भूगोलाचा आढावा

current affairs, loksatta editorial-Geography Field Of Study Mpg 94

195   13-Aug-2019, Tue

 भूगोल या विषयाचा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास आणि जैवविविधता व पर्यावरण इत्यादी अभ्यासक्रमामध्ये नमूद विषयासोबत कसा संबंध येतो, याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन हे अधिक नेमकेपणे करता येऊन विषयाची सर्वागीण तयारी करता येईल.

भूगोल या विषयातील पर्यावरण भूगोल हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासताना मुखत्वे पर्यावरण परिस्थितीकी, प्रदेशनिहाय जैवविविधता तसेच याचे प्रमाण, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े, हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमानवाढ यासाठी कारणीभूत असणारे नसíगक व मानवी घटक, वाढते शहरीकरण त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, जंगलांचा होणारा ऱ्हास तसेच या कारणास्तव निर्माण झालेल्या समस्या आणि एकूणच याचा होणारा एकत्रित परिणाम या सर्व घटकांचा जगाच्या आणि भारताच्या भूगोलात विचार करावा लागतो आणि याच्याशी संबंधित माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. या घटकांचा अभ्यास कसा करावा याची माहिती आपण मागील लेखांमध्ये सविस्तरपणे घेतलेली आहे. सामान्य अध्ययनमधील बहुतांश घटकांचा परस्पर संबंध येतो.

आर्थिक विकास या घटकासोबतचा संबंध 

 • सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकाअंतर्गत देशाच्या विविध भागात घेतली जाणारी महत्त्वाची पिके व पीक पद्धती, शेती उत्पादन, प्राणी संगोपन, अर्थशास्त्र, सिंचनाचे प्रकार आणि दळणवळण इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे.
 • याकरिता आपल्याला आर्थिक भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो आणि या विषयाच्या मूलभूत माहितीची तोंडओळख करून घ्यावी लागते. अर्थात यामुळे या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्यासाठी मदत होते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुतांश प्रमाणात भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित असतात. याच्या मूलभूत माहितीचा अभ्यास सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल विषयातील आर्थिक भूगोलामध्ये झालेला असतो.
 • या माहितीचा वापर करून पेपर तीनमधील प्रश्न अधिक समर्पकरीत्या सोडवता येऊ शकतात. पण अशा प्रकारे माहितीचा वापर करताना पेपर तीनमध्ये आर्थिक पलूंचा विशेषकरून अधिक विचार करणे अपेक्षित असते याचे भान ठेवावे लागेल. थोडक्यात जरी मूलभूत माहितीची परिभाषा एकसारखी असली तरी उत्तरे लिहिताना पेपरनिहाय लागणारा दृष्टिकोन भिन्न-भिन्न असतो.

पर्यावरण आणि जैवविविधता या घटकासोबतचा संबंध 

 • सध्या जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, शहरीकरण, उपलब्ध नसíगक साधनसंपत्तीमध्ये होणारी घट, सतत वाढणारी लोकसंख्या आणि यासाठी कारणीभूत असणारे नसíगक आणि मानवनिर्मित घटक यासंबंधी सतत काही घटना घडत असतात. ही माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने नोट्स स्वरूपात संकलित करावी लागते. या माहितीचा उपयोग सामान्य अध्ययनमधील संबंधित विषयाचा सखोल आणि सर्वागीण पद्धतीने तयारी करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो.
 • या घटकाचा समावेश हा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील-जैवविविधता आणि पर्यावरण अंतर्गत नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकांच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. हे घटक पर्यावरण भूगोल विषयाशी संबंधित आहेत पण पेपर तीनमध्ये या घटकाचा अभ्यास करताना मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टीवर कोणते परिणाम झालेले आहेत? तसेच यासाठी कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या आहेत? याची माहिती असणे आवश्यक आहे.
 • यात प्रामुख्याने भारत सरकारने आखलेल्या उपाययोजना, नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन यासाठी पारित करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे त्याचबरोबर यात भारताची नेमकी भूमिका काय आहे, याची सविस्तर माहिती ठेवावी लागते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना आणि कायदे माहीत असणे गरजेचे आहे. या माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजना, कायदे यांसारख्या स्रोतांचा उपयोग करता येऊ शकेल. या घटकाचा पारंपरिक अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये झाल्यामुळे या विषयाशी संबंधित चालू घडामोडींची समज अधिक योग्यरीत्या करता येते.

उपरोक्त नमूद केलेल्या घटकांसाठी सामान्य अध्ययनातील पेपरनुसार जो दृष्टिकोन वापरावा लागतो त्यामध्ये भिन्नता येते. त्यामुळे सर्वप्रथम प्राथमिक माहितीचा अभ्यास करून घ्यावा लागतो. त्यासाठी आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल हे विषय अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर सामान्य अध्ययन पेपर तीनमधील उपरोक्त नमूद घटकांवर विचारण्यात येणारे प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा चालू घडामोडींशी अधिक संबंधित असतात. असे असले तरी विषयाच्या पारंपरिक ज्ञानाची सखोल माहिती असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे लिहिता येत नाहीत. सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल या विषयामुळे पर्यावरण आणि आर्थिक भूगोलाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास झालेला असल्यामुळे संबंधित घटकाच्या चालू घडामोडींचा समावेश करून सर्वागीण पद्धतीने परीक्षाभिमुख तयारी करता येऊ शकते.

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा संयुक्त पेपर सराव प्रश्न

MPSC PSI STI ASO-Maharashtra Secondary Examination Mpsc Abn 97

2184   20-Jul-2019, Sat

*     प्रश्न १) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो?

१) २५ फेब्रुवारी

२) २७ एप्रिल

३) २९ जून

४) ३१ ऑगस्ट

*     प्रश्न ) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा मान कोणास प्राप्त आहे?

१) इंदिरा गांधी

२) सुषमा स्वराज

३) निर्मला सीतारामन

४) वरीलपैकी नाही

*      प्रश्न ३) पुढीलपैकी कोणत्या उत्पादनास जून २०१९मध्ये भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे?

१) सांगलीची हळद

२) कोल्हापुरी चप्पल

३) सोलापुरी चादर

४) सातारी कंदी पेढे

*      प्रश्न ४)पुढीलपैकी कोणत्या राज्याने महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये काम करण्याची मुभा देण्यासाठी फॅक्टरी कायदा १९४८मध्ये दुरुस्ती केली आहे?

१) केरळ

२) गोवा

३) कर्नाटक

४) महाराष्ट्र

*     प्रश्न ५) त्रिनेत्र हे काय आहे?

१) भारतीय वायुदलाचे टेहळणी विमान

२) इस्रोने प्रक्षेपित केलेला टेहळणी उपग्रह

३) शासकीय कार्यलयातील सी.सी.टीव्ही प्रणाली

४) भारतीय रेल्वेसाठी रडार प्रणाली

*      प्रश्न ६. हिमा दास व सरबज्योत सिंग हे खेळाडू अनुक्रमे —– व ——- या खेळांशी संबंधित आहेत.

