Researchers researched the brain area that introduced the speech

 1. संशोधकांनी मेंदूचा असा एक छोटासा भाग ओळखला आहे, जो मानवाला विविध आवाज ओळखण्यास मदत करतो.
 2. जर्मनीमधील मॅक्स प्लांक्स इंस्टीट्यूटमधील संशोधकांनी हा खुलासा केला कि, मानवी मेंदूचा पुढील ‘सुपेरियर टेम्पोरल गायरस (STG)’ नावाचा भाग आवाज ओळखण्यास मदत करतो.
 3. असे आढळून आले आहे की ज्या लोकांच्या प्रामुख्याने उजवीकडील पुढील टेम्पोरल भागाला इजा झालेली असते, त्यांना आवाज ओळखण्यास अडचण होते.
  तुम्हाला हे माहित आहे का?

  पार्श्वभूमी:-

  1. मेंदूची विभागणी चार भागांमध्ये केली जाते:-
   1. दोन पुढील मोठे टेम्पोरल अर्धभाग
   2. दोन मागील छोटे अर्धभाग.
  2. ‘सुपेरियर टेम्पोरल गायरस (STG)’ हा उजव्या बाजूच्या पुढील टेम्पोरल भागाचा एक भाग असतो.
  3. या शोधाचे निष्कर्ष ‘ब्रेन’ नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध केले गेले आहे.
  4. शोधाची प्रक्रिया
   1. संशोधकांनी मेंदूमध्ये जखम असलेल्या रुग्णांची, त्यात प्रामुख्याने आघात (स्ट्रोक) ने प्रभावित रुग्णांचे परीक्षण केले आणि त्यांच्या शिकण्याच्या व आवाज ओळखण्याच्या क्षमतेची तपासणी केली.
   2. सोबतच, संशोधकांनी सहभागी रूग्णांच्या मेंदूचे स्कॅन करून त्यांच्या मेंदूच्या संरचनेच्या आणि त्यांना असलेल्या इजेच्या हाय-रिजोल्यूशन प्रतिमांचे विश्लेषण केले.
   3. या अभ्यासात असे आढळून आले कि, ज्या लोकांना आघाताचा सामना करावा लागला, त्यांच्यात आवाज न ओळखणार्‍या रुग्णांची संख्या अधिक होती.
   4. अश्या लोकांपैकी 9% लोकांना आवाजामधील विविधता ओळखण्यास अडचण होत होती.
   5. त्या निष्कर्षांना उपस्थित अभ्यासातून समर्थित केले गेले, ज्यामध्ये आवाजाचा अंधूपणा (वॉइस ब्लाइंडनेस) “फोनागनोसिया” या आवाज ओळखण्यात अक्षम अश्या आजाराची तपासणी केली गेली होती.


NASA's new 'WFIRST' is creating space telescopes

 1. अमेरिकेची NASA अंतराळात पुढच्या पिढीची दुर्बिण पाठवण्याची योजना तयार करीत आहे, जी विश्वाची व्यापक आणि सखोल अशी प्रतिमा पाठवू शकणार आणि त्याची स्पष्टता ‘हबल’ अंतराळ दुर्बिणीप्रमाणेच असणारआहे.
 2. ‘वाइड फील्ड इंफ्रारेड सर्व्हे टेलीस्कोप (WFIRST)’ नामक ही दुर्बिण वर्ष 2020 च्या मध्यात अंतराळात सोडण्याची योजना आहे.
वाइड फील्ड इंफ्रारेड सर्व्हे टेलीस्कोप (WFIRST)
 1. ही दुर्बिण हबल दुर्बिणीपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा घेऊ शकणार आहे.
 2. हबल प्रमाणेच WFIRST मध्ये बसविलेले 300 मेगा पिक्सल वाइड फील्ड उपकरण आकाशाच्या कोणत्याही भागाची 100 पटीने मोठी प्रतिमा छायाचित्रित करणार आहे.
 3. म्हणजेच हबल दुर्बिणीने पाठवविलेल्या 100 प्रतिमा मिळून WFIRST ची एक प्रतिमा असेल.
 4. याप्रकारच्या प्रतिमेमुळे खगोलशास्त्रज्ञांना विश्वासंबंधी अनेक मोठ्या रहस्यांना समजण्यास मदत होणारआहे.
 5. तसेच कित्येक सिद्धांतापैकी एक असे, खगोलशास्त्रज्ञांचे कल्पित ‘डार्क मॅटर’ बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी WFIRST त्याच्या शक्तिशाली 2.4 मीटर आकाराचे आरसे आणि वाइड फील्ड उपकरणाचा वापर करण्यास सक्षम आहे.

