक उपयोगी ठरेल.

शब्द रचना, स्पेिलग, शब्दांचे प्रकार, यांवर सरळ व विश्लेषणात्मक अशा दोन्ही प्रकारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. रेन ऑड मार्टिन किंवा कोणत्याही इंग्रजी व्याकरणाच्या प्रमाणित संदर्भ ग्रंथाचा वापर करावा.

व्याकरणाच्या प्रश्नांसाठीही इंग्रजीचे आकलन आवश्यक आहे. वाक्य / शब्द यांचा अर्थ समजून घेऊन व्याकरणाचे नियम लागू करणे अशा प्रकारे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.

समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी रोजचे इंग्रजी वाचन व त्याचे आकलन याचा सराव आवश्यक आहे. वाक्प्रचार, म्हणी व अनेक शब्दांसाठी एका शब्दाचे उपयोजन यांची तयारी कशी करावी यासाठीही सिव्हील्स महाराष्ट्र वाचावे.

उताऱ्यावरील प्रश्न हा काही पदांसाठीच्या पेपरचा घटक नव्हता. मात्र आता मुख्य परीक्षेमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या तयारीसाठी रोजचे वाचन आणि आकलनाचा सराव आवश्यक आहे.

इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन

english study planning

3369   05-Jun-2018, Tue

विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा या तीनही परीक्षांसाठी  मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासाची रणनीती पाहिली. आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.

*  अभ्यासक्रम इंग्रजी हा विभाग अभ्यासाला घेताना सर्वप्रथम आपण आयोगाने नमूद केलेला अभ्यासक्रम पाहिला तर त्यामध्ये  Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrases,  Comprehension of Passages  या घटकांचा समावेश होतो.

*  प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण –  इंग्रजीच्या अभ्यासाची सुरुवातसुद्धा प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि प्रश्नांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालूनच करावी लागेल. यावरून आपल्याला कोणत्या उपघटकावर अधिक भर द्यावा लागेल, कोणत्या घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागेल तसेच कोणत्या घटकांचे पाठांतर करावे लागेल याचा अंदाज काढता येतो. पेपर एकमध्ये इंग्रजी या विषयावर एकूण १०० पैकी ४० प्रश्न विचारले जातात.

*  व्याकरण (Grammar)

या विभागांतर्गत विचारले जाणारे प्रश्न फारसे अवघड नसतात; परंतु थोडेसे फिरवून विचारले जातात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रश्न लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक उत्तरे निवडली पाहिजेत. यामध्ये  Spotting Error, Fill in the blanks, Jumbled Sentences, Synonyms, Antonyms, Spellings/Detecting Mis-Spelt words, Sentence Improvement या घटकांवर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. Active and Passive Sentences, parts of speech  या घटकांवर देखील काही प्रश्न विचारले जातात.

Basic Grammar वर जर प्रभुत्व असेल तर या विभागातील प्रश्न सोडविणे फारसे कठीण जात नाही.  Sentence Formation च्या पद्धती, उत्तम Reading Ability व योग्य Vocabulary (शब्दसंग्रह) यांच्या माध्यमातून या घटकांवर प्रभुत्व मिळविता येऊ शकते.

त्याचबरोबर पुढील काही मूलभूत तंत्रे विकसित केल्यास परीक्षाभिमुख अभ्यास करणे नक्कीच सुकर होऊ शकते. यापैकी काही महत्त्वाच्या घटकांसाठी पुढे काही तंत्रे दिली आहेत त्यांचा उपयोग करावा.

*  Spotting Error and Sentence Improvement : या घटकावर साधारणपणे ४ ते ५ प्रश्न विचारले जातात. या मध्ये  Grammatical Error शोधायचा असतो. यासाठी सर्व प्रथम पूर्ण वाक्य नीट काळजीपूर्वक वाचावे. बऱ्याच वेळा या टप्प्यावरच आपल्याला समजतो, परंतु वाक्य काळजीपूर्वक वाचूनही जर चूक सापडली नाही तर Subject-Verb Agreement योग्य आहे का ते पाहावे, यानंतरही तुम्ही उत्तराबाबत साशंक असाल तर वाक्याचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे अभ्यासून अंतिम उत्तर शोधावे.

Fill in the blanks, Sentence Structure : या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यासाठी सर्व प्रथम पूर्ण वाक्य नीट काळजीपूर्वक वाचावे व पर्यायी उत्तरांमधून योग्य तो शब्द गाळलेल्या जागी बसविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी काही पर्याय  करून योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येते. परंतु अंतिम उत्तर निवडण्यापूर्वी रिकामी जागा भरून वाक्याला योग्य अर्थ प्राप्त होतो का आणि ते वाक्य वाचताना व्याकरणदृष्टय़ा योग्य आहे का ते पहावे.