१) अ‍ॅथलेटिक्स व नेमबाजी

२) बॉक्सिंग व तिरंदाजी

३) क्रिकेट व हॉकी

४) बॅडमिंटन व ज्युडो

*      प्रश्न ७) पुढीलपैकी कोणात्या राज्याने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जून २०१९मध्ये सुरू केली आहे?

१) पश्चिम बंगाल

२) छत्तीसगढ

३) राजस्थान

४) महाराष्ट्र

*      प्रश्न ८) सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

१) सुमित्रा महाजन

२) ओम बिर्ला

३) व्यंकय्या नायडू

४) मीरा कुमार

*      प्रश्न ९. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

१) १ मे

२) २७ जून

३) १५ ऑगस्ट

४) १० डिसेंबर

उत्तरे व स्पष्टीकरणे

*      प्र. क्र. १ – योग्य पर्याय क्र.(३) भारतीय पंचवार्षकि योजनांमध्ये महत्त्वाचे प्रतिमान तयार करणारे सांख्यिकी तज्ज्ञ पी. सी. महलनोबीस यांचा जन्म दिवस २९ जून हा दरवर्षी  राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महालनोबीस यांनी भारतीय सांख्यिकी प्रणाली स्थापन केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस मानला जातो. तसेच सांख्यिकी शाखेचे दैनंदिन महत्त्व अधोरेखित करण्यासाठीही तो साजरा करण्यात येतो.

*      प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र.(१) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी होत्या. मात्र पंतप्रधान असताना त्यांनी हा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला आहेत.

*      प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र.(२) कोल्हापुरी चप्पल. या पादत्राणांचे उत्पादन बाराव्या शतकापासून सुरू असून छत्रपती शाहू महाराजांनी २०व्या शतकामध्ये त्याला प्रोत्साहन दिले आणि हे उत्पादन एक वैशिष्टय़पूर्ण ब्रँड म्हणून प्रस्थापित झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्हे आणि कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि बागलकोट हे जिल्हे येथील उत्पादक WF GI tag वापरू शकतील.

*      प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(२) सायंकाळी ७ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये महिला कामगारांकडून कार्य करून घेण्यास फॅक्टरी कायदा १९४८ मनाई करतो. या तरतुदीमध्ये बदल करून या कालावधीमध्ये महिला कामगारांना काम करण्याची मुभा देण्यासाठी गोवा शासनाने मंजुरी दिली आहे.

*      प्र.क्र.५. – योग्य पर्याय क्र.(४) भारतीय रेल्वेसाठी धुके व तत्सम कमी दृश्यमान परिस्थितीमध्ये रुळांवरील अडथळे समजावेत यासाठी त्रिनेत्र ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

*      प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(१)

*      प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र.(४) राज्यामध्ये पुढील पाच वर्षांत १ लाख सूक्ष्म, लघू किंवा मध्यम उद्योगांची (units) उभारणी करून १० लाख रोजगार निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यातील ४० टक्के उद्योग हे ग्रामीण भागात विकसित करण्यात येतील. तसेच तालुका पातळीवर ५० औद्योगिक पार्क्‍सची स्थापना करण्यात येईल.

*      प्र.क्र.८ – योग्य पर्याय क्र.(२) लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळाणकर होते तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार या होत्या.

*      प्र. क्र. ९ – योग्य पर्याय क्र.     (२) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी तसेच कल्पकता व नावीन्यपूर्णतेस प्रोत्साहन देण्यामध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सन २०१७ पासून दरवर्षी २७ जून रोजी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस साजरा करण्यात येतो.

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्न

engineering-service-pre-examination-mpsc-abn-97-1916794/

559   13-Jul-2019, Sat

प्रश्न १ – मिशन शक्तीबाबत पुढील विधानांची सत्यता तपासा.

अ.   ही भारताची उपग्रहनाशक क्षेपणास्त्र चाचणी आहे.

ब.   दि. २७ मार्च २०१९ रोजी ही चाचणी घेण्यात आली.

१)   विधान ‘अ’ सत्य असून विधान ‘ब’ असत्य आहे.

२)   विधान ‘ब’ सत्य असून विधान ‘अ’ असत्य आहे.

३)   दोन्ही विधाने सत्य आहेत.

४)   दोन्ही विधाने असत्य आहेत.

प्रश्न २ – पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

१) परम विशिष्ट सेवा पदक – जनरल बिपीन रावत

२) कीर्ती चक्र – मेजर तुषार गौबा

३) नौसेना पदक – व्हाइस अडमिरल सुनील आनंद

४) वरीलपैकी नाही

प्रश्न ३ – सन २०१८ मध्ये

पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने सहा इमारतींना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे?

१) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

२) उच्च न्यायालय, नागपूर

३) शालिनी पॅलेस, कोल्हापूर

४) थिबा पॅलेस, रत्नागिरी

प्रश्न ४ – भारतरत्न नानाजी देशमुख यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

१)   महाराष्ट्राच्या कोडोली गावात

(हिंगोली जिल्हा) ११ ऑक्टोबर १९१६ रोजी जन्म

२) मूळ नाव चंडीकादास अमृतराव देशमुख

३) देशातील पहिले ग्रामीण विद्यापीठ – चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना

४) वरीलपैकी नाही

प्रश्न ५ – केंद्र शासनाने ‘ऑपरेशन ग्रीन्स’ कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे?

१)   टोमॅटो, कांदा व बटाटा यांचा पुरवठा व उपलब्धता सुरळीत ठेवणे.

२) पालेभाज्यांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी हमीभाव देणे.

४) जैविक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुरस्कार सुरू करणे.

४) वरील सर्व

प्रश्न ६ –

अ. भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्याची तरतूद नाही.

ब. एका वर्षांत जास्तीत जास्त तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करता येते.

वरील विधानाची सत्यता तपासा.

१) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही सत्य आहेत.

२) फक्त विधान ‘ब’ सत्य.

३) दोन्ही विधाने असत्य आहेत.

४) फक्त विधान ‘अ’ सत्य

प्रश्न ७ – पुढीलपैकी कोणत्या घटनेस सन २०१९ मध्ये १०० वष्रे पूर्ण झाली?

अ. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा स्थापना

ब. जालियनवाला बाग हत्याकांड

क. आझाद हिंद सेनेची स्थापना

पर्याय:

१) क     २) ब,

३) अ ४) वरील सर्व

प्रश्न ८ – पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ.   सन २०१९ ते २०२८ हे कौटुंबिक शेतीचे दशक म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

ब.   संयुक्त राष्ट्र संघटनेने सन २०१९ हे वर्ष स्थानिक भाषांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष, मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि समभावासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष या स्वरूपात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

१) ‘अ’ ‘आणि ‘ब’ दोन्ही सत्य आहेत.

२) फक्त विधान ब सत्य.

३) दोन्ही विधाने असत्य आहेत.

४) फक्त विधान अ सत्य

प्रश्न ९ – भारतीय नौसेनेसाठी आण्विक, जैविक आणि रासायनिक अस्त्रांविरोधात लढा देण्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे?

१) आयएनएस शिवाजी, लोणावळा

२) आयएनएस हंसा, दाबोलीम

३) आयएनएस जारवा, पोर्ट ब्लेअर

४) आयएनएस किलगा,

विशाखापट्टणम

 

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र.१) योग्य पर्याय क्र. (3) भारताने उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची (anti sattellite MIssile A-Sat) चाचणी केली असून अशी क्षमता असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे.