 

तुम्हाला हे माहीत आहे का?

नासा (NASA):-

 1. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन
 2. संयुक्त राष्ट्रसंघाच्या फेडरल शासनाच्या नागरी स्पेस कार्यक्रमासाठी जबाबदार असलेल्या कार्यकारी शाखेची एक स्वतंत्र संस्था आहे
 3. स्थापना:- २९ जुलै १९५८
 4. सध्याचे अध्यक्ष :-रोबर्ट लाईट वूड
 5. संस्थापक : ड्वाइट डी. आयझेनहॉवर
 6. मुख्यालय :- वॉशिंग्टन
 7. Motto- for the benefit of all
 8. नवीन होरायझन्स आणि ग्रेट ऑब्झर्वॅटरीज आणि संबंधित कार्यक्रमांद्वारे बिग बैंगसारख्या खगोल भौतिकी विषयांचे संशोधन करीत आहे.


Triple divorce ban bill passed in the Lok Sabha

 1. नारी सन्मान आणि नारी रक्षण हे या विधेयकाचा उद्देश आहे, असं कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले.
 2. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं तात्काळ तलाक प्रतिबंध विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं.
 3. हे विधेयक देशातील महिलांच्या न्यायासाठी, रक्षणासाठी आहे. नारी सन्मान आणि नारी रक्षण हे या विधेयकाचा उद्देश आहे, असं कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले.
 4. या विधेयकानुसार तात्काळ तलाक देणं बेकायदा ठरणार असून, तसा तलाक देणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
 5. फोन, मेसेज, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा तोंडी बोलून तात्काळ देणं यापुढे अवैध ठरेल.
 6. मुस्लीम महिला (विवाह हक्काचं संरक्षण) विधेयक असं या विधेयकाचं नाव आहे.
 7. सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट महिन्यात तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवलं होतं. तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा तुम्ही आणणार का, आणलात तर ते बरं होईल, असं कोर्टानं सुचवलं होतं.
 8. असदुद्दीन ओवेसींचा विरोध
 9. दरम्यान, या विधेयकाला एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला. या विधेयकामुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होईल, असा दावा त्यांनी केला.
मुख्य बाबी
 1. तात्काळ तिहेरी तलाक विधेयकाचं वैशिष्ट्ये:-
  1. तात्काळ तलाक बेकायदेशीर आणि अवैध होईल.
  2. तात्काळ तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास.
  3. तात्काळ तलाक अजामीनपात्र गुन्हा असेल.
  4. पीडित महिलेला पोटगीचा अधिकार.
  5. मुलांच्या जबाबदाची निर्णय न्यायदंडाधिकारी घेणार.
  6. जम्मू-काश्मीर वगळता सर्व देशात कायदा लागू होणार.
 2. विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी:-
  1. केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील आठवड्यातच या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती.
  2. मुस्लीम महिला (विवाह हक्काचं संरक्षण) विधेयक हे विधेयक सरकारच्या प्राधान्यक्रमावर होतं.
  3. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांनी हे विधेयक तयार केलं आहे.
 3. तात्काळ तलाक शिक्षेच्या श्रेणीत:-
