IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4102 जागांसाठी भरती

ibps po recruitment 2018

213   09-Aug-2018, Thu

MPSC मुख्य परीक्षेनंतर

after mpsc mains exam

450   25-Aug-2018, Sat

राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा मागच्या आठवडय़ामध्ये संपन्न झाली. मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांचा हक्काचा तीनचार दिवसांचा आरामही झालेला असेल. या ब्रेकनंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धा परीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी सुरू करायला हवी.

मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे अंदाज न बांधता त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नासाठी ‘चार्ज’ राहतील. मुलाखतीची तयारी हा विषय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तित्वाशी, व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात. नियुक्तीचे पद, त्यासाठी आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त / अमूर्त गोष्टींवर मुलाखतीचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक असते.

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाल्यानंतर सर्वच उमेदवारांना एकच सल्ला दिला होता, तो हा की पूर्व परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी, मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी सुरक्षित होते व स्पध्रेत आपली दावेदारीसुद्धा! स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे, आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक नेहमी गतिशील ठेवायला हवे. राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल होऊ शकतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये.

मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीचे निमंत्रण मिळणारच असे गृहीत धरून मुलाखतीची तयारी सुरू करायलाच हवी. मात्र त्याचबरोबर इतर काही स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षाही वर्ष अखेरीपर्यंत होत आहेत. काही उमेदवार यातील काही परीक्षा देणार असतील. अभ्यासाच्या नियोजनासाठी या परीक्षांचे अद्ययावत वेळापत्रक देत आहोत.

हे वेळापत्रक आणि तुम्ही उत्तीर्ण झालेल्या पूर्व परीक्षा यांचा व्यवस्थित आढावा घेऊन पुढचे वेळापत्रक आखून घ्यावे. या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये कॉमन असणाऱ्या मुद्दय़ांची (उदा. भारताची राज्यघटना) तयारी एकत्रितपणे आधी करावी. त्यानंतर त्या त्या परीक्षेच्या वेळेप्रमाणे विशिष्ट घटक विषयांची उजळणी करावी.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम िलकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, यशाच्या ध्येयाप्रती प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही. राज्यसेवा परीक्षेची मुलाखत आणि त्याच वेळी इतर स्पर्धा परीक्षांचे प्रयत्न असे multi tasking ही तुमच्या उद्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून घडणाऱ्या भविष्याची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी नावाचा घटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कार्यरत असतो. या परीक्षांशी संबंधित महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या तयारीसाठीची परीक्षोपयोगी चर्चा पुढील काही लेखांमध्ये करीत आहोत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा

संयुक्त पेपर (पेपर क्र. १) २६ ऑगस्ट

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा  (पेपर क्र. २) २ सप्टेंबर

राज्य कर निरीक्षक (पेपर क्र. २) ३० सप्टेंबर

सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) ६ ऑक्टोबर

महाराष्ट्र कृषी सेवा  मुख्य परीक्षा  ८ सप्टेंबर

साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा

संयुक्त पेपर (पेपर क्र. १) १४ ऑक्टोबर

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा  (पेपर क्र. २) २१ ऑक्टोबर

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  (पेपर क्र. २) ४ नोव्हेंबर

कर सहायक मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) २ डिसेंबर

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी) १७ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (विद्युत) २४ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्थापत्य) २५ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी/ विद्युत) १५ डिसेंबर

MPSC व UPSC ची तयारी : निबंध लेखन – वैचारिक प्रक्रिया आणि स्पष्टता

mpsc upsc Essay Writing Skill and all

15819   04-Jul-2018, Wed

मुद्देसूदपणा आणि अचूकता हेदेखील चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे निकष मानले जातात