प्र. क्र.२) योग्य पर्याय क्र.(४)

प्र. क्र.३) योग्य पर्याय क्र. (२) उच्च न्यायालय, नागपूर या इमारतीला दगडातील काव्य असे म्हटले जाते. याबरोबर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या इमारती पुढीलप्रमाणे :

राजस्थान- निमराना  बावडी, रानीपूर – झरियाल मंदिर समूह, ओडिशा, विष्णू मंदिर, उत्तराखंड, आगा खान व हाथी खाना हवेली, उत्तर प्रदेश

प्र. क्र.४) योग्य पर्याय क्र.(४)

प्र. क्र.५) योग्य पर्याय क्र.(१)

प्र. क्र.६) योग्य पर्याय क्र.(२) सन १९५५पासून भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्र. क्र.७) योग्य पर्याय क्र.(२) (जालियनवाला बाग हत्याकांड १० एप्रिल १८१९ रोजी घडले. याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी आपला ‘सर’ हा किताब ब्रिटिश संसदेला परत केला. हत्याकांडाचा आदेश देणाऱ्या डायरच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या जनरल ओडवायरचा वध उधम सिंग यांनी लंडन येथे केला. ब्रिटनच्या संसदेने सन २०१९मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत दिलगिरी व्यक्त केली.)

प्र. क्र.८) योग्य पर्याय क्र.(१)

प्र. क्र.९) योग्य पर्याय क्र.(१)

दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर

/secondary-service-main-examination-joint-paper-mpsc-abn

444   12-Jul-2019, Fri

दुय्यम सेवा (गट ब) मुख्य परीक्षा २८ जुलपासून सुरू होत आहे. या लेखापासून मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.

मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक हा तिन्ही पदांसाठी संयुक्त पेपर आहे आणि पेपर दोन हा सामान्य क्षमता चाचणी आणि त्या त्या पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित वेगळा अभ्यासक्रम यांवर आधारित असेल. केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असतो.

एकूण दोनशे गुणांसाठी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या दोन प्रश्नपत्रिका असतात व त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

या लेखामध्ये संयुक्त पेपरच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. तर पदनिहाय पेपरच्या तयारीबाबत स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल.

पेपर १ (संयुक्त पेपर) तयारी

मराठी व इंग्रजी

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी-वाक्प्रचार आणि आकलन असे ढोबळ मानाने तीन भाग दिसून येतात. व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथक्करण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक, सामासिक शब्दांची उकल, महत्त्वाचे तत्सम, तद् भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल, तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषांसाठीचे कोष्टक आणि महत्त्वाच्या क्रियापदांची, past participle, past perfect participle  यांचे कोष्टक पाठच असायला हवेत. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात. शब्दरचनेचे मराठीतील नियमही माहीत असणे आवश्यक आहे.

तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा प्रिंन्ट आऊट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

आकलनासहित वाचन आणि नियमांचा सराव अशी रणनीती या घटकाच्या तयारीसाठी योग्य ठरेल.

सामान्य ज्ञान –

चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींची टिपणे नोटस् सूत्रबद्धपणे पुढीलप्रमाणे काढता येतील –

केंद्र व राज्य सरकारच्या योजना, धोरणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे, देशावर प्रभाव टाकू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना, ठळक पर्यावरणीय व भौगोलिक घटना, त्याबाबतचे निर्णय, अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्थेसंबंधी घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञानविषयक घडामोडी, महत्त्वाच्या परिषदा, संघटना, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या-निवड-बढती, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, ग्रंथ लेखक, निधन, महत्त्वाच्या चच्रेतील कंपन्या, संस्था त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र, चच्रेतील ठिकाणे, विज्ञानातील शोध व त्यातील संकल्पना, महत्त्वाच्या समित्या-आयोग व त्यांचे अहवाल, महत्त्वाची आर्थिक आकडेवारी, महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या, महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ.

माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

दोन्ही अधिनियमांतील महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, विहित कालावधी, सेवा / माहिती देणारे व अपिलीय प्राधिकारी यांचे अधिकार, कर्तव्ये, नियमांतील अपवाद, दंडांची /  शास्तीची तरतूद या बाबी मुख्य अधिसूचनेतून आणि नियमांतून तयार कराव्यात.

संगणक व माहिती तंत्रज्ञान

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधा मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य या बाबींची तयारी संदर्भ साहित्यासहित वृत्तपत्रीय चच्रेतून अपडेट कराव्यात.

डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी यातील महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजून घ्याव्यात व थोडक्यात प्रणालीची माहिती करून घ्यावी.

शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी बाबी उद्देश, प्रक्रिया, लाभार्थी यांचा आढावा घ्यावा.

सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध याबाबतचे कायदे मुळातून वाचून त्यांची तयारी करावी.

मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन

mpsc-exam-2019-mpsc-exam-preparation-tips-zws-70-1927951

493   11-Jul-2019, Thu

राज्यसेवा मुख्य परीक्षा या आठवडय़ात होत आहे. सलग तीन दिवस प्रत्येकी दोन पेपर अशा प्रकारे ही परीक्षा होत असते. यामध्ये एक पारंपरिक वर्णनात्मक पेपर तर बाकीचे पाच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर आहेत. परीक्षा काळात घ्यायची दक्षता आणि परीक्षा हॉलमधील नियोजन याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

उत्तर पत्रिकेची काळजी

भाषा विषयाच्या पारंपरिक पेपरसाठी तीन तास देण्यात आले आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका पुरवण्यात येतात. मराठीची उत्तरे इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत आणि इंग्रजीची मराठीत असे उलटे झाल्यास ती उत्तरे तपासली जात नाहीत. त्यामुळे उत्तरे लिहायला सुरुवात करताना त्याच भाषेच्या उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहीत असल्याची खात्री प्रत्येक प्रश्न सोडवताना करावी.

पारंपरिक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उपप्रश्न सलग लिहावे. एखादा उपप्रश्न बाजूला ठेवल्यास त्यासाठी जागा सोडून पुढचा प्रश्न सोडवावा. वेळेअभावी अशा मोकळ्या सोडलेल्या जागेवर प्रश्न सोडवता आला नाही व ती जागा रिकामी राहिली तर त्यावर उभी रेघ काढू ढळड (कृपया मागे पहा) असे नक्की लिहावे, अन्यथा पुढची उत्तरे नजरचुकीने तपासायची राहून जायची शक्यता अनाठायी नाही.

बहुपर्यायी पेपरच्या उत्तरपत्रिका या डटफ शीट आहेत. खाडाखेड, फाटणे, चुरगळणे, खराब होणे अशा गोष्टी झाल्यास त्या तपासल्याच जात नाहीत. त्यामुळे त्यात माहिती भरताना उत्तरांसाठीचे पर्याय रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी.

उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो. यानंतर शाई पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला जातोच. पण घाम आल्याने किंवा आणखी काही कारणाने या शाईचा डाग उत्तरपत्रिकेवर पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. चौकटीमध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील मार्किंग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.