* Synonyms and Antonyms: या घटकावर साधारणपणे २ ते ३ प्रश्न विचारले जातात. दररोज किमान १० नवे इंग्रजी शब्द आत्मसात करावेत आणि त्यांचा अर्थ समजून घेऊन वाक्यात उपयोग करावा. यासाठी काही, युक्त्या वापरता येऊ शकतील. पाठांतर आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर हा या घटकावर प्रभुत्व मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे.

*   Use of Idioms and Phrases : या घटकावर साधारणपणे ३ ते ५ प्रश्न विचारले जातात. यासाठी Idioms and Phrases चा एकत्र संग्रह करून त्यांचे पाठांतर आणि वाक्यात उपयोग करण्याचा भरपूर सराव करावा.

*  Active and Passive Sentences and Tenses: या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यासाठी Active Voice, Passive Voice यांची उदाहरणे त्यांचे परिवर्तन वाक्यांचे काळ परिवर्तन त्यासाठी असणारे मूलभूत व्याकरणाचे नियम अभ्यासून अधिकाधिक सराव केल्यास हा घटक नक्कीच उत्तम गुण प्राप्त करून देतो.

*   Parts of speech : या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यामध्ये nouns, pronouns, adjectives, verbs, adverbs, prepositions, conjunctions and interjections या प्रमुख आठ  Parts of speech आणि त्यांच्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात.

*   Comprehension of Passages

या विभागावर साधारणपणे ५ प्रश्न विचारले जातात. या विभागातील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकलनक्षमता सुधारली पाहिजे तसेच भरपूर वाचन आणि सराव यावर भर देणे अपेक्षित आहे.

एकूणच विद्यार्थी मित्रहो, या परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी भरपूर पाठांतर, योग्य तो परीक्षभिमुख सराव आणि सराव चाचण्यांच्या माध्यमातून तुम्ही अपेक्षित यश निश्चितच मिळवू शकता. या अभ्यासासाठी  ‘High School English Grammar and Composition’ हे  Wren and Martin यांचे पुस्तक वापरता येईल.

इंग्रजी अनिवार्य

english-essentials articleshow

1278   14-Oct-2018, Sun

मुख्य परीक्षेचा विचार करता त्यात दोन पेपर अनिवार्य असतात. एक म्हणजे 'इंग्रजी' आणि दुसरा स्थानिक भाषेचा उदा. मराठी, गुजराथी, तेलगू आदी. विद्यार्थ्यांना इंग्रजी सोडून दुसरा पेपर निवडण्याची मुभा असते. तसेच या दोन्ही पेपरमध्ये २५ टक्के म्हणजेच ३०० पैकी ७५ गुण मिळवणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत. त्यामुळे या दोन्ही पेपरचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. 

‍'इंग्रजी अनिवार्य' या पेपरचा विचार करता खालील बाबी लक्षात घ्याव्यात : 

१) हा पेपर विद्यार्थ्यांच्या भाषेविषयीचे मूलभूत ज्ञान तपासणे यासाठी असतो. 

२) भावी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील भाषेबद्दल मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. 

३) दहावी व बारावीच्या स्तरावरील भाषेतील मूलभूत संकल्पना यात विचारल्या जातात. 

४) २५ टक्के म्हणजेच ७५ गुण ही किमान पात्रता आयोगाने निर्धारित केली आहे. 

५) बऱ्याचदा विद्यार्थी या पेपरला गांभीर्याने घेत नाही. त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. कारण या पेपरमध्ये ७५ गुण नाही मिळाले तर इतर पेपर तपासले जात नाहीत. 

६) या पेपरसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही; परंतु गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून त्यातील मूलभूत संकल्पना समजून घेणे. 

७) शालेय जीवनात भाषेत शिकलेले घटक इथे विचारले जातात.‍ त्यामुळे आपल्याला परि‌चित असलेल्या घटकांवरच प्रश्न विचारण्याची एकंदर वृत्ती आयोगाची आहे. त्यामुळे शालेय जीवनातील या घटकांना उजाळा देऊन आपण या पेपरमध्ये सहज उत्तीर्ण होऊ शकतो. 

इंग्रजी अनिवार्य पेपरचे स्वरूप 

गुण : ३०० 

वेळ : ३ तास 

पात्रता : ७५ गुण (२५ टक्के) 

इंग्रजी ‌अनिवार्यमध्ये विचारले जाणारे घटक : 

१. निबंध : १०० गुण 

२. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या : ७५ गुण 

३. सारांश लेखन : ७५ गुण 

४. व्याकरण : ५० गुण 

व्याकरणाच्या बाबतीत नेमके काय विचारणार ते आयोगाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे व्याकरणातील कोणत्याही घटकावर प्रश्न विचारण्याचा विशेषाधिकार आयोगाने स्वत:कडे राखून ठेवला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आपण हे जाणून घेऊ शकतो की आयोग पुन्हा पुन्हा कोणत्या घटकांवर प्रश्न विचारत आहे. 