कुठल्याही विषयावर निबंध लिहीत असताना एकाच प्रकारे लिहिला जाऊ शकत नाही. विविध व्यक्ती एकच विषय विविध प्रकारे हाताळताना दिसतात. तर अनेकदा, एकच व्यक्ती एक विषय विविध पद्धतीने सक्षमपणे मांडत असते, असेही दिसते. मग अशा वेळेस, आपण निवडलेली मांडणी आणि मुद्देच आपण का निवडले? याचे काही एक स्पष्टीकरण निबंध लिहीत असतानाच दिले तर लिखाण अधिक परिपूर्ण होते. त्याचबरोबर आपले म्हणणे हे केवळ महिती आणि तथ्ये (facts) यांची जंत्री न उरता, त्यामध्ये युक्तिवाद असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे लिखाण सरावानेही जमते. त्यासंबंधी अजून चर्चा आपण पाहणार आहोत.

मुद्देसूदपणा आणि अचूकता हेदेखील चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे निकष मानले जातात. अशा लिखाणाने युक्तिवाद अधिक ठळकपणे पुढे येतात. तसेच १०००-१२०० शब्दांत व्यापक विषयावर चर्चा पूर्ण करण्यासाठी जी शिस्त लेखनामध्ये आवश्यक असते, तीदेखील येते.

युक्तिवादात्मक दावा (Arguable Claim)

तुम्ही मांडत असलेले ठाम मत युक्तिवादात्मक असावे. तसेच हे मत मांडत असताना तुमचे लेखन त्या विषयावरील अधिक बारकावे व खोली असणाऱ्या चच्रेचा भाग होऊ शकते असे असावे. आपले मत युक्तिवादात्मक आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता, आपल्या मताच्या विरुद्ध मताचे समर्थन केले जाऊ शकते का? असा विचार केला पाहिजे. जर का आपण मांडत असलेल्या मुद्दय़ांच्या विरोधी कोणतेही मत अथवा युक्तिवाद शक्य नसेल तर, आपला मुद्दा केवळ ‘माहिती’ असण्याची शक्यता आहे.

अ-युक्तिवादात्मक (non-arguable) – संगणक हे कामकाज सांभाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. (याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणूनच हे विधान म्हणजे केवळ माहिती आहे.)

युक्तिवादात्मक (argualbe) – संगणकाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक कारण असू शकते. (विविध माहिती व आकडेवारी सादर करून वरील विधानाचे समर्थन केले जाऊ शकते. तसेच वरील विधान असत्य मानणे व त्या बाजूने युक्तिवाद करणे शक्य असू शकते.)

मुद्देसूदपणा व अचूकता

तुम्ही लिहीत असलेल्या मतांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढणे टाळा. खूप व्यापक मुद्दय़ांना किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालण्याआधी आपल्याकडे आवश्यक अचूक माहिती आहे का? याचा विचार करा.

अचूकतेचा अभाव – आपण कोणत्याही परिस्थितीत अन्नसुरक्षा विधेयक मंजूर होऊ देता कामा नये. (हे विधान नुसतेच मूल्यात्मक कल दर्शवणारे आहे. अशा प्रकारचा कल असण्यामागील कारण अथवा युक्तिवाद करण्यामागील भूमिका अचूकपणे मांडलेली नाही.)

अचूक विधान – अन्नसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने देशातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण येणे साहजिक आहे. याकरिता देशातील यंत्रणा सक्षम नाहीत. तसेच अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा योग्य आढावा घेतल्याशिवाय असे विधेयक मंजूर होऊ देणे योग्य नाही. (वरील मांडणीमध्ये मूळ मुद्दय़ाबरोबर तशा मतापर्यंत येण्यासाठी आवश्यक कारणे दिलेली आहेत. म्हणूनच वाचणाऱ्यालादेखील अधिक स्पष्टपणे एकंदर युक्तिवादाची भूमिका कळते.) 