वेळेचे नियोजन

पारंपरिक पेपरमध्ये तीन तास वेळ असला तरी त्याचे नियोजन काळजीपूर्वक करावे. तीन तासांत दोन्ही भाषांसाठी प्रत्येकी एक निबंध, प्रत्येकी सारांश लेखन व भाषांतराचा उतारा लिहायचा आहे. त्यामुळे लेखनाचा सराव महत्त्वाचा आहे.

बहुपर्यायी भाषा पेपरमध्ये ६० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे आहेत, तर सामान्य अध्ययनाच्या चार पेपरमध्ये १२० मिनिटांत १५० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि डटफ शीटची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.

नकारात्मक गुणपद्धतीचा विचार करता जास्तीत जास्त १२५ ते १३५ प्रश्न सोडविणे व्यवहार्य ठरते. १०० गोळे रंगवायला किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्या पुढच्या सगळ्याच प्रश्नांचा क्रम चुकतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटी एकाच वेळी नोंद करा. तुमच्या सोयीने यातला पर्याय तुम्ही निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे, हे ध्यानात घ्या.

प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करावी. सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नये. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जायचे.

एखाद्या प्रश्नाबाबत काही शंका किंवा गोंधळ असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नाच्या क्रमांकाला प्रश्नपत्रिकेमध्ये खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडविण्याची पहिली फेरी संपवावी. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेत रंगवून घ्यावीत. किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तरपत्रिकेमध्ये रंगवले तरी हरकत नाही. पण त्या वेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोरील पर्यायांची खूण रंगवत नाही ना, हे काळजीपूर्वक पाहावे.

आता दुसरी फेरी. अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करायचा. आधीच अशा खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.

थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या मनाचा कौल घ्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या एका निरीक्षणामधून ही गोष्ट समोर आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटते,  तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर असते.

पारंपरिक पेपरमध्ये ज्या भाषेच्या लेखनाबाबत जास्त आत्मविश्वास असेल तिचे प्रश्न आधी सोडवावेत. शब्दमर्यादा १० टक्के कमी किंवा जास्त इतक्या मर्यादेत राहील याची खात्री बाळगावी.

उमेदवारांच्या दोन ओळखपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात असे हॉल तिकिटामध्ये नमूद असते. पण ऐन वेळी एका/ दोन्ही ओळखपत्राची प्रतच नसणे किंवा एकच ओळखपत्र बाळगणे अशा बाबींमुळे धावपळ होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण अजूनही बऱ्यापैकी आहे. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशीच आवश्यक बाबींची तयारी करून  ठेवावी.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

practice-of-maharashtra-secondary-service-practice-mpsc-

369   11-Jul-2019, Thu

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २८ जुलै रोजी सुरू होत आहे. या परीक्षेच्या सरावासाठी सराव प्रश्न या आणि पुढील लेखांमध्ये देण्यात येत आहेत.

प्रश्न १. समानता एक्स्प्रेसबाबत पुढील विधानांची सत्यता तपासा.

अ.   १४ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन

ब.   गौतमबुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणार.

१)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

२)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

३)   दोन्ही विधाने सत्य आहेत.

४)   दोन्ही विधाने असत्य आहेत.

प्रश्न २. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

१)   दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची संघटना म्हणून स्थापना करण्यात आली.

२)   भारत संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

३)   सन १९६९चा शांततेचा नोबल पुरस्कार संघटनेस प्रदान करण्यात आला.

४)   एकूण १८७ देश संघटनेचे सदस्य आहेत.

प्रश्न ३. गगनयान प्रकल्पाबाबत कोणते विधान असत्य आहे?

अ.   सन २०२२मध्ये मानवी अंतराळ घडवून आणणे हा उद्देश.

ब.   रशिया आणि फ्रान्स या देशांशी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करार

१)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

२)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

३)   दोन्ही विधाने असत्य आहेत.

४) दोन्ही विधाने सत्य आहेत.

प्रश्न ४. पुढीलपकी कोणत्या देशांच्या गटाने  (single use plastic) बंदी घातली आहे?

१) ओपेक

२) जी ४

३) युरोपियन युनियन

४) सार्क

प्रश्न ५. पीएम किसान योजनेबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

१)   १ जानेवारी २०१९ पासून देशामध्ये लागू करण्यात आली.

२)   २ हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना वार्षकि रु. ६,००० इतके अनुदान देण्यात येईल.

३)   १००% केंद्र पुरस्कृत योजना.

४)   रु. २०००च्या तीन हफ्त्यांमध्ये प्रत्यक्ष लाभ देण्यात येईल.

प्रश्न ६. अनुप सत्पथी समितीने महाराष्ट्रासाठी —— प्रतिदिन इतके किमान वेतन असावे अशी शिफारस केली आहे?

१) रु. ३८०

२) रु. ४१४

३) रु. ४४७

४) रु. ५०३

प्रश्न ७. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबाबत अयोग्य विधान कोणते?

१)   दरमहा १५,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या असंघटित क्षेत्रातील श्रमिकांसाठी निवृत्ती वेतनाची योजना.

२)   वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना दरमहा ६,००० रुपये निवृत्तीवेतन.

३)   लाभार्थ्यांच्या वयाच्या ४०व्या वर्षांपर्यंत लाभार्थी व शासन यांचेकडून ५०:५० प्रमाणात अंशदान जमा केले जाईल.

४) वरीलपैकी नाही.

प्रश्न ८. कलामसॅट V2 बाबत  पुढील विधानांची सत्यता तपासा.

अ)   हा जगातील सर्वात लहान व सर्वात कमी वजनाचा उपग्रह आहे.

ब)   चेन्नईच्या स्पेस किडझ इंडिया या खासगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी हा उपग्रह विकसित  केला आहे.

१)   दोन्ही विधाने असत्य आहेत.

२)   दोन्ही विधाने सत्य आहेत.

३)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

४)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

प्रश्न ९. एमीसॅट उपग्रहाबाबत पुढीलपकी कोणते विधान असत्य आहे?

१)   शत्रूच्या रडार यंत्राणांची माहिती संरक्षण यंत्रणांना पुरविण्यास सक्षम.

२)   शत्रूच्या रडार यंत्रणांची दिशाभूल करण्यात सक्षम.

३)   इसरो व डीआरडीओ यांनी एकत्रितपणे विकसित केलेला उपग्रह.

४)   मिशन शक्तीच्या माध्यमातून

प्रक्षेपण.

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र.क्र.१ – योग्य पर्याय क्र. (३)

प्र.क्र.२ – योग्य पर्याय क्र. (१)

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर व्हर्सायच्या तहातील तरतुदीनुसार आंतरराष्ट्रीय कामगार संघटना

सन १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली. संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. यामध्ये सरकार, नियोक्ते व कामगार

यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र. (४)

(गगनयान प्रकल्प यशस्वी झाल्यावर मानवास अंतराळात पाठविणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरेल.)

प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र. (३)

(स्ट्रॉ, इअर बड्स, प्लॅस्टिकचे चमचे इत्यादी कटलरी अशा एकदाच वापरात येणाऱ्या वस्तूंवर युरोपियन युनियनने मार्च २०१९ मध्ये बंदी घातली आहे.)

प्र.क्र.५ – योग्य पर्याय क्र. (१)

पीएम किसान योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशामध्ये लागू करण्यात आली.