I) २०१८ पेपर : निबंध - इंग्रजी अनिवार्य - 

खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ६०० शब्दांत १०० गुणांसाठी निबंध लिहिण्यासाठी सूचना आयोगाने पहिल्या प्रश्नात केली आहे. 

a) Impact of waterisation on the Indian family 

b) Literature Mirrors Society 

c) Women in Indian Pacifics 

d) Rural-Urban divide in India 

वरीलपैकी कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात. 

निबंध हा भाषेचा एक घटक आहे. 

भाषेच्या पेपरमध्ये निबंध लिहिताना 'जीएस'प्रमाणे लिहू नये. 

निबंध लिहिताना ज्याप्रमाणे निबंधाच्या पेपरमध्ये गांभीर्याने आपण लिहितो त्याच गांभीर्याने या पेपरलाही आपण सामोरं गेलं पाहिजे. 


II) उतारा वाचून उत्तरे लिहा. (Comprehension) 

या प्रश्नात एक उतारा दिलेला असतो. त्या उताऱ्यावर पाच प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे एक प्रश्न १५ गुणांसाठी विचारलेला असतो. तेव्हा उतारा नीट वाचून स्वत:च्या शब्दांत प्रश्नाची उत्तरे लिहावीत. बऱ्याचदा शालेय जीवनातल्या सवयी असतात की, प्रश्नातील शब्द उताऱ्यात पाहून तसेच्या तसे वाक्य खाली उत्तरात लिहावे. असे करता कामा नये. 

III) सारांश लेखन (Precise Writing) 

या प्रश्नात दिलेल्या उताऱ्याच्या एक तृतीयांश इतके सारांश लेखन करणे अपेक्षित असते. सारांशलेखन करताना उतारा वाचून त्याचा अर्थ समजून तो स्वत:च्या शब्दांत मांडणे आवश्यक असते. उ‌ताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी सारांश लेखनात लिहू नयेत. 

IV) ‍व्याकरण 

२०१८ च्या पेपरचा विचार करता खालील घटकांवर प्रश्न विचारलेले आढळून येतात. 

Write the following sentences after makingg necessary corrections. 

Supply the missing words 

Use the correct forms of the verbs in brackets 

Write the antonyms of the following 

Write the following sentencesas directed without changing the meaning 

Use the following idioms/Phrases in sentences 

अशा प्रकारे व्याकरणात प्रश्न विचारले जातात.

एमपीएससी मंत्र : अभ्यासाची रणनीती भाषा (वस्तुनिष्ठ)

 MPSC Mantra: Study Strategy Language (Objective)

4695   24-May-2018, Thu

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयासाठी प्रत्येकी ५० गुणांसाठीचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. दोन्ही भाषांसाठी व्याकरणावर प्रत्येकी ४५ आणि उताऱ्यावरील आकलनाचे प्रत्येकी ५ प्रश्न विचारण्यात आले आहेत.

१०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. पेपरचा स्तर पदवी परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशा काठीण्य पातळीचा असल्याचे लक्षात येते.

व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतील. भाषा विषयामध्ये भरपूर गुण मिळवण्याकरता भावार्थ व शब्दप्रभुत्व कमजोर असल्यास येणाऱ्या मर्यादा येथे कमी प्रमाणात जाणवतील.

आणि त्यामुळे चांगला स्कोअर करता येईल. अर्थात पदवी परीक्षेची काठीण्य पातळी आहे म्हटल्यावर व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागणार नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येईल. एकूणच वस्तुनिष्ठ भाषा म्हटले तरी भाषेतील वेगवेगळ्या अर्थछटा माहीत करून घेतल्या तर हा पेपर कमी वेळेमध्ये यशस्वीपणे सोडविता येईल.

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी-वाक्प्रचार आणि आकलन असे ढोबळमानाने तीन भाग दिसून येतात. व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथकरण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे टेबल, सामासिक शब्दांची उकल, महत्त्वाचे तत्सम, तद्भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे  नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. यामुळे अनोळखी शब्द विचारला गेल्यास कॉमन सेन्स वापरून प्रश्न सोडविता येईल. इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल, तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषांसाठीचा टेबल आणि महत्त्वाच्या क्रियापदांची past participle, past perfect participle यांचे टेबल पाठच असायला हवे. शब्दरचनेचे मराठीतील नियमही माहीत असणे आवश्यक आहे. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात.

