एमपीएससी:  लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा

mpsc-GROUP C MAIN exam-preparation-MATHS

992   29-Sep-2019, Sun

गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न मागील वर्षीपासून लागू झाला आहे. लिपिक टंकलेखक पदासाठीचा पेपर दोन या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मागील वर्षी झालेल्या पेपरचे विश्लेषण केल्यास या वर्षीच्या तयारीसाठी दिशादर्शक ठरेल. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या सोबतच्या टेबलमध्ये देण्यात आली आहे.

यापकी बुद्धिमापनविषयक प्रश्नांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. इतर घटकांच्या तयारीबाबत या आणि पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

गणित

 • संख्यांचे प्रकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णाकांवरील क्रिया, लसावि, मसावि, समीकरणे, बहुपदी, आलेख, शेकडेवारी, व्याज, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता,       क्षेत्रफळ, परिमिती यांवर आधारित प्रश्नांचा यामध्ये समावेश होतो.
 • मूलभूत अंकगणितावरील प्रश्न सोडविण्यासाठी सरावच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दहावीपर्यंतची गणिताची तसेच के सागर प्रकाशनाची अंकगणितावरील पुस्तकेही तयारीसाठी उपयुक्त आहेत.
 • पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
 • शेकडेवारी, व्याज, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण हे घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
 • नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र)

 •    इतिहास घटकामध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. मध्ययुगीन व आधुनिक काल खंड यावरील प्रश्न यामध्ये समाविष्ट आहेत.
 •    पाचपकी केवळ एक प्रश्न हा तथ्यात्मक व थेट आहे. बाकीचे चार प्रश्न सोडविण्यासाठी नेमकी माहिती असणे आवश्यक असल्याचे लक्षात येते. त्यामुळे या पाच गुणांसाठीसुद्धा अभ्यास करताना पाठांतराचा शॉर्टकट उपयोगाचा नाही.
 •    ‘एनसीईआरटी व राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पुस्तके’ आणि ‘सतीश चंद्रा’ यांचे ‘मध्ययुगीन भारत’ व ‘बिपिन चंद्रा’ यांचे ‘आधुनिक भारत’ ही पुस्तके अभ्यासावीत. या पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘के सागर प्रकाशना’ने उपलब्ध करून दिला आहे.
 •    भूगोलामध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्नांचा समावेश केलेला आहे. दूरसंवेदनावरही प्रश्न विचारलेला दिसून येतो.
 •    या घटकावरील प्रश्न तथ्यात्मक आणि बऱ्याच अंशी थेट असल्याचे दिसून येतात.
 •    एकूण विषयाचा आवाका पाहता जागतिक भूगोलातील महत्त्वाचे तथ्ये कोष्टकामध्ये मांडून पाठ करण्यापुरतेच मर्यादित ठेवणे व्यवहार्य आहे.
 •    भारताच्या प्राकृतिक भूगोलावर तर महाराष्ट्राच्या आíथक, राजकीय व प्राकृतिक भूगोलावर भर देणे आवश्यक आहे.
 •    या घटकाच्या तयारीसाठी ‘माजिद हुसेन’ यांचे ‘वर्ल्ड जिओग्राफी’, ‘जिओग्राफी ऑफ इंडिया’ आणि ‘के. ए. खतीब’ यांचे ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
 •  नागरिकशास्त्र घटकामध्ये राज्यघटना, स्थनिक स्वराज्य शासन आणि राज्यव्यवस्था विषयातील मूलभूत संकल्पना / सिद्धांत विचारलेले दिसून येतात.

या घटकावरील संकल्पनात्मक प्रश्न हे विषयाची समज असेल तर सोडविता येतील असे आहेत. तर तथ्यात्मक प्रश्नांची काठिण्य पातळी पाहता राज्यघटना व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे कायदे मुळातून व बारकाईने अभ्यासणे आवश्यक ठरते.

या घटकाच्या अभ्यासासाठी ‘एम. लक्ष्मीकांत’ यांचे ‘इंडियन पॉलिटी’ व ‘के सागर प्रकाशना’चे ‘महाराष्ट्रातील पंचायतराज’ ही पुस्तके उपयुक्त आहेत.

शासनाचे प्रकार, त्यांचे चांगले-वाईट गुणधर्म, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, घटनेतील महत्त्वाच्या तरतुदींमागचे तत्त्वज्ञान व हेतू, महत्त्वाची कलमे-मूलभूत हक्क, नीतीनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, केंद्र-राज्य संबंध, कायदा निर्मिती प्रक्रिया, केंद्र व राज्य कायदे मंडळे (संसद, विधानसभा, विधान परिषदा), न्यायपालिका, घटनात्मक पदे या साऱ्याबाबतच्या तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करताना ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांसाठीचे कायदे यांमधील तरतुदी बारकाईने पाहाव्यात.