प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(२)

(सत्पथी समितीने किमान वेतननिश्चितीबाबत शिफारस करताना राज्यांना पाच विभागांत विभागले आणि त्यांच्यासाठी अनुक्रमे रु. ३४२, रु. ३८०, रु. ४१४, रु. ४४७ व रु. ३८६ प्रतिदिन किमान वेतन असावे अशी शिफारस केली आहे. महाराष्ट्राचा समावेश तिसऱ्या गटामध्ये असून प्रतिदिन रु. ४१४ प्रमाणे दरमहा रु. १०,७६४ इतक्या किमान वेतनाची शिफारस करण्यात आली आहे.)

प्र. क्र. ७- योग्य पर्याय क्र. (४)

प्र. क्र. ८ – योग्य पर्याय क्र. (२)

प्र. क्र. ९ – योग्य पर्याय क्र. (४)

मिशन शक्तीच्या माध्यमातून उपग्रहनाशक उपग्रहाचे (A-SAT) प्रक्षेपण करण्यात आले. एमी सॅटचे प्रक्षेपण १ एप्रिल २०१९ रोजी पीएसएलव्ही ४५च्या माध्यमातून करण्यात आले. याबरोबर AMSAT सह इतर २८ उपग्रहांचे प्रक्षेपणही करण्यात आले.

एमपीएससी आणि वेळेचे नियोजन

mpsc exam and time management

1834   03-Apr-2019, Wed

या सदरामध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण २४ मार्च २०१९ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठीचे समान नियोजन कसे करता येऊ शकते, याबद्दल माहिती बघितली होती. आजच्या लेखात एमपीएससी मुख्य परीक्षा आणि वेळेचे नियोजन याबाबत माहिती पाहू; तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेचीही माहिती घेऊ. 

वेळेचे नियोजन : एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम बघता किमान एक ते दीड वर्ष एवढा कालावधी य परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे असे लक्षात येते. मग हा अभ्यासक्रम नेमका कशा प्रकारचा आहे. तो कोणत्या कोणत्या संदर्भासाहित्यातून अभ्यासायचा, नेमकी परीक्षा कशा स्वरुपाची असे, परीक्षा कशा हाताळायच्या या सर्वांसाठी किमान एक ते दीड वर्ष एवढा कालावधी निश्चितच उपयोगी आणावा लागतो. यासाठी योग्य मार्गदर्शन, स्वयंअध्ययनाची तयारी आणि परीक्षाभिमूख अभ्यासपद्धती अशी त्रिसुत्री अंमलात आणणे आवश्यक आहे. 

एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवांच्या संधीकडे एक सुरक्षित आणि स्थिर करिअर म्हणून बघितले जाते. यामुळेच बहुदा शिणातील पदवी घेतल्यावर या परीक्षांच्या अभ्यासाकडे वळण्याचा निर्णय घेतात. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असल्यामुळे पुढे आता किती काळ एमपीएससीचा अभ्यास करायचा याचे काही निश्चित धोरण आखले जात नाही. आणि मग एमपीएससीचे अटेम्प्ट हे चक्र सुरू होते. म्हणूनच एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करताना आपण स्वत:साठी वेळेची मर्यादा आखून घेणे आवश्यक आहे. 

किमान किती प्रयत्न (अटेम्प्ट)? : आता एमपीएससीच्या यशाचे असे काही एकच विशेष सूत्र किंवा मार्ग नाही. यामधील निश्चितता, अनिश्चितता वेगळ्या स्वरूपाची आहे. यशाचा हमखास असा एकच फॉर्म्युला नाही. मात्र, एमपीएससीचा अभ्यासक्रम, त्याचा आवाका, परीक्षांची काठीण्यपातळी या सर्वांचा विचार करता पूर्ण वेळ अभ्यासाचे नियोजन करून किमान एमपीएससीचे तीन प्रयत्न देणे योग्य ठरते. तीनच प्रयत्न का, याचे साधारण विश्लेषण असे सांगता येईल, की पहिल्या प्रयत्नामध्ये एकूण परीक्षाचा आवाका व अभ्यासक्रम पूर्णपणे आटोपण्यास कमतरता राहू शकते. परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये पहिल्या परीक्षेचा अनुभव पाठिशी असल्यामुळे दुसरी परीक्षा फार योग्य प्रकारे देता येते. ज्या उणीवा पहिल्या अटेम्प्टमध्ये राहिल्या त्यासुद्धा भरून काढता येतात. आपण असे म्हणून शकतो की पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होऊ शकलो नाही कारण परीक्षेत वेळेचे नियोजन किंवा अनुभव कमी पडला. परंतु दुसऱ्या प्रयत्नात आपल्या दोन्हीमध्ये सुधारणा करून पूर्व परीक्षा पास होता येते. दुसऱ्या प्रयत्नात जर मुख्य परीक्षेत कमतरता राहिली तर ती निश्चितच तिसऱ्या प्रयत्नात पूर्ण करून आपल्याला यशापर्यंत पोहाचता येते. आपण एमपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी करणाऱ्या या तिन्ही प्रयत्नात सामान्य असणे गरजेचे आहे. हे तिन्ही प्रयत्न पूर्ण वेळेचे नियोजन करून, पूर्ण वेळ अभ्यासाला देऊन केल्यास या तीन प्रयत्नांमध्ये यश मिळवताच येऊ शकते. 

आपण आधी उल्लेखल्याप्रमाणे व्यक्तीपरत्वे यामध्ये नक्कीच वेगवेगळेपणा असणार आहे. कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती, अभ्यासाचा वेग, स्वयंशिस्त या सर्व बाबींचा निश्चित परिणाम हा व्यक्तीपरत्वे वेगळा वेगळा असणार आहे. 

नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर बरेच विद्यार्थी स्कोर चेक करून पुढील अभ्यासाचा निर्णय घेतात. काही जण किंवा बहुतांश विद्यार्थी २४ मार्चच्या संयुक्त पूर्व परीक्षेनंतर त्यांची अभ्यासाची पुढची दिशा निश्चित करतील. येथेच सर्व गल्लत होते. आपण जर एमपीएससीचा पूर्णवेळ अभ्यास करून असू तर पूर्व परीक्षेचा निकाल आणि त्यानंतर मुख्य परीक्षांचा अभ्यास असे अभ्यासाचे नियोजन करता येणार नाही. 

मूळात एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करतानाच सुरुवात ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून करणे आवश्यक असते. मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर पूर्व परीक्षेचा अभ्यास आणि पूर्वपरीक्षा झाली, की परत मुख्य परीक्षेचा अभ्यास हे खरे अभ्यासाचे चक्र आपल्याला यशाकडे नेऊ शकते. म्हणूनच पूर्व परीक्षा झाल्यावर स्कोअर काढण्यात '
कटऑफ'ची चर्चा करण्यात, जागा वाढणार की नाही, जाहिरात येणार की नाही, अशा चर्चामध्ये न अडकता आपल्या नियोजनानुसार मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तत्काळ सुरुवात करावी. 

किमान पहिले तीन प्रयत्न तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर पूर्व व परत मुख्य परीक्षेचा अभ्यास अशा चक्राने करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या कालावधीत प्रत्येक परीक्षार्थींनी स्वत:ला झोकून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागणे गरजेचे आहे. 