मात्र नियम आणि त्यांच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाचे नाही. त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांशी संबंध ओळखता येणे महत्त्वाचे आहे. या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे. नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

म्हणी व वाक्प्रचार हा या पेपरमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन  सेन्स यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो.

कॉमन सेन्समुळे म्हणी आणि वाक्प्रचारांचा इतर प्रसंगांशी संबंध जोडता येणे शक्य होते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा पिंट्रआउट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी, उकारांमधील बदलामुळे तसेच काना, मात्रा, वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणि (हात) आणि पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे / स्पेलिंगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द Tricky ठरतात. उदा. Expect आणि except  या शब्दांमध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

व्याकरणाचे नियम पक्के केले तरी भाषा विषयाच्या तयारीमध्ये त्या त्या भाषेतील वेगवेगळ्या विषयांवरचे लेखन वाचनात येणे आणि त्याचे आकलन होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आकलनासहित वाचन आणि नियमांचा सराव अशी रणनीती या पेपरच्या तयारीसाठी योग्य ठरेल.

निबंधलेखनातील अडचणींचा वेध

essay writing problems

4286   06-Jun-2018, Wed

कोणत्याही विषयाची तयारी करताना, त्यात कुठे आणि कशा अडचणी येणार आहेत, हे लक्षात घेऊन तयारी केल्यास ती अधिक उत्तम होते. या लेखात आपण निबंध लेखनाविषयीचे अजून काही मुद्दे पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने निबंध लिखाणाला सुरुवात केल्यानंतर प्रभावी सुरुवात आणि शेवट कसा करावा हे आपण पाहणार आहोत. तसेच एकंदरीत निबंध लेखनासाठी आवश्यक भाषा व शैली याचा विचारही आपण करणार आहोत.

प्रस्तावनेचा परिच्छेद –

प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे. दिलेल्या विषयाची प्रमुख भूमिका निश्चित करणे आणि प्रमुख मुद्दा ठामपणे मांडणे हे या परिच्छेदाचे महत्त्वाचे काम आहे. पुढे येणाऱ्या गुंतागुंतीच्या लेखनाला दिशा देणारा हा परिच्छेद आहे. वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी वाक्ये येथे असली पाहिजेत. अशा प्रकारची सुरुवात खालीलपकी एखादी मांडणी करून केली जाऊ शकते.

  • माहितीचा रंजक नमुना
  • आश्चर्यकारक माहिती
  • विषयास लागू असणारा सुविचार
  • आपल्या आजूबाजूला असणारा पण सहज लक्षात न येणारा विरोधाभास
  • अवघड संकल्पनेचे स्पष्टीकरण
  • एखाद्या घटनेचे थोडक्यात वर्णन
  • विचार करण्यास प्रवृत्त करणारा प्रश्न

थेट विषय प्रवेश

साधारणत: ८०० शब्दांपेक्षा कमी शब्दात लिहिलेल्या निबंधाकरता खूप मोठी प्रस्तावना आवश्यक नाही. परंतु १२०० शब्दांचा निबंध लिहीत असताना सविस्तर प्रस्तावनेतून निबंधाची भूमिका स्पषष्ट करणे शक्य होते. अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर स्पष्टीकरणांवर वेळ अथवा शब्द वाया न घालवता प्रमुख मुद्दय़ांच्या मांडणीला सुरुवात करावी. आपण लिहीत असलेल्या विषयांच्या संदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा दाखला देऊन मूळ लिखाणाला सुरुवात करता येते. मात्र अशी सुरुवात करत असताना तोचतोचपणा टाळावा. तसेच ‘सध्या क्ष हा अतिशय कळीचा प्रश्न बनला आहे..’ किंवा ‘मनुष्य कायमच क्ष प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे..’ अशा ठोकळेबाज वाक्यांचा वापर टाळावा. इतकी व्यापक मांडणी जवळपास कोणताही महत्त्वाचा मुद्दा कवेत घेऊ शकते, म्हणूनच आपली सुरुवात ही अचूक भूमिका असणाऱ्या वाक्यांनी व्हावी.

अतिशय व्यापक- गुन्हेगारी ही सर्वच काळातील एक मोठी समस्या आहे.

