
3186 22-Apr-2019, Mon
1. देशात आपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमाकांवर घसरण झाली असली तरी राज्याने एकूण ९ हजार ३०० मेगावॅट
इतकी वीज निर्मितीची क्षमता गाठली आहे.
2. पाच वर्र्षांपुर्वी अक्षय ऊर्जा निर्मिती केवळ ५ हजार १७२ मेगावॅट होती. ती दुपटीहून वाढली आहे. मात्र शहरी घनकचऱ्यापासून वीज
निर्मिती करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अजूनही चाचपडतच आहे.
3. अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये देशात कर्नाटक, तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. आधी महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी होते.
4. राज्याची अक्षय ऊर्जा निर्मितीची संभाव्य क्षमता ७४ हजार ५०० मेगावॅटपर्यंत आहे. पूर्ण क्षमता गाठण्यासाठी अजूनही बराच मोठा पल्ला
गाठावा लागणार आहे.
5. पवनऊर्जा, सौर ऊर्जा, लघु जलविद्युत आणि सहवीजनिर्मिती या क्षेत्रात राज्याने गेल्या काही वर्षांत भरीव कामगिरी केली आहे.
6. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या बाबतीतही महाराष्ट्र पिछाडीवर आहे. राज्यात सौर ऊर्जा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. सौर फोटोव्होल्टाईक आणि
सौर औष्णिक तंत्रज्ञानाच्या आधारे वीज निर्मिती करता येऊ शकते.
7. भारताची नूतनशील ऊर्जा निर्मितीची संभाव्य क्षमता ८ लाख ९६ हजार ६०२ मेगावॅट आहे. राज्यात २००४ मध्ये तर केवळ ७४८ मेगावॅट इतकी वीज निर्मिती अक्षय ऊर्जेतून केली जात होती. पवन ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी राज्यात ४० ठिकाणे उपयुक्त आहेत.