शब्दबोध

article-about-vocabulary-words-7

1523  

शिक्का

एक क्षणभर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, जगातील प्रत्येक माणसाचे दैनंदिन जीवन या शिक्क्याने किती घेरलेले आहे. हा शिक्का नसता तर आपले शैक्षणिक, शासकीय, आíथक, वैद्यकीय व्यवहार पूर्णत्वास गेले असते का? अगदी ग्रंथालयातील ग्रंथावरचा शिक्का, जन्म दाखल्यापासून तर पारपत्रापर्यंत ते थेट मृत्यू दाखल्यावरचा शिक्का, बँकेच्या व्यवहारासाठी आवश्यक शिक्का, शालेय स्तरापासून ते संपूर्ण शिक्षण, नोकरी येथे प्रवेश, अर्ज, नेमणूक यांवर लागणारा शिक्का, निवडणुकीतील ‘विचार पक्का- मारा शिक्का’ वगरे, यावरही कळस म्हणजे खेडेगावात सणासुदीला आपल्या गायी- म्हशींना रंगीत शिक्के मारून कौतुकाने सजविणारे गावकरीही.. असा हा शिक्का मूळ फारसी शब्द आहे.

शिक्का हा शब्द एकाच अर्थाची विविध रूपे घेऊन आपल्या अवतीभवती वावरत असतो. नाण्यावरील छापाला फारसीत सिक्का म्हणतात. शिवाय चिन्ह, मुद्रा, ठसा, ठप्पा, राजमुद्रा, सरकारी मुद्रा, मोहोर, कापडावरील, शरीरावरील खूण, छाप, व्रण, व्यक्तीच्या नावाचा पदासह असलेला शिक्का इत्यादी रूपांनी हा शिक्का सर्वत्र वापरला जातो.

यासंदर्भात ऐतिहासिक सनदांमधे पुढील उल्लेख येतो ‘बादशाहची चाल अशी आहे की शिक्क्यात नाव भरावयाचे ते आपले नावाची अक्षरे ज्या आयतेत (कुराणवचन) किंवा हदीसात (पगंबरवचन) निघतील ते हदीस किंवा आयते त्या शिक्क्यात भरावी म्हणजे तो शिक्का आपले नावचा जाहला.’

शेखी

‘वर्गात पहिला आल्यापासून हा जास्तच शेखी मिरवायला लागला’ किंवा ‘त्या हिरोसोबत फोटो काय छापून आला तर ती जास्तच शेखी मिरवतेय आता.’ शेखी मिरवणे म्हणजे गर्वाची वागणूक, प्रौढी, बढाई, ऐट. मूळ फारसी ‘शैखी’ यापासून शेखी तयार झाला.

फारसीमधे शेखी/ शोखी असे दोन्ही शब्द आहेत. पण शोखी हा शब्द कौतुकपूर्ण गुणवर्णनासाठी देखील वापरतात, जसे िहदीत ‘शोखियों में घोला जाये फूलों का शबाब.’ ऐतिहासिक लेखसंग्रहात पुढील उल्लेख येतो, ‘मिरजेस फौज गुंतली, यामुळे हैदर नाइकाने शेखी- शोखी केली आहे.’

मराठी व्याकरणाचा अभ्यास

competitive-exams/study-of-marathi-grammar/articleshow/67777041.cms

54  

उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे, अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी उत्तम भाषाज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये भाषाज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आगामी स्पर्धापरीक्षा डोळ्यासमोर ठेवून मराठी विषयाच्या व्याकरणविषयक घटकांबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा येथे करणार आहोत. या माहितीचा मराठी व्याकरण विषयावर आधारित सर्व स्पर्धापरीक्षांसाठी निश्‍चितच उपयोग होईल.

काठिण्यपातळी वाढली

२०१२नंतर परीक्षांच्या स्वरूपामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलानंतर वर्ग १ व २साठी असलेल्या परीक्षेची काठिण्यपातळी वाढलेली आहे. याचमुळे मराठी व्याकरणातील संकल्पना समजून न घेता केवळ पाठांतर केलेल्या उमेदवारांची उत्तरे शोधताना गफलत होते आणि व्याकरणासारख्या हक्काच्या विषयात गुण जातात. म्हणूनच मुळातून व्याकरण समजून घ्या, गुण मिळतीलच; कारण वाढलेल्या काठिण्यपातळीनुसार व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या यासंदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे केवळ पाठांतर इथे मदतीला येत नाही तर अर्थ समजून लक्षात ठेवलेले नियमच आपल्या मदतीला धावत येतात.

कमी वेळात जास्त प्रश्न सोडविण्याचा सराव

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लक्षात घेण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील किंवा पर्यांयामधील मोठा मजकूर. ५० प्रश्नांसाठी ३० मिनिटे हा वेळ पाहता प्रत्येक प्रश्न वाचून समजून घेण्यासाठी साधारण अर्ध्या मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ मिळतो. लांबलचक विधाने वाचणे, त्यातील रोख लक्षात घेणे व एक किंवा अनेक अचूक पर्याय निवडणे यात उमेदवारांच्या व्याकरणविषयक ज्ञानाची खरोखरच परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारच्या प्रश्नांचे स्वरूप ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने व्याकरणाचे ज्ञान आणि कमी वेळात प्रश्न सोडविण्याचा सराव इथे महत्त्वाचा ठरतो. आता आपण मराठी व्याकरण या विषयाच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया.

अभ्यासक्रम

'एमपीएससी'च्या बहुतांश मुख्य परीक्षेतील या विषयाचा एक पेपर वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी असतो. आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर क्र. २ हा मराठी व इंग्रजी (वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी) आहे. त्यात मराठी विषयामध्ये ५० गुणांसाठी ५० प्रश्न विचारले जातात. त्यासाठी व्याकरणाचे सर्व घटक, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरूद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे असा पदवी पातळीपर्यंतचा अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केलेला आहे. या व्यतिरिक्त इतर परीक्षांसाठीही गुणसंख्या व विभागणी बदलली तरी हाच अभ्यासक्रम आहे.