अंकगणित आणि सामान्य बौद्धिकक्षमता

arithmetic-field-of-study-1886242/

9426   05-May-2019, Sun

अंकगणित या उपघटकाचा विचार केल्यास यामध्ये मूलभूत संख्याज्ञान आणि संख्या वा त्यावर केल्या जाणाऱ्या गणिती क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावि, मसावि आणि घातांकांच्या क्रियांचा अंतर्भाव होतो. याचा पुरेसा सराव होणे अपेक्षित आहे. सामान्य बौद्धिकक्षमता या घटकांवर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मूलभूत संख्या ज्ञानाचा वापर एक साधन म्हणून केला जातो. सामान्य बौद्धिकक्षमता या घटकामध्ये बऱ्याच उपविषयांचा समावेश होतो. यामध्ये रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मूलभूत संख्या ज्ञानाचा वापर करता येतो का हे तपासले जाते. आतापर्यंत वारंवार विचारले गेलेले विषय म्हणजे – काळ व काम, काळ, वेग व अंतर, सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर व प्रमाण, व्याज, नफा व तोटा, वय, पृष्ठफळ आणि घनफळ. या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे प्रश्नामध्ये दिलेल्या शाब्दिक माहितीला आकृतीच्या वा समीकरणांच्या स्वरूपात मांडता येणे. जर हे करता आले तरच आपण मूलभूत संख्याज्ञानाचा वापर करून गणिती क्रियांद्वारे उत्तर शोधू शकतो. यात प्रथम प्रत्येक विषयाच्या मूलभूत संकल्पना आणि त्यांच्या मधल्या परस्पर संबंधांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे की काळ, वेग आणि अंतर यांच्यातील परस्पर संबंध. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रश्नांमध्ये दिलेली माहिती ही आकृती वा समीकरण स्वरूपात मांडता येण्याचा सराव होणे गरजेचे आहे. इथे प्रत्येक प्रकारच्या उदाहरणासाठी सूत्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नये. कारण कोणत्याही विषयावर अमर्याद पद्धतीने उदाहरणे विचारता येतात. त्याऐवजी प्रश्न वाचून अपेक्षित सूत्र तयार करण्याची क्षमता विकसित करावी. हे प्रयत्नांनी सहज साध्य आहे. असे न करता जर खूप सारी सूत्रे पाठ केली तर ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता उद्भवू शकते. बऱ्याचदा दिलेल्या पर्यायांच्या आधारे उत्तर तात्काळ शोधता येते. अशा ठिकाणी विस्तृत समीकरणे वा सूत्रे तयार करण्याचा प्रयत्न करून आपला वेळ वाया घालवू नये. या पद्धतीला ताळा पद्धत (tally method) असे म्हणतात.

तार्किक आणि विश्लेषणात्मकक्षमता या घटकांवर विचारले जाणारे प्रश्न हे एकतर संपूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित असतात वा त्यामध्ये तर्कशास्त्रासोबतच काही गणितीय संकल्पनांचा वापर केलेला आढळतो. अशा पद्धतींच्या प्रश्नांमध्ये प्रचंड विविधता आढळून येते. असे प्रश्न सोडवण्यासाठी ठरावीक शैक्षणिक पात्रता आवश्यक नसते. येथे पूर्व तयारी म्हणजे भरपूर सराव करणे होय. सर्वसामान्यपणे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी तर्काच्या आधारे सोडवण्याचे कौशल्य उमेदवाराकडे आहे का हे या घटकाद्वारे तपासून पाहिले जाते. आतापर्यंत वारंवार विचारले गेलेले विषय म्हणजे – Blood Relations, Syllogism, Direction Sense Test, Seating Arrangement, Cubes, Venn Diagram, Puzzles based on 5×3 matrix or Data arrangement या मध्ये दिलेली माहिती ही प्रश्नांमध्ये दिलेल्या नियमांनुसार वा अटींनुसार मांडावी लागते आणि नंतर निष्कर्ष काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. यामध्ये प्रत्येक विषयासाठी आवश्यक अशा क्लृप्त्यांची माहिती आणि पुरेसा सराव असणे अपेक्षित आहे. जसे की Syllogism मध्ये बसलेल्या व्यक्ती जर तुम्हाला पाठमोऱ्या बसल्या आहेत असे गृहीत धरले तर तुमची डावी वा उजवी बाजू ही त्यांची देखील अनुक्रमे डावी वा उजवी बाजू ठरते. यानंतर माहितीची मांडणी करणे सोपे जाते. तसेच Syllogism मध्ये मानक पूर्वपदांना (standard premises) दाखवणाऱ्या सर्व आकृत्या जर माहिती असतील तर निष्कर्ष काढणे अचूक होते. परंतु हे सर्व कोणत्याही सूत्रांद्वारे शिकता येत नाही. इथे भरपूर सराव करणे नितांत गरजेचे असते. इथे देखील पर्यायांचे निरीक्षण करून आणि ताळा पद्धतीचा वापर करून लागणारा वेळ कमी केला जाऊ शकतो. पण हे नेमके कुठे करायचे आणि कुठे सविस्तर माहितीची मांडणी करून उत्तर काढायचे हे कळण्यासाठी पुरेसा सराव होणे अपेक्षित आहे. इथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माहितीचे स्वरूप पूर्णपणे समजल्याशिवाय तिची मांडणी करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा चुकीची पद्धत वापरल्याने वेळ वाया जाऊ शकतो. उदाहरणार्थ जिथे Tree Diagram ची गरज आहे तिथे जर table format वापरला तर उत्तर मिळणार नाही पण वेळ मात्र वाया जाईल.

सर्वच उमेदवारांना सर्वच घटक सोपे वाटत नाहीत. अशा वेळी सोप्या घटकांवरचे प्रश्न पहिल्या तासात अचूकपणे आणि लवकर सोडवावे. यामुळे तुमचे मनोबल वाढेल. यानंतर अवघड वाटणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. असे केले तर पेपर सोडवणे अधिक सोयीचे जाईल.

अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता

mpsc-exam-2019-mpsc-exam-preparation-tips-in-marathi-1837469/

1142   22-Mar-2019, Fri

सी सॅट पेपरमधील गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता या घटकाचा आहे. या घटकामध्ये एकूण ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात. या तीन उपघटकांमधील प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. या वैविध्यामुळे आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो. पण यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करीत राहिल्यास आपोआप रस वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, ट्रिक्स, टिप्स समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

अंकगणित

सर्वसाधारणपणे या उपघटकामध्ये गणिती क्रियांवर ६ ते ८ प्रश्न आणि संख्यामालिकेवर २ ते ५ प्रश्न विचारण्यात येतात.

शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.

पायाभूत गणिती सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.

संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या बेसिक्सबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारण्यात येत आहेत.

नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

तर्कक्षमतेच्या प्रश्नांमध्ये डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येत आहेत.

तर्कक्षमता

तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती (किमान १ प्रश्न), नातेसंबंध (१ प्रश्न), बैठकव्यवस्था (१ प्रश्न) हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.

निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.

नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत.

बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.

बुद्धिमत्ता चाचणी

या घटकामध्ये आकृती मालिका, अक्षर मालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इनपुट आऊटपुट या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. घडय़ाळ, कॅलेंडर यांवरील प्रश्नही या विभागात समाविष्ट होतात.

आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो.

अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.

संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती टेबलमध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोचता येते.

सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.

इनपुट आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. चौथी व सातवी शिष्यवृत्तीची पुस्तके, गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. राष्ट्रचेतनाचे राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे तसेच अगरवाल यांचे यावरील पुस्तक यासाठी उपयोगी ठरतील.  जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात, हे गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणवरू न लक्षात येते. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात.

सी सॅट उताऱ्यांचे आकलन

article-about-csat-descents-estimation

668   22-Mar-2019, Fri

उमेदवारांच्या आकलनाची परीक्षा घेण्यासाठी हा घटक पूर्व परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. दिलेला उतारा उमेदवारांनी समजून घेऊन त्यावरील प्रश्नांची कमीत कमी वेळेत उत्तरे देणे यामध्ये अपेक्षित आहे. पूर्व परीक्षेत सन २०१३ पासून तर मुख्य परीक्षेत सन २०१७ पासून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेमध्ये हा भाग समाविष्ट झाला आहे. पारंपरिक आकलनाच्या पद्धतीमध्ये आपल्या भाषेत प्रश्नांची उत्तरे लिहून आपले कौशल्य दाखविण्यास वाव असतो. पण वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये दिलेल्या पर्यायांमधून उत्तरे शोधताना नेमकेपणा आणि प्रश्नकर्त्यांला अपेक्षित उत्तराचा अंदाज बांधणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. उमेदवारांच्या मागील वर्षांच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर या विषयाच्या तयारीमध्ये पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

उताऱ्याच्या पहिल्या काही ओळी वाचून तो अवघड वाटल्याने आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्यावरील प्रश्न फारसे आव्हानात्मक नसले तरी अवघड वाटू लागतात. परीक्षा हॉलमध्ये आपल्याला उताऱ्याचा अभ्यास करायचा नाही तर प्रश्नांची उत्तरे देऊन गुण मिळवायचे आहेत हे मनामध्ये व्यवस्थित िबबवून घ्यायला हवे. आपल्याला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित सापडत असेल तर उतारा संपूर्णपणे कळला नाही तरी हरकत नसते. अर्थात केवळ प्रश्न वाचून त्यांची उत्तरे शोधली आणि काम झाले असा कोणताही उतारा सहज सोपा नसतो. तो ढोबळ मानाने तरी समजलाच पाहिजे. एखादा उतारा नाही समजला आणि त्यावर तथ्यात्मक माहिती विचारली असेल तर तो बोनस घ्यायलाच हवा.

बऱ्याच वेळा उताऱ्यातील त्या त्या विषयाशी संबंधित अवघड पारिभाषिक शब्दांमुळे किंवा उताऱ्याचा टोन औपरोधिक किंवा तिरकस असल्यामुळे उमेदवारांना उताऱ्याचे आकलनच होण्यात अडचणी येतात.

पुरेसा सराव नसेल तर कमी वेळेत उतारा समजून घ्यायच्या गडबडीत तणाव येतो. त्यामध्ये एकाग्रतेने आणि वेगाने उतारा वाचणे आव्हानात्मक वाटते आणि वेळेचे नियोजन आणि मार्काचे गणित दोन्ही कोलमडते.

बहुतांश वेळा मराठीतूनच उतारा वाचण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण यामुळे पर्यावरणविषयक किंवा काही विज्ञानविषयक माहितीवरील उतारे वाचून समजण्यास जास्त वेळ लागतो. अशा उताऱ्यांमध्ये जर पारिभाषिक संज्ञा जास्त असतील आणि तथ्यात्मक प्रश्न जास्त विचारले असतील तर असे उतारे इंग्रजीतून वाचल्यास वेळेची बचत होऊ शकते.

प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून दिसते की, प्रबोधन, लेखकांचे व्यक्तिगत अनुभव, अ‍ॅबस्ट्रक्ट विषयांवर आधारित उताऱ्यांवर बरेचदा संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे अशा विषयांचे उतारे लोकसत्ता, साधना मासिक अशा स्रोतांतून वाचणे आणि तयारीच्या वेळी ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उतारे समजून घ्यायचा सराव झाला की परीक्षा हॉलमध्ये कमीत कमी वेळेमध्ये त्यांचे आवश्यक आकलन होण्यास मदत होते.