  1. तात्काळ तलाक संविधान, नैतिकता आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधात असून विधेयकात तात्काळ तलाकला शिक्षेच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.
  2. तात्काळ तलाक देणाऱ्यांविरोधात शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. ही शिक्षा वाढवून तीन वर्षांपर्यंत केली जाऊ शकते.
 4. राज्यांकडून उत्तर मागवलं
  1. या विधेयकाचा मसुदा 1 डिसेंबरला सर्व राज्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यांच्याकडून 10 डिसेंबरपर्यंत उत्तर मागवलं होतं.
 5. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध:-
  1. मागील रविवारी या संदर्भात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक झाली.
  2. ज्यात तात्काळ तलाकच्या प्रस्तावित विधेयकावर चर्चा झाली. पण अनेक तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक महिला विरोधी असल्याचं सांगत बोर्डाने ते फेटाळलं.
 6. तिहेरी तलाक आणि तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे काय?
  1. तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे एकाच वेळी तीन वेळा तलाक (तलाक तलाक तलाक) अशी उच्चारणा.
  2. मात्र तिहेरी तलाकमध्ये प्रतीक्षेचा कालावधी येतो.
  3. पहिल्यांदा केलेली तलाकची उच्चारणा आणि घटस्फोटाचा अंतिम निर्णय यामध्ये सर्वसामान्यपणे तीन मुस्लीम महिन्यांचा काळ असतो.
 7. तात्काळ तिहेरी तलाक कसा जारी केला जातो?
  1. पती पत्नीला उद्देशून 'तलाक तलाक तलाक' असं म्हणतो.
  2. बऱ्याचदा रागाच्या भरात किंवा मद्याच्या अंमलाखाली, फोनवर, लेखी तलाकनामा, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर हे बोललं जातं.
 8. विधेयकातील तरतुदी:-
  1. तोंडी, किंवा लेखी तसंच इमेल, एस एम एस आणि व्हॉट्स अॅपद्वारे दिला जाणारा तिहेरी तलाक या विधेयकाद्वारे बेकायदेशीर ठरवला जाणार आहे.
  2. इंस्टन्ट तलाक एक अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा आहे.
  3. अशा प्रकारे तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
  4. प्रस्तावित विधेयकात, पीडित महिला मॅजिस्ट्रेटकडे अल्पवयीन मुलांच्या संरक्षणाची मागणी करू शकते आणि मॅजिस्ट्रेट यासंबंधी मुद्द्यावर अंतिम निर्णय घेतील.
  5. या विधेयकाच्या तरतुदीनुसार, पतीला आपल्या पत्नी आणि मुलांची जबाबदारी टाळता येणार नाही... त्यांना पोटगी आणि भत्ता देणं पतीला अनिवार्य असेल.
  6. याखेरीज दोषी पतीला दंड ठोठावण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
  7. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या एका बेन्चनं तीन तलाक ही परंपरा बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतरही ती सुरूच आहे, अशा प्रकारांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचं या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.
  8. या विधेयकावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं आणि अन्य अल्पसंख्यांक संस्थांच्या म्हणण्यानुसार, हे विधेयक अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचं उल्लंघन करत आहे.

 