मराठी व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात. स्पर्धापरीक्षेसाठी मराठी विषयाच्या वस्तुनिष्ठ प्रश्‍नपत्रिकेसाठी व्याकरणाचा अभ्यास करताना व्याकरणाचे हे तीन घटक व इतर दोन असे एकूण पाच मुख्य घटक आहेत.

सुरुवातीला आपण हे घटक व त्यासाठी असलेली अंदाजे गुणविभागणी पाहू. अर्थात ही गुणविभागणी मागील परीक्षांवर आधारित आहे. आगामी परीक्षांसाठी आयोग यामध्ये बदल करू शकतो.

वर्णविचार : ५-६

शब्दविचार : १८-२०

वाक्यविचार : १०-११

शब्दसंग्रह : १२-१५

गद्य आकलन : ५

यावरून आपल्या लक्षात आले असेल, की शब्दविचार व शब्दसंग्रह हे मोठी व्याप्ती असलेले घटक परीक्षेच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचे आहेत.

या परीक्षेसाठी आपल्या हातात अजून पुरेसा वेळ आहे. आत्तापासूनच पद्धतशीर अभ्यास केला, तर या विषयात उत्तम गुण मिळवणे अवघड नाही. म्हणूनच आपणा सर्वांना या अभ्यासाला पूरक ठरणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या यावर या लेखमालिकेमध्ये आपण भर देणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाच्या घटकांचा आढावा आणि त्यावर विचारले गेलेले अवघड प्रश्न यांबाबतही पुढील शुक्रवारी थोडक्यात चर्चा करणार आहोत.

मराठी वाङ्मय पेपर- २

marathi-literature-paper-2/articleshow/66256088.cms

64  

मराठी वाङ्मय या वैकल्पिकविषयाच्या पेपर - २ बद्दलचे विश्लेषणआपण या लेखात पाहणार आहोत. मराठी वाङ्मयाचा पेपर २ म्हणजे आपली साहित्याबद्दलची जाण समर्पकपणे शब्दात उतरवणे होय. अभ्यासक्रमाला असलेली गद्य व पद्य यांच्या वारंवार वाचनातून आपल्याला नेमके काय गवसले याचा ????? या पेपरमध्ये केला जातो. २०१८ च्या पेपरमध्ये २०१७ च्या तुलनेत स्वरूपामध्ये कोणताही बदल केलेला नाही. गुणांची विभागणीही २०१७ प्रमाणेच आहे. सर्वप्रथम आपण आयोगाद्वारे केलेल्या सर्वसाधारण सूचना पाहूयात- 
- प्रश्नपत्रिकेत ८ प्रश्न दोन विभागात समान विभाजित केलेले आहेत. 
- ८ पैकी ५ प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. 
- प्र. क्र. १ व ५ सोडविणे बंधनकारक आहेत. उरलेल्यांपैकी ३ प्रश्न सोडविताना प्रत्येक विभागातून १ प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 

रसास्वाद (१०० गुण – १० प्रश्न प्रत्येकी १० गुण) 

मराठी वाङमय पेपर २ चे वैशिष्ट्य म्हणजे रसास्वाद होय. शालेय जीवनात आपण संदर्भासहित स्पष्टीकरण हा घटक अभ्यासला होता. त्याचप्रमाणे ‘रसास्वद’ हा घटक असून यात दिलेल्या पद्य वा गद्याच्या ओळींमधून आपल्याला प्रतित होणारा अर्थ व लेखक वा कवीची भाषाशैली यांची वैशिष्ट्ये यांना शब्दरूप द्यायचे असते. रसास्वाद हा घटक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या साहित्यविषयक जाणीवांना प्रकट करतो. पेपरमध्ये पहिलाच प्रश्न हा असल्यामुळे रसास्वादावरून एकंदर विद्यार्थ्यांची साहित्यविषयक जातकुळी बघितली जाते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
SECTION – A 
आपण प्रत्येक विभागातील विचारलेले प्रश्न हे अभ्यासक्रमाला असणाऱ्या पुस्तकांच्या आधारे बघणार आहोत. 
स्मृतिस्थळ (२५ गुण) 
महानुभाव पंथाचे तत्वज्ञान यात दिलेले असून यावर एक रसास्वाद १० गुणांसाठी तसेच तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे साधार वर्णन १५ गुणांसाठी विचारलेले आहे. 
- शेतकऱ्याचा असूड (२५ गुण) - १) रसास्वाद - १० गुण 
२) शेतकऱ्यांच्या अवमत स्थितीचे वर्णन - १५ गुण 
- ब्राह्मणकन्या (२५ गुण) - १) वैजनाथस्मृतिवर रसास्वद – १० गुण 
२) ‘मानवी प्रेरणा, पुरुषसत्ताक समाजव्यवस्था व स्त्रीचे निवड स्वातंत्र्य या विषयीची ठाम भूमिका केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीत गृहित धरलेली दिसते’ (१५ गुण) या विधानाचा विचार करताना ‘???? निवडीच स्वातंत्र्य नाही’ हे लक्षात घ्याव. 
- साष्टांग नमस्कार (२५ गुण) – १) रसास्वाद – १० गुण 
२) मानवी स्वभावातील विसंगती नादिष्टपणा व छांदिष्टपणा यांचे दर्शन कसे घडविले साधार स्पष्ट करा. यासाठी या पुस्तकाची प्रस्तावना व पात्रांचा सुक्ष्मातिसूक्ष्म अभ्यास उपकारक ठरेल. 
- आठवणींचे पक्षी (३० गुण) - १) रसास्वाद – १० गुण 
२) आठवणींचे पक्षी यातील जीवनानुभव सामान्यपासून तत्त्व????? करणाऱ्यांपर्यंत सर्वांना अंर्तमुख करणारे आहेत. चर्चा करा – २० गुण यासाठी प्रल्हादचे अनुभव व जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन यांची उदाहरणे घेवून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. 
- एकेकपान गळावया (१५ गुण) ‘कादंबरीची कल्पना स्त्री-पुरुष नाते-संबंधांभोवतीच फिरते.’ असे विधान स्पष्ट करताना ही कादंवरी नसून ती लघूकादंबरी आहे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. 
- जन हे वोळतु जेथे (१५ गुण) ‘बिशू’च्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास स्पष्ट करताना ‘क्षिप्रा’ व ‘सरहद’ यांचाही विचार तिथे असणे क्रमप्राप्त ठरते. 
- जेव्हा मी जात चोरली होती (२० गुण) – बागूल हे दलित जीवनाचे प्रभावी भाष्यकार आहे याची चिकित्सा करणे. यासाठी कथांतील दलित संकल्पना व संवेदना जाणून त्यांची उदाहरणे घेवून लिहिणे. 
- ????? (२० गुण) – ‘लेखनातील जीवनानुभव मर्यादित स्वरुपाचे आहेत’ यावर भाष्य करताना लेखकाची मर्यादा व समीक्षकाचे पूर्वानुग्रह लक्षात घेवून उत्तर लिहावे. 