तथ्यात्मक माहिती, पारिभाषिक संज्ञांचा समावेश असलेल्या उताऱ्यांवर सरळ प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे हे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते. आधी प्रश्न पाहून असे उतारे वाचत गेल्यास शक्य तेथे प्रश्नानुसार आवश्यक माहिती अधोरेखित करत उतारा वाचन करणे शक्य होते. यामुळे उत्तरे देण्याचा वेळही कमी होतो.

मराठी आकलनासाठी तिरकस, औपरोधिक आणि तत्त्वचिंतनपर अशा विषयांवरील साहित्य वाचण्याचा सराव आवश्यक आहे.

इंग्रजी आकलनासाठी द इंडियन एक्स्प्रेसमधील संपादकीय, विज्ञान व अर्थव्यवस्थेबाबतचे लेख वाचून ते समजून घेण्याचा सराव आवश्यक आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रह वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला हवा. याचा फायदा कायमच होणार आहे.

दिलेला उतारा उमेदवार पहिल्यांदाच वाचत आहे हे प्रश्नकर्त्यांला माहीत असते त्यामुळे विनाकारण गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जात नाहीत.

वाचनाचा वेग आणि आकलन वाढविण्याचा प्रयत्न करणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहेच. शिवाय बाकीच्या एकूण अभ्यासामध्येही अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसते वाचन आणि आकलनासहीत वाचन यांमध्ये गुणवत्ता आणि आवश्यक वेळ दोन्हीतही फरक असतो. त्यासाठी सुरूवातीपासूनच क्वालिटी रीिडग- गुणवत्तापूर्ण वाचनाची सवय लावून घ्यायला हवी.

उताऱ्यावरील प्रश्न हा पूर्व परीक्षेमध्ये सर्वाधिक लांबीचा प्रश्न घटक आहे. साधारणपणे १० ते ११ उताऱ्यांवर एकूण ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतात. सर्वाधिक गुणांसाठी असणारा हा भाग सर्वाधिक वेळखाऊसुद्धा असतो. त्यामुळे याची तयारी आणि परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन या बाबी अत्यंत काळजीपूर्वक आखणे आवश्यक आहे.

दुय्यम सेवा पूर्व परीक्षा (बुद्धिमत्ता चाचणी)

secondary-service-pre-examination-intelligence-test

699   18-Mar-2019, Mon

सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या दुय्यम सेवांसाठीच्या पूर्व परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा घटक १०० पकी १५ गुणांसाठी विचारण्यात येतो. या घटकामध्ये अंकगणित, मासिके, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता असे उपघटक विचारात घ्यावे लागतील. या उपघटकांमधील प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत.

या वैविध्यामुळे आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो. पण यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप रस वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या आणि क्लृप्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.

निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.

नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:ला कल्पून ते प्रश्न सोडवावेत.

बठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.

बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये आकृती मालिका, अक्षर मालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इनपूट आऊटपूट या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. घडय़ाळ, दिनदर्शिका यांवरील प्रश्नही या विभागात समाविष्ट होतात.

आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो.

अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.

संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती सारणीमध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोचता येते.

सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.

इनपुट-आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.

भूमितीमधील घनफळ, क्षेत्रफळ, परिमिती याबाबतची सूत्रे माहीत असणे व त्यांचा विश्लेषणात्मक वापर करता येणे आवश्यक आहे.

पायाभूत गणिती सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.

संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या मूलभूत गोष्टींबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारण्यात येत आहेत.

नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येतात. त्यामुळे सूत्रांचा योग्य वापर करणे आणि त्याचबरोबर नेमक्या कोणत्या बाबींचे उपयोजन आवश्यक आहे त्याची समज विकसित करणे आवश्यक आहे.

जे उमेदवार या घटकांमध्ये किमान नऊ ते अकरा प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गुणांच्या विश्लेषणवरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास चांगले गुण मिळण्याची खात्री वाढते. आणि सराव, युक्त्या लक्षात ठेवणे ही असे प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली आहे.

या प्रश्नांच्या सरावासाठी चौथी व सातवी शिष्यवृत्तीची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा.  कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हा घटक वेगवेगळ्या उपघटकांच्या आधारे समाविष्ट केलेला असतो. फरक असतो तो काठीण्य पातळी आणि अनोळखी प्रश्न विचारण्याच्या प्रमाणाचा. सराव आणि केवळ सराव हाच या घटकासाठी एकमेव अभ्यास आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

उताऱ्यावरील प्रश्न आणि त्याचे अभ्यास नियोजन

question on passage and its study

11195   06-Jun-2018, Wed

कोणत्याही लेखनाचे आकलन होण्यासाठी तो एकदा वाचून संपूर्ण कळला असे प्रत्येक वेळी होईलच असे नसते. सामान्यपणे आवडता विषय किंवा विशेष प्रावीण्य असलेला किंवा ज्यामध्ये शिक्षण झाले आहे असा विषय पटकन समजतो. त्यावरील नवीन लेखनही कमी प्रयत्न आणि वेळेमध्ये समजते.

अनोळखी विषय, शालेय व महाविद्यालयीन काळात अवघड वाटणारे विषय, अमूर्त विषय समजून घ्यायला कोणासही थोडे जड जातात आणि त्यासाठी जास्त वेळही द्यावा लागतो. अशा विषयांवरील नवीन लेखनही जास्त अवघड वाटते. आकलन हे असे व्यक्तिनिष्ठ असते. त्यामुळे प्रत्येकाची या घटकाची तयारी करायची पद्धतही वेगळी असायला हवी.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता प्रबोधनकाळ, सामान्य विज्ञान, पर्यावरण, आध्यात्म तसेच वैचारिक चर्चा, आर्थिक व सामाजिक समस्या / विकास, सामाजिक चालू घडामोडी यांवर आधारित उतारे विचारण्यात आल्याचे लक्षात येते. यातील कोणता विषय आपल्या आवडीचा, कम्फर्ट झोनमधील आहे आणि कोणता नावडता, अवघड आहे हे स्वत:ला माहीत असायला हवे.