 

प्रश्नवेध एमपीएससी : दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा

article-on-secondary-service-joint-pre-examination

894   16-Mar-2019, Sat

१.‘संसदेच्या कायद्याच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन कार्यपद्धतीबाबत नियम बनवू शकते.’ ही तरतूद राज्यघटनेच्या ——– मध्ये करण्यात आली आहे.

१) कलम १२४   २) कलम १४०   ३) कलम १४५   ४) कलम १६५.

२. राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये केंद्र व राज्यांतील संबंधांबाबतच्या तरतुदी समाविष्ट आहेत?

१) भाग १३            २) भाग १२

३) भाग ११            ४) भाग १०

३. दुहेरी नागरिकत्वाबाबत पुढीलपकी अयोग्य विधान ओळखा.

१) परदेशातील भारतीय वंशाच्या व्यक्तींना ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया या स्वरूपात दुहेरी नागरिकत्व प्राप्त होते.

२) दुहेरी नागरिकत्वप्राप्त व्यक्तींना मतदानाचा अधिकार मिळत नाही.

३) शासकीय नोकरीमध्ये समान संधी मिळते.

४) नागरिकत्व कायद्यामध्ये समाविष्ट १६ देशांपकी ज्या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे अशा देशांमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना ओसीआयसाठी अर्ज करता येतो.

४. घटना समितीबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

१) भारत सरकार कायदा १९३५ऐवजी घटना समितीकडून बनविण्यात आलेली राज्यघटना भारतामध्ये लागू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कायदे मंडळासमोर एस. सत्यमूर्ती या काँग्रेस सदस्याने सन १९३७मध्ये मांडला.

२) बाहेरच्या प्रभावाशिवाय भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रौढ मताधिकाराने निवडलेल्या घटना समितीकडून करण्यात येईल अशी घोषणा मोतीलाल नेहरू यांनी सन १९३८मध्ये केली.

३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यघटना निर्मितीसाठी घटना समिती स्थापन करण्याची औपचारिक मागणी सन १९३५मध्ये केली.

४) भारतासाठी घटना समिती स्थापन करण्याची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली

५. कलम १६ अन्वये नागरिकांना देण्यात आलेल्या शासकीय नोकऱ्यांमधील समान संधीच्या अधिकाराबाबत अपवाद विहित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही?

१) राज्यातील निवासाबाबत संसदेने कायदा करून विहित केलेली अट.

२) पर्याप्त प्रमाणात प्रतिनिधित्व न मिळालेल्या मागास वर्गासाठी आरक्षण.

३) व्यावसायिक वा तांत्रिक कौशल्याची अट.

४) धार्मिक संस्थांमध्ये ठरावीक धर्माचे पालन करणारे पदाधिकारी नेमणे.

६. पुढीलपकी कोणती विधाने योग्य आहेत?

अ) संसद सदस्यांच्या निर्हतेबाबतचा निर्णय राष्ट्रपती घेतात.

ब) विधान मंडळ सदस्यांच्या निर्हतेबाबतचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त घेतात.

क) राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबतच्या विवादांचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देते.

ड) पक्षांतराच्या कारणावरून सदस्यांच्या निर्हतेबाबतचा निर्णय त्या त्या सदनाचे सभापती / अध्यक्ष घेतात.

पर्याय

१) अ, ब आणि क

२) अ, क आणि ड

३) ब, क आणि ड

४) वरील सर्व

७. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते.

ब)     गोपीनाथ मुंडे हे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.

पर्याय

१) केवळ अ बरोबर                    २) केवळ ब बरोबर

३) दोन्हीपकी एकही नाही         ४) दोन्ही बरोबर

८. पुढीलपकी कोणत्या कलमांन्वये संसद सदस्य आणि राज्य विधान मंडळ सदस्यांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत?

१) कलम १०५ व १९४

२) कलम १०३ व १९३

३) कलम १०६ व १९५

४) कलम १०२ व १९२

९. पुढीलपकी कोणते नीतिनिर्देशक तत्त्व सरनाम्यामधील ‘दर्जा व संधीची समानता’ उपलब्ध करून देण्यासाठी योजण्यात आलेले नाही?

१) सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने मिळविण्याचा अधिकार असेल.

२) महिला व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देय असेल.

३) उद्योगांचा व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असेल.

४) संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होणार नाही.

१०. पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

१)  ग्रामसभा बरखास्त करण्याचा अधिकार सरपंचांना असतो.

२)  ग्रामसभेची गणपूर्ती एकूण मतदारांच्या १५% सदस्यांनी होते.

३) ११व्या परिशिष्टामधील सर्व २९ विषय महाराष्टातील ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आले आहेत.

४)  ग्रामसभेच्या जास्तीतजास्त किती बठका घेण्यात याव्यात याबाबत राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही.

उत्तरे व स्पष्टीकरणे

१.  योग्य पर्याय (३)

२.  योग्य पर्याय (४)

३.  योग्य पर्याय (३) शासकीय नोकरीमध्ये समान संधी मिळण्याचा हक्क हा केवळ भारतामध्ये अधिवास असणाऱ्या भारतीय नागरिकालाच आहे.

४.  योग्य पर्याय (२)

५.  योग्य पर्याय (३)

६.  योग्य पर्याय (२) विधान मंडळ सदस्यांच्या निर्हतेबाबतचा निर्णय निवडणूक आयुक्तांचे मत विचारात घेऊन त्या राज्याचे राज्यपाल घेतात.

७.  योग्य पर्याय (४)

८.  योग्य पर्याय (१)

९.  योग्य पर्याय (३)

उद्योगांचा व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची तरतूद कलम ३९ मधील नीतिनिर्देशक तत्त्वानुसार करण्यात आली आहे.

आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये अशा प्रकारे राज्य आपले धोरण आखेल अशी तरतूद कलम ३९(c) मध्ये करण्यात आली आहे.

१०. योग्य पर्याय(१) ग्रामसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्य शासनास असतो.

चालू घडामोडींचे सर्वव्यापी स्वरूप

article-about-format-form-of-current-events

2087   25-Jan-2019, Fri

कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर दिल्यावर काही उमेदवारांची एक प्रतिक्रिया असते, ती  म्हणजे आपण वाचलेल्या पुस्तकांतून प्रश्नच येत नाहीत. चालू घडामोडींचा नेमका आणि विश्वासार्ह स्रोतच कळत नाही. चालू घडामोडींची व्याप्ती फार आहे, असा समज करून घेतला की स्पर्धा परीक्षेच्या मूळ दृष्टिकोनापासून ‘भरकटणे’ सोपे होते. व्याप्ती फार आहे असे समजून व्याप वाढवून घेण्यापेक्षा योग्य विश्लेषण करून आपला अभ्यास योग्य दिशेने जाईल, याची काळजी घेतली पाहिजे.