SECTION – B 
- पैजन (३० गुण) : १) रसास्वाद ‘सुंदरा मनामधि भरली...’ 
२) प्रस्तावनेची सुरुवात असणारे विधान शाहीरी वाङ्मयाला ‘मराठी काव्याची ?????’ यावर प्रश्न विचारला आहे. संतसाहित्य, महानुभव हे शाहीरी काव्याआधी अस्तित्वात आहेत हे लक्षात घेवून उत्तर लिहावे. 
- दमयंती स्वयंवर (२५ गुण) : १) रसास्वाद ‘प्रकट तिजपुढारी जाहला...’ 
२) रघुनाथपंडितांच्या काव्यागुण हा सरळ-सरळ प्रश्न आहे. 
- विशाखा (३० गुण) : १) रसास्वाद – ‘परी भव्य ते तेज पाहून पुजून...’ 
२) विशाखाचा आशय यावर विधान दिलेले आहे. त्यात अन्याय, जुलूम, विषमता यांच्याविरुद्धचा ‘आक्रोश’ असे म्हणताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे की आक्रोशाकरीता कविता नसते. 
- जाहिरनामा (२५ गुण) : १) रसास्वाद – ‘संपलाच नाही भाकरीचा मार्ग’ 
२) ‘श्रमिकांच्या जीवनानुभवांचे विविध पदर जाहीरनामा उलगडून दाखवते’ असे म्हणताना जानकी आक्का सारखे संदर्भ घेवून लिहिणे. 
- संध्याकाळच्या कविता (२५ गुण) : १) रसास्वाद ‘नको मोजू माझ्या...’ 
२) ग्रेसची प्रतिमासृष्टी – प्रतिमासृष्टी सर्व कवितासंग्रहांची करूनच ठेवावी दरवर्षी असे प्रश्न विचारले जातात. 
- नामदेवाची अभंगवाणी (१५ गुण) ‘अंतर्मुखता, आत्मपरता आणि जिव्हाळा हा नामदेवांच्या कवितेचा गाभा आहे’ हे या विधानाची चर्चा करताना विधानातील मुख्य शब्दांना अनुसरून उदाहरणे देवून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. 
- बालकवींची कविता (१५ गुण) : ‘एक निसर्गकवी’ म्हणून बालकवींच्या काव्याविष्काराचा परामर्श घेताना त्यातील प्रेमभाव, रंगाची आसक्ती इ. चा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. 
- या सत्तेत जीव रमत नाही (१५ गुण) : सामाजिकतेच्या पलिकडे जावून मानवी अस्तित्वाचा शोध घेणारी नामदेव ढसाळ यांची कविता मानवी??? अस्तित्वाचे जे-जे सूक्ष्मतम भाव ???? त्याचे वर्णन इथे अपेक्षित आहे. 
- ‘मृद‌्गंध (२० गुण) : संध्याकाळच्या कवितेवरही प्रतिमासृष्टी हा प्रश्न आला आहे. त्यामुले वर सांगितल्याप्रमाणे असे प्रश्न आधीपासूनच तयार असलेले फायदेशीर ठरतात. 

अशाप्रकारे प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले आहेत. ज्या अभ्यासक्रमातील पुस्तकांवर प्रश्न विचारलेले नाहीत त्यावर येत्या काळात प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक असते उदा. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ तसे आयोगाने सर्व घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. DrSushils Spotlight या YouTbue व टेलिग्राम चॅनेलवर मराठी चालूघडामोडी व इतर स्पर्धापरीक्षात्मक घडामोडींसाठी आपण भेट देवू शकता. यूपीएससीच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वैकल्पिक विषयांना योग्य प्रकारे हाताळणे ही काळाची गरज आहे हे सदैव लक्षात असू द्या. 

मराठी वाङ्मय

marathi-literature/articleshow/66232161.cms

35  

या लेखात आपण वैक‌ल्पिक विषय ‘मराठी वाङ्मय’ या पेपर I २०१८चे विश्लेषण पाहणार आहोत. मुख्य परीक्षेस ५०० गुणांसाठी वैकल्पिक विषयाचे दोन पेपर असतात. हे दोन्ही पेपर प्रत्येकी २५० गुणांसाठी असतात. ‘मराठी वाङ्मय’ या वैक‌ल्पिक विषयाचे २०१८चे पेपर पाहता काही महत्त्वाच्या नोंदी खालीलप्रमाणे आहेत. 