यादीरूपात मुद्दय़ांची मांडणी करणे टाळावे

जरी तुमच्या निबंधामध्ये अनेक प्रमुख मुद्दे येणार असतील तरी ते सर्व मुद्दे यादी रूपात मांडू नयेत. अशा प्रकारची मांडणी केल्याने लेखन उथळ व वरवरचे वाटते. समजा अन्नसुरक्षा विधेयकाविरोधात मांडण्यायोग्य ६-७ वेगवेगळी कारणे तुम्हास माहीत आहेत. परंतु इतके विस्तारपूर्ण लिखाण करण्याचा हेतू बाळगला तर विविध मुद्दय़ांना नुसते स्पर्शून पुढे जावे लागते. याऐवजी कोणतीही २-३ महत्त्वाची कारणे निवडून त्याबद्दल अधिक बारकाईने लेखन करणे जास्त योग्य आहे. विविध मुद्दय़ांच्या मोठमोठय़ा याद्या केल्याने त्या मुद्दय़ांचे गांभीर्य कमी होते. तसेच यादीत दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. जास्त शब्दमर्यादा असलेला निबंध लिहीत असताना अनेक मुद्दय़ांचा समावेश होतोच. तरीही कोणत्याही स्वरूपाच्या याद्या करणे टाळावे.

उदा. – भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने या विषयासंदर्भात पुढील वाक्याचा विचार करा. भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, गळतीचे वाढते प्रमाण, शाळांमधील अपुरा कर्मचारीवर्ग, स्त्रीशिक्षणाचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण, अचूक ध्येय नसणारे अभ्यासक्रम, शाळांमधील पायाभूत सोयीसुविधांचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत. वरील वाक्यातील विविध मुद्दे पाहता आपल्या हे सहज लक्षात येते की, वरील सर्व मुद्दय़ांचे महत्त्व व गांभीर्य सारखे नाही. तरीही या सर्व मुद्दय़ांचा एकाच यादीत समावेश केल्यामुळे लेखनातील ठामपणा कमी होतो.

वरील गोष्टी लक्षात घेऊन लिखाण केल्यास ते वरवरचे उरत नाही. तसेच विषयालाही योग्य न्याय दिला जातो. 

अपेक्षित प्रश्नांची तयारी

preparation of expected question

633   06-Jun-2018, Wed

स्पर्धा परीक्षांमध्ये मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यासाठी संपूर्ण तयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विश्लेषणातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तर लक्षात येतेच, पण त्याचबरोबर अभ्यासक्रमाशी सांगड घालून हे विश्लेषण केले तर सर्वसाधारणपणे महत्त्वाचे घटकही समजतात. या विश्लेषणातून एखाद्या वर्षी विचारल्या जाऊ शकणाऱ्या अपेक्षित मुद्दय़ांचा अंदाजही घेता येतो. अशा विश्लेषणातून पूर्वपरीक्षेतील वेगवेगळ्या घटकविषयांमधील अंदाजे अपेक्षित घटक व त्यातील अपेक्षित मुद्दे यांबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

इतिहास विषयाबाबत चालू घडामोडी हा मुद्दा असंबद्ध वाटू शकतो, पण तो तसा नाही. एखाद्या वेळी एखाद्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती किंवा निर्णयाबाबत नव्याने चर्चा, विवाद सुरू झाले तर तो मुद्दा अपेक्षित यादीमध्ये समाविष्ट करावा. ज्या ऐतिहासिक घडामोडींना ३००, २००, १७५, १५०, १००, ७५, ५०, २५ वष्रे पूर्ण झाली असतील त्यांचाही समावेश या यादीत होतो. ऐतिहासिक व्यक्तीची जन्मशताब्दी किंवा १००वा स्मृतिदिन असल्यास त्यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो.

मागील काही वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक व क्रांतिकारक यांच्यावर प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास एप्रिल २०१८च्या पूर्वपरीक्षेमध्ये पुढील मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्याची अपेक्षा करतायेईल.

 • संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महत्त्वाचे नेते
 • भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील सन १९४२ पासूनचे महत्त्वाचे टप्पे व निर्णय
 • चलेजाव चळवळ आणि त्या दरम्यान सुरू असलेल्या चळवळी (साताऱ्याचे प्रतिसरकार, इ.)
 • क्रांतिकारी चळवळीचा दुसरा टप्पा व त्यातील महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांचे योगदान
 • चंपारण्य सत्याग्रह तारीख, १९१८मधील गांधीजींचे इतर सत्याग्रह, त्यांच्या सर्व सत्याग्रहांचा क्रम व समकालीन आंतरराष्ट्रीय घटना
 • काँग्रेसचे सन १९१६चे अधिवेशन, महत्त्व, अध्यक्ष व त्याबाबत टिळकांची भूमिका
 • दादाभाई नौरोजी, त्यांची काँग्रेस अध्यक्षपदे, कार्य
 • वृत्तपत्रे, त्यांचे संपादक आणि बोधवाक्ये
 • वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, नोकरी, इ.
 • रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य
 • इंग्रज मराठा युद्धे व त्यांची निष्पत्ती, तह
 • टिपू सुलतान आणि त्याचे विचार, प्रशासन व कार्य, इंग्रजांबरोबरची युद्धे व तह
 • विजयनगर साम्राज्यातील वंशियांचा क्रम, महत्त्वाचे राजे, कृष्णदेवरायची कारकीर्द व त्याच्या दरबारामध्ये आलेले परदेशी प्रवासी. या कालावधीतील भारतभेटीवर आलेल्या परदेशी प्रवाशांची वर्णने विशेषत: बाबरेसा, अब्दुल रज्जाक, डॉिमगो पाएस, इ.
 • सम्राट अकबर आणि त्याचे कार्य व युद्धे
 • मोहम्मद तुघलक आणि त्याच्या मोहिमा व महत्त्वाचे निर्णय
 • संगम साहित्यातील साहित्यिक व त्यांची पुस्तके (पुस्तकातील विषयांचे वर्णन)
 • प्राचीन ग्रंथ, त्यांचे विषय व लेखक (अर्थशास्त्रज्ञ चाणक्य, प्लिनी – नॅचरल हिस्ट्री, टॉलेमी – भूगोल, इ.)
 • मेगास्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ व त्यातील भारतीय समाजाचे वर्णन
 • मौर्य शासक आणि त्यांचा क्रम, सम्राट अशोकाचे शिलालेख, त्यांची संख्या, ठिकाणे आणि त्यांमधील लिपी व भाषा
 • वैदिक साहित्य आणि त्यातील महत्त्वाचे उल्लेख. (नद्या व त्यांची वैदिक नावे किंवा धातू / दागिना / अन्नपदार्थ / राजा / मुलगी यांच्यासाठीचे वैदिक शब्द)
 • सिंधू संस्कृतीमधील पुरातत्त्व स्थळे आणि तेथील उत्खननामध्ये सापडलेल्या महत्त्वाच्या वस्तू (एखादे स्थळ विचारण्यापेक्षा जोडय़ांवर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक)

या अपेक्षित मुद्दय़ांचे सर्व आयाम व्यवस्थित समजून घेतल्यास त्याचा या पूर्वपरीक्षेमध्ये फायदा होईल. अर्थात पूर्वपरीक्षेचा इतिहास हा घटक एवढय़ा मुद्दय़ांपर्यंतच सीमित आहे असे समजून अभ्यास मर्यादित करण्यासाठी ही अपेक्षित यादी नाही. अभ्यास करताना या मुद्दय़ांवर जास्त भर देणे उपयुक्त ठरेल व जास्तीतजास्त गुण मिळवण्यासाठी या विश्लेषणावर आधारित यादीची नक्कीच मदत होईल.

परीक्षेच्या काळातील नियोजन

time management in exam hours

304   28-May-2018, Mon

आयोगाच्या उत्तरपत्रिका या OMR  शीट असल्याने खाडाखेड, फाटणे, चुरगळणे, घाण होणे अशा गोष्टीमुळे तपासल्याच जात नाहीत त्यामुळे ती हाताळताना, यामध्ये माहिती भरताना आणि उत्तरे नोंदवताना करताना विशेष काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पुढील बाबी गांर्भीयाने लक्षात घ्याव्यात.

 • उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी.
 • बॉक्समध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील माìकग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.
 • पेपर १ मध्ये १२० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे आहेत. तर पेपर २ मध्ये १२० मिनिटांत ८० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि OMR शीटची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.
 • सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नये. हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करा. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जायचे.
 • एखाद्या प्रश्नाबाबत गोंधळ असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नाच्या क्रमांकाला प्रश्नपत्रिकेमध्ये खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडवायचा पहिला राऊंड संपवावा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांचे उत्तरपत्रिकेत मार्किंग करून घ्यावे किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तरपत्रिकेमध्ये मार्किंग केले तरी हरकत नाही. पण त्यावेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोर मार्किंग करत नाही ना, योग्य प्रश्नक्रमांक समोरच करत आहोत ना हे काळजीपूर्वक पहावे.
 • आता दुसरा राऊंड. अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करायचा. आधीच अशा खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.
 • थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवावा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या एका सव्‍‌र्हेमधून ही गोष्ट समोरी आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटलेले असते तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर बसते.
 • सी सॅटमधील प्रसंगाधारित प्रश्न पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की, शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर मग मनावरचा ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे.
 • अवघड वाटणारे प्रश्न सगळयात शेवटी सोडवायचा प्रयत्न करावा पण जोपर्यंत आपण शोधलेले उत्तर बरोबर आहे याची खात्री वाटत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिकेत त्याची नोंद करू नये. अनोळखी वाटणाऱ्या प्रश्नांना हातच लावायचा नाही. अन्यथा नकारात्मक गुणांची पेनल्टी महागात पडू शकते.
 • प्रश्न वाचल्यानंतर उत्तर आठवले हे तथ्यात्मक (factual) प्रश्नाबाबत ठीक आहे. पण बहुविधानी प्रश्न मूलभूत तपशील विचारणारे  (concept based) असतात. त्यामुळे असे प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच उत्तरांचे पर्याय वाचावेत. किमान दोन वेळा प्रश्न वाचला जावा व तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून मगच उत्तर मार्क करावे.
 • एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससीच्या उत्तरपत्रिका या non-leaded OMR sheet स्वरूपाच्या असतात.  यांच्यावर बॉलपेनने मार्किंग करायचे असते. त्यामुळे ते काळजीपूर्वक करायला हवे.

उत्तरपत्रिकेची काळजी

उत्तरपत्रिकेच्या ओएमआर शीटवर तुम्ही रंगवलेले गोळे तुमचे भविष्य ठरवतात. म्हणूनच या शीटवर काम करताना अत्यंत काळजी घ्यायला हवी. १२० मिनिटांच्या परीक्षेत १०० गोळे रंग वायला किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे.

कारण फक्त एका प्रश्नाचा क्रम चुकला की, त्यापुढच्या सगळाच क्रम चुकलेला असतो आणि परिणामी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न फसलेला असतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटी एकाच वेळी नोंद करा, यातला पर्याय तुम्ही, तुमच्या सोयीने निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे.

एमपीएससी (पूर्व परीक्षा) : सामान्य अध्ययन पेपर १ ची तयारी

 MPSC (Pre-Examination): Preparation of General Studies Paper 1

1655   22-Mar-2018, Thu

राज्य प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच मुख्य परीक्षा देता येते.

दरवर्षी जवळजवळ १५ ते २० लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतील. उर्वरित दिवसांत या परीक्षेची तयारी कशी करता येईल, याचा विद्यार्थ्यांनी सविस्तर विचार करायला हवा. गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या आणि या वर्षी पार पडलेल्या आयोगाच्या इतर प्रश्नपत्रिका अभ्यासल्या की लक्षात येते की, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे –
राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ, राज्य पद्धती व प्रशासन, आíथक आणि सामाजिक विकास, पर्यावरण, सामान्य विज्ञान.

१) चालू घडामोडी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा विचार करता चालू घडामोडींचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. या घटकाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा. यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन आवश्यक ठरते. 