मुद्देसूद- बालगुन्हेगारांच्या शिक्षेची तीव्रता व त्यासंबंधीच्या समस्यांनी सध्याचे चर्चा विश्व व्यापले आहे. गेल्या काही वर्षांतील बालगुन्हेगारांच्या वाढत्या नोंदींमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

निष्कर्ष

निबंधाच्या शेवटचे परिच्छेद प्रभावी असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. निष्कर्षांचे परिच्छेद डौलदार भाषेत, योग्य शैलीचा वापर करून लिहावेत. एखादा संस्मरणीय विचार, चलाख तार्किक युक्तिवाद किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यातील प्रश्न सोडवण्यासाठीचा कृतीक्रम या किंवा अशा मुद्दय़ांनी निबंधाचा शेवट करावा. निबंध वाचून पूर्ण झाल्यानंतर वाचणाऱ्याच्या मनात कोणती छाप असावी असे आपल्याला वाटते? त्यास धरून निष्कर्ष लिहावा.

निष्कर्षांच्या परिच्छेदामधील आधी लिहिलेले मुद्देच परत लिहिण्याने निष्कर्ष प्रभावी होत नाही. असे केल्याने निष्कर्ष एकसुरी व निष्प्रभ ठरतो. प्रभावी शेवट करण्यासाठी वरती दिलेल्या मुद्दय़ांव्यतिरिक्त विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा, अर्थपूर्ण शब्दांची योजना करून वाचणाऱ्याच्या लक्षात आणून दिले जाऊ शकते.

निष्कर्षांचा परिच्छेद आटोपशीर असावा. २० ओळींपेक्षा मोठा निष्कर्ष लिहिण्याचे टाळावे. अतिशय हुशारीने तुम्ही विषयाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडत आहात, अशा भूमिकेतून निष्कर्ष लिहिला जाणे अपेक्षित आहे. पूर्णत: नवीन संकल्पना, विचारांची साखळी या परिच्छेदात मांडू नये. परंतु असे करत असताना निबंधातील मुद्दे पुन:पुन्हा देण्याचे टाळावे. अशाप्रकारचा निष्कर्षांचा परिच्छेद लिहिण्यासाठी पुरेसा सराव अत्यावश्यक आहे.

भाषा व शैली

व्याकरणाच्या दृष्टीने योग्य, सुटसुटीत व प्रभावी वाक्ये कोणत्याही चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे घटक असतात. सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा नाही. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या निबंध विषयांवर लेखन करताना मजकुराबरोबरच भाषेचीही प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे.

एखाद्या मुद्दय़ाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कशाप्रकारे भर द्यावा, दोन वाक्यांमधील तर्कसंगती स्पष्ट  करण्यासाठी कोणते शब्द वापरावेत, आपल्याजवळील माहितीचा वापर करून ठामपणे मत मांडत असताना अनावश्यक अधिकाराचा सूर कसा टाळावा या सर्व गोष्टी योग्य भाषेच्या वापरामधून साध्य होतात.

प्रगल्भ विचार व भाषा यांचा वापर म्हणजे केवळ जड व मोठय़ा शब्दांची खिरापत नाही. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्याला खात्री नाही, असे शब्द वापरणे टाळावे. तसेच फार मोठमोठे, अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपले लिखाण दिखाऊ होत नाही ना याची काळजी घ्यावी. आपले लिखाण जर नसर्गिकरीत्या गुंतागुंतीचे व अनेक पातळ्यांवर विश्लेषण करणारे असेल तर, शब्दांचा वापर आपोआपच अधिक प्रगल्भ होत जातो.

प्रत्येक वाक्य छोटे व सुटसुटीत असेल याची खबरदारी घ्यावी. वाक्य मोठे झाल्यास योग्य ठिकाणी स्वल्पविराम, अर्धस्वल्पविराम, विसर्ग चिन्हांचा योग्य वापर करावा. संपूर्ण अर्थबोध होऊ शकणार नाही इतकी मोठी वाक्ये करण्याचे मुळातच टाळावे. कोणतेही अर्थपूर्ण लेखन करण्याकरिता वरील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

निबंध कसा लिहावा?

how to write essay

3760   06-Jun-2018, Wed

अर्थपूर्ण व सुसूत्र मांडणी असलेला निबंध लिहिण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करावा लागतो. आज आपण त्यातील काही टप्प्यांची माहिती करून घेणार आहोत.

१) आराखडा

पेपरमध्ये दिलेले सर्व निबंध विषय काळजीपूर्वक वाचावेत. ज्या विषयाबद्दल आपल्याला पुरेसा आत्मविश्वास वाटतो तो विषय निश्चित करावा. एकदा विषय नक्की करून लिखाणास सुरुवात केल्यानंतर पुन्हा विषय बदलला जाऊ शकत नाही. विषय निश्चित करत असताना, त्या विषयाबद्दल आपल्याला किती माहिती आहे व एकंदरीतच त्या विषयाचे लिखाण करण्याकडे आपला किती कल आहे याचा अंदाज घ्यावा.