Announcement of the Fort Raigad Authority; Yuvraj Sambhaji Raje as president

 1. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या जाचक अटी आणि निधीची चणचण या अडचणींचा दुर्गपंढरी रायगडाला पडलेला वेढा आता उठणार असून, गडाला पुनर्वैभव मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 2. राज्य सरकारने नुकतीच किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा केली असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोल्हापूर गादीचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 3. राज्यभरातील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवभक्तांच्या सहकार्याने रायगड संवर्धन करून गडाला पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
 4. रायगडाशी संबंधित कामांसाठी प्राधिकरणाला विशेष अधिकार देण्यात आल्यामुळे रायगडाच्या जतन संवर्धनाचा मार्ग अधिक सुकर आणि प्रशस्त झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
 5. राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागातर्फे रायगड आणि परिसराच्या पर्यटन विकास आराखडय़ाला नुकतीच मान्यता देण्यात आली.
 6. हा आराखडा बनवताना रायगडाचे जतन, संवर्धन आणि गडपण पणाला लागू नये, अशी दुर्गप्रेमींची अपेक्षा होती.
 7. त्याचा पाठपुरावाही संभाजीराजे यांच्याकडे तसेच त्यांच्यामार्फत सरकारकडे सुरू होता.
 8. या पाश्र्वभूमीवर रायगड प्राधिकरणाची घोषणा झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रायगड प्राधिकरण
 1. खासदार संभाजीराजे छत्रपती या प्राधिकरणाचे अध्यक्ष असून,
 2. कोकणचे विभागीय आयुक्त,
 3. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक,
 4. रायगड जिल्हाधिकारी, सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 5. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक,
 6. राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक,
 7. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमटीडीसीचे अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता हे या प्राधिकरणाचे सदस्य आहेत.
 8. रायगड प्राधिकरणावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात, जयसिंगराव पवार, कोल्हापूरचे दुर्गअभ्यासक भगवान चिले आणि राम यादव यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 


Mother's plan for pregnant women

 1. मातृ पूर्ण ही योजना लवकरच बंद करण्यात येणार असून गर्भवती
 2. महिलांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. याचा महिलांना चांगला फायदा मिळणार आहे.
 3. बेळगाव  शासनाने गर्भवती महिलांसाठी आणि बाळंतणीना लागू करण्यात आलेली मातृपूर्ण योजना बंद करण्यात येणार असून याठिकाणी मातृवंदना ही योजना 1 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.
 4. प्रत्येक गर्भवती महिलेला तिच्या पहिल्या बाळंतपणाला शासनाकडून पाच हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे.
 5. त्या महिलेच्या बॅंक खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.
 6. गर्भवती महिला व बाळंतणीच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने गेल्या चार महिन्यापासून मातृपूर्ण योजना सुरु केली आहे. पण, या योजनेचा लाभ घेण्याकडे महिलांनी पाठ फिरवली आहे.
 7. अंगणवाडीत जाऊन पौष्टिक जेवण जेवण्याचे लाभार्थीनी नापसंत केले आहे. तर महिलातून जेवण देण्याचे बंद करा अशी मागणी होती आहे.
 8. याचाच विचार करून शासनाने मातृवंदना ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 9. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा महिलांना अधिक फायदा होणार आहे.
 10. त्याचबरोबर मातृपूर्ण योजनेच्या माध्यमातून होणारी अन्नाची नासाडी हे रोखली जाणार आहे.
 11. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती पडलेला कामाचा भारही कमी होणार आहे.
 12. जिल्हा पंचायत तालुका पंचायत, तालुका पंचायत आणि प्रत्येक ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मातृपूर्ण योजनेसंदर्भात महिलांतून विरोध होत आहे. महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा होत आहे.
 13. प्रत्येक बैठकीमध्ये जेवण नको पैसे द्या, अन्यथा ड्रायफ्रूट द्या. अशी मागणी केली जात आहे. याचा विचार शासनाने घेतला असून महिलांना यापुढे त्यांच्या बॅंक खात्यावर शासनाकडून थेट पाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
 14. केवळ महिलेला पौष्टीकर आहार घेण्यासाठी आणि त्यापासून बाळही सदृढ होण्यासाठीच हे अनुदान शासनाने देण्याचा निर्णय घेतला आहे.