दुसऱ्या श्रेणीमधील त्यातल्या त्यात सरावाने कम्फर्ट झोनमध्ये येऊ शकतील अशा विषयांच्या तयारीवर सर्वात जास्त भर द्यावा. त्यानंतर पहिली श्रेणी आणि त्यानंतर अत्यंत कठीण वाटणारे विषय अशा प्राधान्याने सराव करायला हवा. सर्वात अवघड विषय दुर्लक्षित करण्याचा पर्याय आहे, पण त्यासाठी आधीच्या दोन प्रकारांवरील प्रश्न मात्र शत प्रतिशत चांगल्या प्रकारे सोडविता येतील इतकी तयारी व्हायला हवी. आपल्या कम्फर्ट झोनमधील नवीन लेखनाच्या आकलनाबाबत अतिआत्मविश्वास अणि अवघड, नावडत्या विषयाबाबत न्यूनगंड दोन्ही गोष्टी नुकसान देतात. त्यामुळे दोन्हीचा सराव महत्त्वाचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. 

उताऱ्यांवरील प्रश्नांचा सराव दोन पद्धतींनी केल्यास जास्त फायदा होतो. वेगवेगळ्या स्रोतांमधून वेगवेगळ्या विषयावरचे लेखन वाचून त्याचे आकलन करण्याचा आणि त्यावरचे प्रश्न स्वत:च तयार करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकार. रोज दोन उतारे घेऊन अशा प्रकारे सराव करावा. यातून आकलनाचा आणि वाचनाचा वेग वाढेल यासाठी प्रयत्न करावा.

दुसरा प्रकार प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणामध्ये वेळ लावून प्रश्न सोडविण्याचा सराव. पहिल्या तयारीच्या जोरावर आपला परफॉर्मन्स तपासून किती आणि कोणत्या प्रकारच्या तयारीची आवश्यकता आहे, हे समजून घेण्यासाठी हा सराव महत्त्वाचा आहे. यासाठी राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे राष्ट्रचेतनाचे पुस्तक उपयुक्त ठरेल.

प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले तर लक्षात येते की सगळे उतारे वाचून सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आणि व्यवहार्य दोन्ही नाही. मागच्या लेखामध्ये चर्चा केल्याप्रमाणे सी सॅटमध्ये किमान  १२० गुण मिळवायचे असतील तर उताऱ्यावरील ५० पैकी किमान ४० प्रश्न सोडवायला हवेत. त्यामुळे सर्वात अवघड विषयावरील दोन उतारे सोडता येतील किंवा वेगवेगळ्या उताऱ्यांवरचे काही प्रश्न सोडता येतील.

उतारा नव्हे तर त्यावरचे प्रश्न अवघड असले तरच तो सोडावा. अवघड उताऱ्यावर तथ्यात्मक माहितीचे प्रश्न असतील तर ते सोडवावेत.  आयोगाचा नियम नाही की उतारा घेतला की सगळे प्रश्न सोडवायलाच हवेत. पण यामध्ये सगळे उतारे वाचण्यात कालापव्यय होतो. त्यामुळे उतारा प्रथमदर्शनी अत्यंत अवघड वाटला तर त्यावरचे प्रश्न पहावेत. वस्तुनिष्ठ माहिती विचारणारा प्रश्न असेल तर ते २.५ गुण गमावू नयेत. 

हे प्रश्न सोडविताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायला हवी. प्रश्नांची उत्तरे दिलेल्या उताऱ्यातील लेखकाच्या मताच्या अनुषंगाने, ते मत योग्य व खरे मानून देणे आवश्यक आहे. संबंधित विषयातील अद्ययावत माहिती आपल्याकडे असेल किंवा मांडलेले मत वस्तुस्थितीच्या विपरीत असेल तरीही उताऱ्यातील मुद्दय़ाच्या चौकटीतच उत्तर देणे आवश्यक आहे. याबाबत दिलेल्या पर्यायांनी गोंधळून न जाता उताऱ्याची चौकट हा त्या प्रश्नापुरता ठरलेला अभ्यासक्रम आहे हे लक्षात घेऊन उत्तरे द्यावीत.

वरीलप्रमाणे उताऱ्यातील मुद्दय़ाच्या अनुषंगानेच उत्तर देणे, आकलनासहीत वाचन करण्याचा वेग वाढविणे, पहिल्या एकदोन ओळीमध्येच उताऱ्याचा आपल्या श्रेणीप्रमाणे प्रकार ओळखणे या बाबी सरावानेच जमू शकतात. सराव आणि केवळ सराव हाच हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि चांगले गुण मिळविण्यासाठी आवश्यक आहे.

सीसॅट – निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्ये

preparation for decision making and management

1749   06-Jun-2018, Wed

सीसॅटमधील शेवटचा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य हा घटक. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत, त्यामुळे भरपूर गुण मिळवायचे असतील तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देणे आवश्यक आहे. या पाच प्रश्नांसाठी एकूण १० मिनिटे वापरली तर किमान १० गुणांची तजवीज होऊ शकते.