२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्य चळवळ :
इतिहासाचा अभ्यास करताना त्याची व्याप्ती समजून घ्यावी. अभ्यासक्रमात ‘इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह’ असा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ यांचा अभ्यास करावा. भारताचा सांस्कृतिक इतिहासही अभ्यासावा.

 
संदर्भग्रंथ :

 1. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तके वाचावीत.
 2. आधुनिक भारताचा इतिहास- बिपिनचंद्र
 3. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर.
 4. ही पुस्तके मराठीत भाषांतरित झाली आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी ‘एनसीईआरटी’ पुस्तकांचा अभ्यास करावा.

लक्ष्य सेन

lakshya sen

1171   24-Jul-2018, Tue

घरातूनच बाळकडू मिळाले असले की गुणवान खेळाडूची बालपणापासूनच कशी बहरते, त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे भारतीय बॅडमिंटनचा उगवता तारा लक्ष्य सेन. उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्यात १६ ऑगस्ट २००१ साली जन्मलेल्या लक्ष्यचे वडील डी. के. सेन हे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत आणि मोठा भाऊ चिराग सेन हादेखील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू. त्यामुळे पहिली पावलेसुद्धा बॅडमिंटन रॅकेट आणि शटलकॉकच्या सान्निध्यातच त्याने टाकली. दहाव्या वर्षीच तो त्याच्या वयोगटातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये झळकू लागला होता. प्रारंभिक शिक्षण वडिलांकडूनच घेतल्यानंतर त्याला प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकॅडमीत पुढील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

लक्ष्यने २०१६ सालात, म्हणजे वयाच्याही सोळाव्या वर्षांत लक्ष्यने मलेशियाच्या ली झी जियाला हरवून इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद तसेच १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. मात्र, या दोन्ही विजेतेपदांपेक्षा एका अनोख्या पराभवाने त्याच्या अस्तित्वाची दखल बॅडमिंटन जगताने घेतली. न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतला तो सामना होता दोनदा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता ठरलेल्या चिनी खेळाडू लीन डॅनसमवेत. हा सामना लीन डॅनच जिंकणार असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र, पहिल्याच गेममध्ये लीनला मागे टाकत लक्ष्यने खळबळ उडवून दिली. पुढचे दोन गेम जिंकून घेत लीनने सामन्यात बाजी मारली, मात्र त्या सामन्यापासून लक्ष्यने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याशिवाय २०१७ साली लक्ष्यने युरेशिया बल्गेरियन खुल्या तर इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद आणि टाटा खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावत त्याची घोडदौड कायम राखली.

यंदा वर्षांरंभीच्या काळात त्याच्या खांद्याची दुखापत बळावल्याने त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. हा सल्ला शिरोधार्य मानत त्याने खांद्याला तर पूर्ण आराम दिला, पण त्याच काळात आपल्या छातीखालच्या शरीराच्या तंदुरुस्तीवर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पायाचे, कमरेचे विविध प्रकाराचे व्यायाम करून त्याने शरीराचा खालील भाग भक्कम केल्याचा फायदा त्याला रविवारच्या लढतीत मिळाला. दोन वर्षांपूर्वी ज्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत लक्ष्यने कांस्य पटकावले होते, त्याच स्पर्धेत त्याने अग्रमानांकित थायलंडच्या कुनलावुत वितीदसॅम याला पराभूत करून विजेतेपद पटकावत त्याने अजून एक ‘कनिष्ठ’ लक्ष्यपूर्ती केली आहे.

नजीकच्या भविष्यात ऑक्टोबरमध्ये होणारी युवा ऑलिम्पिक स्पर्धा आणि नोव्हेंबरमध्ये होणारी जागतिक कनिष्ठ चॅम्पियनशिप या स्पर्धा त्याचे लक्ष्य राहणार आहेत. तसेच नजीकच्या भविष्यात खुल्या गटातील स्पर्धामध्येही त्याने विजेतेपद पटकावल्यास कुणालाच आश्चर्य वाटणार नाही.