सुरुवातीची २० ते ३० मिनिटे विषय निश्चित करण्यात व कच्चा मसुदा तयार करण्यात गेली तरी हरकत नाही. कच्चे काम करण्यासाठी उत्तरपत्रिकेमध्ये जागा दिलेली असते. निबंधविषयाशी संबंधित मुद्यांचे टिपण काढून कच्चा आराखडा तयार करावा. निबंधामध्ये येणाऱ्या सर्व प्रमुख मुद्यांचा यामध्ये समावेश असावा. यातून लिखाणाला नक्कीच दिशा मिळण्यास मदत होते. तीन तास सलग लिखाण करण्याकरिता अशा नियोजनाची व त्यास अनुसरून मांडणी करण्याची नितांत गरज असते.

एकदा लेखनाची रचना ठरली की, त्याप्रमाणे एकसमान लयीत मांडणी करावी. अनेकदा लिहित असताना नवीन मुद्दे, संदर्भ आठवतात. त्यांचा लिखाणात जरूर समावेश करावा. मात्र असे करत असताना मूळ रचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. असे नियोजन केल्याने लेखन करण्याआधी विषयासंबंधीचा पूर्ण विचार केला जातो. संपूर्ण निबंध लिहून झाल्यानंतर जर असे लक्षात आले की, नियोजनावर अजून थोडा वेळ खर्च करायला हवा होता तरी त्याचा काही उपयोग नाही.

मुक्त शैलीत निबंध लिहिल्यास, नंतर आढावा घेत असताना काही परिच्छेद गाळायला हवेत असे वाटल्यास काहीही केले जाऊ शकत नाही. अशा सर्व प्रकारचे रचनेतील बदल आराखडय़ाच्या टप्प्यावरच करणे शक्य आहे. अशा प्रकारे उत्तम नियोजनानंतर लेखन करत असताना विचार करण्यात खूप वेळ खर्च होत नाही. लेखनाच्या मांडणीकडे, शब्दांच्या वापराकडे पुरेसे लक्ष दिले जाते. अर्थातच लिहीत असताना झालेल्या लिखाणाचा आढावा घेणे आवश्यक असते.

२) मूळ हेतू /प्रमुख दावा

निवडलेल्या विषयासंबंधी कोणता प्रमुख मुद्दा आपल्याला सांगायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. आपण सांगत असलेला मुद्दा ठामपणे सांगण्यामागील मूळ हेतू कोणता, याबद्दल लिखाणात स्पष्टता असणे आवश्यक आहे. यामधून वाचणाऱ्याला लेखनाची एकंदरीत दिशा कोणती हे समजण्यास मदत होते. एकंदरीतच स्पष्ट मूळ हेतूशिवाय चांगला निबंध लिहिणे अशक्य आहे.

हा प्रमुख मुद्दा/दावा पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी येणे अपेक्षित आहे. विषयाच्या सुरुवातीला जी तोंडओळख करून दिली जाते त्याला जोडूनच हे ठाम मत येणे आवश्यक आहे. पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी हे विधान असण्याची वाचक किंवा निबंध तपासणारी व्यक्ती अपेक्षा करते. एकदा प्रमुख मुद्दा लक्षात आल्यानंतर त्या संदर्भातील अधिक बारकावे असलेला युक्तिवाद निबंधात असेल अशी अपेक्षा केली जाते.

३)युक्तीवादात्मक दावा (Arguable Claim)

तुम्ही मांडत असलेले ठाम मत युक्तिवादात्मक असावे. तसेच हे मत मांडत असताना तुमचे लेखन त्या विषयावरील अधिक बारकावे व खोली असणाऱ्या चच्रेचा भाग होऊ शकते असे असावे. आपले मत युक्तिवादात्मक आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता, आपल्या मताच्या विरुद्ध मताचे समर्थन केले जाऊ शकते का? असा विचार केला पाहिजे. जर का आपण मांडत असलेल्या मुद्यांच्या विरोधी कोणतेही मत अथवा युक्तिवाद शक्य नसेल तर, आपला मुद्दा केवळ ‘माहिती’ असण्याची शक्यता आहे.

अ-युक्तिवादात्मक (Non -Arguable Claim) – संगणक हे कामकाज सांभाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. (याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणूनच हे विधान म्हणजे केवळ माहिती आहे.)

युक्तिवादात्मक (Arguable Claim) – संगणकाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक कारण असू शकते. (विविध माहिती व आकडेवारी सादर करून वरील विधानाचे समर्थन केले जाऊ शकते. तसेच वरील विधान असत्य मानणे व त्याबाजूने युक्तिवाद करणे शक्य असू शकते.)

राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर - २ (इंग्रजी)

mpsc english

2483   05-Jan-2018, Fri


एका तासात १०० प्रश्न सोडवायची कसरत विद्यार्थ्यांना करायची आहे. त्यामुळे या परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन चुकवण्यासाठी दोन पॅसेजेसवर १० प्रश्न ठेवतील, असा अंदाज बांधता येईल. ५० गुणांच्या इंग्रजीमध्ये अशाप्रकारे साधारणतः १८ ते २० गुणांचे व्याकरणावर आधारित प्रश्न, २० ते २२ गुण हे idioms, phrases, proverbs, one word substitute, antonyms व synonyms, इत्यादींवर आणि १० गुण पॅसेजेसवर येतील असे वाटते. प्रत्यक्षात काय येईल, ते लवकरच समजेल

 


अभ्यासाची दिशा

व्याकरणाचा अभ्यास करताना Spot the error व Correct आणि incorrect Sentences ओळखता येणासाठी ' दररोज इंग्रजीमधील नियम वाचून, समजावून घेऊन Objective प्रश्न कसे

पडतात यासाठी २०११ पासून २०१५पर्यंत आयोगाने घेतलेल्या PSI, STI आणि Assistant

यांच्या प्रश्नपत्रिकांचा जरूर अभ्यास करावा.

प्रचलित प्रश्नपद्धती

प्रत्येक प्रकरणात कसे प्रश्न पडले आहेत हे बघावे. आयोगाच्या सर्वांत शेवटी झालेल्या STIच्या परीक्षेचा यासंबंधाने विशेष उल्लेख करावासा वाटतो. आयोगाने प्रश्न विचारण्याचा पद्धतीत खूपच बदल केला आहे. त्यामुळे नियमांना चिकटून न राहता वाक्य नियमानुसार आहेत का, आणि विद्यार्थ्यांना हे समजते का, हे पाहण्याच्या दृष्टीने प्रश्न तयार केले जात आहेत. जसे - Subjunctiveच्या नियमाप्रमाणे Fill in the blanks न देता चार वाक्ये वेगवेगळी देऊन त्यातील कोणते वाक्य किंवा कोणती वाक्य बरोबर आहेत किंवा सर्वच बरोबर आहेत किंवा सर्व वाक्य चूक आहेत हे ओळखण्यास विचारले जात आहे.

निष्कर्ष

थोडक्यात आयोगाला तुमच्याकडून भाषेचा खूप खोलवर अभ्यास अपेक्षित आहे. Active Voiceचे Passive Voice करायला न देता, चार वाक्य देऊन त्यातील वेगळे वाक्य/वेगळी वाक्य कोणती, असे प्रश्न विचारले जात आहेत. पण व्याकरणाचे गुण हे गाणिताप्रमाणे अचूक गुण देतात, त्यामुळे सततचे व दररोजचे पारायण करावे, जेणेकरून व्याकरणाच्या नियमांशी मैत्री होईल.

प्रश्न सोडवायचा क्रम

Idioms, Proverbs व Phrasesसाठी A to Zसारखे पुस्तक जवळ ठेवावे. नियमित काही Phrases पाहाव्या व लक्षात ठेवाव्यात. जेवढे इंग्रजी वाचन वाढेल, तेवढा त्याचा फायदा परीक्षेत आधिक होईल. Idioms व Phrasesचा अर्थ शोधताना elimination पद्धत वापरावी. अर्थात, यासाठी वाचन व शब्दसंग्रह आवश्यक असतो. आता उरलेल्या दिवसांसाठी सूचना करावीशी वाटते की, पाठांतरावर जोर देण्यापेक्षा व्याकरणाच्या नियमांशी अधिक जवळीक साधावी व अधिकाधिक सराव करावा. यातून हमखास गुण मिळू शकतात. यानंतर One-word Substitute व त्यानंतर Idioms व Phrasesकडे वळावे.

पॅसेजेसवरील प्रश्न सोडवताना प्रथम पॅसेजेसवर काय प्रश्न विचारले गेले आहेत ते वाचावे. म्हणजे पॅसेजमध्ये उत्तर शोधता येते व एकूणच पॅसेजचा विषय समजतो. वाचन बारकाईने केल्यास विचारलेले प्रश्न आधीच माहीत असल्याने उत्तर लवकर मिळण्यास मदत होऊ लागते.

५० मधील ३० ते ३५ गुण मिळवण्याच्या उद्देशाने पेपर सोडवावा. सगळे प्रश्न सोडवण्याचा अट्टाहास करू नये. निगेटिव्ह मार्किंग आहे, याकडे लक्ष ठेवावे. अचूक उत्तरे माहीत झाल्यानंतर त्याचे मार्क्स बघून निर्णय घ्यावा. लक्षात ठेवा, अंदाजाने टिकमार्क करू नका. आयोगाने बदललेली पद्धत गुणांची खिरापत करणारी नाही, याचा विसर पडू देऊ नका.