- पेपरच्या स्वरूपामध्ये २०१७च्या तुलनेत कोणताही बदल केलेला नाही. 
- प्रश्न विचारण्याची पद्धती पाहिल्यास प्रश्नात नेमकेपणा दिसतो. उदा. श्रेष्ठ कवी म्हणून अरुण कोलटकर यांची योग्यता सप्रमाण सिद्ध करा. 
- २०१८च्या मुख्य परीक्षेचा विचार करता नेमकेपणाचे प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती स्पष्ट दिसून येते. ‘जीएस’च्या पेपरमध्ये आपण हे पाहिलेले आहे. तेच वैक‌ल्पिक विषयांच्या पेपरमध्येही आपण अनुभवू शकतो. 
- Facts - तथ्य आपणास यथायोग्य पद्धतीने नोंदवता येणे येथे अपेक्षित आहे. उदा. ‘आधुनिक कविपंचक’ असे कोणाला उद्देशून म्हटले गेले आहे? का? 
- यूपीएससीत वैक‌ल्पिक विषयांचे महत्त्व जाणून, त्यासाठी अधिकाधिक श्रम घेऊन त्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. 


मराठी वाङ्मय पेपर I स्वरूप 
एकूण गुण २५० 
वेळ ३ तास 
एकूण प्रश्न १) ८ प्रश्न प्रत्येकी ५० गुण (प्रत्येक प्रश्नात उपप्रश्न) 
२) या ८ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे आवश्यक 
३) प्रश्न क्र. १ व प्रश्न क्र. ५ सोडविणे बंधनकारक 
४) Section A व Section B मधील प्रश्न १ व ५ सोडून तीन प्रश्न सोडविणे. या तीन प्रश्नांपैकी किमान १ प्रश्न दोन्ही Section म्हणून अपेक्षित आहे. 

पेपरच्या स्वरूपावरून एक बाब स्पष्ट होते की, ‘जीएस’मध्ये दिलेले सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक आहेत. परंतु, वैक‌ल्पिक विषयाच्या पेपरमध्ये आपणास जास्तीचे प्रश्न देऊन आपल्या सोयीनुसार व आयोगाच्या सूचनांना अनुसरून प्रश्न निवडण्याची मुभा आहे. 

Section A 

Section A चा विचार करता खालील बाबी ‌आढळून येतात. 

- प्रश्नांचे स्वरूप पाहता त्याच त्या आशयाचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. अभ्यासक्रमाच्या घटकांचा विचार करता भाषा व भाषेची लक्षणे, लोकवाङ्मय, मराठी व्याकरण या तिघांचा विचार करता सर्वाधिक प्रश्न हे ‘भाषा’ या विषयावर विचारलेले आहेत. 

I) भाषा व भाषेची लक्षणे : (१३५ गुण) 

या घटकावर प्रश्न क्र. १ ते ४ यांचा विचार करता एकूण ९ प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्र. १ हा बंधनकारक असून त्यातील ५ प्रश्नांपैकी ३ प्रश्न हे भाषेवर विचारलेले आहेत. अभ्यासक्रमातील घटकांचा विचार करता खालील उपघटकांवर प्रश्न विचारलेले आहेत. 

I) प्रमाणभाषा व बोली : 
१) प्रमाणभाषा व बोली यातील संबंध 
२) डांगी बोली प्रमुख वैशिष्ट्ये 
३) वऱ्हाडी बोली शब्दसंग्रह स्वरूप वैशिष्ट्ये 

II) भाषा व भाषेची लक्षणे 
१) भाषेची लक्षणे 
२) सोस्यूर याचे भाषाविषयक दृष्टिकोन (२०१७मध्ये सोस्यूर व चॉम्स्कीवर प्रश्न) 
३) व्यावहारिक भाषा व काव्य भाषा 
४) स्तरभेदांनुसार होणारे भाषिक परिवर्तन 

III) मराठी भाषेवरील प्रभाव 
१) तेराव्या शतकातील मराठीचे वेगळेपण 
२) सतराव्या शतकातील मराठी भाषा 

वरील घटकांचा विचार करता २०१७मध्ये ‘अहिराणी’ बोली विचारली, तर २०१८ मध्ये ‘डांगी’ व ‘वऱ्हाडी’ बोली विचारली आहे. सोस्यूरचा प्रश्न २०१७ व २०१८मध्ये विचारला गेला. भाषेची लक्षणे तेरावे शतक, १७वे शतक यातील मराठी, यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती नियमितपणे गतवर्षीच्या प्रश्नांच्या आधारे आपण पाहू शकतो. 

II) लोकवाङ्मय (२५ गुण) 
लोकवाङ्मय २०१८मध्ये जरा दुर्लक्षित राहिले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘लोककथा प्रकार’ व ‘सर्वसामान्य मराठी नाटक आणि लोकनाट्य’ यावर प्रश्न विचारलेले आहेत. 

III) मराठी व्याकरण (४० गुण) 
१) उभयान्वयी प्रत्यये व शब्दयोगी अव्यय फरक 
२) कर्तरी, कर्मणी भावे प्रयोगाचे उपप्रकार ३) विभक्ती I असे तीन प्रश्न आपण पाहू शकतो. २०१७च्या तुलनेत व्याकरणावर अधिक भर दिसून येतो. 

Section B 

यात Specific व Facts विचारण्याचे प्रमाण अधिक आहे. जर सटीक व सप्रमाण अभ्यास असेल, तर यातील प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. 