International Film Award for Just One More Day

 1. भारतीय वंशाचे अमेरीकेतील हौशी चित्रपट निर्माते पुनम आणि आशिष सहस्त्रबुध्दे या दांम्पत्याने चित्रपट क्षेत्रात केलेले पदार्पण चांगलेच यशस्वी ठरले आहे.
 2. जस्ट वन मोअर डे या त्यांच्या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळविले आहेत. 
 3. लॉस एंजलिस आणि न्युयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'जस्ट वन मोअर डे' या चित्रपटाने स्थान मिळविले आहे.
 4. विशेष म्हणजे त्यांच्या या यशात त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रिषी याचा मोलाचा सहभाग आहे.
 5. त्याला या चित्रपटातील निक या रोलसाठी लॉस एंजलिस चित्रपट महोत्सवात बेस्ट यंग अॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. 
 6. या चित्रपटात एका लष्करी कुटूंबाची कथा सांगितली आहे.
 7. या लष्करी कुटूंबाच्या आयुष्यातील भावनिक रोलर कोस्टरवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.
 8. पुनम सहस्त्रबुध्दे यांनी चित्रपटाविषयी सांगितले, 'जेव्हा आम्ही पहिल्यांदा या चित्रपटासाठी नियोजन करण्यास सुरवात केली, तेव्हा हा प्रोजेक्ट आम्हाला जवळजवळ अशक्य वाटला.
 9. सहस्रबुद्धेने यांनी 'थिंक ग्रँड फिल्म्स' याआपल्या स्वत:च्या कंपनीच्या माध्यमातून चित्रपटासाठी भांडवल उभे केले. कंपनीचे काम आणि मुलांच्या शाळा यांकडे आठवडाभर लक्षं केंद्रीत करायला लागायचे त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाचे बहुतेक शूटिंग झाले.
 10. जानेवारी 2016 मध्ये चित्रीकरण सुरु झाले. या चित्रपटाद्वारे आपल्या आयुष्यातील संपूर्ण जगभरातील खरे नायक म्हणजेच लष्करी जवान आणि त्यांचे कुटूंबिय यांना वंदन करणे हे आमचे ध्येय आहे.'
 11. आशिष सहस्त्रबुध्दे यांनी, चार दिवस सासुचे आणि समांतर (ईटिव्ही मराठी), दामिनी (दुरदर्शन), यह दिल क्या करे (झीटिव्ही), अफलातून (सब टिव्ही) या टिव्ही शोज् साठी काम केले आहे.   


Bitcoin's first-ever mobile app deal in India

 1. १० आकडी मोबाइल क्रमांकाचा पिन म्हणून वापर करावा
 2. कोणत्याही नियामकाचे नियंत्रण नसलेल्या मात्र भरधाव मूल्यतेजी आणि मागणीने चर्चेत राहिलेल्या बिटकॉइन या आभासी चलनाचे आता भारतात प्रथमच मोबाइल अ‍ॅपद्वारे व्यवहार होणार आहेत.
 3. प्लुटो एक्स्चेंजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी भारत वर्मा यांनी याबाबतची घोषणा गुरुवारी नवी दिल्ली येथे केली.
 4. मोबाइल अ‍ॅपवर आधारित वॉलेटच्या माध्यमातून आभासी चलनाचे व्यवहार करता येतील; यासाठी १० आकडी मोबाइल क्रमांकाचा पिन म्हणून वापर करावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले.
 5. याद्वारे बिटकॉइन या आभासी चलनाची खरेदी, विक्री तसेच या चलनाद्वारे काही निवडक आर्थिक व्यवहार करता येतील, असे वर्मा यांनी सांगितले.
 6. सध्या मोबाइलद्वारे व्यवहार करावयाचे झाल्यास संकेतस्थळाच्या माध्यमातून चार आकडी पिनचा उपयोग केला जातो.
 7. बिटकॉइन व्यवहारांसाठी गेल्या दोन वर्षांत भारतात १५ हून अधिक मंच तयार झाले आहेत. मात्र प्लुटोच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे प्रथमच व्यवहार होऊ शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 8. चालू महिन्यात बिटकॉइनचे मूल्य १३,००० डॉलपर्यंत गेल्याने आभासी चलन विशेष चर्चेत आले.
 9. या आभासी चलनाबाबत सावधगिरी बाळगून व्यवहारकर्त्यांनी स्वत: जोखीम बाळगावी, असे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेनेही केले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.