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - २०१७

maharashtra forest pre 2017

558   06-Jun-2017, Tue

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - २०१७ उत्तर पत्रिका करता CLICK करा PDF किव्वा www.mpsc.gov.in

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क (पूर्व) परीक्षा - २०१७ 

mpsc excise sub inspector ans key

1228   31-May-2017, Wed

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क (पूर्व) परीक्षा - २०१७ Click करा उत्तर पत्रीका

साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ 

psi sti 2017

736   13-May-2017, Sat

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग व गृह विभागांतर्गत साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ या स्पर्धा निवड परीक्षेअंतर्गत खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

जागांची संख्या व तपशील- वरील निवड स्पर्धा परीक्षेअंतर्गत उपलब्ध जागांची संख्या १००८ असून त्याचा पदनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सामान्य प्रशासन विभाग- साहाय्यक कक्ष अधिकारी, गट ब (अराजपत्रित)- उपलब्ध जागांची संख्या १०४. यापैकी १२ जागा अनुसूचित जातीच्या, ७ जागा अनुसूचित जमातीच्या, ७ जागा विमुक्त जातीच्या, ८ जागा भटक्या जमातीच्या, १६ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी व ३ जागा विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असून ५४ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

वित्त विभाग- विक्रीकर निरीक्षक, गट ब (अराजपत्रित)- उपलब्ध जागांची संख्या २५१. यापैकी २६ जागा अनुसूचित जातीच्या, १३ जागा अनुसूचित जमातीच्या, ९ जागा विमुक्त जातीच्या, १५ जागा भटक्या जमातीच्या, ४४ जागा इतर मागासवर्गीय तर ५ जागा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असून १३९ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक, गट ब (अराजपत्रित)- उपलब्ध जागांची संख्या ६५०. यापैकी ५५ जागा अनुसूचित जातीच्या, ४६ जागा अनुसूचित जमातीच्या, १ जागा विमुक्त जातीच्या, ४४ जागा भटक्या जमातीच्या, ९६ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी तर १२ जागा विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असून ३६६ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही स्पर्धा- निवड परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा- २०१७ अंतर्गत राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर १६ जुलै २०१७ रोजी घेण्यात येईल.

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे वेगवेगळ्या पदांच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी मुख्य निवड परीक्षा स्वतंत्रपणे व खाली नमूद केलेल्या तारखांना घेण्यात येईल.

मुख्य परीक्षा दिनांक

 • सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा १० डिसेंबर २०१७
 • विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा ७ जानेवारी २०१८
 • पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७

वर नमूद केल्याप्रमाणे संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित पदावर अंतिम निवड करण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी, दूरध्वनी- ०२२-२२७९५९०० अथवा २२६७०२१० वर संपर्क साधावा अथवा आयोगाच्या  संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१७.

राज्यसेवा परीक्षा करीता महत्व पूर्ण पुस्तकांची सूची

mpsc-book-list

1056   10-May-2017, Wed

राज्यसेवा पूर्व परीक्षा

 1. NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
 2. आधुनिक भारत- बिपीन चंद्र
 3. महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
 4. समाजसुधारक- के सागर
 5. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
 6. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
 7. पंचायतराज- के सागर
 8. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
 9. भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण
 10. विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
 11. सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
 12. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
 13. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
 14. चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य
 15. राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
 16. राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल

राज्यसेवा मुख्य परीक्षा

मराठी-

 1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
 2. अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
 3. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.

इंग्रजी-

 1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
 2. Wren and Martin English Grammar
 3. अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन

सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल

 1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
 2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
 3. भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
 4. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
 5. कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
 6. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे

सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा

 1. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
 2. भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
 3. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
 4. पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
 5. पंचायतराज- के. सागर
 6. आपले संविधान- सुभाष कश्यप
 7. आपली संसद- सुभाष कश्यप

सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क

 1. मावाधिकार- NBT प्रकाश
 2. मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
 3. मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
 4. मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन


Top