- साहित्यिक (७० गुण) : आधुनिक कविपंचक, भालचंद्र नेमाडे, नाटककार खाडिलकर व अरुण कोलटकर यावर प्रश्न विचारले आहेत. 
- महानुभाव (१० गुण) : महंदबेचे काव्य म्हणजेच धवडे यावर प्रश्न 
- संतसाहित्य (२५ गुण) : संत एकनाथ व संत कवयित्री यावर प्रश्न. 
- साहित्य समीक्षा (३० गुण) : आस्वादक समीक्षा (२०१७ स्त्री वादी समीक्षा) साहित्य समीक्षेची कार्ये 
- आधुनिक (४० गुण) मराठी कवितेवर स्त्री वादाचा प्रभाव व साहित्य, समाज आणि संस्कृती परस्परसंबंध, दलित कथा व ग्रामीण कथा 
- बखर साहित्य (गुण) : बखर साहित्य इतिहास की कल्पित 
* पंडिती काव्य (१० गुण) : तैसी आर्या मयूरपंताची 

Section B चा विचार करता एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे वरील घटकांबाबतचे तथ्य (Facts) आपल्याला योग्यरित्या लिहिता येणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा वाचन व नियमित लिखाण करणे अपेक्षित आहे. मराठी वाङ्मय हा एक महत्त्वपूर्ण वैकल्पिक विषय म्हणून यूपीएससीच्या इतिहासात स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. या पेपरची PDF व मराठी संबंधी इतर घडामोडींकरिता Drsushils spothight या Youtube व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. वर्तमानपत्राच्या शनिवार व रविवारच्या पुरवण्यांमधील साहित्यसंबंधी लेख तसेच २०१८च्या विविध दिवाळी अंकांचा मागोवा घेण्यास विसरू नये. चालू घडामोडींचा मोठा प्रभाव आपण या वैकल्पिक विषयावर पाहू शकतो. तसेच, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकाही मराठी वाङ्मयासाठी मार्गदर्शक ठरतात. तेव्हा या दोन्ही बाबींचा विचार सदैव करणे ही काळाची गरज आहे. 

शब्दबोध : लसूण

article-on-garlic-1877732/

130  

लसूण

कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी ‘माझे खाद्यजीवन’ या लेखात या लसणाच्या ठेच्याचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘लसणाचा ठेचा ठेवलेल्या भांडय़ावरचे झाकण निघाले की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे, की धुवा हात पाय’ अर्थात लसूण ही चवीलाच छान लागते असे नव्हे तर एक औषधी वनस्पतीही आहे. हृदयरोगासाठी तिचा प्रभावी उपयोग होऊ शकतो, असे वैद्य सांगतात. आता शब्दाच्या उत्पत्तीकडे जाऊ.

लसणामधे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सहा रसांपकी फक्त लवण रस नसतो. खरं म्हणजे लवण रस कुठल्याच वनस्पतीत नसतो. आपण आहारात मिठाचा वापर करून लवण रस मिळवतो. मीठ म्हणजेच लवण. सर्वच प्राण्यांना मीठ आवश्यक असते. अगदी जंगलातील प्राण्यांनाही. मग शाकाहारी प्राणी रानातील ज्या जमिनीत क्षाराचे प्रमाण जास्त असते, अशा ठिकाणची माती चाटतात आणि लवण रस मिळवतात. अशा क्षारपड भागाला चाटण किंवा सॉल्ट लिक असे म्हणतात.

हत्ती, गवा, हरीण, सांबर अशा शाकाहारी प्राण्यांच्या चाटणाच्या जागा ठरलेल्या असतात. काही अभयारण्यात वन विभागातर्फे रानात ठिकठिकाणी मिठाचे ढीग रचलेले असतात ते याचसाठी. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना मारून खातात तेव्हा त्यांना त्या प्राण्यांच्या शरीरातील क्षारही मिळतात. तर सहा रसांपकी एक रस कमी म्हणजे उणा म्हणून लसणाला संस्कृतमधे रसोन असे म्हणतात. (जसे एक उणा वीस म्हणजे एकोणावीस तसेच.). मराठीत येताना या ‘र’चा ‘ल’ झाला.

ते स्वाभाविकही असते. पाहा, लहान मुलं राम रामच्या ऐवजी लाम लाम असे बोबडे बोलतात. अर्थात याचा अर्थ आपण मराठी माणसे बोबडे बोलतो असा नाही. तर ‘र’ आणि ‘ल’ हे सवर्ण आहेत.  पाणिनीच्या लघुसिद्धांत कौमुदीच्या टीकेमधे ऋ ल्रृयोर्मिथा सावर्ण्य वाच्यम्। सूत्र आहे. म्हणजेच ऋ आणि ल्रृ हे सवर्ण आहेत. व्यवहारात ऋ आणि ल्रृचे शब्द फारसे आढळत नाहीत म्हणून र आणि ल हे सवर्ण मानले आहेत. संस्कृतमध्येदेखील रोम आणि लोम, रोहित आणि लोहित असे समानार्थी शब्द आहेत. अशा तऱ्हेने रसोनचा लसूण झाला. रसोन म्हणा किंवा लसूण म्हणा, पण आहारातून लसूण उणा करून चालणार नाही.

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण - वर्णविचार

competition-examination-marathi-grammar-characters/article varn vichar

571  

भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात. या लेखामध्ये आपण वर्णविचार या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या व या संदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्याख्या समजून घेणे व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 

वाक्य, पद, शब्द, मूलध्वनी, वर्ण, अक्षर या संकल्पना समजून घेऊन व्याख्या लक्षात ठेवायला हव्यात. 
शासन निर्णय २००९नुसार वर्णमालेमध्ये ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश. यामुळे आधुनिक वर्णमालेमध्ये १४ स्वर आणि ५० वर्ण. 
‘क्ष्’ आणि ‘ज्ञ्’ ही विशेष संयुक्त व्यंजने, तर ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही जोडाक्षरे. 
वर्णमालेतील स्वर, स्वरादी व व्यंजने ही संकल्पना समजून घेऊन त्यांची व्याख्या व संपूर्ण वर्णमाला वर्गीकरणानुसार लक्षात ठेवणे. 
स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार, उच्चारस्थानांनुसार वर्गीकरण यांचे तक्ते करून ते लक्षात ठेवल्यास सोपे जाईल; कारण परीक्षेच्या दृष्टीने ही वर्गीकरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. 
च्, छ्, ज्, झ् यांचे तालव्य आणि दन्ततालव्य उच्चार असलेले शब्द यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 
अकारविल्हे मांडणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 
जोडाक्षरांचे प्रकार, उभी व आडवी जोडणी, स्वरांची उच्चारपद्धती हे सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत. 
याचबरोबर व्याकरणाची व्याख्या, भाषेचे स्वरूप, देवनागरी लिपी याबाबत विधानांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आता २०१८च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील एक प्रश्न पाहू या. 
पुढील विधाने वाचा 

a) वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. b) वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. 
c) वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय. 