यामध्ये एखाद्या सुजाण नागरिकाचे हक्क आणि त्याची एखाद्या प्रसंगातील नागरिक या नात्याने किंवा हितसंबंधीय म्हणून असलेली कर्तव्ये यांचेशी संबंधित दैनंदिन जीवनातील पेचप्रसंग आणि त्यावरील तोडगा विचारला जातो. याचबरोबर संस्थेत किंवा प्रशासनात अधिकारपदावर असताना येणारी आव्हाने व त्यावरील तोडगा किंवा नैतिकदृष्टय़ा द्विधा मन:स्थितीत अडकविणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

*   प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी.

*   या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

*   समस्येतील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेऊन याबाबतचे मूल्यमापन करावे.

*   दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

*   उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधियांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परीणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

सरावासाठी एक प्रश्न पाहू या.

राज्यामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पण काही फेरीवाले, भाजीवाले असे किरकोळ माल विकणारे लोक अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना तुम्हाला आढळले आहेत. याबाबत त्यांना हटकले असता ग्राहकांकडून सामान ठेवण्यासाठी पिशव्यांची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि इतर पर्यायी पिशव्यांचे दर त्यांना परवडत नसल्याने प्लास्टिकचाच वापर करणे अपरिहार्य असल्याचे तुमच्या लक्षात आणून दिले आहे. तुम्ही

*   रद्दीपासून पिशव्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्यामधीलच काहींना मदत आणि मार्गदर्शन कराल व प्लास्टिकचा वापर थांबवण्याची त्यांना विनंती कराल.

*   ग्राहकांना प्लास्टिकवर बंदी असल्याचे सांगून पिशवी देता येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्याची विनंती विक्रेत्यांना कराल.

*   प्लास्टिकवर बंदी असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकेल हे त्यांच्या लक्षात आणून द्याल व त्यांनी दुसऱ्या पर्यायांचाच वापर करणे आवश्यक असल्यावर भर द्याल.

*    स्थानिक प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार नोंदवाल आणि शासनाने अशा विक्रेत्यांना पर्यायी पिशव्या कमी दराने उपलब्ध करून देण्याची विनंती कराल.

या उदाहरणातील पर्याय पाहिल्यास दुसरा पर्याय कोणत्याही प्रकारे प्रभावी नाही तसेच कोणतीही जबाबदारी यातून पार पडताना दिसत नाही तसेच कोणताच तोडगाही निघत नाही. तिसरा पर्याय कायदेशीर कार्यवाहीचा धाक दाखवतो. पण त्यातून समस्येचे निराकरण होताना दिसत नाही. तसेच विक्रेते पुन्हा प्लास्टिकचा वापर करणार नाहीत याची शाश्वतीही नाही. पर्यायातील आता उरलेल्या एक व चार क्रमांकाच्या पर्यायांमधून अधिक समर्पक व या समस्येवर अंतिम तोडगा निघू शकेल असा क्रमांक एकवरचा पर्याय निवडणे अधिक संयुक्तिक ठरते. पर्याय चार हा शासनावरील अवलंबित्व वाढवतो तर पर्याय एक हा समस्येवरचा तोडगा आहेच, शिवाय विक्रेत्यांना स्वत:च पर्यायी व्यवस्था करण्यास प्रोत्साहनही देतो व दूरगामी परिणाम साधतो. त्यामुळे यामध्ये पर्याय एकला अडीच गुण, चारसाठी दीड, तीनसाठी एक तर दोनसाठी शून्य गुण मिळतील.

सर्वसाधारण व्यवहारज्ञान, नैतिकदृष्टय़ा योग्य-अयोग्य मुद्दय़ांची जाण आणि भारतीय संविधानाचे भान असल्यास कमीत कमी वेळेत हा विभाग जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो. हा घटक पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की, शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे. पण हे प्रश्न सोडविताना मन शांत ठेवून पर्यायांचा विचार करायला हवा आणि जास्तीत जास्त समर्पक उत्तर शोधायला हवे. हे शक्य करायचे असेल तर सराव आणि सरावाचे विश्लेषण यांना पर्याय नाही!

सी सॅट प्रत्येक घटक महत्त्वाचा

csat important topic

1784   28-May-2018, Mon

राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पेपर दोन सी सॅट जास्त महत्त्वाची भूमिका निभावतो. या मुद्दय़ाबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. बरेच वेळा सी सॅट म्हणजे अगम्य उतारे, अवघड गणिते, न कळणाऱ्या असंबद्ध आकृत्या असेच उमेदवारांना वाटत असते. अर्थात कोणत्याही प्रकारचा सराव नसेल आणि टढरउ च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या घटकाचे व्यवस्थित विश्लेषण करून मगच तयारी सुरू करावी.

सीसॅट पेपरचे विभागणी तीन मुख्य विभागात करता येईल.

१.     आकलनाचे उताऱ्यावरील प्रश्न

२.     अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न

३.     निर्णयक्षमतेचे प्रसंगाधारित प्रश्न.

