
2120 12-Aug-2018, Sun
- भारतीय वंशाचे व लंडनमध्ये स्थायीक झालेले नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे ८५ वर्षी निधन झाले.
- १९७१ मध्ये बुकर पुरस्कार तर २००१ मध्ये साहित्याच्या नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
- नायपॉल यांचा जन्म १९३२ त्रिनिदादमध्ये झाला होता. "ए बेंड इन द रिवर" आणि "ए हाऊस फॉर मिस्टर बिस्वास" ही त्यांची पुस्तके मोठ्या प्रमाणात चर्चेत आली.
- १९५१ मध्ये नायपॉल यांचे "द मिस्टिक ऑफ मैसर" हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले होते.
- १९९० मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली होती.
- जागतिक पातळीवरील ज्या ५० लेखकांची यादी बनवण्यात आली होती त्यामध्ये व्ही. एस. नायपॉल हे सातव्या क्रमाकांचे लेखक होते.
- इतर गाजलेली पुस्तके... इन ए फ्री स्टेट (१९७१), ए वे इन द वर्ल्ड (१९९४), हाफ ए लाईफ (२००१) आणि मॅजिक सीड्स (२००४) ई.