चालू घडामोडी म्हणजे ‘काय वाट्टेल ते’ विचारले जाऊ शकते या मुक्त छंदातून बाहेर पडायला हवे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला, मग ती केंद्र, राज्य कोणतीही असो, त्या अभ्यासक्रमाला एक निश्चित चौकट असते, हे समजून, आपला अभ्यास ‘मिनिमाईज’ करायला हवा. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बघता राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांच्या चच्रेतील मुद्दय़ांचा समावेश प्रश्नांमध्ये केलेला दिसून येतो. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की चालू घडामोडी घटकात पुढील तीन प्रकार समाविष्ट असतात –

*     सामान्य अध्ययनामध्ये समाविष्ट इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण या घटकांशी संबंधित चालू घडामोडी.

*     स्वतंत्र चालू घडामोडी – यामध्ये व्यक्तिविशेष, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, पुस्तके व लेखक, संमेलने, नेमणुकी व नियुक्त्या अशा घटकांचा समावेश होतो.

*     सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती – या प्रत्येक घटकासाठीचा स्रोत व अभ्यासपद्धत समजून घेतली तर या घटकाचे ओझे वाटणार नाही.

पहिल्या प्रकारच्या घडामोडींबाबत मुख्य घटकाशी संबंधित अद्ययावत माहिती असे स्वरूप असते. त्यामुळे मुख्य मुद्दय़ाचा अभ्यास करताना या अद्ययावत माहितीचा संदर्भ लक्षात घ्यायचा व ठेवायचा असतो.

स्वतंत्र चालू घडामोडी हा घटक पूर्णपणे तथ्यात्मक व म्हणूनच स्मरणशक्तीवर विसंबून असलेला मुद्दा आहे. त्याचेच प्रमाण चालू घडामोडीवरील स्वतंत्र प्रश्नांमध्ये जास्त आहे. त्यामुळे सारणीच्या पद्धतीत मुद्दे काढणे आणि त्यांची उजळणी हा यासाठी महत्त्वाचा भाग आहे.

सामान्य ज्ञान हा भाग अमर्याद या वर्गवारीखाली मोडतो. येतो. त्यामुळे या घटकाच्या संपूर्ण तयारीचा किंवा अभ्यासक्रम पूर्ण करायचा ध्यास वगरे न बाळगता इंडिया इयर बुक व लोकराज्य / योजना यातून मिळेल तेवढय़ा ‘ज्ञाना’वर समाधान मानावे आणि जमतील तितके प्रश्न सोडवून हुकमी प्रश्नांकडे वळावे.

पूर्व परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारणपणे मागील एक वर्षांच्या घडामोडींवर विचारले जातात. ‘एक वर्ष’ असा लिखित नियम नाही. अजून खोलात जायचे तर मागील आठ-नऊ महिन्यांच्या घडामोडींवर फोकस जास्त असतो. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असे अभ्यासक्रमात नमूद आहे. पण प्रश्नांचा प्राधान्यक्रम पाहता या क्रमात राष्ट्रीय पहिले आणि मग राज्य व आंतरराष्ट्रीय असे दिसते.

‘चालू घडामोडी’ हा सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमामधील नुसता काही मार्कासाठी विचारला जाणारा भाग नसून तो परीक्षेचाच एक ‘आधार’ आहे. या घटकाची व्याप्ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांवर वेढलेली आहे. हा नुसता एक घटक विषय नाही तर अभ्यासक्रमांतील प्रत्येक विषयाशी अनिवार्यपणे जोडलेला मुद्दा आहे. म्हणून चालू घडामोडी हा अभ्यासाचा एक भाग न मानता तो अभ्यासाचा ‘पाया’ बनला पाहिजे. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पाश्र्वभूमीवर एखादी राज्य – राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय घडामोड असतेच हे समजून घ्या. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एक ‘अनिवार्य पेपर’ इतका महत्त्वाचा अभ्यास विषय आहे.

पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. हे टेक्निकली बरोबर आहे. पण एका शब्दात, एका वाक्यात उत्तरे द्या किंवा गाळलेल्या जागा भरा किंवा तारीख, घटना, नाव, नियुक्ती, समिती, अहवाल, तरतूद, शिफारस एवढय़ापुरती वस्तुनिष्ठ माहिती पाठ करून परीक्षा देण्याची परिस्थिती आता राहिली नाही. अशा स्वरूपाचे प्रश्न आता विचारलेही जात नाहीत. काही मोजके पश्न असे विचारले गेलेही असतील पण वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व परीक्षा तुमच्या विश्लेषणात्मक माहितीची आणि अभ्यासाची परीक्षा पाहणारी असते.

अभ्यास नेमका काय करायचा, कशाचा करायचा आणि कोणत्या संदर्भ साहित्यातून करायचा हा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. उमेदवारांचा एक साधारण अनुभव असा आहे की एका विषयाची, घडामोडीची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकात पाहिली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत हे जसेच्या तसे

लागू पडते.  एखादे दुसरे गाइड पाहून किंवा एकच स्रोत हाताळा आणि अभ्यास संपवा हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की ही मर्यादा आपल्या लक्षात येते. अशा अभ्यासाने आपण स्पध्रेत टिकू शकणार नाही हेही जाणवते. त्यामुळे डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकतो, मनात कसलीही शंका न ठेवता अभ्यास करू शकतो.

अशा संदर्भ साहित्याचा ‘पर्याय’ आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळे किमान दोन संदर्भ वापरून माहितीची पडताळणी करून मगच मुद्दे काढणे आवश्यक आहे.

कर सहायक (पेपर २)

useful-tips-for-mpsc-exam-tax assistant

1996   03-Nov-2018, Sat

आज आपण कर सहायक गट क परीक्षेच्या पेपर २ बद्दल बोलणार आहोत. या पेपरसाठी परीक्षेला जाता जाता उजळणी कशी करावी आणि त्यासाठी कोणते अभ्यासस्रोत वापरावेत याचा आढावा घेऊ या.

अभ्यासक्रम व अभ्यासस्रोत

१. नागरिकशास्त्र – राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन)

या विभागांतर्गत ग्रामप्रशासन आणि राज्यव्यवस्थापन यामधील मूलभूत संकल्पनांचे आकलन, पंचायत राजव्यवस्था, त्यासंदर्भातील समित्या; त्यांच्या शिफारशी; सदस्य; स्थापना वर्ष; कायदे; या स्तरावर कार्यरत अधिकारी – त्यांचे अधिकार व कर्तव्ये; यासंदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी या घटकांवर विशेष भर द्यावा.

अभ्यासस्रोत – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्र आणि अकरावी, बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके यासाठी उपयोगी ठरतील.

२. भारतीय राज्यघटना – या विभागात घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या या विभागांतर्गत भारतीय राज्यघटनेबद्दलची निरीक्षणे, केंद्र-राज्य संबंध आणि त्यासंबंधित तरतुदी, नीती आयोग आणि त्याचे महत्त्व; कार्य; संरचना, राष्ट्रपती; पंतप्रधान; मुख्यमंत्री; राज्यपाल ही पदे व या पदांची कार्ये, पात्रता, विशेषाधिकार, लोकसभा; राज्यसभा; तसेच विधानसभा; विधान परिषद यांची कार्यपद्धती, लोकलेखा समिती; तिची निर्मिती; कार्य, संविधान दुरुस्तीविषयक तरतुदी आणि त्यांचे विषय, भारताचा महाधिवक्ता; त्याची कार्ये; अधिकार व त्यासंदर्भातील तरतुदी, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्यासंदर्भात संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि तिचे पडसाद, या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा.