पहिल्या विभागावर ५०% दुसऱ्यावर २५ आणि तिसऱ्यावर ५ प्रश्न विचारले जातात. पण प्रश्नसंख्येवरून या विभागांचे महत्त्व ठरविता येणार नाही. निर्णयक्षमतेचे प्रश्न सर्वात कमी असले तरी त्यांमध्ये नकारात्मक गुणपद्धती नसल्यामुळे किमान ५ ते कमाल १२.५ गुण मिळवता येतात. पेपर दोनचा ५६ पानी विस्तार पाहता कमी वेळेत जास्त व खात्रीने गुण मिळवून देणारा हा भाग आहे. सरावाने याचे गुण १०पर्यंत पोहोचू शकतात. दुसरा घटक ६२.५ गुणांसाठी (२५ प्रश्न) आहे. पण त्यामध्ये प्रश्नांचे प्रकार खूप जास्त आहेत. त्यामुळे सरावाची जास्त गरज आहे असे वाटते. पण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर यातील महत्त्वाचे प्रकार शोधता येतात. ज्या प्रकारचे प्रश्न समजायला अवघड जातात किंवा सोडवायला जास्त वेळ घेतात त्यांना परीक्षेच्या ऐनवेळी बाजूला ठेवता येते. मात्र पुढील काही मुद्दय़ांवर सरावाच्या वेळी भर असणे आवश्यक आहे. पुढील मुद्दय़ावर नेहमीच दोन ते सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

१.     आकृत्या (४ ते ६)

२.     तक अनुमान (किमान १)

३.     नातेसंबंध (० ते २)

४.     गणिती क्रिया (६ ते ८)

५.     संख्यामाला, अक्षरमाला (४ ते ७)

६.     चिन्हमाला (० ते २)

७.     कालमापन (० ते २)

८.     माहितीचे आकलन, बैठक व्यवस्था (२ ते ४)

९.     इनपुट-आउटपुट (किमान १)

त्यामुळे या मुद्यांचा बारकाईने अभ्यस व सराव केल्यास २५ ते ३५ गुणांची तजवीज होते.

आकलनाच्या प्रश्नांसाठी उतारे वाचन हा सर्वात जास्त वेळ घेणारा घटक आहे.

१२५ गुणांसाठी सुमारे ३५० शब्दांचे

१० उतारे वाचून त्यांवरील प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. हे विश्लेषण वाचताना दडपण जाणवू लागते. पण उत्तीर्ण होण्यासाठी सगळा पेपर सोडविणे आवश्यक नाही आणि व्यावहारिकदृष्टय़ा ते शक्यही नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

वरील चच्रेप्रमाणे किमान ३५ ते ४५ गुणांची तयारी कमी वेळेत करणे शक्य होते.

सी सॅट मध्ये किमान १२० गुण मिळवायचे असतील तर नकारात्मक गुणांसहीत एकूण ३० प्रश्नांचे गुण मिळवणे आवश्यक आहे. याचा अर्थ उताऱ्याच्या ५०पैकी किमान ४० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

सी सॅटच्या तिन्ही घटकांचे स्वत:चे असे महत्त्व आणि स्थान आहे. त्यामुळे योग्य रणानीती ठेवून तिन्हीची तयारी करणे आवश्यक आहे. या घटकांच्या तयारीबाबत पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येईल.

मागील वर्षांच्या उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांचे आणि त्यांनी सोडविलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात.

१.     जास्तीत जास्त पेपर कव्हर करण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांकडून क्षुल्लक चुका जास्त होतात आणि जास्त प्रश्न सोडवूनही गुण खूप कमी होतात. (कारण नकारात्मक गुण)

२.     ठरावीक गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या उमेदवारांना तुलनेने कमी प्रश्न सोडवूनही चांगले गुण मिळाले आहेत. (कारण पुन्हा नकारात्मक गुण)

३.     ठराविक गुणांचे उद्दिष्ट ठरविले की किती प्रश्न सोडवायचे याची मर्यादा आखून घेता येते आणि ताण कमी होऊन नकारात्मक गुण ओढवून घेणाऱ्या क्षुल्लक चुका टाळता येतात.

४.     एकूण ८० पैकी ५ निर्णयक्षमतेचे प्रश्न वजा केले तर ७५ पैकी ६० ते ६५ प्रश्न सोडविणे हे उद्दिष्ट असायला हरकत नाही. मात्र अचूकपणे सोडविता येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सरावाने वाढविणे आवश्यक आहे.

५.     ज्या उमेदवारांनी आपल्या सरावाचे विश्लेषण करून आपले कम्फर्ट झोन आणि आव्हानात्मक वाटणारे प्रश्नप्रकार शोधले आणि त्यावर आधारित सराव केला त्यांना गुणांचे उद्दिष्ट ठेवून सोडविल्यावर सी सॅट पेपरमध्ये चांगले गुण मिळाले आहेत.

सी सॅट अंकगणित आणि बुद्धिमत्ता

csat math reasoning

2597   28-May-2018, Mon

सी सॅट पेपरमधील गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार अंकगणित आणि बुद्धिमत्ता या घटकाचा आहे. यामध्ये ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात. ढोबळ मानाने हा विभाग अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विभागांत विभागता येईल. या तीन उपघटकांमधील प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार आहेत.

त्यामुळे प्रत्येक प्रकार सोडविण्याचा सराव करणे आणि त्यांच्यासाठीची सूत्रे, युक्त्या, टिप्स लक्षात ठेवणे हे सगळे उगाचच आव्हानात्मक वाटते. पण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर यातील महत्त्वाचे प्रकार शोधता येतात.

अंकगणित या उपघटकामध्ये गणिती क्रिया (६ ते ८ प्रश्न) आणि संख्यामालिका (२ ते ५ प्रश्न) हे मुख्य प्रकार आहेत. यांमध्ये शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ-काम-वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत.

यांच्यासाठीची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात. संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.

नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती (किमान १ प्रश्न), नातेसंबंध (१ प्रश्न), बठकव्यवस्था (१ प्रश्न) हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.

निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत. नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत. बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.