पर्यायी उत्तरे : 

1) a) व b) बरोबर, c) चूक 2) फक्त a) बरोबर, b) व c) चूक 
3) a), b) व c) बरोबर 4) ब) व c) बरोबर, a) चूक 

वरवर पाहता हे तिन्ही पर्याय बरोबर वाटू शकतात. आपण सर्व पर्याय तपासून पाहू. पर्याय a) वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय - हे बरोबरच आहे; कारण विचार पूर्ण अर्थाने व्यक्त होत असले तर त्यास वाक्य म्हणतात. b) वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात - वाक्य ही शब्दांची किंवा पदांची बनलेली असतात. त्यामुळे हे विधानही बरोबर आहे. c) वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय - केवळ शब्दांची मांडणी करून वाक्य तयार होत नाही तर शब्दांची अर्थपूर्ण मांडणी करून वाक्य तयार होते, म्हणून पर्याय क्र. 1) a) व b) बरोबर, c) चूक हाच पर्याय योग्य आहे. 

संधी - महत्त्वाचे मुद्दे 
वर्णविचारातील संधी हा एक महत्त्वाचा घटक आहे. 
संधी हा विषय संस्कृत व्याकरणातून मराठीत आल्यामुळे संधी झालेल्या शब्दाचा विग्रह व एकत्र येणारे वर्ण यामधील ऱ्हस्व - दीर्घ बारकाईने लक्षात ठेवावे लागतात. 
स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे संधींचे मुख्य तीन प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि मराठीचे विशेष संधी यांचा अभ्यास या घटकामध्ये आहे. 
संधींचे नियम लक्षात ठेवून त्यानुसार तयार होणारे शब्द लक्षात ठेवणे आणि उलट पद्धतीने प्रत्येक शब्द विचारात घेऊन तो कोणत्या संधिनियमाने तयार झाला असेल, याचा सराव करणे ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल. 
जास्तीत जास्त संधियुक्त शब्दांच्या विग्रहाचा सराव करणे आवश्यक आहे. 
मराठीचे विशेष संधियुक्त शब्द वगळता इतर सर्व संधियुक्त शब्द आणि त्यांच्या विग्रहातील शब्द मूळ संस्कृत असल्याने मराठीत तत्सम शब्द म्हणून गणले जातात हेही लक्षात घ्या. 
संधी घटकाचा अभ्यास उत्तमप्रकारे केला की ‘नियमानुसार शब्दलेखन’ या घटकाचाही बहुतांश अभ्यास होऊन जातो. अशा प्रकारे मुख्यत: वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित वर्णविचार हा घटक तुम्हाला संपूर्ण गुण मिळवून देऊ शकतो. 

अभ्यासाची पद्धत 
कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, विशेषतः स्वयंअध्ययन करताना पुढील पद्धत वापरावी. सर्वप्रथम संदर्भपुस्तकातील एक प्रकरण वाचून संकल्पना समजून घ्यावी, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत, त्यांचे वहीत स्वत: टिपण काढावे, पुन्हा समजून घ्यावे आणि नंतर त्या प्रकरणावरील मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न सोडवावेत. प्रश्न सोडवितानाच आपल्याला किती समजले आहे, याचा अंदाज येईल. त्यानुसार पुन्हा एकदा त्या दृष्टिकोनातून प्रकरणाचे पुनर्वाचन करावे. व्याकरण व शब्दसंग्रहाच्या संपूर्ण अभ्यासासाठी मो. रा. वाळंबे लिखित ’सुगम 
मराठी व्याकरण व लेखन’ हे पुस्तक उत्तम संदर्भ आहे. 

शब्दबोध : घट्टकुटी प्रभात न्याय

article-on-word-sense-1869399/

131  

संस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर न्याय आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘हे नेमके काय?’ असा प्रश्न अनेकांना पडेल. हा फार जुना आणि संस्कृत साहित्यातील न्याय आहे.

घट्ट म्हणजे जकात. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकात नाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे. सध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे, पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना मालावर जकात द्यावी लागे. त्या वेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकविण्याची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.

जकात चुकविण्यासाठी हल्ली जशा युक्त्या योजल्या जातात, तशाच पूर्वीही योजल्या जात.

पूर्वी व्यापारी आपला माल बैलगाडय़ांतून वाहून नेत. जकात नाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, तेदेखील आडमार्गाने. पण कित्येकदा गंमत काय व्हायची की, आडमार्गाचा रस्ता चुकायचा. मग रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात गाडी हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकात नाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा या न्यायाचा अर्थ.

शब्दबोध : हळदिवी

word-sense-article-2-1865251/

306  

आपल्यापैकी अनेकांना बोलताना एखादा विशिष्ट शब्द किंवा शब्दप्रयोग वारंवार वापरण्याची सवय असते. काही कवींचेही असे लाडके शब्द असतात. म्हणजे त्या कवीच्या कवितांमध्ये एखादा विशिष्ट शब्द वारंवार भेटतो. ‘हळदिवी’ या शब्दाबाबत असं म्हणता येईल. हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ आहे हळदीच्या रंगाचा, पिवळा.

हा शब्द आरती प्रभूंच्या कवितांमधे अनेकदा आपल्याला भेटतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे या कवितांमध्ये आलाय ते पाहा.

‘हिरव्याशा गवतांत हळदिवीं फुलें

हलकेच केसरांत दूध भरूं आले’ (गंध)

तर ‘मिळालेले खूळ’ या कवितेत पिकून पिवळ्या झालेल्या फळाचं वर्णन करताना तो असा आलाय,

‘फळा हळदिव्या झाकी हिरवासा पंख

रस गळे.. करी चोंच लालसर डंख’.