अभ्यासस्रोत – सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्राची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके अकरावी व बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके, एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे पुस्तक.

३. पंचवार्षिक योजना – या विभागांतर्गत नियोजनाची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या आतापर्यंतच्या पंचवार्षिक योजनांचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल आणि त्या संदर्भातील पंचवार्षिक योजनांमधील तरतुदी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा.

अभ्यासस्रोत – वरील घटकासाठी भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ हे डॉ. किरण देसले यांचे पुस्तक अभ्यासावे.

४.  चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 

हा घटक अभ्यासताना परीक्षेच्या अगोदर किमान एक वर्ष अगोदर घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था भारतीय राजकारण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल, नवीन लागू झालेल्या करप्रणाली, जागतिक उच्चांक, राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अधिनियम, विविध योजना, चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरी यांचा समावेश करावा.

अभ्यासस्रोत – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

५. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय

कौशल्ये – ५.१) बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते.

५.२) मूलभूत गणितीय कौशल्य – यामध्ये मूलभूत अंकगणितीय कौशल्ये, अंक आणि त्यांचे परस्पर संबंध, अशा दहावीच्या स्तरावरील गणितीय क्रियांवर अधिक भर देणे अपेक्षित आहे.

अभ्यासस्रोत – वा. ना. दांडेकर यांची गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची टळरची पुस्तके आणि दहावीची ठळरची पुस्तके

६. अंकगणित – गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन.

अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास पाचवी ते दहावीपर्यंतच्या अंकगणित विषयाच्या पाठय़पुस्तकातील उदाहरणसंग्रह सोडवून करावा.

७. पुस्तपालन व लेखाकर्म (Book Keeping and Accountancy)- लेखाकर्म अर्थ, लेखासंज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्त्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहायक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कामाविणाऱ्या संस्थांची खाती.

अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे पुस्तकपालन व लेखाकर्म या संदर्भातील उपलब्ध असणारे अभिजीत बोबडे यांचे पुस्तक वापरावे.

८. आर्थिक सुधारणा व कायदे – यामध्ये उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या संकल्पना, त्यांचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, प्रश्न व समस्या, GST, VAT, विक्रीकर संबंधित कायदे व नियम या घटकांवर प्रश्नांचा अधिक भर असतो.

अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत.

महिलांसाठी संशोधनकिरण  केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे

 • महिला संशोधकांसाठी असणाऱ्या ‘नॉलेज इन्व्हॉल्वमेंट इन रिसर्च अ‍ॅडव्हान्समेंट नर्चरिंग’ म्हणजे ‘किरण’ योजनेअंतर्गत २०१८-१९ या शैक्षणिक सत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात खालीलप्रमाणे संशोधनपर संधी उपलब्ध आहेत.
 • योजनेअंतर्गत समाविष्ट विषय – योजनेअंतर्गत समाविष्ट विषयांमध्ये कृषी व संबंधित क्षेत्र, आरोग्य व सकस आहार, विज्ञान व तंत्रज्ञान विकास यासारख्या विषयातील संशोधनपर कामाचा समावेश आहे.
 • आवश्यक पात्रता – अर्जदारांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रासह वरील विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची रुची असायला हवी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
 • पाठय़वृत्तीचा कालावधी व तपशील- ‘किरण’ योजनेअंतर्गत संशोधनपर फेलोशिपचा कालावधी तीन वर्षांपर्यंत असेल व त्यादरम्यान त्यांना खालीलप्रमाणे दरमहा संशोधनपर पाठय़वृत्ती देण्यात येईल.
 • एमएस्सी पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ३० हजार रुपये.
 • एमफील/ एमटेक पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ४० हजार रुपये. पीएचडी पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ५५ हजार रुपये.
 • अधिक माहिती व तपशील- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची महिला संशोधकांसाठी असणाऱ्या ‘किरण’ संशोधन योजनेची जाहिरात पाहावी अथवा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या www.dst.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

MPSC मुख्य परीक्षेनंतर

after mpsc mains exam

2071   25-Aug-2018, Sat

राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा मागच्या आठवडय़ामध्ये संपन्न झाली. मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांचा हक्काचा तीनचार दिवसांचा आरामही झालेला असेल. या ब्रेकनंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धा परीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी सुरू करायला हवी.

मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे अंदाज न बांधता त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नासाठी ‘चार्ज’ राहतील. मुलाखतीची तयारी हा विषय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तित्वाशी, व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात. नियुक्तीचे पद, त्यासाठी आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त / अमूर्त गोष्टींवर मुलाखतीचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक असते.

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाल्यानंतर सर्वच उमेदवारांना एकच सल्ला दिला होता, तो हा की पूर्व परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी, मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी सुरक्षित होते व स्पध्रेत आपली दावेदारीसुद्धा! स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे, आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक नेहमी गतिशील ठेवायला हवे. राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल होऊ शकतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये.

मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीचे निमंत्रण मिळणारच असे गृहीत धरून मुलाखतीची तयारी सुरू करायलाच हवी. मात्र त्याचबरोबर इतर काही स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षाही वर्ष अखेरीपर्यंत होत आहेत. काही उमेदवार यातील काही परीक्षा देणार असतील. अभ्यासाच्या नियोजनासाठी या परीक्षांचे अद्ययावत वेळापत्रक देत आहोत.

हे वेळापत्रक आणि तुम्ही उत्तीर्ण झालेल्या पूर्व परीक्षा यांचा व्यवस्थित आढावा घेऊन पुढचे वेळापत्रक आखून घ्यावे. या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये कॉमन असणाऱ्या मुद्दय़ांची (उदा. भारताची राज्यघटना) तयारी एकत्रितपणे आधी करावी. त्यानंतर त्या त्या परीक्षेच्या वेळेप्रमाणे विशिष्ट घटक विषयांची उजळणी करावी.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम िलकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, यशाच्या ध्येयाप्रती प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही. राज्यसेवा परीक्षेची मुलाखत आणि त्याच वेळी इतर स्पर्धा परीक्षांचे प्रयत्न असे multi tasking ही तुमच्या उद्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून घडणाऱ्या भविष्याची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी नावाचा घटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कार्यरत असतो. या परीक्षांशी संबंधित महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या तयारीसाठीची परीक्षोपयोगी चर्चा पुढील काही लेखांमध्ये करीत आहोत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा

संयुक्त पेपर (पेपर क्र. १) २६ ऑगस्ट

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा  (पेपर क्र. २) २ सप्टेंबर

राज्य कर निरीक्षक (पेपर क्र. २) ३० सप्टेंबर

सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) ६ ऑक्टोबर

महाराष्ट्र कृषी सेवा  मुख्य परीक्षा  ८ सप्टेंबर

साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा

संयुक्त पेपर (पेपर क्र. १) १४ ऑक्टोबर

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा  (पेपर क्र. २) २१ ऑक्टोबर

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  (पेपर क्र. २) ४ नोव्हेंबर

कर सहायक मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) २ डिसेंबर

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी) १७ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (विद्युत) २४ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्थापत्य) २५ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी/ विद्युत) १५ डिसेंबर


Top