निबंध

 Essay writing

8546   05-Jan-2018, Fri

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या दोन भाषा विषयात अधिक गुण मिळतील, त्यांनी वरच्या रँकची अपेक्षा ठेवावी, एवढे हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. मुख्य परीक्षा जवळ येत असताना, उरलेल्या शेवटच्या दिवसांत, विशेषतः इंग्रजी या परीक्षेची तयारी कशी करावी, हाच यक्षप्रश्न अनेकांपुढे असेल. त्यातील निबंधाचा विचार येथे करू या.
अलिकडे परीक्षेत चालू घडामोडी, ठळक घटना, इत्यादींवर विचारला जातो. त्यामुळे हे विषय कोणते असू शकतील, याचे अंदाज प्रत्येकाने बांधले असतील. पुढील काही विषयांकडे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्ष द्यावे. जसेः Odd and Even Formula to Curb Pollution, Water Conservation - A need of Hour, 'Sairat'- in 100 Crore Club, Perils of Inter-Caste Marriage (या चित्रपटाच्या अनुषंगाने उभा राहिलेला विषय म्हणून याकडे बघता येईल), Should there be censor Board, Rain - Water Harvesting, Farmers suicide, इत्यादी विषय महत्त्वाचे आहेत.
खालील मुद्दे निबंधासाठी विशेष लक्षात ठेवावे.
निबंधाची सुरुवात आकर्षक असावी, जेणेकरून निबंध पुढे वाचण्याची उत्कंठा वाढली पाहिजे जसे- शेतकरी आत्महत्या विषयावरील निबंधासाठीः Just Five paise a kg! Impossible! How Could it be! What the hail is this going on? Is it the value of the farmers hard work ?.......etc.

यानंतर मात्र लगेच निबंधाच्या टॉपिकची ओळख व त्या विषयाचे गांभीर्य याचा उल्लेख करावा.


पुढचा भाग म्हणजे 'The body of an Essay' असतो. निबंधाचे हे हृद्यच म्हणा ना! यामध्ये मुख्य कल्पना, तपशील व आपण मांडत असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ एखादे छोटे उदाहरण असावे.

निबंधात किती पॅराग्राफ असावेत याला मर्यादा नसते, पण प्रत्येक स्वतंत्र व नवीन विचारासाठी नवीन पॅरा करावा. साधारणतः या परीक्षेसाठी तीन किंवा चार पॅराग्राफ शब्दसंख्या लक्षात घेता पुरेसे ठरावेत.

शेवटच्या पॅराग्राफमध्ये थोडक्यात सर्व मतांचा सारांश मांडून, स्वतःचे मत मांडावे व काही सूचना लिहाव्यात.

निबंधात कधीही पूर्ण गुण देत नसतात. तेव्हा गुण कमी कसे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे विशेषतः इंग्रजी व्याकरणाच्या चुका नसाव्यात. विविध प्रकारच्या वाक्यरचनांचा वापर करावा. त्याला स्पेलिंग व विरामचिन्हे व्यवस्थित द्यावीत.

निबंधात आशय भरपूर असावा, त्याला आधिक महत्त्व आहे. निबंधाचे सादरीकरण मुद्देसुद असावे. त्यात थापा मारून विनाकारण निबंध वाढवण्याच्या फंदात पडू नये. विचारांची स्पष्ट मांडणी, सुसूत्रता, आशय आणि सादरीकरण यात कमी पडू नये.

निबंधामध्ये थोर व्यक्तींची विधाने उद्धृत करावी का, असा अनेकांचा प्रश्न असतो. यावर एवढेच सांगावेसे वाटते की, माहिती असल्यास व विषयाला अनुलक्षून असल्यास जरूर टाकावे. मुद्दामून अशी विधाने पाठ करण्याची गरज नाही. शेवटी आयोगाला तुमची भाषा व त्या भाषेवरील तुमचा आत्मविश्वास बघायचा आहे. तुम्ही साहित्यिक असावे, हे आयोगाला नक्कीच अपेक्षित नाही. जे इंग्रजी निबंधाच्या बाबतीत आहे, तेच मराठीच्या बाबतही लागू होते.

इंग्रजी व्याकरणाच्या वाक्यरचनेत कमीत कमी चुका, विविध प्रकारच्या वाक्यांचे उपयोग (Simple, Compound, Complex) व आशयघन निबंध असल्यास १८ ते २०च्या दरम्यान गुण पडण्यास काही हरकत नाही.


Top