मात्र कधी कधी अर्थ आकळत नाही जसे..

‘धुकें फेसाळ पांढरे दर्वळून दवे

शून्य शृंगारते आता होत हळदिवें’

(शून्य शृंगारते) या शब्दाची नशा आपल्याला चढते. पण सर्वात भन्नाट म्हणजे

‘हळदीची पाने हळदिवी झाली,

कुठे कोण जाणे पिंगाळी पळाली’ (हिरव्या चुका)

हळदीच्या सुकलेल्या पिवळ्या पानांना हळदिवीची उपमा देणे म्हणजे थोरच. या कविता वाचल्यावर वाटते की, हळदिवी हा शब्द आरती प्रभूंचाच. त्यांनीच तो वापरावा. मात्र आणखीही एका कवयित्रीने हा शब्द फार सुंदर वापरला आहे. कविता महाजन यांच्या ‘कुहू’मध्ये.  त्या आता आपल्यात नाहीत पण त्यांनी वापरलेला हा शब्द मात्र नक्की लक्षात राहण्याजोगाच.

मृदु मंद हळदिवी उन्हे जांभळा गर्द गारवा

अशा क्षणी झाडावर का पक्षी नवा उतरावा.

शब्दबोध : केळवण

article-about-word-sense-8-1836531/

290  

घरात एखादे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात. मंगलकार्यापूर्वी घरच्या सदस्यांना आप्तस्वकीयांकडून जेवायला, मेजवानीला बोलावले जाते. हेच ते केळवण. यासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. याचा उच्चार गडंगनेर किंवा गडंगणेर असाही होतो. हा बरोबर की चूक हे ठरवण्यापेक्षा त्याच्या अर्थाकडे जरा जाऊ या. गडू आणि नीर यापासून हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. गडगनेर म्हणजे नुसतेच तांब्याभर पाणी नव्हे तर पाहुण्यांसाठी मेजवानी, अशा अर्थाने तो वापरला जातो.

जेवणासाठी केळीची पाने वापरण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. केळीचा उगम हा भारतात विशेषत: पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात मानला जातो. मुसा अ‍ॅक्युमिनाटा आणि मुसा बाल्बिसिआना या प्रजाती, आज आढळणाऱ्या सर्व जातींच्या केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. त्यापैकी सर्व जातींच्या केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. त्यापैकी मुसा अ‍ॅक्युमिनाटा या मूळ जातीचा उगम दक्षिण-पूर्व आशियात (भारतातील प.घाट आणि ईशान्य भारत) समजला जातो. सुमारे ८-१० हजार वर्षांपूर्वी मानवाने या दोन जातींपासून विविध संकरित जाती निर्माण केल्या. आज जगातील केळीच्या एकूण उत्पादनातील १८ टक्के उत्पादन भारतात होते. केळ्याला संस्कृतमध्ये रंभा आणि कंदल: असे शब्द आहेत. तर सांगण्याचा उद्देश हा की, आर्याच्या आगमनापूर्वी कित्येक शतके केळ ही वनस्पती आपल्याला माहिती होती. तिच्या पाना, फुलांचा, फळांचा, तंतूंचा वापर आप करत होतो. तर या केळीपुराणावरून पुन्हा केळवणाकडे वळू. केळवण म्हणजे काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे, असाही एक अर्थ आहे. केळीची लागवड केल्यास त्या पिकाची नीट मशागत करावी लागते. काळजी घ्यावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे ती सासरीही घेतली जावी, हा कदाचित केळवणामागील मूळ उद्देश असावा.

केळवण झालेल्या मुलीला केळवली असे म्हणतात. अशा मुलीला सासरचे वेध लागलेले असतात. इतके दिवस माहेरात गुंतलेले तिचे मन आता सासरी धाव घेऊ लागते. ती माहेराविषयी उदासीन राहू लागते. केळवली नवरीची ही भावावस्था स्वत: ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना ते म्हणतात, केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते, तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो. न मरताच तो आपल्या अंत:करणाला मृत्यूची सूचना देतो. ती ओवी अशी –

ना तरी केळवली नोवरी।

कां संन्यासी जियापरी।

तैसा न मरतां जो करी।

मृत्युसूचना।

ज्ञानदेवांच्या अलौकिक उपमांवर आपण सामान्य काय भाष्य करणार? परंतु त्यांच्या काळात किंबहुना त्याही आधी काही शतके केळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ होती एवढे मात्र त्यातून दिसून येतं. मुख्य म्हणजे केळवण हा काही संस्कृतातून पुढे आलेले किंवा संकरित झालेला शब्द नाही. तो अस्सल मराठी आहे.

शब्दबोध : बुंथ

word-sense-article-1861794

152  

गोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे अनेकदा ऐकलेले असते. ‘रात्र काळी घागर काळी’ या नावाची चिं.त्र्यं.खानोलकरांची कादंबरीही बरीच गाजली होती. तर या गाण्यामध्ये भेटतो, ‘बुंथ’ हा शब्द.

रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना. रात्र काळी, घागर काळी, यमुनेचे जळ काळे, बुंथ काळी, बिलवर काळी, गळ्यातील मोत्याची एकावळी काळी, काचोळी काळी हे सर्व परिधान केलेली नायिका नखशिखांत काळी आणि तिचा एकलेपणा घालवणारी कृष्णमूर्तीही काळी.

काळा रंग हा आपली दृक्-संवेदना शून्यावर आणतो. जणू काही कृष्णविवर. या गाण्यातील कृष्णभक्तीचे आकर्षण कृष्णविवरासारखे आहे. त्यात शिरले की बाहेर पडणे अशक्य अगदी प्रकाशदेखील. अशी ही सुंदर रचना. त्यातील बुंथ हा शब्द नवखा.

