
1384 06-Jan-2019, Sun
- नवीन आंतरराष्ट्रीय वाद प्रकरणामधील तंटा सोडविण्यासाठी, दि. 4 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र विधेयक-2018’ संमत करण्यात आले आहे.
- या विधेयकामार्फत नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय तंटा निवारण केंद्र (International Arbitration Centre) याची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे.
- भारत सरकारने देशाला तंटा निवारण प्रक्रियेबाबत एक केंद्र बनविण्याचा उद्देश्य ठेवला आहे.
- भारत देशात संस्थात्मक तंटा निवारणासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्र (International Centre for Alternative Dispute Resolution -ICADR) याच्या उपक्रमांच्या संपादन आणि हस्तांतरणासाठी एका स्वतंत्र आणि स्वायत्त जागतिक दर्जाच्या न्यायधिकरणाची स्थापना करण्याचा प्रयत्न करीत आहे.
- आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्र (ICADR) सर्वोच्च न्यायालयाच्या अधीनतेखाली कार्य करीत आहे, ज्याची सन 1995 मध्ये स्थापना करण्यात आली.
- भारताचे मुख्य न्यायाधीश या केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
- हे केंद्र तंटा निवारण प्रक्रियेच्या वातावरणामध्ये सक्रियपणे कार्य करीत नाही आहे.
- त्यामुळे नवे केंद्र ICADRच्या उपक्रमांची जबाबदारी आपल्याकडे घेणार आहे.