बुद्धिमत्ता चाचणी घटकामध्ये आकृतीमालिका (० ते २ प्रश्न ), अक्षरमालिका (२ ते ४ प्रश्न), व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न (० ते २), सांकेतिक भाषा (० ते २ प्रश्न), इनपूट आऊटपूट (० ते २ प्रश्न ) या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. घडय़ाळ, कॅलेंडर यांवरील प्रश्नही (० ते २) या विभागात समाविष्ट होतात.

आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.

संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती टेबलमध्ये भरावी. सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत. ईनपुट आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची गाइड्स, आठवी; नववी; दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. राष्ट्रचेतनाचे राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे तसेच अगरवाल यांचे यावरील पुस्तक यासाठी उपयोगी ठरतील.

गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणावरून हे लक्षात येते की, जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात.

सी सॅटची तयारी

preparation of csat

3322   25-Jan-2018, Thu

यूपीएससी व राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सी-सॅट पेपरकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः राज्यसेवेत सी-सॅटचे गुण धरले जात असल्याने हा विषय काळजीपूर्व हाताळावा लागतो.

अभ्यासपातळी:-

पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर सी-सॅटकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. कोणतीही मॅच नेटमधील सरावाने जिंकता येते. त्यामुळे येथेही सरावातील सातत्य राखणे महत्त्वाचे ठरेल. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने सी-सॅटचा पेपर सामान्य अध्ययन-१ इतकाच महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रमात सी-सॅट पेपरची काठिण्यपातळी दहावीपर्यंतची सांगितली असली तरी राज्यसेवा परीक्षेतील सी-सॅटची काठिण्यपातळी केंद्रीय लोकसेवा परीक्षेतील सी -सॅटपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.

विश्लेषण:-

सी-सॅट पेपरची तयारी सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचे ‍उपघटकनिहाय विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्या घटकावरती एकूण प्रश्न किती विचारण्यात आले आहेत याचा आराखडा तयार करावा. त्या आराखड्यामुळे लक्षात येईल की कोणत्या घटकासाठी आधिक सराव करण्याची गरज आहे. त्यामुळे अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यास मदत होईल. विश्लेषणानंतर विद्यार्थांनी आपण कोणत्या घटकामध्ये अधिक प्रवीण आहोत आणि कोणता घटक सरावानंतर अधिकचे गुण मिळवून देण्यास मदत करेल हे स्वतःपुरते शोधले पाहिजे.

आकलन:-

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आकलनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या घटकावर जवळपास ५० प्रश्‍न विचारण्यात येतात. या घटकांची उपभागांत विभागणी करता येईल. एक भाग हा पूर्णपणे एखाद्या दिलेल्या उताऱ्यातील विषयाचे विद्यार्थ्यांला किती आकलन होते यावर आधारित असतो. हे उतारे मराठीत आणि इंग्रजीत असतात. (सुमारे ३५ प्रश्न). त्या उताऱ्यांचे विषय हे इतिहास, भूगोल, विज्ञान, राजकीय घडामोडी, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान यांच्याशी निगडीत असतात. दुसरा भाग हा मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन यावर आधारित असतो. (सुमारे १५ प्रश्न) आकलन हा एका दिवसात प्रावीण्य मिळवता येणारा घटक नाही. त्यामुळे योग्य सराव आणि दर्जेदार साहित्यच या घटकामध्ये गुण मिळवून देऊ शकते.

बुद्धीमापन क्षमता:-

सी-सॅट पेपरमध्ये आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि सततच्या सरावातून सहज गुण मिळवून देणारा हा घटक आहे. (सुमारे १८ प्रश्न) या घटकावर सरावाच्या माध्यमातून कोणताही विद्यार्थी प्रावीण्य मिळवू शकतो. सोप्या प्रश्नांच्या सरावानंतर काठिण्यपातळी वाढवत गेल्यास या प्रश्नांमध्ये हक्काचे गुण मिळतील. विशेष म्हणजे या घटकाच्या सरावामुळे यातील प्रश्न सोडविण्यास वेळ फार कमी लागतो.

मूलभूत गणित:-

मूलभूत गणित या घटकावर जवळपास तीन ते पाच प्रश्‍न विचारले जातात. गणित म्हटले की अनेक विद्यार्थांना भीती वाटते. परंतु प्रश्नांच्या विश्लेषणानंतर लक्षात येते की ज्या विद्यार्थांचा गणिताची मूलभूत आकडेवारी जमते त्या सर्वांना हे प्रश्न सुटण्यासारखे असतात. विद्यार्थांनी या घटकाची भीती न घेता पाया मजबूत करण्यावर भर दिल्यास हा घटक गुण मिळवून देऊ शकतो. यासाठी शालेय अंकगणिताचा सराव फायदेशीर ठरेल.

निर्णयक्षमता:-

प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थांच्या निर्णय आणि समस्या निराकरणक्षमता याच्या तपासणीसाठी हा घटक असतो. यावर पाच प्रश्‍न विचारण्यात येतात. या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणपद्धती नसते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांने हा घटक सर्वात अगोदर सोडवून घ्यावा. वृत्तपत्रातील प्रकाशित होणाऱ्या केस स्टडिजच्या अभ्यासातून हा घटक विकसित होऊ शकतो.

नेट सराव:-

विविध दर्जेदार साहित्यामधून सी-सॅटचा सराव करावा. हा सराव दररोज दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान केल्यास जास्त फायदयाचे होईल, कारण पेपर याच कालावधीत असतो. सरावात सोप्या प्रश्नांकडून अवघड प्रश्नांकडे जावे. त्यामुळे सर्वप्रकारच्या काठिण्यपातळीचा सराव होईल. 


Top