Rio de Janeiro: UNESCO's World Capital of Architecture for 2020

 1. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने 2020 सालासाठी आपली 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली आहे.
 2. UNESCO आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाला संयुक्तपणे सुरूवात केली.
 3. याउपक्रमाच्या अंतर्गत रियो डी जनेरो या शहराची प्रथमच निवड करण्यात आली आहे.
 4. ब्राझिलीया हे राजधानी शहर उभारणार्‍या ऑस्कर निमेयर या प्रख्यात वास्तुकलाकाराची उभी मूर्ती ब्राझील देशात आहे.
 5. UNESCO:-
  1. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
  2. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
  3. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. 
  4. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.


Organizing 15th Pravasi Bharatiya Divas Parishad in Varanasi

 1. ‘प्रवासी भारतीय दिवस 2019’ निमित्त उत्तरप्रदेश राज्याच्या वाराणसी शहरात ‘रोल ऑफ इंडियन डायस्पोरा इन बिल्डिंग न्यू इंडिया’ या संकल्पनेखाली एक परिषद भरविण्यात आली आहे.
 2. दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी सुरू झालेल्या तीन दिवसांच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले.
 3. याशिवाय, तेथे ‘युवा प्रवासी भारतीय दिवस’ हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला.
 4. ‘प्रवासी भारतीय दिन’ भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी ‘9 जानेवारी’ या दिवशी साजरा केला जातो.
 5. दिनांक 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले.
 6. त्यामुळे ही तारीख प्रवासी भारतीय दिन म्हणून निवडण्यात आली.
 7. मात्र या वर्षी (सन 2019) पहिल्यांदाच प्रवासी भारतीय दिवसांचे आयोजन 9 जानेवारीऐवजी 21 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात केले जात आहे.
 8. प्रयागराजमधील कुंभ मेळाव्यात भाग घेण्यास आणि राष्ट्रीय राजधानीत होणारे प्रजासत्ताक दिनाचे पथ संचलन बघण्याची परवानगी देण्याच्या उद्देशाने तिथीमध्ये बदल करण्यात आले.


India is the most trusted nation in the world - the GTI report

 1. दाव्होस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) याच्या वार्षिक बैठकीत ‘2019 एडेलमन ट्रस्ट बॅरोमीटर’ शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला गेला.
 2. या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स’ अनुसार, सरकार, व्यवसाय, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात विश्वासार्ह देशांपैकी एक ठरला आहे, परंतु देशाचे ब्रँड तितकेसे विश्वासार्ह नाहीत.
 3. ‘ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स’ म्हणजे अशासकीय संस्था, व्यवसाय, सरकार आणि प्रसारमाध्यमांमधील सरासरी टक्केवारीत स्पष्ट केलेला विश्वास होय.
 4. अन्य ठळक बाबी:-
  1. या मानांकन यादीत ‘माहिती असलेले जनसामान्य’ आणि ‘सामान्य लोकसंख्या’ या गटांमध्ये चीन हा देश अग्रस्थानी आहे.
  2. भारत माहिती असलेले जनसामान्य गटात दुसरा तर सामान्य लोकसंख्या गटात तिसरा देश ठरला.
  3. प्रत्येक बाजारपेठांमध्ये मुख्यालय असलेल्या कंपन्यांमधील विश्वासाच्या बाबतीत, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि कॅनडा या देशांमधील कंपन्या सर्वात विश्वासार्ह आहेत.
  4. या देशांमधील ब्रँड सर्वाधिक (प्रत्येकी 70 गुण) विश्वासर्ह आहेत, तर याबाबतीत जपानला 69 गुण प्राप्त झाले आहेत.
  5. दक्षिण कोरिया (41), भारत (40), ब्राझील (40), मेक्सिको (36), चीन (36) येथे मुख्यालय असलेल्या कंपन्या सर्वात कमी विश्वासार्ह आहेत.


SEBI proposes to create a commodity index

 1. भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI) ने ‘कमोडिटी एक्सचेंज’ला शेयर बाजारावर आपला इंडेक्स तयार करण्याची परवानगी देण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला आहे, जेथे फ्यूचर्स कॉण्ट्रॅक्ट (बंध) प्रस्तुत केले जाऊ शकतात.
 2. कमोडिटी म्हणजे कच्चा माल किंवा प्राथमिक कृषी-उत्पन्न ज्यांची थेट विक्री केली जाऊ शकते (जसे की तांबा किंवा कॉफी).
 3. तर इंडेक्स म्हणजे लोकांकडून गुंतवणूक करवून घेण्यासाठी संस्था/कंपन्यांद्वारे समभागाच्या रूपात उत्पादने सूचीबद्ध करणे.
 4. प्रस्तावानुसार, इंडेक्समध्ये सूचीबद्ध कंपनीच्या जास्तीत-जास्त 20% मालमत्तेची (कमीत-कमी 1%) येथे गुंतवणुकीच्या उद्देशाने विक्री केली जाणार.
 5. इंडेक्स-आधारित उत्पादने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये म्युच्युअल फंड, विमा कंपन्या इत्यादी संस्थांच्या सहभागास प्रोत्साहित करतील.
 6. तसेच, विचाराधीन काळात समभागाद्वारे केली जाऊ शकणारी सरासरी दैनिक उलाढाल शेतमाल व प्रक्रियाकृत कृषी उत्पादनांसाठी कमीतकमी 75 कोटी रुपये तर इतर सर्व वस्तूंसाठी 500 कोटी रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
 7. भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI)
  1. भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI) हे भारतामधील सिक्युरिटीज (सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने) बाजारपेठेचे नियामक आहे.
  2. 1988 साली या संस्थेची स्थापना केली गेली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी याला वैधानिक दर्जा दिला गेला.
  3. याचे मुंबईत मुख्यालय आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.