त्याचा अर्थ शब्दकोशात शोधला. बुंथ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ. तसेच बुरखा किंवा घुंगट. तसेच रूप किंवा वेश या अर्थानेही बुंथ हा शब्द वापरलेला आढळतो.(होतों दाशरथी तुम्ही वसुमती घ्या वानराच्या बुंथी)

विशेष म्हणजे बुंथ हा शब्द ज्ञानेश्वरीतही आच्छादन या अर्थाने आलेला आहे.

सहाव्या अध्यायातील

जैसी आभाळाची बुंथी

करूनि राहे गभस्ती

मग फिटलिया दीप्ति धरूं नये  २५१

किंवा त्याच अध्यायातील

नातरी कर्दळीचा गाभा

बुंथी सांडोनी उभा

कां होता चमत्कार पिंडजनी   २९५

या ओव्यांत बुंथ हा शब्द ‘आच्छादन’ या अर्थाने वापरला आहे. एकंदरीत विष्णुदास नामा यांच्या अजरामर काव्यामुळे बुंथ शब्द विस्मरणात जाण्यापासून वाचला असे म्हणता येईल.

या ठिकाणी या काव्यरचनेच्या दुसऱ्या एका वैशिष्टय़ाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. ‘ळ’ हे अक्षर मराठी भाषेचे वैशिष्टय़ म्हणून ओळखले जाते. मराठीतील अनेक शब्द संस्कृतोद्भव असले किंवा संस्कृत ही मराठीप्रमाणे सर्व भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जात असली तरी ‘ळ’ हे अक्षर संस्कृतमध्ये नाही. तसेच हिंदीमध्येही नाही. अशा या वैशिष्टय़पूर्ण ‘ळ’ अक्षराचा मराठी काव्यात फारसा वापर केलेला आढळत नाही. या संदर्भातील गदिमांचा किस्सा अनेकांना  माहीत असतो. तो असा, एकदा पुलंनी गदिमांजवळ अशी तक्रार केली की ‘ळ’  हे अक्षर मराठी काव्यात फारसे आढळत नाही, कारण त्याचा वापर काव्यात करणे अवघड आहे. तेव्हा गदिमांनी तेथल्या तेथे ‘ळ’चा मुक्त वापर केलेले काव्य रचले आणि ते म्हणजे ‘घननिळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा.’ गंमत म्हणजे विष्णुदास नाम्याच्या या रचनेतही ‘ळ’ अक्षराचा असाच मुक्त वापर केलेला आहे.

काळी, जळी, गळा मोती, एकावळी, काचोळी, सावळी असे अंती ‘ळ’ अक्षर असलेले शब्द या रचनेत आहेत. गदिमांचाही संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता. त्यांची काव्यशैली सुबोध, सुगम आणि अर्थवाही असण्यामागे या अभ्यासाचाही मोठा वाटा होता.

शब्दबोध : भारूड

article-about-word-sense-bharud

215  

सामान्य लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माची शिकवण देण्यासाठी संतांनी ओवी, अभंग,भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यातील जनसमुदायासमोर नाटय़मय रीतीने सादर केली जाणारी रूपकात्मक रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व कालात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारुडे रचली. असे असलं तरी एकनाथांचीच भारुडे सर्वात लोकप्रिय झालेली आढळतात. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’ , ‘अभंग तुकयाचा’ तसं ‘भारूड नाथांचं’ असं म्हटलं जातं.

‘भारूड’ या शब्दाची निश्चित उत्पत्ती सांगणं कठीण आहे. काहींच्या मते ‘बहुरूढ’ या शब्दापासून भारूड शब्द तयार झाला असावा. भारुडांचे विषय जोशी, पिंगळा, सन्यासी, माळी, जंगम अशा विविध समाजरूढींवर आधारलेले आहेत म्हणून ते बहुरूढ समजले जाते. याशिवाय ‘भा’ म्हणजे तेज त्यावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशीही व्युत्पत्ती मानली जाते. यासोबतच भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज प्रचलित आहे.

एकनाथांच्या भारुडाचे वर्णन ‘आध्यात्मिक आणि नतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाटय़-गीत’ असे केले जाते. नाथांच्या भारुडांची संख्या जशी विपुल आहे तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे एकनाथ जे अचूक वर्णन करतात त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते. शिवाय अशा साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय ते ज्या प्रकारे व्यक्त करतात त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होते.

विंचू, दादला अशा बहुतेक भारुडांना विनोदाची झालर आहे. त्यामुळे भारुडाचे सादरीकरण लोकांना नेहमीच मनोरंजक वाटते. पण त्यातील आध्यात्मिक आशय साऱ्यांनाच उलगडतोच असे नाही. त्या दृष्टीने ‘कोडे’ हे भारूड बघा –

नाथाच्या घरची उलटी खूण। पाण्याला मोठी लागली तहान।

आत घागर बाहेर पाणी। पाण्याला पाणी आले मिळोनी।

यातील ‘पाण्याला मोठी लागली तहान’ याचा अर्थ आहे, ‘नाथांच्या आत्म्याला लागलेली परमात्म्याची ओढ.’ आता हा अर्थ साऱ्यांनाच सहज समजेल असे नव्हे. तरीही एकंदरीत नाथांची भारुडे रंजक आणि उद्बोधक आहेत, यात शंका नाही. या भारूड शब्दावरून आणखी एक वाक्प्रचार रूढ आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा माणूस फार वेळ कंटाळवाणे बोलू लागला की त्याला म्हणतात, काय भारूड लावलंय. आता ही अर्थछटा या शब्दाला नक्की कोणाच्या भारूड लावण्यामुळे मिळाली, ते काही माहिती नाही. पण आता या शब्दाबद्दल बोलणे इथेच थांबवायला हवे, नाहीतर वाचक हो, तुम्हीच म्हणाल, काय भारूड लावलंय!


Top