Sikkim State Government's 'One Family One Job' scheme

 1. सिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.
 2. मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामधील एका सदस्याला एकतरी सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवित आहे. अश्या प्रकारचा खास कार्यक्रम चालविणारे हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे.
 3. या अनुषंगाने 12 जानेवारीला गंगटोकमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 12,000 हून अधिक बेरोजगार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
 4. सुरूवातीला फक्त त्या कुटुंबांच्या सदस्यांना नियुक्ती पत्र दिले गेलेत, जे सध्या सरकारी नोकरीमध्ये नाहीत. यापूर्वीच 25,000 पेक्षा अधिकांना नोकर्‍या दिल्या गेल्या.
 5. केवळ 6.4 लक्ष लोकसंख्या असलेल्या या राज्यात वर्तमानात 1 लक्ष नियमित सरकारी कर्मचारी आहेत.
 6. शिवाय सिक्किम हे देशातले एकमेव राज्य आहे, जे सरकारी कर्मचार्‍यांना सर्वाधिक वेतन देते.


Brahma Dutt: new chairman of YES Bank

 1. माजी IAS अधिकारी ब्रह्म दत्त यांची यस बँकेच्या (Yes Bank) अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. ही नियुक्ती दि. 4 जुलै 2020 पर्यंत प्रभावी करण्यात आली आहे.
 3. भारतातली चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातली बँक असलेल्या यस बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून ‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’ अन्वये परवानगी प्राप्त झाली आहे.
 4. ब्रह्म दत्त जुलै 2013 पासून स्वतंत्र संचालक म्हणून यस बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत.
 5. शिवाय ते ‘नामनिर्देशन आणि वेतन समिती’चे अध्यक्षही आहेत. त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत कर्नाटक सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक जबाबदार्‍या सांभाळलेल्या आहेत.
 6. त्यांनी पूर्वी मंत्रिमंडळ सचिवालयात तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य पाहिले होते.


'2019 khelo India Games' was announced; Maharashtra tops

 1. दि. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या पुणे शहरात खेळल्या गेलेल्या ‘2019 खेलो इंडिया खेळ’ या क्रिडा महोत्सवाची सांगता झाली.
 2. स्पर्धेअंती:-
  1. पदकतालिकेत अग्रस्थानी महाराष्ट्र राहले.
  2. महाराष्ट्र राज्याने 56 सुवर्ण, 44 रौप्य आणि 56 कांस्यपदकांची कमाई करीत पहिल्या क्रमांकावर स्पर्धा संपवली.
  3. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली (42 सुवर्ण, 27 रौप्य आणि 38 कांस्य) आणि हरियाणा (33 सुवर्ण, 34 रौप्य आणि 36 कांस्य) यांचा क्रमांक लागला.
  4. खो-खोमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या 17 व 21 वषार्खालील गटात विजय मिळविला.
  5. पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने 10 वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत 10 मीटर एयर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. 10 वर्षांच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवण्याची ही पहिलीच कामगिरी आहे.
  6. या क्रिडा महोत्सवात 18 क्रिडाप्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
  7. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, हॉकी, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, कबड्डी,  खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल असे 18 खेळ होते.
 3. ‘खेलो इंडिया’:-
  1. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली.
  2. समाजाच्या अगदी तळागळात बदल करून राष्ट्रव्यापी क्रिडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जानेवारी-फेब्रुवारी 2018 या काळात ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले.
  3. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
  4. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार. क्रिडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रिडा केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले जाणार.
  5. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यासंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले गेले.
  6. शालेय खेळांमध्ये 16 क्रिडा प्रकारांचा समावेश केला गेला होता.


Top

Whoops, looks like something went wrong.